Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 14:47
का स्वप्नी माझ्या येतेस तू?
का डोळ्यात माझ्या भरतेस तू?
का भान मजला राहिना?
काय जादू मजवर करतेस तू ,?सांग ना...
का एकांती तुजला आठवतो ?
का गर्दीत तुजला शोधतो ?
चेहरा तुझा तो पाहता
का लुप्त होई क्रोध तो,? सांग ना...
का तू हवीशी वाटतेस?
का तुलाच पाहावे वाटते?
काही त्रास तुजला होताच
का डोळ्यात पाणी दाटते,? सांग ना...
का मी तुलाच कळतो ?
का तू मलाच कळते ?
का मन तुझे अन माझे
एकमेकांकडे वळते,? सांग ना...
का मी न बोललो तरी तू बोलतेस?
का मी तुज वाचून राहिना ?
काय आहे तुझ्यात अन माझ्यात ?
सांग ना मज सांग ना , सांग ना तू सांग ना...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा