कायद्यानुसार असलेल्या शिक्षेचे अपुरेपण

Submitted by बेफ़िकीर on 7 January, 2025 - 03:21

हे लेखन 'चालू घडामोडी' समूहात करायचे होते पण तेथे लेखन करण्याचा पर्याय दिसत नाहीये (मला). कृपया जमल्यास प्रशासकांनी हे लेखन तिकडे न्यावे ही विनंती!

संतोष देशमुख यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली ते इथे लिहावेसेही वाटत नाही. निर्भयाची हत्याही भयानक क्रूरपणे झाली होती. माणसांत जनावरापेक्षा कैक प्रमाणात अधिक क्रौर्य असते / असू शकते याची ही दोन व आणखीही असंख्य उदाहरणे आहेत.

गुन्हेगार सापडणे, कोठडी, चौकशी, खटला, या असल्या आरोपीच्या बाजूने वकील असू शकणे, निकाल लागणे, वरच्या कोर्टात जाणे, दयेचा अर्ज वगैरे बाबींमुळे विलंब होतो हा तर वेगळाच भाग आहे.

मात्र, गुन्हेगारांनी जे क्रौर्य दाखवले त्या तुलनेत फाशीची शिक्षा अगदीच साधी वाटते.

गुन्हेगारांना भयंकर जरब बसावी अश्या प्रकारचे कायदे येथे अस्तित्वात येणे जवळपास अशक्य आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून खूप अस्वस्थ वाटले म्हणून फक्त हे विचार मांडले.

कोणाला याबाबत व्यक्त व्हायचे असल्यास अवश्य लिहावेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक निरीक्षण.

भरत यांचा प्रतिसाद नंतरचा.... त्यात बेजबाबदार जाणवला.

बोकलत यांचा प्रतिसाद आधीचा.... शांतपणे वाचून काढला. पहिल्या वाचण्यात अस्थानी, उसकवणारा असे काहीच वाटले नाही. खास आमंत्रण दिले होते असा प्रतिसाद देण्यासाठी हा भाग वेगळा.

नंतर भरत यांना अर्थ कळला नाही हा प्रतिसाद वाचल्यावर बोकलतांचा प्रतिसाद मी पुन्हा एकदा वाचला.... आता प्रतिसाद पटला नाही, अस्थानी व उसकवणारा वाटला.

देर आये दुरुस्त आये असे म्हणायचे का ?

उदय,

मी तुमच्या मुद्यांशी मुळातच सहमत आहे. याचे कारण, संतोष देशमुखांना कसे मारले याचे वर्णन खूप आधीच पेपरमध्ये वाचले होते. नेत्यांनी निर्णय घ्यायला का वेळ लावला, काय प्रॉब्लेम असू शकतील याचा अंदाज आजकाल माझ्यासारख्या सामान्य माणसालाही येऊ शकतो. आजच्या युगात कोणीही पूर्ण स्वच्छ चारित्र्याचे, विचारांचे वगैरे नाही. हे सगळे गांधी असताना होते / असावे.

मात्र या धाग्याचे शीर्षक व मूळ मुद्दा यात काहीही राजकीय नाही, निदान मी तसे मूळ धाग्यात काही लिहिले नाही

तरीही तुम्हाला राजकीय विषय आणायचा असेल व प्रशासनाकडून परवानगी असेल तर मी कोण काही म्हणणारा!

'आपल्याकडील शिक्षा या अपुऱ्या वाटू शकतील अश्या आहेत' हे विषय आहे, तो तुम्हाला तुमच्या अजेंड्याकडे न्यायचा असला तर न्या

परत लिहितो - राजकारणी कोणीच विश्वासार्ह व आदरास पात्र नाहीत याच्याशी मी सहमत आहे व त्यावरून गदारोळ येथे होऊ नये

>>> देर आये दुरुस्त आये असे म्हणायचे का ?

