पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.
डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.
१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.
२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.
रुग्णालय कर्मचार्यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?
--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक
सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
१० एप्रिलच्या लोकसत्तेच्या
१० एप्रिलच्या लोकसत्तेच्या पुणे आवृत्तीत ही बातमी आहे. - पुण्यात वर्षभरात ७० मातामृत्यू.
त्यात मातांचे शिक्षण, आर्थिक स्तर, रुग्णालयात यायला विलंब झाला का यानुसार आकडेवारी आहे.
>>The MDA uses the ‘three
>>The MDA uses the ‘three delays’ model — delay in seeking medical care, delay in reaching a hospital, and delay in receiving proper treatment... ...Besides, this death cannot be attributed to any of the delays stated in the MDA,” she said.<<
आयॅम स्पीचलेस...
काही नेते आता तर मंगेशकर
काही नेते आता तर मंगेशकर कुटुंबीयांनाच दूषणं देऊ लागले आहेत. वैद्यकीय सेवेत त्यांचा काय सहभाग? ज्यांना वाटतं किंवा ऐकून ठरवतात की हे हॉस्पिटल चांगले नाही ( उपचार किंवा बिलांच्या बाबतीत) त्यांनी तिकडे जाऊच नये. इतर ठिकाणी जाऊन उपचार देतील ते करून घ्यावेत.
बाकी
१. या हॉस्पीटलची नोंदणी कशी आहे? खाजगी का धर्मादाय?
२. No profit organisation आहे का? रुग्णांकडून आलेल्या पैशांचा विनियोग वैद्यकीय सेवा देण्यातच खर्च होतो का?
ताळेबंद कोणत्या प्रकारचा आहे?
३. कर्मचाऱ्यांचा पगार, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवेकरी यांचे मानधन, इमारत सुरक्षा, यंत्रांची खरेदी आणि देखभाल, स्वच्छता यावर अधिक पैसे लागत असतील तर रुग्णांकडूनही अधिक रक्कम घेतली जाणार.
हे सामान्य माणसास कसे समजणार?
https://www.dmhospital.org
https://www.dmhospital.org/about-hospital
Deenanath Mangeshkar Hospital & Research Center is a charitable, multi-specialty hospital located in the heart of Pune, India. Founded in 2001, today it is one of the largest hospital in Pune, with 800 beds. Deenanath Mangeshkar Hospital offers state-of-the-art diagnostic, therapeutic and intensive care facilities in a one-stop medical center.
Vision
"To provide Rational Ethical Medical Services of Highest Quality to all Patients at affordable cost without any discrimination.
Mission
"To provide competent, ethical, tertiary healthcare services with charity as a core value."
Core Values
Patient-centric Care
Rational & Ethical Medical Practice
Holistic Approach
Charity
आर्थिक दृष्ट्या दुर्बल
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावे यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही. तेव्हा सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, त्यानुसार असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाने आयुक्त, धर्मादाय यांच्या कार्यालयाला दिले.
"सर्व धर्मादाय रुग्णालयांनी
"सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, त्यानुसार असलेल्या सुविधा, नियमावली यांची माहितीही लावावी"
राज्य महिला आयोगाचा स्तुत्य निर्णय 👍
ज्यांना वाटतं किंवा ऐकून
ज्यांना वाटतं किंवा ऐकून ठरवतात की हे हॉस्पिटल चांगले नाही ( उपचार किंवा बिलांच्या बाबतीत) त्यांनी तिकडे जाऊच नये. >>> थोडक्यात तुमच्या भागात चोर्या होऊ लागल्या तर घर सोडून जावे.
सगळ्या चर्चेत एक गोष्ट निसटून
सगळ्या चर्चेत एक गोष्ट निसटून जातेय असे वाटले.
भारतात उपचारांचे खर्च किती वाढले आहेत ते.
मेडिकल ट्रीटमेंट मध्ये inflation रेट खूप जास्त आहे.
समजा 20 लाख रु असेल ट्रीटमेंटसाठी
तर गरीब सोडा ज्याचा 2 ते 5 लाखाचा इन्शुरन्स आहे तो संपून बचत, इन्व्हेस्टमेंट्स सगळे मोकळे होईल.
