Submitted by मुकुंद on 10 January, 2025 - 07:57
लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. त्या भागात राहाणार्या सगळ्यांनीच काळजी घ्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Nature is the great equalizer
भयंकर परिस्थिती आहे. अश्या वेळी स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे.
बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. >>
Nature is the great equalizer. It doesn’t discriminate based on race, class, how much you own or what you have in the bank.
होम इन्श्युरन्स असेल तर जरा
होम इन्श्युरन्स असेल तर जरा तरी बरं. नाहीतर फार वाईट.
ही बातमी शोधत होते - Thousands of Los Angeles homeowners were dropped by their insurers before the Palisades Fire
विचित्र आठवडा आहे हा.
विचित्र आठवडा आहे हा. वेस्ट्कोस्टला आग तर आमच्या इथे स्नोस्टॉर्म. साधारण १ इंच स्नो पडला, म्हणजे पुढचे ३-४ दिवस कामकाज ठप्प...
१ इंच?
१ इंच?
>>>>>>अश्या वेळी स्वतःचा जीव
>>>>>>अश्या वेळी स्वतःचा जीव वाचवणे महत्त्वाचे.
पंचमहाभूतांपैकी एक महाभूत आहे ते. झपाट्याचा वेग आहे. पापणी लवते न लवते तो वेढून टाकणारं, आणि निर्दयी बळी घेणारं
आमच्याकडे तुफान पाऊस, तिकडे
आमच्याकडे तुफान पाऊस, तिकडे सनसेट blvd जळून गेले.
एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.
>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा
>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.
+१०१
मुकुंद , धागा काढल्याबद्दल
मुकुंद , धागा काढल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आणि माहितीतले सर्व मायबोलीकर सुखरूप आहेत. काही जणांना इव्हॅक्युएट करावे लागले आहे पण आता परत घरी पोचले आहेत.
पण काही भाग प्रचंड उध्वस्त झाला आहे काही दिवसांनी कळेल काय नुकसान झाले आहे ते.
>>>>>>>>>.एल ए करांनो जपून
>>>>>>>>>.एल ए करांनो जपून राहा. तुम्हाला सदिच्छा. ही भीषण परिस्थिती लवकर दूर होवो.>> + १
टेक केअर.
टेक केअर.
बापरे काय आग आहे..
बापरे काय आग आहे..
गेले अर्धा तास व्हिडिओ बघतोय याचे.. दिसणारी दृश्ये आणि कानावर येणारे आकडे सारेच खतरनाक
त्या तुलनेत जीवित हानीचा आकडा कमी वाटतोय हेच समाधान.. अन्यथा व्हिडिओ बघवले नसते.
समीर - धन्यवाद इथे
समीर - धन्यवाद इथे कळवल्याबद्दल!
आत्ता गूगलवर मॅप मधे बघितले. फार मोठा एरिया आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी आग लागलेली दिसते. पासाडिना वगैरे मी लांब समजत होतो पण तेथे दुसरी एक वेगळी आग आहे जवळ.
खूप भयंकर आहे.
खूप भयंकर आहे.
त्या भागातल्या लोकांच्या
त्या भागातल्या लोकांच्या सुरक्षेसाठी शुभेच्छा. काळजी घ्या.
काळजी घ्या सर्व सुखरूप असोत
काळजी घ्या
सर्व सुखरूप असोत
बुधवारी ( ३:०० am - ३:०० pm),
बुधवारी ( ३:०० am - ३:०० pm), वार्याचा वेग ७० mph पर्यंत जाणार आहे असा अंदाज आहे म्हणजे आगीचे संकट अजूनही टळलेले नाही.
काळजी घ्या.
