दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - तनिषा भिसे मृत्यू प्रकरण

Submitted by भरत. on 8 April, 2025 - 02:37

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती स्त्री- तनिषा / ईश्वरी भिसे - यांना डिपॉझिट न भरल्याने अ‍ॅडमिट करून घेतले नाही आणि नंतर त्यांचा अन्य इस्पितळात बाळंतपणानंतर मृत्यू झाला. याबद्दल सगळ्यांनी वाचलेच असेल.
रुग्णालयाचे इन चार्ज डॉ केळकर यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांबद्दल उलट सुलट वाचायला मिळते आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या व्हिडियोची लिंक शोधली.

डॉ केळकर अतिशय आश्वस्त स्वरात आणि आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना पाहून बरे वाटले.
पण दोन गोष्टींचे नवल वाटले.

१ डॉक्टरांकडून डिपॉझिट मागायची पद्धत नाही. त्या दिवशी काय राहू केतू त्यांच्या (डॉ घैसास) आला आणि त्यांनी १० लाख रुपये डिपॉझिट (रुग्णाच्या पेपरवर ) लिहिले.

२. रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्या दिवशी रुग्णालयात ५-६ तास होते. ते यापूर्वी ५-६ वेळा येऊन गेले होते. त्यांना इथली माहिती होती . हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही - सचिन व्यवहारांचे ऑफिस, चॅरिटीचे ऑफिस यांच्याकडे आले असते, तर आज या प्रकरणाला हे वळण लागले नसते.

रुग्णालय कर्मचार्‍यांपैकी कोणी त्यांना या मंडळींना भेटा असे सांगितले का? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता, असेही बातम्यांमध्ये वाचले. त्याचाही उपयोग झाला नाही ?

--
भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्या आई वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होम मध्ये तोडफोड केली.
त्याचा व्हिडियो - चित्रा वाघ यांच्या ट्वीटची लिंक

सुश्रुत घैसास यांच्या आईंनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीने काढलेला निष्कर्ष.
deenanath.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलणार यावर ? संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत . शांत बसून परिस्थिती दोन्ही बाजूनी समजावून घेऊन मध्यम मार्ग काढायला कोणीही तयार नाहीये . राजकीय पक्षांना देश चालवण्याची कामे सोडून अशा कामात आपला वेळ अधिक द्यावासा वाटतो हे खेदजनक आहे , हा एकप्रकारे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावरचा अविश्वास वाटतो .

इतकी वर्ष मंगेशकर रुग्णालयाने पुण्याची आणि पुण्याच्या बाहेरच्या रुग्णांची अविरत शुश्रूषा केली त्यावेळी हे सगळे लोक कुठे होते ? दंगे, आंदोलने करण्याआधी निदान चर्चेला सामोरं जाणं आवश्यक होतं . कारण नाण्याला दोन बाजू असतात .

पण जनक्षोभ बघून सुन्न झालं मन आणि आपण कुठे चाललोय देश म्हणून हा प्रश्न पडला , पण उत्तर काही सापडलं नाही .

'दिशाभूल करणारी तक्रार'?? काल तर केळकरांनी हॉस्पिटलची आणि डॉक्टरांची चूक झाल्याचं कबूल केलं सार्‍यांसमोर. कुणीतरी राहुकेतूंमुळे हे असं झालं म्हणे.

दोन्ही बाजूला फार मोठे प्रॉब्लेम दिसत आहे. धर्मादाय रुग्णायल / दवाखन्यांनी पैशासाठी रुग्णांची पिळवणूक करणे खटकते. हे कुटुंब सधन आणि सोशल नेटवर्क ( सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे PA ) असणारे आहे म्हणून या प्रकरणाची बाहेर वाच्यता झाली.

बाफचा विषय नाही पण स्वत: चेच बाळ असायला हवे हा अट्टाहास कुठपर्यंत ताणायचा? तंत्रज्ञान उपलब्द असले तरी पण त्या महिलेची शारिरीक तसेच मानसिक स्थिती IVF साठी १०० % फिट होती हे त्या क्षेत्रातला डॉक्टरच सांगू शकेल. या घटनेत, असाध्य आजारातून गेल्यावर IVF चा हट्ट कुटुंबाने का करावा? लाखो महिलांवर वंशवेल वाढविण्याचे निर्णय कुटुंबाकडून लादले जातात, क्वचित न कळत त्यांचाही यात सहभाग असतो.

