कायद्यानुसार असलेल्या शिक्षेचे अपुरेपण

Submitted by बेफ़िकीर on 7 January, 2025 - 03:21

हे लेखन 'चालू घडामोडी' समूहात करायचे होते पण तेथे लेखन करण्याचा पर्याय दिसत नाहीये (मला). कृपया जमल्यास प्रशासकांनी हे लेखन तिकडे न्यावे ही विनंती!

संतोष देशमुख यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली ते इथे लिहावेसेही वाटत नाही. निर्भयाची हत्याही भयानक क्रूरपणे झाली होती. माणसांत जनावरापेक्षा कैक प्रमाणात अधिक क्रौर्य असते / असू शकते याची ही दोन व आणखीही असंख्य उदाहरणे आहेत.

गुन्हेगार सापडणे, कोठडी, चौकशी, खटला, या असल्या आरोपीच्या बाजूने वकील असू शकणे, निकाल लागणे, वरच्या कोर्टात जाणे, दयेचा अर्ज वगैरे बाबींमुळे विलंब होतो हा तर वेगळाच भाग आहे.

मात्र, गुन्हेगारांनी जे क्रौर्य दाखवले त्या तुलनेत फाशीची शिक्षा अगदीच साधी वाटते.

गुन्हेगारांना भयंकर जरब बसावी अश्या प्रकारचे कायदे येथे अस्तित्वात येणे जवळपास अशक्य आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे वर्णन वाचून खूप अस्वस्थ वाटले म्हणून फक्त हे विचार मांडले.

कोणाला याबाबत व्यक्त व्हायचे असल्यास अवश्य लिहावेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिक्षेच्या अपुरेपणा पेक्षाही शिक्षा होत नाही या आत्मविश्वासाने गुन्हेगार निवांत आहेत. शिक्षा होते आणि वेळेत होते. राजकीय आर्थिक किंवा सामाजिक प्रभावाचा उपयोग होत नाही. ही भीती जास्त प्रभावशाली होईल. विकसित देशात केस चा निकाल काही महिन्यात लागतो. आपल्याकडे केस पेंडण्सी अशक्य आहे. फाशी ची शिक्षा मुळात भीतीदायक आहे. अजून क्रौर्य वाढवून जर शिक्षा होण्याची निश्चिती नसेल तर गुन्हे कमी होणार नाही. दुर्दैवाने पोलिस व्यवस्था अत्यंत पोखरलेली आहे.

मानव +१००
आहे त्याची अंमलबजावणी भारतात होत नाही.
ती अंमलबजावणी पोलिस, राजकारणी, नोकरशहा, न्यायालये, माध्यमे किती काटेकोर आणि नेकीने करतात हे धडधडीत वास्तव आहे. कायदे हे विरोधकाच्या नुकसानी साठी वापरायची आपली परंपरा आहे. आणखी कठोर न्हवे क्रुर कायदे करुन कशाला कोलित देऊन आम्ही काही तरी केले गंड शमवायची संधी द्यायची.
ठेविले अनंते...

कायदे कडकच आहेत भारतात- जगातली सर्वाधिक लोकप्रिय/वापरात असलेली कॉमन लॉ सिस्टिमच भारतात आहे. प्रश्न काही इन्फ्लुएन्शियल लोकांच्या बाबतीत त्याच्या अंमलबजावणीचा आहे. राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा सुधारण्याचा, लोकांच्या मनातली सरंजामशाही काढून, लोकशाही रुजवण्याचा आहे. हे न घडता जर नुसतंच कडक कायदे केले तर त्याची परिणिती भीषण होईल.

साधारण गुन्हेगार कैदेत असताना फारसं सुखावह जीवन जगत नाहीत/नसावेत. शिक्षेच्या पब्लिक डिसप्लेविषयी: टीव्ही पहाणारी/वर्तमानपत्र वाचणारी बहुसंख्य सामान्य जनता क्रूर गुन्हेगार कॅटेगरीत येत नाही. त्यांना अश्या भयंकर गोष्टी दाखवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा निर्णय (जरी सिलेक्टीव्हली बरा वाटला तरी) लोकशाही राज्यात घेतला जाऊ शकत नाही.