मी खरं तर राजकारणी धाग्यांवर
मी खरं तर राजकारणी धाग्यांवर प्रतिसाद देत नाही. आणि हो हा राजकारणी धागाच आहे कारण इथे आणि त्या ज्या बातम्या येत आहेत त्यांत पण - कोणाला ती आई गेली याची चिंता दिसत नाही. इथे फक्त मला एकच अजेंडा दिसतो की दीनानाथची बदनामी. या धाग्याचे नाव सुद्धा दीनानाथ ने सुरू होते. बाकी आम्हाला कशाची पर्वा नाही - फक्त दीनानाथ बदनाम झाले पाहिजे.
धनी +१
धनी +१
काल तर मन्गेशकराना लूटारुची टोळी अस प्रमुख विरोधी पक्षानेच सबोधल...रियली??? आणी वर ते बरोबरच आहे हे ठरवण्याचा आटापिटाही काही चॅनेल करताना दिसली.
मंगेशकर कुटुंबीय भाजपच्या
मंगेशकर कुटुंबीय भाजपच्या जवळचे आहे म्हणूनच विरोधी पक्षाने आरोप केला असेल.
आज पुन्हा या प्रकरणासंबंधीची
आज पुन्हा या प्रकरणासंबंधीची बातमी लोकसत्तेत पहिल्या पानावर आहे.
मुंबई आणि पुणे आवृत्तीतील बातम्यांत थोडा फरक आहे.
मुंबई आवृत्ती
डॉ. घैसास यांना दिलेल्या नोटिशीवर संघटनांचे आक्षेप
पुणे : गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करणारे डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने नोटीस बजावली. या नोटिशीवर भारतीय वैद्याक संघटनेच्या (इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमए) राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या (एमएमसी) माजी अध्यक्षांनी रविवारी आक्षेप नोंदविला.
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रूघवानी यांनी गर्भवतीच्या मृत्युप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली होती. या नोटिशीला रुग्णालयाने दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे डॉ. रूघवानी यांनी डॉ. घैसास यांना नुकतीच नोटीस बजावली. याबाबत भारतीय वैद्याक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचारास प्राधान्य देणे आवश्यक आहे. अनामत रक्कम मागण्याचे धोरण रुग्णालयाने आखून दिलेले असते. त्या धोरणाचे पालन तिथे कार्यरत डॉक्टरांकडून केले जाते. त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाला विचारणा करायला हवी. डॉ. घैसास यांना बजाविलेली नोटीस चुकीची आहे.
पुणे आवृत्ती
पुणे : गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर भारतीय वैद्याक संघटनेच्या (इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमए) राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या (एमएमसी) माजी अध्यक्षांनी रविवारी आक्षेप नोंदविला.
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रूघवानी यांनी ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्युप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली होती. या नोटिशीला रुग्णालयाने दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे डॉ. रूघवानी यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांना नुकतीच नोटीस बजावली. नोटिशीला उत्तर देण्यास डॉ. घैसास यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली. याबाबत भारतीय वैद्याक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष (पान ४ वर)
डॉ. घैसास यांना पाठवलेल्या नोटिशीवर प्रश्नचिन्ह
(पान १ वरून)
डॉ. दिलीप भानुशाली म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. रुग्णाकडून अनामत रक्कम मागण्याचे धोरण रुग्णालयाने आखून दिलेले असते. त्या धोरणाचे पालन तिथे कार्यरत डॉक्टरांकडून केले जाते. त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाला विचारणा करायला हवी. महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने डॉ. घैसास यांना बजाविलेली नोटीस चुकीची आहे.’
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, ‘एखाद्या रुग्णाच्या उपचारात निष्काळजी केली असेल तर परिषद संबंधित डॉक्टरला नोटीस बजावू शकते. याचबरोबर एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरविरोधात तक्रार केल्यास नोटीस बजावण्यात येते. या प्रकरणी डॉक्टरांनी उपचारच केले नसल्याने निष्काळजीपणा केल्याबद्दल स्वत:हून परिषदेने नोटीस पाठविणे अप्रस्तुत आहे. केवळ रुग्णालयाच्या प्रतिसादावर आणि माध्यमांतील बातम्यांवर विसंबून राहून, अशा प्रकारची नोटीस परिषदेला बजावता येत नाही.’
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेला एखाद्या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन नोटीस बजाविण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात वैद्याकीय निष्काळजीची शक्यता समोर आल्याने नोटीस बजावली आहे. आम्ही केवळ डॉक्टरांकडून स्पष्टीकरण मागवले असून, त्यांच्यावर ठपका ठेवलेला नाही.