थोडी वेगळी माहिती या व्हिडिओ मधे दिसते.
https://youtu.be/_mVmlI3SZ9w?si=L8vZTD7pw9Je16iF

मी स्वतः DMH मध्ये ८ वर्ष काम केले आहे. या प्रकरणामध्ये उल्लेख झालेल्या बऱ्याच व्यक्तींना ( हॉस्पिटल मधल्या) मी पर्सनली ओळखते. मला नाही वाटत पैशाकरता पेशंटची अडवणूक केली असेल हॉस्पिटल मधे. त्या पेशंटला आधी पासूनच त्रास होता असं कळलय.

भिसे यांचे निधन दूर्देवी आहेच. पण त्यांना ऍडमिट न करून घेतल्यामुळे या केसमध्ये अक्षम्य गलथानपणा झालेला आहे. खास करून जर रिपीट रुग्ण असेल आणि अत्यंत कॉम्प्लिकेटेड मेडिकल हिस्टरी ठाऊक असेल तर रुग्णाला दाखल करून किमान स्टेबल होईपर्यंत उपचार देण्याची सोय केलीच पाहिजे.

दुसऱ्या बाजूने कित्येक अशाही केसेस ऐकल्या आहेत की पेशंटला दाखल करून उपचार केल्यावर आणि ते उपचार फोल ठरल्यावर रुग्णाचे नातेवाईक तोडफोड, डॉक्टरांना मारहाण करतात. बिल चुकवणे तर बाजूलाच राहिले. त्यामुळे डिपॉझिट सांगितले असेल तर ते चूक नाही. परंतु ते कितपत असावे याबाबत चर्चा व्हायला पाहिजे.

काही लोकांनी डिपॉझीटच्या १० लाख रकमेवर शंका घेतली आहे. माझ्या जुन्या ऑफिसमध्ये एका मुलीला प्रीमि ट्विन्स झाली होती. त्यांचा NICU मधला खर्च दिवसाला ६०००० होता. डिसेंट पगार असणाऱ्या नवरा बायकोचे सर्व सेविंग संपल्यामुळे ऑफिसातून उचल देऊनही, क्राऊड फंडींग करावे लागले होते. ही किमान ७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा खर्च विम्यातून कव्हर होतो, कितपत कव्हर होतो याबद्दल शंका आहे.

यात मूळ प्रश्न म्हणजे सामान्य परिस्थितील लोकांना गुंतागुंतीच्या उपचारासाठीचा हॉस्पिटलचा खर्च रुग्णाची हेळसांड न करता कसा भागवता येईल. पण या प्रकरणात हॉस्पिटलमध्ये फोडाफोडी, जातपात आणि राजकारण आणून ऑलरेडी विचका झालेला आहे.

उदय यांनीही चांगला मुद्दा मांडलेला आहे. स्वतःचे बायोलॉजिकल मुल हवे यासाठी महिलेच्या जीवाची पर्वा न करणे याबद्दल कुणी फारसं बोलत नाही.

माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली होती सातव्या महिन्यात, अतिशय उत्तम ट्रीटमेण्ट मिळाली होती
अँडव्हान्स एक रुपयाही घेतला नव्हता , लगेच ट्रीटमेण्ट मिळाली
बाळाला NICU मधे ठेवावे लागेल त्यामुळे सात लाख अंदाजे खर्च येऊ शकतो असा आम्हाला सांगितल होत पण प्रत्यक्षात पाच लाखच खर्च आला आणि त्या बिलातही सवलत मिळाली
माझ्या आईची बायपास सर्जरी करायची होती त्यावेळी तीन lलाख भरायचे होते आमच्याकडे पन्नास हजार होते आईला ॲडमिट करून घेतलं आणि आम्हाला फक्त सांगितलं की सर्जरीचा खर्च अंदाजे तीन लाख येऊ शकतो खर्च दोन लाख ऐंशी हजार आला आणि ज्येष्ठ नागरिक सवलत मिळाल्यामुळे अठ्ठावीस हजार कमी झाले