मग फेरफटका,

गुन्हेगारांना जरब बसेल असा आणखी कोणता पर्याय अवलंबता येईल यावरही कृपया लिहावेत

अर्थात, खून करतानाचे खुन्यांचे क्रौर्य कितपत होते यानुसार दर केसनुसार शिक्षा बदलली जाऊ शकणार नाही हे सर्वमान्य आहेच

पण मुळात 'शिक्षेची भीती वाटणे' असे काही अंमलात आणणे शक्य आहे का, अंमलात आणावे का, असे मुद्दे आहेत

'असे मुद्दे आहेत' म्हणजे असे मुद्दे 'आता' चर्चेत आले आहेत

शिक्षेस होणारा विलंब हाच मुळात शिक्षेस पात्र आहे हे इतर काहींनी मांडलेले मत अगदी मान्य

"गुन्हेगारांना जरब बसेल असा आणखी कोणता पर्याय अवलंबता येईल यावरही कृपया लिहावेत" - ह्यात उपरोध आहे का ते नेमकं सांगता येत नाही (शेल्डन सारखं). पण असलेल्या कायद्यांची कार्यक्षमतेनं अंमलबजावणी केली तरी ही जरब बसू शकते. सामान्य माणूस ह्या कायद्याच्या बडग्याला वचकून असतोच. प्रश्न येतो तो ह्या इन्फ्लुएन्शियल आरोपींच्या बाबतीत. म्हणूनच मी लिहीलं की हा प्रश्न राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा सुधारण्याचा, लोकांच्या मनातली सरंजामशाही काढून, लोकशाही रुजवण्याचा आहे.

शिक्षेच्या पब्लिक डिसप्लेविषयी: टीव्ही पहाणारी/वर्तमानपत्र वाचणारी बहुसंख्य सामान्य जनता क्रूर गुन्हेगार कॅटेगरीत येत नाही....

श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा आफताब किंवा सरस्वती वैद्य हिचा खून करून तिच्या मृतदेहाचे chain saw ने तुकडे करून ते तुकडे कुकरमध्ये शिजवणारा मनोज साने हे दोघे (हे गुन्हे करण्याआधी) क्रूर गुन्हेगार कॅटेगरीत होते का?

'शिक्षेची भीती वाटणे' असे काही अंमलात आणणे शक्य आहे का>>
वाहतुकीचे नियम परदेशात (माझा प्रत्यक्ष अनुभव अमेरिकेचा आहे फक्त आणि सौदी वैगेरे बद्दल ऐकीव माहिती आहे ) सगळेच लोकं कसे काय पाळतात?
नियम मोडणाऱ्याला शिक्षा तर कायद्याने भारतातही आहे. प्रश्न कायदा पाळण्याचा आहे (मोडणाऱ्याने आणि अमंलबजावणी करणाऱ्यांनी)

मोडणाऱ्याने आणि अमंलबजावणी करणाऱ्यांनी>>>> अमंलबजावणी करणाऱ्यांचे दायित्व अधिक..... कुणितरी वेडंवाकडं वागणार हे गृहीत धारुनच कायद्यांची आणि शिक्षेची निर्मिती केली गेली.

फाविदडी तुमच्या वेड लागू देण्याच्या सूचना मला फार गंभीर वाटल्या. भयंकर यातनामय शिक्षा तुम्ही ठोठावण्याबद्दल लिहीलेले आहेत. विचार करा - चुकून माकून एखादा निरपराध माणूस कचाट्यात सापडला व त्याला ती भयंकर शिक्षा झाली तर? किती मोठं पाप आहे ते.
अर्थात याचा अर्थ गुन्हेगारां करता त्या नरकयातना ठीक आहेत असे नाही.
आपण ईश्वर आहोत का? मला कल्पना आहे - ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना किती भयंकर त्रास, यातना झाले असेल. मरणाहून वाईट अवस्था झाली असेल त्यांची.