मायबोली हे खुले व्यासपीठ आहे अशी माझी धारणा आहे. बोकलत यांनी ज्यांना उद्देशून लिहिले ते त्यावर इथे लिहू शकतात. बोकलत यांच्या प्रतिसादाचा भरत यांनी (जे म्हणतात, की बाय default ते अश्या प्रकारच्या वर्तनाविरुद्ध असतात व प्रत्येक ठिकाणी निषेध, दुःख वगैरे व्यक्त करण्याची त्यांना गरज नाही) उल्लेख केल्यावर मी त्यावर लिहिले. माझ्या धाग्याच्या उद्देशाबद्दलच त्यांनी शंका उपस्थित केल्यावर मला ते आधी लिहिणे भाग होते.

आणि मी बोकलत यांना उद्देशून जे लिहायचे ते येथेच जाहीर लिहिले आहे, त्यात तुम्हाला क्रम बघून व्यक्तिगत रोखाने काही लिहायचे असल्यास तुम्हाला कोण रोखू शकते?

तसेही, उदय, मी व भरत एकमेकांशी बोलून हा विषय जवळपास संपवून मोकळे झालो होतोच. तुम्ही वेळ काढून यात लक्ष घातलेत हे स्तुत्य आहे, वर मी लिहिलेच आहे की खुले व्यासपीठ आहे.

मी बोकलत यांच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करायला कधीच शिकलो आहे. त्यांचे प्रतिसाद समजण्याची माझी पात्रता नाही, हे मला कधीच कळून चुकले आहे. पण आपल्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल तुम्ही चांगलेच जागरुक आहात हे या धाग्यावर सुरुवातीपासून दिसल्याने बोकलत यांच्या प्रतिसादाबद्दल लिहिले.

<< तसेही, उदय, मी व भरत एकमेकांशी बोलून हा विषय जवळपास संपवून मोकळे झालो होतोच. तुम्ही वेळ काढून यात लक्ष घातलेत हे स्तुत्य आहे, वर मी लिहिलेच आहे की खुले व्यासपीठ आहे. >>

------ तुम्ही लिहिण्याचे औंदार्य दाखविले नसते तरी व्यासपीठ हे सर्वांसाठी खुलेच आहे आणि ते तसे रहावे. Happy

<< आणि मी बोकलत यांना उद्देशून जे लिहायचे ते येथेच जाहीर लिहिले आहे, त्यात तुम्हाला क्रम बघून व्यक्तिगत रोखाने काही लिहायचे असल्यास तुम्हाला कोण रोखू शकते? >>

------- व्यक्तीगत असे काहीच नाही. दुटप्पीपणा जाणवला आणि म्हणून लिहीला.

>>> पण आपल्या धाग्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल तुम्ही चांगलेच जागरुक आहात हे या धाग्यावर सुरुवातीपासून दिसल्याने बोकलत यांच्या प्रतिसादाबद्दल लिहिले.

बहुतेकवेळा दुर्लक्षच करतो, या धाग्यावर प्रशासकांनी हस्तक्षेप केल्याने जरा लक्ष जास्त दिले
=====

>>> तुम्ही लिहिण्याचे औंदार्य दाखविले नसते तरी व्यासपीठ हे सर्वांसाठी खुलेच आहे आणि ते तसे रहावे.

होय, या सोयीचे लाभार्थी ते सिद्ध करतच आहेत. इतर कुठे बोलू शकतत् की नाही हे त्यांचे त्यांना माहिती, इथे या सोयीचा भरपूर लाभ घेतात
=====

>>> दुटप्पीपणा

हसावे का रडावे? बोकलत यांचा प्रतिसाद वाचल्या वाचल्या त्यावर तुटून पडावे असे म्हणणे आहे का? मुळात, राजकीय धागा नसूनही आणि प्रशासकांनी धागा चालू घडामोडी सदरात हलवूनही तुमची जळजळ तुम्ही इथेच व्यक्त करताय आणि वर दुसऱ्याला दुटप्पी वगैरे म्हणण्यात वेळ घालवताय. दुसरा काढा की धागा?