- डॉ. विंकी रूघवानी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्याकीय परिषद
डाॅक्टर भानुशाली यांचे म्हणणे
डाॅक्टर भानुशाली यांचे म्हणणे पटते.. ऊपचार केले नाहीत तर हलगर्जीपणा कसा होऊ शकेल?
तसेच जो रिपोर्ट NDTV वर सादर केला गेला त्यात कुटुंब मान्य करते आहे की दिनानाथ ला नेताना Emergency नव्हती ..
मयत बाई चे कुटुंब फारच लपवाछपवी करतय अस वाटतय..
दीनानाथचे अधिष्ठाता म्हणतात
दीनानाथचे अधिष्ठाता म्हणतात राहुकेतू आले आणि डॉ घैसासांनी डिपॉझिट मागितलं ती पूर्णपणे डॉक्टर घैसासांची चूक असं रुग्णालय म्हणते आहे.आता डॉक्टरांची संघटना म्हणते की डिपॉझिट मागणं हे डॉक्टरचं काम नव्हे. म्हणून त्यांना नोटिस देऊ नका. अगदी रुग्णालयाच्या प्रतिसादावर सुद्धा नको. ( आता त्या मृत मातेला आणि तिच्या कुटुंबालाच दोष देणारी मंडळी डॉ घैसास आणि दीनानाथ रुग्णालय यांच्यापैकी कोणाच्या मागे उभे राहणार? )
याशिवाय डिपॉझिट मागणं चूक नाही, असंही IMA ने म्हटलंच आहे
मग ते धर्मादाय इस्पितळाचं काय झालं? इस्पितळाकडे काही कोटी रुपये गरीब रुग्णांच्या उपचारासाठी शिल्लक होते , त्याचं काय?
बरं. पुणे मनपाने रुग्णाच्या नातलगांचीही चौकशी केली. इतर इस्पितळांचीही चौकशी केली. तिची लग्नापासूनची मेडिकल हिस्टरी तपासली. म्हणजे कॅन्सर, आय व्ही एफ इ. सगळ्या गोष्टी पाहिल्या. मृत्यूच्या कारणांत जसा दीनानाथने निष्काळजीपणा केल्याचा उल्लेख आलाय असं दिसत नाही, तसंच रुग्णाने वेळेवर इस्पितळात न येणं , IVF करून जिवावरचं दुखणं ओढवून घेतलं, असंही म्हटल्याचं दिसत नाही
भरत हे वरचे स्टेटमेंट कुठे
भरत हे वरचे स्टेटमेंट कुठे वाचायला मिळतील ? मुख्य आलेला रूग्ण सवलतीच्या ऊपचारासाठी पात्र आहे का हे ठरवायला काहतरी वेळ लागेल ना ?
Neonatal care चॅरिटी मध्ये करता येते का खासगी ईसापितळात हे पण बघायला हवय.
बघा बघा
बघा बघा
बातम्या शोधा . लोकसत्ता ईपेपर
त्या सवलतीच्या उपचाराला पात्र होत्या हे पहिल्या चौकशी समितीच्या अहवालाताच आलं आहे. ( त्यांना या आधीही तिथेच सवलत मिळालीही होती ) या धाग्याच्या पहिल्या पानावरच्या माझ्या प्रतिसादात बातमीची लिंक दिली होती . पुढच्या एका प्रतिसादात सगळा मजकूरही डकवला आहे.
तुम्ही इस्पितळाच्या वतीने चौकशी समितीच्या अहवालाला आव्हान देऊ शकताच
< मुख्य आलेला रूग्ण सवलतीच्या ऊपचारासाठी पात्र आहे का हे ठरवायला काहतरी वेळ लागेल ना ?> ते २-३ लाख रुपये भरायला तयार होते. तेवढात वेळ मिळाला असता. शिवाय ते म्हणत होते, आता एवढे आहेत, आणखी पैसे जमवायला वेळ लागेल. हेही इथल्या दीनानाथ समर्थकांना मान्य नाही. IVF करायला पैसे होते, म्हणजे दहा लाख अंगावर घेऊनच फिरायला हवं त्यांनी.
तसंच १०-२० लाखांची गरज लगेच होती का? डिलिव्हरी कधी होणार तेही नक्की नव्हतं . तरी अर्भकांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायचे पैसे आधीच हवे होते?
त्यांना ससूनमध्ये जा असंही सांगितलं होतं का? मग न सांगता गेले असं नंतर का म्हटलं?
