Submitted by पुरंदरे शशांक on 7 December, 2024 - 01:45
जय मल्हार
जेजुरी नगरी । कडे पठारी ।
मार्तंड मल्हारी । विराजतो ।। १॥
शिव अवतरे ।मार्तंड भैरव ।
मल्हारी खंडेराव । देवा नामे ।।२॥
मणि मल्ल दैत्य । देवे संहारिले ।
मल्हारी साजले । नाम थोर ।।३॥
म्हाळसा बाणाई । राणीयांसमवेत ।
अश्वारुढ देव । शोभतसे ।।४॥
भंडारा उधळी । भक्त थोर थोर ।
येळकोट उच्चार । तोषोनिया ।।५॥
मार्गशीर्ष मासी । प्रतिपदे पासोन ।
चंपाषष्ठी सण । विशेषत्वे ।।६॥
रोडगे भरीत । नेवैद्य अर्पिती ।
मल्लारी स्तविती । भक्तजन ।।७॥
दिवटी बुधली । तळी उचलोन ।
येळकोट स्मरण । चांगभले ।।८॥
भंडारा खोबरे । उधळण थोर ।
जै जैकार मल्हार । गर्जताती ।।९॥
संत मुनि जन । सश्रद्ध भाविक ।
दर्शनासी येत । जेजुरीसी ।।१०॥
पैलपार पाववी । देवाजी मल्हारी ।
माथा चरणावरी । कृपाळुवा ।।११॥
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिलेय. काल चंपाषष्ठी
छान लिहिलेय. काल चंपाषष्ठी होती.
सुंदरच! जय मल्हार!
सुंदरच! जय मल्हार!
छान.
छान.
जय मल्हार.
जय मल्हार.
(No subject)