मला आज सारख्या उचक्या लागत होत्या. बोललो कोण आठवण काढतयं बरं. मला शक्यतो उचकी लागत नाही कारण लोकांना माझी आठवण येत नाही कारण आठवण यायला लोकं मला विसरतच नाहीत. #बोकलत लोगों के दिलो मे रहता है

अधिवेशन तोंडावर आले नसते ( तर सरपंच हत्या प्रकरणांत ) मंत्र्याचा राजिनामा घेतला गेला नसता.

भरत यांचा " या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही" असा प्रतिसाद आला नसता तर उपरती झाली नसती. क्रम महत्वाचा आहे.

<< संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून खूप अस्वस्थ वाटले म्हणून फक्त हे विचार मांडले.
कोणाला याबाबत व्यक्त व्हायचे असल्यास अवश्य लिहावेत. >>

------ कायद्यानुसार शिक्षा मिळण्यासाठी सर्व आरोपींना गुन्हा घडल्यावर तत्काळ अटक होणे अत्यावश्यक होते. मग पुढे पुरावे गोळा करणे, केस उभी होणे असे सोपस्कार. या प्रकरणांतील सर्व आरोपी पकडल्या गेले आहेत? जर पोलीस / वरिष्ठ अधिकारी आरोपींच्या सोबत जिपमधे फिरत होते तर ते पुरावे गोळा करतांना ते किती प्रामाणिक पणा दाखवतील ? मंत्र्याचा राजिनाम्यासाठी दोन महिने लागले आणि दरम्यानच्या काळांत गुन्ह्यातले पुरावे आहे त्या जागेवर सुरक्षित असायला हवेत.
कमजोर केस उभी रहीली तर गुन्हेगारांना पुराव्या अभावी सोडावे लागेल अशी भिती वाटते.

कुठल्याही माणसाला लाज वाटेल असे एव्हढी अमानुषता आहे या हिंसा प्रकरणांत . विधानसभेत वर्णन एकले ( यावरुन अंदाज येत आहे).
https://www.youtube.com/live/qrCEZ9Rn7cE?si=8LdYFWAf3jnCFQVj

<< मात्र, गुन्हेगारांनी जे क्रौर्य दाखवले त्या तुलनेत फाशीची शिक्षा अगदीच साधी वाटते.
गुन्हेगारांना भयंकर जरब बसावी अश्या प्रकारचे कायदे येथे अस्तित्वात येणे जवळपास अशक्य आहे. >>

------ फाशीची शिक्षा साधी वाटते, यापेक्षा भयंकर अशा काय शिक्षा कायद्यामधे आहेत?

शिक्षेच्या भितीमुळे भावी गुन्हेगारांत जरब बसेल आणि गुन्हे कमी होतील असे मला वाटत नाही.
(अ) बदलापूरच्या घटनेत आरोपीच्या " थेट डोक्यात " गोळी घालाण्याची भाषा झाली. " जनतेचीच " मागणी होती आणि तत्काळ आरोपीला शिक्षा झाली. त्यानंतरही महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना घडतच आहेत. स्वारगेट, पुणे बद्दल वाचत होतो तर यावर्षातली अशी पुणेशहरांतलीच ५० वी घटना आहे.
(ब) काही वर्षांपूर्वी, हैद्राबादेत बलात्कार+खून अशा घटनेत, दोन चार दिवसातच आरोपींना (त्यांनी गुन्हा केला होता हे सिद्ध झाले नाही म्हणून आरोपी) चकमकीत मारले. या चकमकी नंतरही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत.

शिक्षेमुळे काय आणि किती जरब बसली ? भावी गुन्ह्यांच्या घटना टळल्या का ? का शिक्षा फारच सौम्य होत्या?

शिक्षेच्या भितीमुळे भावी गुन्हेगारांत जरब बसणे वेगळे आणि गुन्हेगारी गुन्हेगारी संपणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षे मुळे नक्कीच जरब बसत असणार पण गुन्हेगारी पूर्णपणे नाहीशी होणे शक्य नाही. गुन्हेगारी कमी होण्यासाठी जे जे करता येईल ते करायला पाहिजे.

उदय,

परत लिहीत आहे. धाग्याचा विषय वेगळा आहे. (तुमचा जेमतेम एक प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी थोडाफार संबंधित वाटत आहे). बाकीचे प्रतिसाद लिहिण्यासाठी वेगळ्या धाग्याचा वापर करा किंवा नवीन धागा काढा.