पहिली चौकशी समिती तातडीची स्थिती होती, असं म्हणते. अशा वेळी दुसर्या रुग्णालयात पाठवताना अँब्युलन्सने पाठवणे ही त्या इस्पितळाची जबाबदारी असते. इथे त्यांना अॅडमिट करून घेतलंच नव्हतं, म्हणून नियम लावू नका म्हणाल. पण मग न सांगता गेले असंही म्हणू नका.
सूर्या इस्पितळात भिसेंची मेडिकल हिस्टरी लपवून ठेवली हे दीनानाथला कसं कळलं? त्यांनी प्रेस रिलीजमध्ये सुद्धा ही मेडिकल हिस्टरी लिहिली आहे. दोन्ही ठिकाणी गोपनीयतेचा भंग झाला.
आपसातले संबंध लोकांनी बिघडवू
आपसातले संबंध लोकांनी बिघडवू नयेत. पण एखाद्या संस्थेच्या मागे फर्स्ट हॅण्ड माहिती नसताना का उभे रहावेसे वाटत असेल ?
अशा घटना सर्रास घडतात. एक डॉक्टर कुटुंब पोलिसांना चकवा देत देशभरात फिरत होतं. त्यांच्या कारनाम्यांबद्दल बोलणे, चर्चा करणे म्हणजे बदनामी होते का ? चूक होणे, गुन्हा करणे याबद्दल लोक बोलतात ती बदनामी हे कसे काय ठरवता येते ?
ज्यांना अमूक तमूक आवडत नाही त्यांनी पाकिस्तानात जा , तसे अमूक एका हॉस्पिटलच्या चुकांबद्दल बोलता तर उपचार घेऊ नका हे गंमतीशीर आहे. धर्मादाय हॉस्पिटलमधे ते ही सवलती घेतलेल्या असताना पैसे भरा नाहीतर ससूनला जा म्हणून अडवून ठेवण्याला कुटुंबाची लपवाछपवी म्हणावेसे वाटते हे पण मनोरंजक आहे. ते कुटुंब ना माझ्या नात्यातले, ना जातीचे ना गावचे ना आणखी कशाचे. ना मंगेशकर कुटुंब किंवा त्यांची संस्था माझी वैरी. ना मायबोलीवर अशा धाग्यांवर सतत सहभाग घेते.
काही जण फक्त सूचक प्रश्न विचारत राहतात. जर पैसे भरल्याशिवाय दाखला दिला असता तर ते कुटुंब तिथे कशाला पाच सहा तास थांबले असते ? कशाला डीनला फोन केला असता ? जर पैसे भरले नाहीत म्हणून अडवणूक झाली नसेल तर मग डीन यांनी मध्यस्थी करून तुमच्याकडे आहेत तेव्हढे भरा असे त्यांना फोनवर सांगितल्याचे का प्रेस मधे सांगितले. शिवाय माझे म्हणणे अॅडमिशन कडे पोहोचले नाही असेही सांगितले.
यात लपवाछपवी कुटुंब करतंय हा निष्कर्ष कसा काढायचा हे शिकावं लागेल. इथे थांबावं.
डॉक्टरांच्या संघटनेची मतं पटतात. धर्मादायचे नियम खासगी हॉस्पिटल्सना का लावायचे ? इमर्जन्सी किंवा तत्सम परिस्थितीत हा नियम लागू असावा. आम्ही एका आमच्या ग्रुपमधल्या एकाला अशाच धर्मादाय हॉस्पिटलमधे दाखल केले होते. तो थोडा शुद्धीवर नव्हता. तर त्यांनी सांगितलं कि याचं बोल जे काही होईल ते एक तर तुम्ही भरा किंवा नातेवाईकांना बोलावून घ्या. आमच्याकडे त्याच्या घरच्यांचा एकही नंबर नव्हता. घर माहिती होतं. तो शुद्धीवर नव्हता आणि फोन पण सापडत नव्हता. पण त्यांनी उपचार सुरू केले. तोपर्यंत आम्हाला पैशावरून त्रास दिला नाही. शुद्धीवर आल्यावर आम्ही घरच्यांचा नंबर घेऊन बोलावून घेतलं.
आता इमर्जन्सी नाही, ती इमर्जन्सी कधी होईल हे कसे सांगता येईल ? असे घडू नये म्हणून काळजी घेतली पाहीजे.