पण मला पटत नाही. त्यापेक्षा, फाशी, गजाआड, जन्पठेप इतकेच असावे मात्र अंमलबजावणी अचूक व त्वरित व्हावी. जर्सी सिटी मधील कोर्टाच्या आवारात एक दगडी कोरि व लेणे आहे त्यावरती लिहीलेले आहे - Delayed justice is no justice

शिक्षेच्या पब्लिक डिसप्लेविषयी: टीव्ही पहाणारी/वर्तमानपत्र वाचणारी बहुसंख्य सामान्य जनता क्रूर गुन्हेगार कॅटेगरीत येत नाही....>>> जनरल पब्लिकला नका करु डिस्प्ले, पण जे फेंन्सवर बसलेले, होतकरु, उदयोन्मुख गुन्हेगार ( खास करुन नवतरुण) आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच अमंलात आणायला हरकत नसेल.

विचार करा - चुकून माकून एखादा निरपराध माणूस कचाट्यात सापडला व त्याला ती भयंकर शिक्षा झाली तर? किती मोठं पाप आहे ते.>>>> हे फक्त दुर्मिळात दुर्मिळ अमानुष गुन्हे करणाऱ्यांसाठीच....आणि ते ही सध्या अस्तित्वात असलेल्या न्यायदानाच्या सर्व स्तरातून ( सर्वोच्च न्यायालयात) अपराधीत्व सिद्ध झाल्यावरच.

>>>>> दुर्मिळात दुर्मिळ अमानुष गुन्हे
ज्या व्यक्तीला विचारशक्ती आहे, सारासार विवेक थोडा तरी आहे , ती व्यक्ती असे गुन्हे करेल का? तर नाही. त्यामुळे जरी महाभयंकर जरबेच्या शिक्षा अंमलात आणल्या तरी ती व्यक्ती थोडी ना घाबरणार आहे. त्या व्यक्तीला विचार बुद्धीच नाही, ती विकृतच आहे. त्यामुळे ती गुन्हा १००% करणारच.

ज्या व्यक्तीला विचारशक्ती आहे, सारासार विवेक थोडा तरी आहे , ती व्यक्ती असे गुन्हे करेल का?>>>माझ्यामते कोणत्याही माणसाची सारासार विचार करण्याची शक्ती क्षय होणे ही एक ग्रॅजुअल प्रोसेस आहे.... त्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षा अस्तित्वात आहेत ही कल्पनाच सुरवातीच्या पायरीवर असलेल्या गुन्हेगारांच्या मनात जरब बसवेल आणि ते पुढच्या पायऱ्या चढणार नाहीत.....ईतक्या भयंकर शिक्षांचा विचार मनात येण्याचं दुसरं कारण जे सर्वांनी नमूद केलं ते कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी, आता मुळात गुन्हेगारांना ही बजबजपुरी पाहून हेच कळून चुकलंय की आपल्याला शिक्षा होण्याची १-२% शक्यता उरलीय तर मग ती शिक्षाच एवढी भयानक असावी की माणूस १% पण चान्स घेणार नाही. मला तुम्ही जे म्हणताय ते कळतंय, पण गुन्हेगारीच्या स्वरुपाच्या बाबतीत आपण क्रिटीकल थ्रेशोल्ड कधीच ओलांडलाय असं माझ मत आहे.... Unfortunately now no way back!

>>>>>>माझ्यामते कोणत्याही माणसाची सारासार विचार करण्याची शक्ती क्षय होणे ही एक ग्रॅजुअल प्रोसेस आहे....
हम्म्म!! पॉसिबल.

विषय वेगळा होईल, पण मला तर वाटतं driving license देण्याआधी भावी ड्रायव्हर्स ना हॉस्पिटलस मधल्या अपघात कक्षा मधून फिरवून आणावे आधी.

