लॉस एंजेलीस मधली भिषण आग- जानेवारी २०२५

Submitted by मुकुंद on 10 January, 2025 - 07:57

लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्‍याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. त्या भागात राहाणार्‍या सगळ्यांनीच काळजी घ्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>
इतकी अक्कल कॅलिफोर्नियन लोकांना तो सर्वश्रेष्ठ क्लायमेट देव देवो हीच सदिच्छा.” - बच्चन साहेब, ते टेक्सास ला मूव्ह व्हायचं कधी मनावर घेताय
<<
नुसत्या रिकामटेक डे सल्ले देण्याऐवजी काही आर्थिक मदत करणार असाल तर ठीक आहे. नाहीतर आपला सल्ला ठेवायला काही जागा सुचवू शकतो!

“आपला सल्ला ठेवायला काही जागा सुचवू शकतो!” - अर्र… लागलं वाटतं? Proud

जर आर्थिक मदत केली असेल तर तुम्हाला माहित असलेल्या जागांपैकी कुठे मूव्ह व्हाल का? (जहाँ प्यार हीं प्यार खि़ला हो) Happy

>>
जर आर्थिक मदत केली असेल तर तुम्हाला माहित असलेल्या जागांपैकी कुठे मूव्ह व्हाल का? (जहाँ प्यार हीं प्यार खि़ला हो)
<<
उगा जर तर कशाला करता? किती घसघशीत मदत आहे त्यावर ठरवू.

ह्यातील एक आग तरी समाजकंटकाने लावली आहे. त्याला ब्लो टॉर्च नामक आयुध वापरून आग लावल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. (बेकायदा घुसखोरीचा उदो उदो करणारे त्याला निष्पाप अनडॉक्युमेंटेड वेल्डर म्हणा असा आग्रह धरत आहेत)

लोकांना उपद्रव व्हावा म्हणून किंवा कुठल्याशा बड्या कंपनीला मोठे प्लॉट घेऊन तिथे अपार्टमेंट बांधता यावेत म्हणून हे वारे सुरू झाल्यावर पद्धतशीरपणे आगी लावल्या जात असतील तर सर्वशक्तीमान क्लायमेट देवाचा कोप म्हणून बोंब मारण्यात काही अर्थ नाही.
गुन्हेगारांना शिक्षा द्यायची नाही. बेकायदा घुसखोरांना अभय द्यायचे वगैरे आचरट, घातक धोरणांमुळे असल्या आगी लागतच राहणार.
होमलेस प्रश्न सोडवूनच आता टाकू अशा गर्जना करत न्यूसमने कित्येक अब्ज डॉलर्स ह्या प्रकल्पाकरता अनेक वर्षांपूर्वी दिले होते. तेव्हाच कळले की हा प्रश्न सुटणार तर नाहीच. पण आणखी जास्त वाईट होणार आहे आणि तसेच झाले.

कॅलिफोर्नियात अनेक ठिकाणी होमलेस लोक आपली झोपडी, तंबू, डेरा जे काही म्हणाल ते उभारतात. मग थंडीत ऊब मिळावी म्हणून हव्या तशा आगी लावतात. काही वेळा त्या भडकून मोठ्या आगी बनतात. न्यूसमचे अब्जावधी डॉलर्स म्हणे अशा बेघर लोकांच्या पुनर्वसनासाठी वापरले जाणार आहेत. पण तसे होताना दिसत नाही.
कॅलिफोर्नियात अफाट कर गोळा केला जातो. सगळ्या अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या कराचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगभरातील अनेक लहान सहान देशांच्या बजेटपेक्षा जास्त पैसा कॅलिफोर्निया राज्याच्या करातून मिळतो. परंतु हा पैसा व्यर्थ दवडला जातो आहे किंवा न्यूसम सारखे लुच्चे लफंगे आपली तुंबडी भरायला तो पैसा वापरत आहेत.
कदाचित ह्या आगीवर न्यूसम आपली पोळी भाजण्यासाठी भक्कम कार्बन टॅक्स किंवा तत्सम लावेल. सर्वशक्तिमान क्लायमेट देवाला संतुष्ट करायला अशा प्रकारे करदात्यांचे कंबरडे आणखी मोडणारी करवाढ म्हणून ही मिरवली जाईल. बघू या काय काय होते ते.

“काही आर्थिक मदत” / “किती घसघशीत मदत आहे त्यावर ठरवू.” - गोलमाल हैं भईं सब गोलमाल हैं… ह्या बोटावरची थुंकी, त्या बोटावर… एक्स्पेक्टेशन्स सेट झाल्या, आता चालू द्या नक्राश्रू Proud

समीर , तुम्ही सगळे सुखरुप आहात हे वाचुन बर वाटल. पण एल ए मधे जे झाल त्याला ट्रॅजिकच म्हटल पाहीजे.