नियम बनवताना सरसकट नको आणि नियमात सवलत देताना त्यातून पळवाटा काढता येऊ नयेत. ही जबाबदारी शासनाचीच आहे. आम्ही सामान्य लोक नियम बनवू शकत नाही. किमान जे नियम आहेत ते का पाळले नाहीत हा प्रश्न निरूत्तर करतो.
सगळेच पक्ष याबाबत उदास आहेत.
< त्या बाईंच्या जीवाला धोकाच
< त्या बाईंच्या जीवाला धोकाच होता. We do not know if she would have survived even then > हे लिहिणारी व्यक्ती इस्पितळात काम करत नाही, हे बरं आहे. नाहीतर कशाला उगाच अॅडमिट करून आमचा वेळ आणि तुमचा पैसा वाया घालवताय. तसंही त्या वाचणारच नाहीत, असंही म्हटलं असतं.
>>> डिपॉझिट मागणं हे डॉक्टरचं
>>> डिपॉझिट मागणं हे डॉक्टरचं काम नव्हे. म्हणून त्यांना नोटिस देऊ नका.
>>> या प्रकरणी डॉक्टरांनी उपचारच केले नसल्याने निष्काळजीपणा केल्याबद्दल स्वत:हून परिषदेने नोटीस पाठविणे अप्रस्तुत आहे.
हे अजबच लॉजिक आहे.
भरपूर उलट सुलट बातम्या आहेत.
भरपूर उलट सुलट बातम्या आहेत. पण तरी माहितीत खूपच गॅप्स आहेत. मिडियामधे दोन्ही पार्टीज स्वतःच्या सोयीचीच बाजू मांडणार हे आहेच.
१. इमर्जन्सी होती की नव्हती - नव्हती असे माझे मत बनले आहे एकून बातम्यांवरून. नसेल तर मग दुसर्या हॉस्पिटल ला जायला अँब्युलन्स ची व्यवस्था का केली नाही वगैरे प्रश्न तितके व्हॅलिड उरत नाहीत. तसेही रुग्ण न सांगता निघून गेली असे निवेदनात म्हटलेय. ( खरं-खोटं करता येत नाही)
२. मुळात अॅडमिट करायला नकार दिला होता का? पेशन्ट ओपिडी मधे आली होती आणि ऑब्जर्वेशन साठी अॅडमिट व्हायचा कुटुंबाचा आग्रह होता हे बरोबर का? इमर्जन्सी नसल्यामुळे हॉस्पिटल ने अॅडमिट करून घ्यायला नकार दिला का ( आता गरज नाही अमूक दिवसांनी या) ? की पैसे भरले नाहीत म्हणुन की कसे हेही नीट समजत नाही. या बाबतीत हॉस्पिटल ची/ केळकरांची पण कम्युनिकेशन ची चूक दिसतेय.
३. डिपॉजिट लिहून दिले होते हे खरेच दिसते. पण ते प्रसूतीनंतर निओनेटल उपचाराकरता. ते चॅरिटीच्या अंडर येते का नाही? सवलतीची पात्रता , क्वालिफाय करण्याचे नियम आणि प्रॉपर प्रोसेस काय आहे? पात्रता असेल तरी तिथे काही वेटिंग असते का? किंवा कमाल सवलत एका वर्षात अमूक अमाउन्ट च मिळू शकते असे काही असते का? या बेसिक माहितीशिवाय "त्यांच्या अकाउंट ला ३० कोटी शिल्लक होते" या स्टेटमेन्ट चा रेलेवन्स समजत नाही.
४. अजून एक - हे असेच आपले निरीक्षण किंवा कमेन्ट - या प्रकरणात लोकांच्या प्रतिक्रियांमधे बायस/ पूर्वग्रह भरपूर दिसत आहेत. हॉस्पिटल ची बाजू घेणारे लोक विशिष्ट जातीमुळेच बाजू घेत आहेत असे काही लोक म्हणत आहेत- हा एक बायस झाला. अनेक सामान्य लोकांना या हॉस्पिटल चा चांगला अनुभव आहे - "आम्हाला आजवर चांगलाच अनुभव आलाय - हॉस्पिटल ची चूक नसावी" हेही दुसर्या बाजूच्या बायस चे कारण असू शकते. गंमत म्हणजे पब्लिक ची सिंपथी अशा केसेस मधे सर्वसाधारणपणे पीडित कुटुंबाला असते. पण या केस मधे ते कुटुंब "जिवाला धोका असला तरी आयव्हिएफ वापरून प्रेग्नन्सी" , शिवाय "आमदाराचा पीए ", "मंत्रालयातून फोन" इ. म्हटल्यावर पब्लिक तेवढे निर्विवाद सिंपथेटिक नसावे.