तुम्हाला कुठेही काहीही लिहिण्याची खास परवानगी असल्यास काही म्हणणे नाही. मी लिहिलेला धागा म्हणजे काही माझी व्यक्तिगत मालमत्ता नाही, याची जाणीव आहे.

<< उदय,
परत लिहीत आहे. धाग्याचा विषय वेगळा आहे. (तुमचा जेमतेम एक प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी थोडाफार संबंधित वाटत आहे). बाकीचे प्रतिसाद लिहिण्यासाठी वेगळ्या धाग्याचा वापर करा किंवा नवीन धागा काढा.
तुम्हाला कुठेही काहीही लिहिण्याची खास परवानगी असल्यास काही म्हणणे नाही. मी लिहिलेला धागा म्हणजे काही माझी व्यक्तिगत मालमत्ता नाही, याची जाणीव आहे.
नवीन Submitted by बेफ़िकीर on 8 March, 2025 - 10:40 >>

------ बेफिकीर, आधी केले मग सांगितले. वर मला उद्देशून लिहीलेले आहे तसे आचरण तुम्ही स्वत: ठेवावे अशी अपेक्षा मी ठेवणार नाही. आपल्या ' अवांतर ' विचाररुपी चकल्यां ' पासून दु : खद बाफ ची पण सुटका होतांना दिसत नाही. तिथे पान क्र दोन वर अशा अवांतर चकल्या दिसतात. दु : खद बाफ वर अवांतर लिहीण्यापेक्षा दुसरा बाफ काढा असे तिथे, समंजसपणा दाखवत , कुणी लिहीले नाही.

संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली म्हणून धागा काढला आहे. एका मानवाची अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली आहे आणि कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी असे प्रत्येकालाच वाटते ( पुरी / अपुरी शिक्षा हे नंतर ) पण शिक्षा होण्यासाठी आधी अपराध्यांना पकडायला हवे आणि गुन्हेगारांना पकडण्याचे काम गृहखात्याचे आहे.

फडणवीसांकडे राज्याचे गृहखाते आहे. गुन्हेगारांना पकडण्याचे काम त्यांच्याकडे आहे. संतोष देशमुख हत्येशी संबंधीत मंत्र्याचा राजिनामा घेण्यासाठी तब्बल दोन महिने लागत असतील आणि या टोकाच्या उदासिनतेवर भाष्य पण करायचे नाही ? मग बाफच्या सुरवातीला त्यांच्या नावाचा दोन वेळा उल्लेख कशासाठी? नावाचा उल्लेख टाळूनही विषय परिणामकारक मांडता आलाच असता.

फडणविसांच्या जागेवर दुसरा कुणीही व्यक्ती गृहमंत्री असता आणि अशा मानवाला काळिमा लावणार्‍या गुन्ह्याबद्दल त्यांनी टोकाची उदासिनता दाखविली असती तरी मी टिका केली असती. आपला तो बाब्या असा प्रकार कामाचा नाही. आपण आधी मानव आहोत.

https://www.maayboli.com/node/85420?page=1

उदय,

याबद्दलच म्हणत आहात का? (माझ्या मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे मला आत्ता हे लिहिताना कळणार नाहीये की।लिंक योग्य आहे की नाही).

जर ती लिंक योग्य असेल आणि दुसऱ्या पानावरील माझ्या प्रतिसादांबद्दल म्हणत असाल, तर मायबोलीवरील कोणीही सांगावे की मी बेजबाबदार व असंवेदनशील प्रतिसाद दिले आहेत. माझ्यामते ते प्रतिसाद भावनिक, मानवतावादी व तरीही धाग्याचे गांभीर्य ओळखून माफी समाविष्ट असलेले आहेत.

तुम्हाला त्याबाबत समस्या असेल तर प्रशासकांना सांगू शकताच, हे काही मी सांगण्याची गरज नाहीच.