मला वाटतं की भिसे यांचा आधीचा आजार, मुलाचा अट्टाहास, जोखमीची प्रसूती, नियमितपणे उपचारासाठी न येणं हे मुद्दे इथे सर्वस्वी गैरलागू आहेत. कळीचा मुद्दा हा आहे की ४-५ तास त्यांना काहीही उपचाराविना का बसवून ठेवलं? त्यांची प्रसूती जोखमीची आहे, BP वाढत आहे अशा परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. ऑपरेशनची सर्व तयारी केली होती तर इतका वेळ त्यांना बाहेर का बसवलं? रक्तस्त्राव होत असताना तुम्ही तुमच्या गोळ्या घ्या असं का सांगितलं? भिसे आधी तिथे तपासणीसाठी येत होत्या म्हणजे त्या काही नवीन पेशंट नव्हत्या. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करणं हे डॉक्टर म्हणून आणि माणूस म्हणून प्रथम कर्तव्य होतं.

चीकू, मला DMH मधून कळलेली माहिती वेगळी आहे. She was not in labor, neither she was bleeding. This was not an emergency case. High risk pregnancy असल्याने under observation ठेवण्यासाठी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता.
कोणालाही कल्पना न देता रूग्णाचे नातेवाईक परस्पर निघून गेले. नंतर डॉक्टर घैसास यांनी श्री. भिसे यांना फोन केला होता पण तो त्यांनी घेतला नाही. उलट फोनही केला नाही.
पेशंटची मेडिकल हिस्टरी महत्त्वाची नाही का? तो मुद्दा गैरलागू कसा?

जिज्ञासा
असे असेल तर ते ठणकावून का सांगत नाहीत? तुमच्या द्वारे का?

केकू, ठणकावून सांगणे म्हणजे काय? मी काही फार आतल्या खबरा देत नाहीये. DMH ने अधिकृतपणे जाहीर केलेल्या प्रेसनोट मध्ये जे सांगितले आहे तेच मांडते आहे.
दुर्दैवाने तुमचा आवाज किती मोठा यावर तुमची बाजू किती वरचढ/योग्य असे वाटण्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे शांतपणे, योग्य मार्गाने आपली बाजू मांडली तर ते तितके विश्वासार्ह वाटत नाही. चालायचेच!

This was not an emergency case. High risk pregnancy असल्याने under observation ठेवण्यासाठी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता. >>> असे असेल तर वीस लख रूपये अ‍ॅडव्हान्स म्हणून का मागितले ?
कुणावर विश्वास ठेवायचा ? कसा ?

माझा मंगेशकर हॉस्पिटलचा अनुभव उत्तम आहे. प्रत्येक वेळी इथल्या डॉक्टरांशी अगदी घरगुती संबंध झाले आहेत. आजोबांच्या वेळी व्हॉट्स एप वरून संपर्क ठेवला होता. कसलीही शंका आली कि विचारा असे सांगितले होते आणि सलग पाच वर्षे शंका समाधान झाले अगदी ते जाईपर्यंत याच हॉस्पिटलने आम्हाला आधार दिला. आईच्या वेळीही खूप काळजी घेतली. विनाकारण बिलं लावलीत असे वाटले नाही.
पण एव्हढ्यावरून कोण बरोबर कोण चूक याचा निर्णय मी घेऊ शकत नाही.

अ‍ॅडव्हान्स मागितला हे कबूल केलेलं आहे.
जर वीस लाख रूपये किंवा दहा लाख रूपये भरले असते तर मग पेशंटचे सगळे गुन्हे माफ होते ना ?

अ‍ॅडव्हान्स मागितला हे कबूल केलेलं आहे.>> डॉक्टर घैसास यांनी असे त्या फॉर्मवर लिहिले त्यासाठी corrective action म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. शिवाय दीनानाथ रूग्णालयाने त्यांची पॉलिसी बदलून कुठल्याही रूग्णाकडून ॲडव्हान्स घेणार नाही असे जाहीर केले आहे.
या शिवाय रूग्णालयाची शासकीय चौकशी सुरू आहे. त्याचेही अहवाल येतील.
जर वीस लाख रूपये किंवा दहा लाख रूपये भरले असते तर मग पेशंटचे सगळे गुन्हे माफ होते ना ? >>
Not really. ही काल्पनिक स्थिती आहे. त्या बाईंच्या जीवाला धोकाच होता. We do not know if she would have survived even then. भिसे दांपत्याने खूप मोठी रिस्क घेतली आणि त्यात खूप चुका केल्या. Why would you not show up for regular check ups when you have a high risk pregnancy? झालं ते खूप दुर्दैवी आहे पण मिडियामध्ये ज्या पद्धतीने याची एकांगी ट्रायल सुरू आहे तेही तितकेच दुर्दैवी आहे.