ही माझी एकूण समरी आहे या प्रकरणाची.
समरी आवडली मैत्रेयी
समरी आवडली मैत्रेयी
इथल्या फक्त रुग्णालयाच्या
इथल्या फक्त रुग्णालयाच्या स्टेटमेंट्स + पत्रकार परिषद आणि चौकशी समित्याच्या अहवालांच्या बातम्या ज्या माझ्या प्रतिसादांत आहेत, तेवढेच वाचले तर बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. हवं तर त्या बातम्यांचा मजकूर मी मूळ लेखात डकवतो. पण मग तेही कोणाला बायस्ड वाटू शकेल.
या मुद्द्यांवर नंतर आलेल्या बातम्या, विशेषतः चौकशी अहवालांच्या बातम्यांच्या आधारे पुन्हा लिहितो आहे.
१. इमर्जन्सी आहे, असं रुग्णाने म्हटलेलं नाही. तातडीची वेळ हे शब्द राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात आले आहेत. तातडीची वेळ असता रुग्णाला दाखल करून घेणे आवश्यक असते. तसेच अशा रुग्णाला अन्य रुग्णालयात पाठवताना काय करावं याबद्दलच्या नियमांचा उल्लेखही याच अहवालात आहे.
पैशाची तरतूद होत नसेल तर ससूनमध्ये जाण्याची सूचना रुग्णाला केली असं दीनानाथच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. पुन्हा तेच रुग्ण न सांगता निघून गेली,असंही म्हणतात.
२. <ऑब्जर्वेशन साठी अॅडमिट व्हायचा कुटुंबाचा आग्रह होता हे बरोबर का? > रुग्णाचा आग्रह होता, असं कुठल्याही बातमीत नाही. जोखमीची परिस्थिती लक्षात घेऊन भरती होण्याचा सल्ला दीनानाथ रुग्णालयाने दिला, असे त्यांच्याच प्रेस स्टेटमेंट मध्ये आहे. आता या जोखमीच्या परिस्थितीला चौकशी समितीने तातडीची स्थिती - इमर्जन्सी म्हटलं असेल तर कल्पना नाही. पण त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन संबंधितांशी बोलून अहवाल दिला. रुग्णालयाने सीसीटीव्ही फूटेजही शासनाला दिले होते.
२. अॅडमिट व्हा हा रुग्णालयाचाच सल्ला होता. त्यासाठी दहा लाख रुपये डिपॉझिट लागतील असं सांगितलं आणि लिहून दिलं. दहा लाखाची सोय न झाल्यास ससून येथे जाण्याचा सल्ला दिला, असं दीनानाथच्या प्रेस स्टेटमेंट मध्ये आहे. म्हणजे पैसे नाहीत म्हणून अॅडमिट केलं नाही. याबद्दलच चौकशी समितीने ठपका ठेवला आणि धर्मादाय आयुक्तालयाला कारवाई करायची शिफारस केली. कम्युनिकेशन गॅप बरोबर. डॉ केळकर रुग्णाच्या नातलगांना म्हणाले, आहेत तेवढे पैसे भरून भरती व्हा. पण हे त्यांनी त्यांच्याच स्टाफला सांगितलं नव्हतं, हे प्रेस कॉन्फरन्समध्ये आहे.
आता यावर डिपॉझिट मागणे चूक की बरोबर अशी चर्चा सुरू झाली आहेच.
३. रुग्ण चॅरिटेबल ट्रीटमेंटसाठी पात्र होती, तरीही रुग्णालयाने त्याअंतर्गत अॅडमिट करून घेतलं नाही, हा चौकशी समितीचा निष्कर्ष आहे. निओ नेटल वगैरे बारकाव्यांत त्या बातमीत काही म्हटलेलं नाही. पण निओनेटल केअर चॅरिटीमध्ये का नसावे? आणि मागच्या वेळी त्यांना ५०% सवलत मिळाली होती. तशीच यावेळीही मिळू शकली असती. मुळात रुग्ण पैशाची जमवाजमव करतो , वेळ लागेल असं म्हणत होता. चॅरिटी खाली दाखल करा अशी त्यांनी मागणी केली असं दीनानाथही म्हणत नाही. उलट हे धर्मादाय रुग्णालय आहे, तुम्ही पात्र असाल तर त्याखाली दाखल करतो असं सांगणं ही रुग्णालयाची जबाबदारी असा मला चौकशी समितीच्या म्हणण्याचा अर्थ लागतो.