जगाला शहाणपणा शिकवण्यात
जगाला शहाणपणा शिकवण्यात आघाडीवर असणारे अमेरिकन लोक लाकडांच्या filmsy घरात का राहतात हे मला कधीही न उलगडलेले कोडे आहे. अपार्टमेंट्स नकोत (काहीतर आचरट नियम बनवले आहेत स्टेअरकेस करिता की अमुक एका एरियाला इतके स्टेयरकेस हवेत वगैर, कशासाठी तर बिल्डिंगला लागलेल्या आगीपासून बचाव व्हावा वगैरे म्हणून), मोठमोठाली लाकडाची घरे पाहिजेत. वणव्यात, वादळात दोन मिनिटात बेचिराख झाले तरी चालेल.
ह्या धाग्याच्या विषयाच्या
ह्या धाग्याच्या विषयाच्या "भीषण" शीर्षकामुळे सहभागी व्हायला घाबरत होतो. पण राहवत नाही! असो.
लॉस अॅन्जेलिसच्या अग्निशामक दलाच्या प्रमुखाचे एक वाक्य खूप व्हायरल होते आहे. सदर प्रमुख हा आपण पहिली लेस्बियन व्यक्ती आहोत जिने ह्या पदावर आरूढ होऊन त्या पदाला गौरवले आहे. आणि आपले लेस्बियन असणे आणि डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन हे जादूचे शब्द आपल्यासाठी शिरसावंद्य कसे आहेत ह्याविषयी त्या शहराच्या अधिकृत संकेतस्थळावर अग्निशमन दलाच्या पानावर उल्लेख आहेत. आता आपल्या लैंगिक आवडी निवडी काय आहेत. कुठल्या लिंगाच्या व्यक्तीसोबत आपले लैंगिक संबंध आहेत ह्यावर आपण किती वेगाने आगी विझवू शकतो ह्याचा नक्की काय संबंध आहे ते तो वोक परमेश्वरच जाणे!
पण ह्या बाईने असे विधान केले की आग लागल्यावर त्या आगीत सापडलेला/ली अशा अग्निशमन कर्मचार्याच्या प्रतीक्षेत असते जो/जी आपल्या सारख्या वर्णाचा/ची असेल. आपल्या सारख्याच लैंगिक आवडी निवडी बाळगत असेल. म्हणजे आगीत एखादा गे पुरुष असेल तर त्याला गे अग्निशामक कर्मचारी लागतो. काळा असेल तर काळा. काळी आणि लेस्बियन असेल तर कर्मचारीही काळी आणि लेस्बियन. किती छान.
म्हणजे ९११ फोन फिरवल्यावर असा काहीसा संवाद होईल
"काय आणीबाणी आहे?",
"आमच्या घराला आग लागली आहे. अमुक अमुक पत्ता आहे. लवकर बंब वगैरे पाठवा".
"बर. मग तुम्ही कुठल्या रेसचे आहात?"
"मी श्वेतवर्णीय आहे. बायको कृष्णवर्णीय आहे"
"घरात कुणी समलैंगिक, ट्रान्स?"
"हो, माझी मुलगी बायरेशियल लेस्बियन आहे. मुलगा ट्रान्स होणार म्हणतो आहे".
"अरेरे! श्वेतवर्णी पुरुष, काळी स्त्री, लेस्बियन काळीपांढरी मिश्र बाई मिळू शकेल. पण आमचा एकमेव ट्रान्स अग्निशामक कर्मचारी सुट्टीवर आहे. बाकीच्यांना सोडवता येईल. पण त्याला दोन दिवस आगीतच रहावे लागेल."
"ठीक आहे. साध्यासुध्या कर्मचार्याकडून सुटका होण्यापेक्षा आगीत जळणे चांगले. जय वोकिज्म!"
"जय वोकिज्म!"
एलेकर्स काय सिच्युएशन आहे आता
एलेकर्स काय सिच्युएशन आहे आता? तेथील रेण्ट्स प्रचंड वाढली आहेत असे वाचले.