=====

तुम्हाला उद्देशून तिसऱ्यांदा लिहीत आहे, या धाग्याचा मूळ विषय वेगळा आहे. कृपया विषय दुसरीकडे नेण्याचा आटापिटा करू नका.

मला वाटते मला धाग्याचा विषय नीट कळला.
कल्पना करा की पोलीस, न्यायव्यवस्था आपापले काम, कर्तव्य निष्पक्षपणे, चोखपणे, विनाचालढकल करत आहे. कल्पना करा की सरकार(कुठल्याही पक्षाचे असो), इतर राजकीयपक्ष अथवा उच्चपदस्थ धेंडं इत्यादि कुणीही या प्रक्रियेत कसलाही दबाव आणत नाहीयेत आणि वर्ष- फार तर दोन वर्षात (सर्वोच्च न्यायालकडे अपील धरून) सरपंच देशमुख यांची अशी निर्घृण हत्या करणाऱ्या व्यक्तींना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे, व तद्पश्चात राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यास दोन आठवड्यात तो ते/त्या फेटाळणार आहेत.

तेव्हा ही जी शिक्षा न्यायाधीश सुनावणार आहेत ती सध्याच्या कायद्यानुसार जास्तीतजास्त फाशी असणार आहे. ती फारच अपुरी आहे आणि त्याने गुन्हेगारांवर अजिबात जरब बसत नाही.
हा धाग्याचा विषय आहे. माझा या आधीचा प्रतिसाद या विषयाला धरून नसल्याने तो उडवावा अशी मी ऍडमिन यांना विनंती करतो.

<< तुम्हाला उद्देशून तिसऱ्यांदा लिहीत आहे, या धाग्याचा मूळ विषय वेगळा आहे. कृपया विषय दुसरीकडे नेण्याचा आटापिटा करू नका. >>

------ धाग्याच्या विषयाला अनुसरुन प्रतिसाद सर्वांनीच लिहायला हवेत , याला धागालेखकही अपवाद नाही. प्रत्येक वेळी तसे होतेच असेही नाही. अपेक्षा ठेवायची, आग्रह नाहीच.

तुमचे अवांतर ( होय, दु : खद धागा बाफवरचे ) प्रतिसांद इतर लोकांनी दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा असेल तर तोच न्याय इथे लावायला अडचण काय आहे? तुम्हाला प्रतिसाद अवांतर वाटत असेल तर सरळ दुर्लक्ष करणे उत्तम.

(ब) विषय गंभिर आहे. पण फाशीची शिक्षा किंवा अजून कुठली शिक्षा देणे अपुरी वाटेल अशी परिस्थिती आहे असे तुम्हाला वाटते पण पर्याय काय आहे ?

( क) विषय मांडतांना देशमुख यांची निर्घुण हत्या झाली असा उल्लेख आहे. त्या हत्येशी संबंधीतच मी लिहीले होते.

कायदा आणि सुव्यावस्था राखायची जबाबदारी गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांची आहे . पोलीस अधिकारी गुन्हेगारांना सामिल आहेत ? तब्बल दोन महिन्यापेक्षाही जास्त काळ संबंधीत मंत्र्याचा राजिनामा घेण्यासाठी लागत असेल तर गृहमंत्री यांच्या उदासिन भुमिकेवर टिका होणारच. अधिवेशनाच्या तोंडावर राजिनामा घेण्याचे नाटके होत आहेत.

कुठल्याही गुन्ह्याच्या घटनेत आरोपींना शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर सब्बळ पुरावे गोळा होणे महत्वाचे आहे, काळ ( time) खूप महत्वाचा आहे. २ महिने, ३ महिने विलंब लावल्यावर, गुन्ह्यातला पुरावा जागेवर राहिला असेल का ? कमजोर पुरावे समोर असतील तर कोर्ट काय डोंबल्याची शिक्षा देणार ? काही वर्षांनी " तपासांत शैथिल्य दाखविले, सबळ पुरावे समोर ठेवले नाही " म्हणून कोर्ट ताशेरे मारणार , तो पर्यंत जनता सर्व काही विसरलेली असेल.