शेंडेनक्षत्रांच्या काही मुद्द्यांशी सहमत. फायर डेंजरची पुर्व सुचना असतानाही मेयरने घानाला तिथल्या प्रेसिडेंटच्या इनऑगरेशनला जाणे अगदी बेजबाबदारपणाचे होते. तसच एल ए फायर डिपार्टमेंटची प्रमुख, उपप्रमुख व उप उप प्रमुख तिनही पदे ओबिज लेस्बिअन स्त्रियांकडे असणे हे बघुन त्यांनी DEI धोरण टु फार उचलुन धरल्यासारखे वाटते. खासकरुन त्यातल्या एकीचे फायर रेस्क्यु सिच्युएशन बद्दलचे “काहीच्या काही” विचार वाचल्यावर तसे वाटण्याला वाव आहे.

पण या आगीला DEI धोरण जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे ठरेल. या आगीचे कारण म्हणजे गेल्या ६ महिन्यातले तिथले एक्स्ट्रिम ड्राय व्हेदर , त्या भागात झालेली झाडे झुडुपांची अनिर्बंध वाढ व ताशी ११० ते १२० किलोमिटर असे घोंगावणारे “ सँटा अ‍ॅना“ चे वादळी वारे!

एल ए व आजुबाजुचा प्रदेश भौगोलीक द्रुष्ट्या असा आहे की एक्स्ट्रिम ड्राय व्हेदर मधे नुसती ठिणगी पेटायचा अवकाश की अशी आग लागायला व पसरायला वेळ लागत नाही. केवळ नशिब म्हणुन आतापर्यंत अशी भिषण आग हायली पॉप्युलेटेड एरिया मधे लागली नव्हती.

एल ए मधे भुकंप व आग हे दोन्ही धोके आहेत. सॅन फ्रॅन्सिस्को व बे एरिया मधे भुकंपाचा फार मोठा धोका आहे. पॅसिफिक नॉर्थवेस्ट मधे भुकंप व सुनामीचा धोका आहे, मिडवेस्टमधे टेक्सास/ ओक्लोहोमा/ कॅन्सस/ मिझुरी/ आयोवा/ नेब्रास्का/ साउथ डाकोटा / नॉर्थ डाकोटा या टोर्नॅडो अ‍ॅलीमधे टोर्नॅडोचा फार मोठा धोका आहे. फ्लोरीडा,नॉर्थ कॅरोलायना, अलाबामा, ल्युझिआना, व टेक्ससच्या समुद्रकिनार्‍यांवर राहणार्‍यांना चक्रिवादळांचा( हरिकेन्स) धोका असतो. तरी त्या सगळ्या भागात लोक राहतातच. इट्स अ कॅल्क्युलेटेड रिस्क. इथल्या भागात राहणार्‍या लोकांना माहीत असते की कधी ना कधी ते ज्या भागात राहात आहेत तिथे कधीना कधी तरी तिथे असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या रिस्कला त्यांना सामोरे जायला लागणारच आहे. पण प्रत्येक जण अशी आशा बाळगुन असतो की आपल्याला अश्या आपत्तीतुन जायला लागणार नाही.

पण बदलत्या पर्यावरणामुळे व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अश्या आपत्त्यांची फ्रिक्वेन्सी व सिव्हिरीटि वाढु लागली आहे. अश्या आगी,हरीकेन्स किंवा टोरनॅडॉज आता गावेच्या गावे उध्वस्त करतात.

एल ए च्या आगींच्या दरम्यान पॅसिफिक पॅलीसेड व मॅलीबु इथल्या आगीत तिथल्या फायर हायड्रंटमधले पाणी संपले किंवा त्यातला प्रेशर कमी झाला त्याला एल ए मेयर, एल ए फायर चिफ किंवा कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर गॅव्हिन् न्युसमला जबाबदार ठरवणे हे मुर्खपणाचे ठरेल. ही आग एवढी मोठी होती की हजारो घरे एकाच वेळेला पेटली होती. अशी आग विझवायला कुठल्याही शहरातली फायर फायटींग यंत्रणा तुटपुंजी पडली असती! एवढ्या सगळ्या हजारो घरांना एकाच वेळी आग लागली तर किती आगीचे बंब लागतील व किती पाणी लागेल! त्यामुळे तिथले फायर हायड्रंट बंद पडले किंवा त्यातुन येणार्‍या पाण्याचा दाब कमी झाला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको. त्याला गव्हर्नर न्युसम किंवा एल ए ची मेयर किंवा फायर चिफ काय करणार?

