दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - तनिषा भिसे मृत्यू प्रकरण

Submitted by भरत. on 8 April, 2025 - 02:37

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अ‍ॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.

डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.

१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.

२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.

रुग्णालय कर्मचार्‍यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?

--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक

सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
deenanath.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा घैसास यांचं फेसबुक प्रोफाइल पाहिलं. राजनाथ सिंग, उ प्र चे मुख्यमंत्री, श्री व सौ फडणवीस. मेधा कुलकर्णी , सुमित्रा महाजन अशा अनेक नेत्यांना भेटतात, त्यांच्यासोबतचे फोटो / व्हिडियो आहेत. दो धागे श्रीराम के नाम वाल्या याच.

मधे हिंजवडी ला काही कामानिमित्त जाणे झाले त्यावेळेस ते सुर्या हाॅस्पिटल दिसले. एकतर तिथे पोचायचा सर्विस रोड मेट्रो च्या कामामुळे खड्डे झालेला आहे. परत आत वरून हाॅस्पिटल परेंत पोचायचा रस्ता पण नीट नाहीये.
ईतक्या अडनेडी दवाखान्यात का नेले असेल घरच्यांनी ?

बातमीत धर्मादाय रुग्णालय , डिपॉझिट इत्यादि गोष्टींबद्दलही आहे. त्यामुळे दंडाचा संबंध या गोष्टींशी असावा.

हा जो काही गचाळ ID आहे....बहुतेक पुण्याचा भूगोल माहित नाही तुम्हाला . दिनानाथ पासून ससून.... तिथून वाकड दिनानाथ ते ससून या प्रवासात किमान 10 अत्याधुनिक हाॅस्पिटल आहेत. रास्ता पेठेतल KEM सुधा neonatal चांगल्या ऊपचारासाठी प्रसिद्ध आहे.
गर्भवती ची अवस्था ठीक नसताना 50 किमी कोण फिरतं ?

प्राजक्ता कागदे, तुम्ही "चौकशी समित्यांमध्ये मला सामील करून घ्या, " असा अर्ज त्या समित्यांना किंवा देवाभाऊंना पाठवा.

दीनानाथ मधून ससून ला गेले पण तिथे डिलिव्हरी नंतर कशी काळजी घेतली जाईल याबद्दल शंका वाटली त्यामुळे तिथून ते दुसऱ्या हॉस्पिटल ला गेले पण त्या हॉस्पिटलमध्ये नेमके त्या क्षणी हृदयरोगतज्ज्ञ (or some specialist in ssuch surgery wasnt available since it was complicated delivery with tweens at 7th month )तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे, सूर्याहॉस्पिटल ला गेले तिथे योग्य ते तज्ज्ञांची टीम उपलब्ध होती त्यावेळेस आणि तिथे डिलिव्हरी झाली.

दीनानाथला अशा सर्व सुविधा होत्या पण तिला तिथे ऑपरेट केले नाही. हेच सत्य.

दीनानाथ मध्ये नवीन बिल्डिंग धर्मदाय च्या अंतर्गत येते का?
मोठ्या अमाऊंटच्या मेडिक्लेम पॉलिसी असलेल्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही असा एकंदरीत अंदाज आहे.

हो भरत पाठवलाय अर्ज पण आधीच भरत हे तिथे असल्यामुळे तुम्हाला घेता येत नाही असा निरोप आलाय

प्राजक्ता कागदे, तुमच्या आकलनक्षमतेबद्दल आणि विचारक्षमतेबद्दल पूर्ण आदर ठेवून लिहितो आहे. मी या धाग्यावर शंका विचारलेल्या नाहीत. अमुकने असंच का केलं, तसं का केलं नाही? असं विचारलं नाही. हा खोटं बोलतोय, तो माहिती लपवतोय, असं म्हटलं नाही.

जास्तीत जास्त ऑथेंटिक माहिती मिळवून तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. याचसाठी न्युज चॅनेल्सच्या व्हिडियोकडे दुर्लक्ष केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं म्हणणं ही समजून घेतलं.
उलट भिसे कुटुंबियानी केलेल्या आरोपांच्याही अनेक बातम्या होत्या. त्यातून चौकशीत काय ते समोर येऊ दे, म्हणून त्यांच्याकडेही विशेष लक्ष दिलं नाही. जर चौकशीत भिसे कुटुंब दोषी आढळलं, तर तेही मी इथे लिहेन.

याउलट चौकशी समित्यांनी जिथे दीनानाथ आणि डॉ घैसासांना जबाबदार ठरवलंय त्या गोष्टींकडेही साफ दुर्लक्ष करताय. डिपॉझिटची मागणी करणं ही चूक होती, हे दीनानाथनेही स्वीकारलं. तेही तुम्हांला पटत नाही. इतकंच नव्हे, तर पैशाची सोय होत नसेल तर रुग्णाला ससून मध्ये घेऊन जा, असं एका धर्मादाय रुग्णालयाने सांगणं चूक आहे, हेही तुम्हांला मान्य नाही.

इथे अन्य सदस्याने लिहिलं होतं की भिसे कुटुंबाचीही चौकशी व्हायला हवी. माता बाल मृत्यू अन्वेषण समितीने त्यांचीही चौकशी केली. इतर इस्पितळांचीही केली. त्यांनी दिलेल्या अहवालात या कोणावर ठपका ठेवल्याची बातमी मिळाली नाही.तरीही तुम्ही तोच हेका धरून बसताय.

बातम्यां मधले फॅक्ट्स दुर्लक्षित करून तुम्ही आधीपासून तुमच्या डोक्यात भरलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा लिहिताय, त्यामुळे तुमच्यावर वेळ घालवावा लागला.

आता (पुन्हा) लिहिलेले मुद्देही तुम्हांला मान्य व्हावेत, अशी अपेक्षा नाही.

मी सुद्धा युट्युब व्हिडिओ पाहूनच माहिती घेतली.
घैसाच बद्दल बोलायचे तर त्यांनी बाळाला ऍडॉप करा असे सांगितले होते
पण त्यांनीच बायकोच्या आयव्हीएफ सेंटर मध्ये जाण्यास सांगितले. तिथे हे कुटुंबीय गेले पण ती सुविधा तिथे त्यांना अननुभवी वाटली. म्हणून त्यांनी इंदिरा ivf मध्ये प्रयत्न केले.

शिवाय जेव्हा पत्नीला वेदना होत होता तेव्हा ते योग्य ठिकाणी आले होते दीनानाथला. त्यांची हिस्टरी जिथं डॉक्टरांना ठाऊक होती.

पेशंटच्या पुढे तीन चार लाख खर्च येईल अशी कल्पना डोक्यात असताना ...यांनी वीस लाख आकडा सांगितला
आणि त्रास अजूनच वाढला. शिवाय घैसास म्हणाले डिलिव्हरी करण्या इतपत इमर्जन्सी सिच्युएशन नव्हती तर मग प्रत्येकी बाळाला दहा लाख रुपये खर्च होईल असे का सांगितले.
त्यांनी त्या पेशंटला त्या क्षणी काय ट्रीटमेंट दिली
तर जुनी औषधं खा म्हटले आणि ससून ला जा म्हटले.
त्यांचं चुकलं असं म्हटलं तर काही लोक विनाकारण जात मध्ये घेतायेत.

डिपॉझिटची मागणी करणं ही चूक होती. >> या एका छोट्या चुकीमुळे आता डॉ.घैसास यांना आयुष्यातून उठवणार, असा माझा अंदाज आहे.

होय, पण कॉन्सिक्वेन्सेस प्रमाणातच हवेत. घैसास यांनी 'दहा लाख भरा नाही तर अ‍ॅडमिट करून घेणार नाही' असे सांगितले होते असे निर्विवाद पणे सिद्ध होत नाही. शिवाय पेशंट व नातेवाईकांचे त्या नंतरचे वागणेही याच्याशी सुसंगत नाही. केवळ 'डिपॉजिट दहा लाख' असे लिहिले म्हणून इतर कोणाशीही काहीही घासाघीस किंवा विनवणी न करत ते निघून जातात हे पटणे अवघड आहे. आता खरे तर लोकक्षोभ होऊ नये म्हणून घैसास यांच्यावर एफ आय आर केला आहे.

विकु+१००.

