Submitted by माबो वाचक on 22 February, 2025 - 09:04
मी त्याच्यापाशी पोचलो तेंव्हा तो डाराडूर झोपला होता. त्याला उठवावे का? माझे मन म्हणाले, हो, तेच योग्य आहे. पण माझे दुसरे मन म्हणाले, नको. त्याच्याजागी तू असतास तर त्याने तुला मदत केली असती का?
शेवटी मी त्याला उठवायचे ठरविले. पण मी त्याला उठवणार इतक्यात मला त्याचे दर्पोक्तीपूर्ण शब्द आठवले. “तू? अन माझी बरोबरी करतोस? तू यत्किंचित मंदगती आहेस, तर मी वाऱ्याशी स्पर्धा करणारा.”
त्याला धडा शिकविणे गरजेचे होते.
मी त्याला तसाच सोडून पुढे निघालो. मी अंतिम ठिकाणापाशी पोचलो तेंव्हा तो अजूनही तिथे आला नव्हता.
अशा रीतीने, मी, एका यत्किंचित कासवाने, शर्यत जिंकून सश्याला हरविले होते. मी त्याचे गर्वहरण केले होते.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
खूप मस्त.
खूप मस्त.
मस्त
मस्त
छान
छान