देशमुख यांचा निर्घुण हत्या झाली, अत्यंत वाईट प्रकारे मारल्या गेले. Sad या घटनेवर वस्तुस्थितीवर आधारित टिपणी करायचीच नाही यासाठी आटापिटा करायचा होता तर देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख बाफ दोन वेळा कशासाठी केला आहे ? त्यांच्या हत्येचा उल्लेख टाळून विषय मांडता येणेही शक्य होते. तसे झाले असते तरच माझे प्रतिसाद अर्थहीन / अवांतर ठरले असते. अन्यथा नाही.

<< ती फारच अपुरी आहे आणि त्याने गुन्हेगारांवर अजिबात जरब बसत नाही. >>
-------- शिक्षा देणारी व्यावस्था मानवी आहे, आणि शिक्षा देण्याला मानवी मर्यादा आहे. पोलीस अधिकारी गुन्हेगारांच्या डोक्यात गोळी झाडत असेल तर त्याला त्या खूनाचा मानसिक त्रास होणारच. युद्धांत भाग घेणे, PTSD , मानसिक आजार आणि क्वचित आत्महत्या यांचा संबंध आहे.

जरब बसतील अशा काय शिक्षा अपेक्षित आहेत?

मुळात कायद्यानुसार अपेक्षित कृत्येही कायद्याच्या रक्षकांकडून होताना दिसत नाहीत.

आणि जे अपेक्षित नाही ते करतात. अक्षय शिंदेचं एन्काउंटर. आता त्याचे आईवडील म्हणतात, आम्हांला एन्काउंटरची कोर्ट केस लढायची नाही.

निर्घृण हा शब्द नीट लिहू लागलात की पुढचे बोलू उदय!

वेळ नाहीये मला तेच तेच लिहीत बसायला. माफ करा. तुम्ही तुम्हाला हवे ते मुद्दे मांडण्यासाठी दुसरा धागा काढत नाही. दुसऱ्या धाग्यावर तिसरे विषय आणता. एकदा, दोनदा, तीनदा लिहिले तरी तेच करता. कमाल आहे तुमची!

आधी लिहिल्यानुसार धागा ही वैयक्तिक मालमत्ता नाही आणि प्रशासनाचा अभय असल्यास तुम्ही काहीही लिहू शकता हे सर्वमान्य आहेच. चालू द्यात.

बेफिकीर - बाफच्या विषयाला धरुनच माझे प्रतिसाद आहेत. प्रतिसाद अवांतर आहे असे तुम्हाला वाटत असल्यास अवांतर प्रतिसादांशी काय करायला हवे हे तुम्ही दु: ख धाग्यावर छान मांडले आहे. तिथला तुमचाच प्रतिसाद तुम्ही वाचा आणि अमलांत आणा अशी विनंती.

तुम्हाला चूप्प / मूक रहायचे स्वातंत्र आहे. अस्वस्थ वाटत असतांना फडणवीसांना कुठलेही पत्र लिहू नका.

धागा " चालू घडामोडीत " आहे. एका जबाबदार सरपंचाची हत्या झाली, हा विषय विधान सभेत जातो, तिथे चर्चा होते, अवघ्या तिन महिन्यांत मंत्र्याचा राजिनामा घेतला जातो. या विषयावर भाष्य करायलाच नको तर बा फ च्या मांडणीत हत्येचा विषय का आणला आहे? संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून जसे तुम्हाला अस्वस्थ झाले तसेच मलाही झालेले आहे.

तीन महिने गुन्ह्याशी जवळचा संबंध असणार्‍या मंत्र्याचा राजिनामा घेण्यासाठी लागतात. आता एव्हढ्या मोठ्या दिरंगाई नंतर पुरावे जागेवर रहातील का ? अपुर्‍या पुराव्यांमुळे कोर्टासमोर केस ढिली राहिल्यास गुन्हेगारांना कायद्यानुसार शिक्षा मिळण्याची शक्यता मावळते. देशमुखांची हत्या झाल्यावरच कायद्यातला अपुरेपणा ठळकपणे दिसला आहे असे मला वाटत नाही.

Pages