भिसे कुटुंबीय सकाळी ९ ते दुपारी २:३० वाजेपर्यंत दीनानाथच्या कॅफेटेरिया मधल्या वेग वेगळ्या पदार्थांच्या चवी पाहत होते. आधी ब्रेकफास्ट मग लंच. वेगवेगळ्या लोकांना , अगदी मंत्रालयात फोन करून इथे कोणते पदार्थ चांगले मिळतात तेही विचारत होते. त्यांना ब्रेकफास्ट मधले पोहे आणि इडली आवडले नाहीत, हे त्यांनी डीन केळकरांना ते ऑपरेशन करत असताना डिस्टर्ब करून सांगितलं. डॉ केळकरांनी तुमच्यासाठी ढोकळा आणि फाफडा जलेबी ठेवू असं सांगितलं, तरी ते पेशंटला घेऊन दीनानाथमधून बाहेर पडले.
ही माहिती दीनानाथच्या मोठ्या प्रेस नोटमध्ये (पहिल्या पानावरचा जिज्ञासा यांचा प्रतिसाद) आणि केळकरांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आहे.

पुढे ते वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या कॅफेटेरियातील पदार्थ चाखत फिरले. सूर्यातले पदार्थ आवडल्याने त्यांनी तनिषा भिसे यांना सूर्यामध्ये अ‍ॅडमिट केले.

विकु
म्हणतात ना "अजापुत्रं बलिं दद्यात."
Politically correct.
इतर कोणाशीही काहीही घासाघीस किंवा विनवणी न करत ते निघून जातात हे पटणे अवघड आहे.>>> डॉक्टर केळकर भाजीवाली बरोबर मेथीच्या जुडीबद्दल घासाघीस करत होते. तेव्हड्यात फोन आला. त्यांनी काहीतरी सांगितले. आणि पुन्हा भाजीवाली बरोबर घासाघीस करू लागले. पण भिसेंनी कुणालाही ते सांगितले नाही की मला डॉक्टर केळकर असे असे बोलले. कदाचित सांगितले असेलही, तेव्हा त्याना असे उत्तर मिळाले असेल की "हम्म केळकर बिलकर कुच्छ नही जाणते."
भाई साब अब तो छोडो.

हा एकमेव धागा आहे जो पहिल्यापासून फॉलो केला आहे. या आधीचे शंभरच्या वर प्रतिसाद असलेले धागे अधले मधले प्रतिसाद स्किप करून वाचले आणि प्रतिसाद लिहीला (नंतर खोडून टाकला) तरी नंतरच्या प्रतिसादात मागचे उल्लेख आल्याने बरं झालं खोडला असे व्हायचे.

इथे काही जणांचे तसे होताना पाहून आठवलं. पुन्हा तेच तेच प्रतिसाद लोक देत नाहीत आणि आपल्याला वाटतं कि आपल्याला इग्नोर करताहेत.

स्वाती_आंबोळे
Not guilty unless proven.
मिडीया ट्रायल म्हणजे काय हे हा धागा वाचून समजते.
वो करे वो मिडीया ट्रायल. हम करे वो...
डॉक्टर घैसास ह्यांच्यावर FIR झाला. दिनानाथ ला दंड झाला. मग आता धाग्याचे प्रयोजन काय ? अजून किती दिवस धागा चालू ठेवायचा.?का अजून काही अजेंडा उरला आहे?

मी हा धागा फॉलो करत आहे.
भरत आणि रानभूली यांनी अनेक एकांगी पोस्ट्सना व्यवस्थित प्रतिसाद दिले आहेत, काय काय घडले, केळकरांनी काय म्हटले, दीनानाथ रुग्णालयाने स्वतः काय स्वीकारले इत्यादि तर अनेकवेळा लिहिले आहे.
तरीही तेच तेच सुरू आहे.

>>तरीही तेच तेच सुरू आहे.<<
कारण काहिंना अजुनहि हे मान्य (अथवा मान्य करुन घायचं) नाहि कि दिनानाथ मधेच त्यांच्यावर उपचार झाले असते तर पुढचा घटनाक्रम टाळता आला असता. पुढे विक्टिमलाच आरोपीच्या कठड्यात उभं करणं हे माझ्यातरी आकलना पलिकडचं आहे...

प्रश्न? मी कुठे प्रश्न विचारले आहेत.
कोर्टात जे काय व्हायचे ते होईल. एव्हढेच मला म्हणायचे आहे. कोर्टाचा निकाल यायला कित्येक वर्षे लागतील. तो पर्यंत आपण थांबूया.

ओ सॉरी.
तो प्रश्न धागाकरते श्री भरत भाऊ ह्यांच्या साठी होता.
गैरसमज नसावा.

Pages