Submitted by मुकुंद on 10 January, 2025 - 07:57
लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. त्या भागात राहाणार्या सगळ्यांनीच काळजी घ्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Nature is the great equalizer
भयंकर परिस्थिती आहे. अश्या वेळी स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे.
बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. >>
Nature is the great equalizer. It doesn’t discriminate based on race, class, how much you own or what you have in the bank.
होम इन्श्युरन्स असेल तर जरा
होम इन्श्युरन्स असेल तर जरा तरी बरं. नाहीतर फार वाईट.
ही बातमी शोधत होते - Thousands of Los Angeles homeowners were dropped by their insurers before the Palisades Fire
विचित्र आठवडा आहे हा.
विचित्र आठवडा आहे हा. वेस्ट्कोस्टला आग तर आमच्या इथे स्नोस्टॉर्म. साधारण १ इंच स्नो पडला, म्हणजे पुढचे ३-४ दिवस कामकाज ठप्प...
१ इंच?
१ इंच?
>>>>>>अश्या वेळी स्वतःचा जीव
>>>>>>अश्या वेळी स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे.
पंचमहाभूतांपैकी एक महाभूत आहे ते. झपाट्याचा वेग आहे. पापणी लवते न लवते तो वेढून टाकणारं, आणि निर्दयी बळी घेणारं
आमच्याकडे तुफान पाऊस, तिकडे
आमच्याकडे तुफान पाऊस, तिकडे सनसेट blvd जळून गेले.
एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.
>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा
>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.
+१०१
मुकुंद , धागा काढल्याबद्दल
मुकुंद , धागा काढल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आणि माहितीतले सर्व मायबोलीकर सुखरूप आहेत. काही जणांना इव्हॅक्युएट करावे लागले आहे पण आता परत घरी पोचले आहेत.
पण काही भाग प्रचंड उध्वस्त झाला आहे काही दिवसांनी कळेल काय नुकसान झाले आहे ते.
>>>>>>>>>.एल ए करांनो जपून
>>>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.>> + १
टेक केअर.
टेक केअर.
बापरे काय आग आहे..
बापरे काय आग आहे..
गेले अर्धा तास व्हिडिओ बघतोय याचे.. दिसणारी दृश्ये आणि कानावर येणारे आकडे सारेच खतरनाक
त्या तुलनेत जीवित हानीचा आकडा कमी वाटतोय हेच समाधान.. अन्यथा व्हिडिओ बघवले नसते.
समीर - धन्यवाद इथे
समीर - धन्यवाद इथे कळवल्याबद्दल!
आत्ता गूगलवर मॅप मधे बघितले. फार मोठा एरिया आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी आग लागलेली दिसते. पासाडिना वगैरे मी लांब समजत होतो पण तेथे दुसरी एक वेगळी आग आहे जवळ.
खूप भयंकर आहे.
खूप भयंकर आहे.
त्या भागातल्या लोकांच्या
त्या भागातल्या लोकांच्या सुरक्षेसाठी शुभेच्छा. काळजी घ्या.
काळजी घ्या सर्व सुखरूप असोत
काळजी घ्या
सर्व सुखरूप असोत
बुधवारी ( ३:०० am - ३:०० pm),
बुधवारी ( ३:०० am - ३:०० pm), वार्याचा वेग ७० mph पर्यंत जाणार आहे असा अंदाज आहे म्हणजे आगीचे संकट अजूनही टळलेले नाही.
काळजी घ्या.
जगाला शहाणपणा शिकवण्यात
जगाला शहाणपणा शिकवण्यात आघाडीवर असणारे अमेरिकन लोक लाकडांच्या filmsy घरात का राहतात हे मला कधीही न उलगडलेले कोडे आहे. अपार्टमेंट्स नकोत (काहीतर आचरट नियम बनवले आहेत स्टेअरकेस करिता की अमुक एका एरियाला इतके स्टेयरकेस हवेत वगैर, कशासाठी तर बिल्डिंगला लागलेल्या आगीपासून बचाव व्हावा वगैरे म्हणून), मोठमोठाली लाकडाची घरे पाहिजेत. वणव्यात, वादळात दोन मिनिटात बेचिराख झाले तरी चालेल.