सगळे लाकडाच्या घरात राहतात म्हणजे एकजात सगळे अमेरिकन्स बिनडोक असले पाहिजेत किंवा तेथे इतर काही फॅक्टर्स असतील जे त्यांच्या "शूज" मधे नसलेल्यांना माहीत नसतील. यातले काय असण्याची शक्यता जास्त आहे याचा विचार केला तर जज न करणे सोपे होईल.
बाय द वे, अगदी आत्ताआत्तापर्यंत कॅलिफोर्नियात मुख्य धोका हा भूकंपाचा समजला जात होता. वणव्याचा नाही.
फारएण्ड - सहमत.
फारएण्ड - सहमत.
लाकडाची घरे बनवायला तुलनेने स्वस्त असतात, सहज उपलब्द आहे , कमी पडल्यास कॅनडामधून मागवता येते . भूकंपप्रवण क्षेत्र असेल तर सिमेंटच्या/ दगडाच्या मानाने लाकडी घर तुलनेने जास्त सुरक्षित आहे. आता आगीच्या भक्षस्थानी पडले तर क्षणांत राख होण्याचा धोका आहेच. रिस्क कशात कमी आहे तरी बहुतेकांना परवडतील अशी घरे बनविली जातात.
किल्लारीचा भूकंप रिश्टर स्केलवर फार मोठा असा नव्हता पण प्राण हानी मोठ्या प्रमाणांत झाली. कारण घरे दगडाची होती. झोपलेल्या अवस्थेत एक मोठा दगड डोक्यात पडला तर जीव गेलाच. याच जागी लाकडाची किंवा काटक्याची किंवा शेणा-मातीची घरे असती एकही जीव गेला नसता.
वाढलेली लोकसंख्या आहे. जुनाट electrical power lines, हवेचा प्रचंड वेग, कोरडे हवामान हे सर्व घटक एकत्र आले. मागच्या वर्षी पण पावर लाईन्समुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. मागच्या वर्षी हवाई मधे अशाच प्रकारच्या आगीत १०० अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
https://en.wikipedia.org/wiki/2023_Hawaii_wildfires#:~:text=In%20early%2...'s%20northwest%20coast
हवेचा वेग हा येथे एक नंबरचा
हवेचा वेग हा येथे एक नंबरचा शत्रू होता त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही पण तरी infra structure जूनाट असणे, अनेक फायर हायड्रन्टला पाणीच नसणे हे समजण्यापलीकडे आहे .
गेली कित्येक दशके तुफान
गेली कित्येक दशके तुफान वेगाने वाहणारे सँटा अॅना वारे अनुभवत आहोत. फक्त असे वारे सुटणार आहेत ह्याची पूर्वसूचना असताना आपली महत्त्वाची घाना देशाची भेट रद्द करण्याचे तारतम्य न बाळगणारी महापौर पहिल्यांदाच पाहिली!
आपण कृष्ण वर्णीय आहोत, आपण लेस्बियन वगैरे एल जी बी टी क्यू ए बी सी डी ई एफ जी एच+ वगैरे महान जातकुळीच्या लोकांची वारेमाप भरती केली आहे. आपण क्लायमेट देवतेसमोर नतमस्तक होतो म्हणून आपण सुरक्षित आहोत असा काही समज बाईंनी करुन घेतला असावा.
इतके दिवस झाले तरी थोर नेता न्यूस्कमपासून खालपर्यंत कुणालाही बहुतेक हायड्रंट कोरडे ठणठणीत का होते ह्याचे उत्तर सापडलेले नाही. कित्येक ठिकाणी चोरट्या लोकांनी हायड्रंटचे विविध भाग चोरून नेले होते! अर्थात न्यूस्कमच्या राज्यात चोरी करणे हा आत्ता आत्ता पर्यंत गुन्हा समजला जात नव्हता.