She was not in labor, neither she was bleeding. This was not an emergency case. High risk pregnancy असल्याने under observation >> जिज्ञासा. मी डॉक्टर केळकरांची पत्रकार परिषद भरत ह्यांनी दिलेली लिंक पाहिली. त्यात असे काही विधान केलेले नव्हते. अशी स्त्री २५ तासांनी मृत्यमुखी पडते. आश्चर्य आहे,
मी स्वतः डॉक्टर केळकर ह्यांचा पेशंट आहे. माझा अनुभव चांगलाच आहे. पण तिथल्याच एका डॉक्टरचा अनुभव अतिशय खराब आहे.
आता सगळे राजकीय पक्ष वाहत्यां गंगेत हात घुवून घेत आहेत.

त्या बाईंच्या जीवाला धोकाच होता. >>>
She was not in labor, neither she was bleeding. This was not an emergency case. High risk pregnancy असल्याने under observation ठेवण्यासाठी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता.>>>
यात तफावत नाही का वाटत ?

मला मनापासून मंगेशकर हॉस्पिटल बंद व्हावे असे वाटत नाही. तसेच कुठल्याही कारणाने लक्ष्य करावे असे वाटत नाही.
पण याची दुसरी बाजू जी समोर येते आहे ती खरी असेल तर मंगेशकरच नाही तर सर्वच धर्मादाय ट्रस्टच्या अंडर असलेल्या हॉस्पिटल्स मधे १०% कोटा पूर्ण होतो का याचे ऑडीट झाले पाहीजे.

ते आता आक्रोश करत असलेले पक्ष का करत नाहीत ? हा सगळा इश्यू चिघळवत ठेवण्याचा प्रयत्न आहे.
आता तर मूळ मालकांपर्यंत मीडीयावाले पोहोचले. बहुतेक ट्र्स्ट ताब्यात घ्यायचा असेल.

यात तफावत नाही का वाटत? >> तफावत काय ते नाही कळलं. High risk pregnancy म्हणजे गर्भवती असताना किंवा प्रसूतीच्या वेळी complications होऊ शकतात. पण जेव्हा तनिषा भिसे तपासणी साठी आल्या तेव्हा त्यांना काही त्रास नव्हता असे DMH च्या pressnote मध्ये नमूद केले आहे. Screenshot_20250408_164137_Adobe Acrobat.jpg

जिज्ञासा
धन्यवाद.
केस इज क्लोज्ड.

हे वाचुन ही सगळी भिसे कुटुंबीयांची घोडचूक होती आणि नंतर कुभांड रचलं आहे असा माझा आता समज झाला आहे.
शोधुन प्रेस कॉन्फरन्सही बघितली. वरची भरत यांनी दिलेली लिंक ही पाहिली. मेक्स सेन्स.

या प्रकरणाला खूप अनावश्यक फाटे फोडले जात आहेत. मिडिया ट्रायल केली जात आहे. हे सगळे असे घडायला नको खरंतर. दीनानाथच्या बाबतीत मला व्यक्तिशः काही अनुभव नसला तरी माझ्या ओळखीत/नात्यात अनेक जण आहेत ज्यांनी तिथून उपचार घेतले आहेत किंवा तिथे काम करत आहेत आणि या सर्वांकडून केवळ चांगलेच ऐकले आहे.
या प्रसंगामुळे आपण एक समाज म्हणून कुठे चाललो आहोत हा प्रश्न पडला Sad