>>>>>भावी ड्रायव्हर्स ना
परवा लोकल न्युझमध्ये वाचले 'सिंग' म्हणुन कोणी भारतिय व्यक्ती कोकेन व अल्कोहोल घेउन गाडी चालवत होती. धडक दिली आणि १४ वर्षांची २ मुले जी मागे बसलेली ती मृत्यु पावली.
भयानक आहे हे सर्व. भारतिय लोकंही कोकेन वगैरे ... Sad निदान गाडी चालवु नका ना.

ही चर्चा ज्या घटनेवरुन सुरु झाली त्या घटनेत गुन्हेआर व बळी यांचा कोणताही संबंध नव्हता, वाद नव्हता. झटापट झाली, गुन्हेगाराने बळीच्या थोबाडीत मारली, बळीनेही उलट दोन थोबाडीत दिल्या. गुन्हेगाराच्या डोक्यावर राजकिय वरदहस्त असल्याने तो स्वत:ला देवच समजत होता, थोबाडीत खाल्ल्याने त्याचा फुगवलेला इगो दुखावला आणि त्याने हे कृत्य केले. राजकिय वरदहस्त नसता तर गुन्हेगार त्या गावात आलाही नसता, पुढचे काही घडले नसते.

राजकारणी लोक गुंडांचा ताफा बाळगतात कशाला? सत्प्रवृत्ती लोकांचा ताफा बाळगलाय असे कुठल्या नेत्याबद्दल ऐकलेय का? गुन्हा केल्यावरही संरक्षण मिळणार, नव्हे ते द्यावेच लागणार नाहीतर तो राजकारणी अडचणीत येणार हे जे वातावरण आहे, मानसिकता आहे त्याला कुठली शिक्षा?? यात नक्की गुन्हेगार कोण? हे फुकटे प्रत्यक्श गुन्हे करणारे की आपल्या गरजेपोटी त्यांना संरक्षण देणारे?? आज वाईट रित्या गुन्हे करणारे सगळे मुख्यत्वे हेच आहेत. बाकी उरलेले लिंगपिसाट, सारासार विचार संपलेले. ते कोणाला घाबरणार??

बोकलत यांच्यासाठी:

हा धागा आहे त्या विषयावर!

वाईट याचे वाटते की काल मीडियावर फोटो वगैरे आल्यावर कशी काय जाग आली?

कसे मारले होते याचे पूर्ण वर्णन मीडियावर आधीच उपलब्ध होते.

अमानुष, राक्षस, पशु वगैरे शब्द वापरणे व्यर्थ आहे. यांना उद्देशून फक्त माणूस म्हंटले पाहिजे, कारण भूतलावरचा तो सर्वात क्रूर सजीव आहे

अमानुष, राक्षस, पशु वगैरे शब्द वापरणे व्यर्थ आहे. यांना उद्देशून फक्त माणूस म्हंटले पाहिजे, कारण भूतलावरचा तो सर्वात क्रूर सजीव आहे <<<< +१

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अमानुषपणे करण्यात आली. त्यांच्या हत्येचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहे. शब्दही नाही सापडत संताप व्यक्त करायला.

या सर्व घटनाक्रमाचा, त्यांच्या घरच्या लोकांना, मित्रपरिवाराला किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. Sad अगोदरच जवळची व्यक्ती अचानक जाण्याचे दु : ख आहे. या परिस्थितीला स्विकारायची प्रक्रिया सुरु असतांनाच हे असले भयंकर काही पुढे येणे खोलवर जखम करते.

हत्येला जवळपास तिन महिने झाले. फोटो, प्रसंगाचे वर्णन, व्हिडिओ पोलिसां कडे होते. पण आरोपीशी थेट संपर्क असलेल्या मंत्र्याचा राजिनामा न घेण्यामागे काय रहस्य होते? मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी आहे ते पण या प्रकरणांत आतापर्यंत मूग गिळून बसले होते. फडणविस म्हणतात " मुंढे यांच्याबाबत अजित पवार निर्णय घेतील... " .
हत्या झाल्यानंतर, सात आठवड्यांनी गृहमंत्र्यांकडे कटाची माहिती , फोटो, व्हिडिओ, आरोपी आणि धनंजय मुंढे किती गुंतले आहेत याबाबत काही म्हणजे काहीच माहिती नव्हती. गृहखाते हट्टाने स्वत: कडे ठेवले पण असे गांभिर अपराध होतात तेव्हा कणाहिन वागतात.