३० करोडचा संदर्भ हे धर्मादाय रुग्णालय आहे हे अधोरेखित करण्यासाठी आहे.
यावरून आणखी एक - रुग्णालयाची जमीन शासनाकडून नाममात्र भाडेपट्ट्याने मिळाली , हे तर आतापर्यत कळलं असेलच. रुग्णालयाच्या बांधकामासाठी बीसीसीआयने लता मंगेशकर यांच्या विनंतीवरून २००३ मध्ये मुंबई मध्ये भारत श्रीलंका एक दिवसीय प्रदर्शनी सामना ठेवला होता. त्यासाठी वानखेडे स्टेडियमने भाडे आकारले नाही व दोन्ही देशांच्या खेळाडूंनीही मानधन घेतले नाही. १ कोटी रुपये उभे करायचे उद्दिष्ट होते. रुग्णालयाच्या बांधकाम इ.चा सगळा खर्च या मॅचमधून निघाला असे म्हणत नाही. पण पुन्हा धर्मादाय रुग्णालय हा भाग अधोरेखित होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संकेतस्थळावरही चॅरिटेबल हा उल्लेख आला आहेच.
४. मंत्रालयातून फोन, पीए हे एकाने म्हटले की इतर जण उचलतात असे दिसले आहे. जसं इथे एकाने निओ नेटल साठी चॅरिटेबल असेल का, असं एकाने म्हटल्यावर इतर जण उचलू लागले. मंत्रालयातून म्हणजे कुठून फोन आला, ते मी एकापेक्षा जास्त वेळा स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी कक्ष आहे. त्यांची मदत घ्यायला तुमची राजकीय पोच असायला हवी, असे नाही.
ही त्याची लिंक
४ आय व्ही एफ वापरून जिवाला धोका - माता मृत्यू अन्वेषण चौकशी करणार्या पुणे मनपाच्या समितीच्या अहवालात मृत्यूची कारणे दिली आहेत. तो अहवाल बनवताना रुग्णाचा लग्नापासूनचा वैद्यकीय इतिहास विचारात घेतला. त्यात कॅन्सर पश्चात आयव्हीएफही आले असेल ना? त्यात दीनानाथप्रमाणेच इतर रुग्णालयांमध्ये चौकशी केल्याचे म्हटले आहे. . म्हणजे या रुग्णाच्या बाबत ती ट्रीटमेंट घेतल्याने जिवाला धोका होता, तर त्या क्लिनिकचीही चौकशी व्हायला हवी होती. जिथे आय व्ही एफ ट्रीटमेंट घेतली त्या इंदिरा आय व्ही एफचे नाव बातमीत नाही. चौकशी करणारे सगळे वैद्यकक्षेत्रातलेच आहेत. आय व्ही एफ मुळे या रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाला हे एक ओपिनियन आहे. , तेही पब्लिकचे , तज्ज्ञांचे तरी दिसलेले नाही .आय व्ही एफ करणार्या इंदिरा आय व्ही एफ वर चौकशी समितीने ठपका ठेवल्याची बातमी नाही.
४ मध्ये आलेले मुद्दे ही मतं आहेत. त्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे बायस . पूर्वग्रह आहेत. डिपॉझिटचा आग्रह धरल्यामुळे आणि डिपॉझिटशिवाय रुग्णाला दाखल करून घेणार नाही असं म्हटल्याने रुग्णालयाच्या विरोधात बोलणारेही लोक आहेत.
हॉस्पिटल ची बाजू घेणारे लोक
हॉस्पिटल ची बाजू घेणारे लोक विशिष्ट जातीमुळेच बाजू घेत आहेत असे काही लोक म्हणत आहेत- हा एक बायस झाला. >> सगळे ? बहुतेक सगळे प्रतिसाद वाचले जात नसावेत. तेच ते मुद्दे पुन्हा पुन्हा मांडूनही ते इग्नोर केल्या प्रमाणे प्रतिसाद येत आहेत. निओ नेटलचा एक महीन्याचा खर्च आहे त्यातला निम्मा अॅडव्हान्स म्हणून ? नंतरही भरता आले असते. वर आलेलं आहे हे. सगळेच आले आहेत मुद्दे आधी.