आता अश्या फायर प्रोन प्रदेशात जळुन घेलेल्या घरांचे व गावांचे पुनर्वसन घाईत करु नये. पुर्ण सारासार विचार करुन पुढचे निर्णय घ्यावेत असे मला वाटते.

तिथल्या सगळ्या लोकांना फास्ट रिकव्हरीसाठी व पुढे अशी ट्रॅजीडी टळण्यासाठी शुभेच्छा.

निव्वळ उत्तम सबबी देऊन आग भडकत ठेवणे एवढेच सरकारचे काम आहे का? हायद्रंट मधे पाणी नसण्याचे किती लंगडे समर्थन कराल? काही भागातील अग्निशमन कर्मचारी सांगतात की जवळपास आज विझवयच्या कुठल्याही नळाला पाणी नव्हते.
ज्या प्रमाणात राज्य आणि शहर कर गोळा करते ते पाहता अशी हलगर्जी अक्षम्य आहे. प्रत्येक वेळी क्लायमेट चेंज चे भूत उभे करून ते सबब म्हणून वापरायचे हे अती होते आहे.
पालीसेड चा एक तलाव काही महिने कोरडा ठणठणीत होता. तो तसा का होता ह्याचें उत्तर कुणाकडेही नाही. त्यातले पाणी आग विझवू शकले असते.
एल जी बी टी क्यू वगैरे प्रकरण इतके हाताबाहेर जात आहे की फायर हायद्रंट मधे पाणी आहे की नाही यापेक्षा तो एल जी बी टी क्यू वाल्या सप्तरंगी रंगात रंगवता येईल का हा प्रश्न जास्त महत्त्वाचा होतो आहे
न्युसमने काही वर्षांपूर्वी अब्जावधी डॉलर्स वाळलेली झाडे साफ करायला बाजूला काढले होते. त्याचे काय झाले?
पाण्याचे दुर्भिक्ष हे राज्यात कायम असते. नवे तलाव, नवी धरणे का बांधली जात नाहीत? होमलेस लोक वाट्टेल तिथे तंबू का ठोकतात? आगी का लावतात? न्युसम ही ह्या हलगर्जीला जबाबदार आहे.
कर घ्यायला सगळ्यात पुढे. काम करायला कायम मागे अशी राज्याची प्रतिमा आहे.
पण अशा डझनभर आगी लागल्या तरच कदाचित आपले नेते बदलतील.

मुकुंद, एक्दम मुद्देसुद आणि समर्पक पोस्ट लिहिल्याबद्दल तुझे आभार. इथे शेंडेनक्षत्रांचे जे काहि चालु आहे ते पाहून आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी याची प्रचिती येते. खरं तर असल्या निर्र्थक पोस्ट्ला इग्नोरच करणार होतो पण रहावत नाही.
आणी शेंडेनक्षत्र, कृपया उत्तर देण्याच्या फंदात पडू नका. ईथल्या स्थानिकांना काय झालं आणि काय होतंय याची पूर्ण कल्पना आहे.

मुकुंद, एक्दम मुद्देसुद आणि समर्पक पोस्ट लिहिल्याबद्दल तुझे आभार. > +१.
मागच्या पानावरील लाकडी घरे का याबाबत अमीतव यांची पोस्टही माहितीपूर्ण आहे.

माझ्या नावाने निव्वळ शिव्या घालणाऱ्या लोकांकडे उत्तर द्यायला मुद्दे नसतात हा आजवरचा अनुभव आहे . भेकड आणि पळपुटे!
तलाव कोरडे असणे
फायर हायद्रंट कोरडे असणे
ह्याला कोण जबाबदार आहे क्लायमेट चेंज?
प्रत्येक गोष्ट क्लायमेट चेंज म्हणून झटकून टाकणार असाल तर सहा आकडी पगार देऊन लेस्बिअन अग्निशमन अधिकारी कशाला नेमले आहेत?
आगीचा मौसम सुरू व्हायच्या आधी युद्ध पातळीवर तयारी का केली जात नाही? महापौर घानाला का धावली? असे काय महत्त्वाचे काम होते?
आपले लाडके वोक तत्त्वज्ञान तोंडघशी पडताना बघून त्यावर टीका करणाऱ्यांना शत्रू मानून बोंबाबोंब केलीत तरी सत्य झाकत नाही

यातल्या अनेक आगी समाज कंटक लोकांनी लावल्या असा संशय आहे हे तर खरे? त्याला कोण जबाबदार? क्लायमेट परमेश्वर?

Pages