आता अतीश्रीमंत लोकांची रिकामी केलेली घरे लुटली जाऊ लागल्यावर काही उच्चवर्णीय लोकांनी गुन्हे वाढलेत म्हणून आक्रंदन सुरू केले आहे. निदान अशा लोकांसाठी तरी काही प्रमाणात चोरट्यांची धरपकड करण्याची नामुष्की लॉस एंजेलिसच्या पोलिसांवर येणार!
आमच्या karaoke ग्रूपमधे काही
आमच्या karaoke ग्रूपमधे काही लोक असे आहेत जे, karaoke ची थीम काहीही असो, त्यांना येत असलेलीच तीच तीच गाणी म्हणतात. इथल्या काही प्रतिक्रिया वाचून एकदम आठवलं.
आजच बातमी वाचली की Los Angeles evacuees return to hope and devastation. इतक्या मोठ्या संकटातून परत उभं रहाण्याचं बळ त्यांना मिळो.
असले नालायक नेते निवडून देऊ
असले नालायक नेते निवडून देऊ नयेत इतकी अक्कल कॅलिफोर्नियन लोकांना तो सर्वश्रेष्ठ क्लायमेट देव देवो हीच सदिच्छा.
कितीही संकटे आली तरी आपल्या लाडक्या लोकांना शिव्या बसू नयेत म्हणून कुणाचीच काही चूक नाही असा आव आणून वाळूत तोंड खुपसणारे शहामृग, कायम नकारघंटा वाजवणारे लोकही इथे दिसतात. सगळे शहर भस्मसात होऊन समस्त एल ए वासी बेघर झाले तरी आमच्या लाडक्या न्यूसमला कुण्णी कुण्णी वाईट म्हणायचे नाही. आमच्या छान छान करेन बासला कुण्णी कुण्णी वाईट म्हणायचे नाही. समस्त लेस्बियन अग्निशामक दलाच्या निष्क्रियतेला कुण्णी कुण्णी नावे ठेवायची नाहीत.
ह्याला काय आधार आहे?
जेव्हा लोखंड तापलेले असते तेव्हाच त्यावर घाव घालायचे असतात. जोवर आगीच्या आठवणी ताज्या आहेत तोवर राजकीय नेत्यांच्या बेजबाबदार चुका दाखवून दिल्या नाहीत तर पुन्हा सगळे नागरिक मुर्दाड वोक बनून तेच तेच लोक निवडून देणार हे नक्की.
“ इतकी अक्कल कॅलिफोर्नियन
“ इतकी अक्कल कॅलिफोर्नियन लोकांना तो सर्वश्रेष्ठ क्लायमेट देव देवो हीच सदिच्छा.” - बच्चन साहेब, ते टेक्सास ला मूव्ह व्हायचं कधी मनावर घेताय?
अमेरिकेत भूकंप प्रोन प्रदेश २
अमेरिकेत भूकंप प्रोन प्रदेश २-३ च आहेत पण लाकडी घरे पूर्ण अमेरिकाभर आहेत.
दरवर्षी अनेक राज्या मध्ये वादळात घरे उडून गेलेली बघायला मिळतात.
लाकडी घरांमुळे California t वणव्यात घरे जाळतात
सतत कुठे खुट्ट ठिणगी उडाली तर काय ही एक टांगती तलवार असतेच डोक्यावर..
आता तर बरेच होम insurers California tun काढता पाय घेतायत..
लाकडी घराचे फायदे - थोड फार insulation, भूकंपात तगू शकतात,
स्वस्त , flexible आणि पटापट बांधून होतात ( चीप लेबर , पैसे सेव होतात)
तोटे
वादळे, आगी यात पूर्ण वाताहत होते. अनेक लोक बेघर होतात.