मंगेशकर हॉस्पिटलच्या बांधकामासाठी क्रिकेटचा सामना झाला कारण बीसीसीआय जेव्हां तोट्यात होतं तेव्हां लता मंगेशकर यांनी एक कॉन्सर्ट करून बोर्डाला निधी मिळवून दिला होता.
आज लोकमत मधे आलेल्या
आज लोकमत मधे आलेल्या बातमीनुसार दिनानाथ रुग्णालयावर कुठलाही ठपका ठेवलेला नाहीये ससून च्या चौकशी समिती ने.
उलट सुर्या , मणिपाल ला दोष दिला आहे की सुविधा नसताना अॅडमिट करून घेतले नाही आणी पोस्टमार्टेम केले नाही.
पोलिसांनी ससून कडे मागणी केली
पोलिसांनी ससून कडे मागणी केली आहे कि अहवाल गोल गोल असल्याने आम्हाला मत बनवता येत नाही. स्पष्ट शब्दात मत द्या.
शोधली बातमी. लोकमतच्या
शोधली बातमी. लोकमतच्या संकेतस्थळावर दिसलेली बातमी अगदीच त्रोटक आहे. त्यांचा ईपेपर वाचावा लागला. लोकसत्ता ईपेपर वाचायला आता पैसे मागतोय.
लोकसत्तेतल्या बातमीत म्हटलेय की ससूनला अहवाल फुटण्याची भीती आहे. तरीही फुटलाच?
या डॉक्टरानी छान व्हिडिओ केला
या डॉक्टरानी छान व्हिडिओ केला आहे, हाय रिस्क प्रेग्नसी मधे कसे आणी काय कॉम्प्लीकेशन येवु शकतात हे निट व्यवस्थित सान्गितले आहे.
https://www.youtube.com/watch?v=5eGbdmPecfc&t=3345s
ही बातमी तरी खरी आहे का?तनिषा
ही बातमी तरी खरी आहे का?
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
https://youtu.be/-Y8M83QtjX4
https://youtu.be/-Y8M83QtjX4?si=0PGBacjvABM4JUDw प्राजक्ता , तटस्थपणे मांडलंय. हा ही ऐकला. डॉ शिराळकरांचा एका पुस्तकावरचा व्हिडिओ सापडला नाही. तो जरूर ऐकावा.
आजच्या लोकसत्ता मुंबई
आजच्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीत पान २ वर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास १० लाख दंड अशा शीर्षकाची बातमी आहे.पण लोकसत्ताच्या संकेतस्थळा वर ही बातमी दिसत नाही. किंवा गुगलने शोधली तरी लोकसत्तेची बातमी दिसत नाही.
मात्र जवळपास तो सगळा मजकूर एन्डीटीव्ही मराठीच्या बातमीत आहे.
" दीनानाथ रुग्णालयास 10 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.
धर्मादाय रुग्णालय अशी नोंदणी असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन ठेवावी लागेल. त्याचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मादाय कक्षाच्या माध्यमातून होईल.
या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यावर बंदी घालण्यात येणार असून रुग्णालयाने 10 टक्के निधी गरीब रुग्णांसाठी वापरला आहे किंवा नाही, याचे हिशेब नियमितपणे धर्मादाय आयुक्तांकडे सादर करावे लागतील. वैद्याकीय शिक्षण विभागाकडून दीनानाथ रुग्णालयाच्या झालेल्या चौकशीनंतर डॉ. घैसास व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय वैद्याकीय परिषदेच्या (इंडियन मेडिकल कौन्सिल) नियमांचे उल्लंघन झाल्याने डॉ. घैसास व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीनानाथ रुग्णालयास करण्यात आलेल्या 10 लाखरुपये दंडाच्या रकमेतून भिसे यांच्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवी केल्या जातील व त्या मुली सज्ञान झाल्यावर ही रक्कम त्यांना मिळणार आहे.
ही बातमी इंडियन एस्क्प्रेसच्या संकेतस्थळावर मात्र आहे.
छापील लोकसत्तेतील बातमीत दोन कॉलम - सात ओळींचा - मृत महिलेच्या कुटुंबाची सुनावणी या शीर्षकाचा चौकटीतला मजकूर आहे. हा भाग लोकसत्तेच्या संकेत स्थळावर सविस्तर आहे.
Pages