समहाऊ पब्लिक ला डोक्टर नी पैसे/ डिपॉजिट मागणे हेच पाप असल्यासारखे डोक्यात असते. कारण डॉक्टर हे नोबल देवासमान प्रोफेशन ही मेन्टॅलिटी असते. ( जी चुकीची आहे). हॉस्पिटल प्रायव्हेट आहे, पेशन्ट आपल्या पायानी चालत आलेला आहे, इमर्जन्सी नाही( कॉम्प्लिकेशन्स होती पण माहित होती) , रुग्णाची आर्थिक स्थिती फार वाइट असेही उघडपणे तरी नव्हते, मग खर्चाचा एस्टिमेट लिहून दिला तर त्यात काही चूक वाटली नाही मला जेवढे वाचले त्यावरून. बर ती बाई जातानाही स्वतःच्या इच्छेने , स्वतःच्या पायाने चालत गेली. मग इथेच दीनानाथ चा संबंध संपला नाही का?!
मला पण त्या बाईच्या फॅमिलीचा दोष वाटतो आहे. एक तर रिस्क माहित असून प्रेग्नन्सीचा निर्णय, राजकारण्यांकडुन दबाव आणुन मोफत उपचार उपटण्याचा प्रयत्न, कॅन्सर ची हिस्टरी लपवणे, आताही बाई च्या मृत्यूनंतर त्याचेही राजकारण करणे. सगळे जाम शेडी वाटते आहे. अनेक राजकारण्यांनी त्यांचा कांगावा उचलून धरणे, फडणविसांनी - राज्य सरकार ने लगेच त्या जुळ्या मुलींच्या उपचाराचा खर्च उचलणे हे बघता फॅमिलीचे हात भरपूर वर पोचलेले असावेत!

राजकारण्यांकडून दबाव आणून मोफत उपचार उकळणे होणार दिसत असताना आणि इमर्जंसी नसताना भारतात डिपॉझिट मागणे यात मला काही गैर वाटत नाही.
त्यात पर्सनल सेक्रेटरी टू एमएलए हा गरीब असणे शक्य नाही. ब्लँकेट स्टेटमेंट आहे कल्पना आहे. असेल खरंच दारिद्य रेषेखाली तर पोस्ट डीलीट करतो. केवळ हॉस्पिटची बदनामी, इगो प्रकार वाटत आहे.

प्रेसनोट सारवासारव केल्यासारखी वाटते.
एक तर फॅमिली चूक किंवा हॉस्पिटल चूक हे निष्कर्ष अपुर्‍या माहितीवर काढलेत.
जर त्या पेशंटचा मृत्यू झाला नसता तर हे प्रकरण पेटले नसते.

पेशंटचे नातेवाईक गुपचूप निघून गेले हे खरे कि खोटे ?
पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे कि आत्ता अडीच ते तीन लाख रूपये भरू शकतो तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. हे खरे कि खोटे ?
हॉस्पिटलने त्यांना ससूनला जायला सांगितले. चार पाच तास गेल्यावर ते ससूनला गेले. हे खरे कि खोटे ?

हे आपण कसे काय ठरवणार ?
ती हॉस्पिटलची इनसाईड न्यूज खरी कशावरून ? धोका नव्हता तर दहा लाख डिपॉझिट का मागितले हा प्रश्न आहे. डिपॉझिट मागितले म्हणून चूक केली असे म्हटलेले नाही. वीस लाख खर्च येणार असेल तर नक्कीच साधी, सरळ केस नसेल. अशा वेळी चार पाच तास पेशंट बाहेर होता का ?

त्यांना सोशल वर्करच्या माध्यमातून पैशांची जमवाजमव करण्याचा सल्ला रूग्णालकडुन कुणी दिला होता का ?
तसे असेल तर डॉक्टरांचा समज असा का झाला कि ते (भिसे) पैशाची जमवाजमव करायला गेले आहेत ?
जर असा समज असेल तर ते पेशंटला सोडून निघून गेले असे स्टेटमेण्ट का आहे ?
जुना पेशंट असेल तर कॅन्सरची हिस्ट्री रूग्णालायला महिती नसेल का ? पेशंटला ही गोष्ट कुठून कळाली ?

ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी.
कायद्यामधे पैसे नाहीत म्हणून ट्रीटमेंट नाकारता येत नाही. ते ही चॅरिटेबल ट्रस्ट खाली नोंदणी असताना.
त्यांना १ रूपया दराने जमीन मिळाली आहे. करात सवलत आहे. याशिवाय निधी मिळतो सरकारकडून. असे मीडीयात सांगितले जातेय.
हे खरे असेल तर २.५ लाख घेऊन ट्रीटमेंट सुरू करायला हरकत नव्हती.

अजून एक :
पेशंटचा पती माजी मंत्र्याचा पीए होता. हा सत्ताधारी पक्षाचा आहे. भारतात कुठलाही राजकारणी दारिद्र्यरेषेखाली मोडू शकतो. मग पेशंटच्या पतीला ते अशक्य नसेल. तरीही त्याची ट्रीटमेंट दहा टक्के कोट्यातून झाली का नाही हा प्रश्न उरतो.