प्रचंड प्रमाणाबाहेर झाडे कत्तल / पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास अतिशय महत्त्वाचा मुद्दा)
अवांतर:
भारतात असताना: खूप पाऊस पडणार असेल तर सांगतात घरीच रहा ( अर्यत कारण तो जास्त सुरक्षित पर्याय असतो बहीतेकांसाठी)
अमेरिकेत: evacuation घरातून बाहेर पडा... ( घरात सुरक्षित नाही)
सुरुवातीला अमेरिकेत हे अत्यंत विचित्र वाटलेले, आपण घट सुरक्षित राहायला बांधतो आणि अपत्कालीन परिस्थिती मध्ये आपण त्या घरातच सुरक्षित नाही.. काय irony आहे पण जे आहे ते आहे.
जळालेल्या इमारती लाकडाच्या
जळालेल्या इमारती लाकडाच्या होत्या का? हे नव्हते माहीत. तरीच इतके वेगाने आग पसरत जाते.
बायकोची एक बहिण वर्षभरापूर्वी अमेरिकेला गेली आहे. अर्थात इथपासून राहायला दूर असावी पण या विषयावर त्यांची फोनवर चर्चा कानावर पडते.
माझ्या एका मैत्रिणीकडून सुद्धा ऐकले होते की तिच्या इथे लाकडाच्या घरात मुलांनी वरच्या फ्लोअर वर दंगा केला की आवाज खाली जातो आणि यावरून भांडणे होतात.
पण बहुतांश अमेरिकेत लाकडाची घरे असतात याची कल्पना नव्हती. पण त्यामागे तसेच आर्थिक गणित असणार हे नक्की. फायदे तोट्यात फायदे वरचढ असावेत.
इतर कुठल्याही पर्यायापेक्षा
इतर कुठल्याही पर्यायापेक्षा लाकूड कित्येक पटींनी पर्यावरण स्नेही, कार्बन साठवणारे, पुनर्वापर शक्य असलेले, जैव विघटित होणारे, रीन्यूएबल, अत्यंत स्वस्त, टिकाऊ १०० वर्षे आरामात टिकणारे, आमच्या कडे मुबलक प्रमाणात आणि सर्वत्र मिळणारे त्यामुळे ने आण करण्याचा खर्च ही कमी. लाकडाची थर्मल कंडक्टीव्हीटी इतर पर्यायांपेक्षा कित्येक पटींनी कमी असल्याने थंडीत आणि उन्हाळ्यात तापमान आणि ते आरामदायी राखणाऱ्या यंत्रांवर कमी ताण येतो.
दिसायला छान, हवा तो आकार देणं सहज शक्य, स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार असे अनेक फायदे लाकडाचे आहेत. घरांच्या लाकडाची शेती केली जाते, ती वापरणे इतर कशाही पेक्षा पर्यावरण स्नेही आहे.
बाकी खूप पाऊस पडणार असेल तर अमेरिकेत घर सोडून जा असं कधी आणि कुठे सांगतात? ज्या परिस्थितीत (मड स्लाईड, पूर, वणाव्या नंतरची अतिवृष्टी) आणि ज्या उंचीच्या घरांना (हाय राईज वि. बैठी) सांगत असतील ते भारतात ही सांगतीलच.
अमितव +१ छान समराईझ केलंयस.
अमितव +१ छान समराईझ केलंयस.
थोडे विषयांतर असेल,
थोडे विषयांतर असेल,
पण आमची जुनी चाळ बर्मा सागवानी लाकडाची होती. जेव्हा तिचे शेवटचे रीपेरींग आले तेव्हा खूप लूटमार झाली. चांगली चांगली लाकडे काढून विकली गेली. आणि त्याजागी स्टील मेंबर बसवले गेले. त्यावरून खूप मोठा राडा झाला. मारामाऱ्या झाल्या. आधीची कमिटी बरखास्त झाली. नवीन कमिटी आली. माझे वडील त्या नवीन कमिटीचे अध्यक्ष झाले. त्यामुळे लहान असून आणि हे कळायची अक्कल नसून या घडामोडी आठवतात. मग सरळ बिल्डर लागला आणि रीडेव्हलपमेंट झाले. त्यामुळे लाकडाची किंमत काय असते हे जाणून आहे.
Pages