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/cm-fadnavis-says-ajit-...

उदय, धागा चालू घडामोडी गृपात आहे. राजकारण ग्रुपात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंडे , पवार यांच्याबद्दल बोलू नका. कदाचित यांच्याबद्दल काही बोललं जाऊ नये याच हेतूने हा धागा चालू घडामोडी ग्रुपात असावा.

ऐन विधानसभा अधिवेशन सुरू होताना पोलिसांकरवी ते फोटो मीडियात येणं, ते पाहून आपली प्रकृती बिघडली आहे असा साक्षात्कार मुंडेंना होणं आणि त्यांनी राजीनामा देणं याबद्दल मला लिहायचं होतं. आरोपींना अटक केली म्हणून गृहमंत्र्यांचं कौतुक करायचं होतं. पण हा धागा चालू घडामोडी ग्रुपात असल्याने तसं करता येणार नाही.

>>> कदाचित यांच्याबद्दल काही बोललं जाऊ नये याच हेतूने हा धागा चालू घडामोडी ग्रुपात असावा.

बेजबाबदारपणे केलेले विधान वाटले भरत!

या धाग्याचा मुद्दाच वेगळा आहे

ज्या नेत्यांवर टीका करायची आहे ती करायला इतर एक दोन धागे आहेत किंवा इच्छुकांनी नवीन धागा काढावा

येथे राजकारण आणण्याचे श्रेयही तुम्हा दोघांचेच. ऍडमिन यांनी माझी विनंती स्वीकारली म्हणून राजकीय चिखलफेक बंद झाली

नाहीतर हा धागा तर तुमच्यासाठी भरपूर लेखनाला वाव देणारा होता

बरं. माझं ते विधान चुकीचं आहे हे मान्य करून मी तुमची क्षमा मागतो.

<ओके ओके आता प्रकार लक्षात आला. ज्या लोकांनी हे केलं ते त्या धाग्यावरच्या ग्रुपमधील होते.> या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही.

>>> प्रतिसादाचा अर्थ कळला नाही.

मला तो प्रतिसाद पटला नाही, पूर्ण अस्थानी व उसकवणारा वाटला

(बोकलत यांचा)

बेफिकीर - राजकारण तुम्हाला " दिसत " आहे. सॉरी.
मला यांत एका मानवाची हत्या झाली आहे आणि गृहमंत्र्यांनी ३ महिने झोपा काढल्या किंवा त्यांना इतर महत्वाची कामे असतील आणि आजच जाग आली असे वाटते. सरकार कुणाचेही असते तरी माझी प्रतिक्रिया निष्क्रिय गृहमंत्र्याबद्दल अगदी अशीच आली असती.

<< ज्या नेत्यांवर टीका करायची आहे ती करायला इतर एक दोन धागे आहेत किंवा इच्छुकांनी नवीन धागा काढावा
नवीन Submitted by बेफ़िकीर on 4 March, 2025 - 22:38 >>

----- असहमत. संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली . राज्याचे गृहमंत्री ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यावस्था अशी मोठी जबाबदारी आहे ते आरोपी विरुद्ध कारवाई करण्यामधे निष्क्रीय, निरुत्साही आहेत.

दोषी असेल तर कारवाई करा, फडणवीस गृहमंत्री आहेत. एव्हढ्या भिषण प्रकरणी पुरावे समोर असतांना मंत्र्याच्या राजिनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील हे कुठल्या लॉजिकमधे बसते ?

राजिनामा देण्यासाठी तिन महिने एव्हढा मोठा काळ लागला. अगदी आजच हे फोटो व्हायरल आणि राजिनामा " नाट्य " का असा प्रश्न येणारच. अधिवेशन नसते तर राजिनामा आलाच नसता.

Pages