आमच्या कुठल्याही केस मधे मंगेशकर मधे आम्हाला ड्डिपॉझिट न मागता अ‍ॅडमिट केलेले आहे. ट्रीटमेंट सुरू करताना अमूक एव्हढे आत्ता भरा, नंतर तुम्हाला सांगितले जाईल तसे भरा असे सांगितले होते. एकदा तर उरलेले पैसेही परत केले. पण यावरून इतरांना जज्ज करता येणार नाही असे मला वाटते. हा कृतघ्नपणा आहे असे वाटते का ?

पेशंट, मीडीया आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापन कोण खरे कोण खोटे हे ठरवता येत नाही.
या नोटवर मी थांबते.

धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मीडियात इतका उलटसुलट धुराळा आहे की कशावर विश्वास ठेवावा हे समजत नाही. वरची चर्चा आणि प्रेसनोट वाचून माझाही ग्रह अमित आणि मैत्रेयीसारखाच झाला आहे. अ‍ॅक्सिडेन्ट झाला तर मोठं वाहन चालवणार्‍यालाच दोषी समजलं जातं त्यातला प्रकार वाटतो.
त्यात प्रस्तुतीत दगावलेली स्त्री हेच इतकं भावनिक भांडवल आहे की बाकी तपास करायची तसदी कोण घेईल!
यूट्यूबवर लगेच मुळात मंगेशकरच कसे वाईट लोक होते/आहेत याच्याही क्लिप्स दिसल्या. अवघड आहे!

धोका नव्हता तर दहा लाख डिपॉझिट का मागितले >>>ते लिहिले आहे की सगळीकडे - बेबीज प्रिमि असणार असल्यामुळे निओनेटल केअर चे चार्जेस म्हटले होते.

संपूर्ण पत्रकार परिषदेचा TV9 Marathi चा व्हिडियो मिळाला. आधीची लिंक बदलून या व्हिडियोची लिंक वर लावली आहे.

पत्रकार परिषदेसंबंधीची लोकसत्तेतील बातमी

तिथला मजकूर कॉपी पेस्ट करता येत नाही. पण त्यातली काही वाक्ये टाइप करतो - " आमच्याकडून डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत कारण तशी पद्धतच आमच्याकडे नाही. रुग्णालयाकडून खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिले जाते. त्यावरही डिपॉझिट लिहायची पद्धत नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहु केतू काय डोक्यामध्ये आला, डॉ घैसास यांनी चौकोनात दहा लाख डिपॉझिट लिहिलं ही गोष्ट खरी आहे. "

डॉ सुश्रुत घैसास यांनी नियमाबाहेर किंवा पद्धत नसताना डिपॉझिट मागितलं , म्हणून त्यांचा राजीनामा घेतलेला नाही वा त्यांना पदमुक्त केलेलं नाही. तर " सामाजिक दडपण, धमक्यांचे फोन , समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका ,सामाजिक संघर्षामुळे होणारे वातावरण त्यांच्या सहन होण्याच्या पलीकडचे आहे. त्याचा आताच्या रुग्णांच्या उपचारावर परिणाम होईल. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्यांनी राजीनामा दिला."

आरोग्य विभागाच्या समितीचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्याची बातमी आजच्या ( ८ एप्रिल) लोकसत्तेत आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी - असं बातमीचं शीर्षक आहे.

लिंक बघते घरून.

>>> राहु केतू काय डोक्यामध्ये आला, डॉ घैसास यांनी चौकोनात दहा लाख डिपॉझिट लिहिलं ही गोष्ट खरी आहे.
राहूकेतू?! Uhoh

जे झाले ते वाईट झाले.
बातमी वाचली नाही कुठे पण लोकांच्या फेसबुक पोस्ट बघत आहे.
प्रत्येक जण आपल्या राजकीय कलानुसार लिहीत आहे.
त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवत नाहीये.
घटना दुःखद असली तरी फार खोलात जाऊन माहिती घ्यावी असे वाटले नाही.

मला या घटनेत महत्वाचा मुद्दा उदय यांनी मांडलेला वाटला
>>>
असाध्य आजारातून गेल्यावर IVF चा हट्ट कुटुंबाने का करावा?
>>>

जर हा या धाग्याचा विषय नसेल तर कोणीतरी यावर वेगळा धागा काढावा.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा