Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल रोहित क्याप्टन असता तर
काल रोहित क्याप्टन असता तर आरसीबी २०० च्या पार गेलीच नसती.
रोहित क्याप्टन असता तर जीव
रोहित क्याप्टन असता तर जीव तोडून खेळला असता आणि RCB ला १४४ धावांवर रोखल असत. त्यातले १०२ तर रोहितच करणार होता. बाकीच्यांनी ३०-४० रन्स करून MI मॅच जिंकली असती, ती पण १५.८ ओव्हर मध्येच
काही म्हणा पण काल हार्दिक
काही म्हणा पण काल हार्दिक फारच सेंटी झालेला!!
मॅच नंतर फक्त रडायचा बाकी होता.... मला हार्दिक फारसा आवडत नाही पण या आयपीएल मध्ये चांगला खेळतोय तो पण त्याला बाकीच्यांची म्हणावी तशी साथ मिळत नाहीये हे खरे!!
काल कुणाल पांड्याला लास्ट ओव्हर देण्याचा निर्णय फारच धाडसी होता पण अजून काही पर्यायही नव्हता!!
आजकाल मॅच डीप घेऊन जाणे आणि मग शेवटच्या एक दोन ओव्हरमध्ये मारधाड करून जिंकणे ही स्ट्रेटजी काम करेनाशी झालीय..... बॉलर हुशार झालेत आताश्या
आज त्याला भूख लागली होती
आज त्याला भूख लागली होती म्हणून लवकर आऊट झाला नाहीतर ४१ बॉल मध्ये १०१ करणार होता.
>>>>>>
देशासाठी खेळताना त्याचे ३५ चेंडूत शतक आहे. जे जगात सर्वात वेगवान आहे. तो एक विश्वविक्रम आहे.
तसेच सर्वाधिक पाच शतके हा सुद्धा विश्वविक्रम आहे.
सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार हे विश्वविक्रम देखील त्याच्याच नावे आहेत.
देशासाठी खेळणे हे एक वेगळेच इन्स्पिरेशन असते
मान्य आहे. शर्माच्या टॅलेंट
मान्य आहे. शर्माच्या टॅलेंट बद्दल मी तरी संशय घेत नाही.
Varun Chakaravarthy has gone
Varun Chakaravarthy has gone out and Angkrish comes in as the impact sub.
व्वा, क्रिकेट.
शार्दुल ठाकुरचा गनिमी कावा!
शार्दुल ठाकुरचा गनिमी कावा!
रहाणे नि अय्यर रंगात येऊन गोलंदा जी झोड्पत होते.
शार्दुलने लागोपाठ ५ वाइड टाकून त्यांचे मोमेन्टम घालवले. मग शेवटच्या चेंडूला रहाणेला आउट केले!
लै हुष्षार!
शिवय लगोपाथ ५ वाईड हे त्याचे रेकॉर्ड आता कोण तोडू शकेल?
सर ह्या सामान्याबद्दल काही
सर ह्या सामान्याबद्दल काही कॉमेंट?
ऑफिस मध्ये बीजी होतो...
ऑफिस मध्ये बीजी होतो... पाहिली नाही.. फॉलो सुद्धा केली नाही..
पण आता वाईड टाकलेत हे कॉमेंट्री वाचून चेक केले
आऊटसाईड ऑफ स्ट्रॅटेजीनुसार टाकले होते.. अखेर त्याच स्ट्रॅटेजीला यश मिळाले असेही दिसले..
श्रेय कर्णधार ऋषभ पंत याला द्यायला हवे.
त्याआधी त्याने ट्वेंटी वर्ल्ड कपसारखा खेळ सुद्धा थांबवला होता असेही वाचले..
पुन्हा सामना फिरवला.. मानले पाहिजे.
*आऊटसाईड ऑफ स्ट्रॅटेजीनुसार
*आऊटसाईड ऑफ स्ट्रॅटेजीनुसार टाकले होते.. * - सलग 5 वाईड टाकणं हे स्ट्रॅटेजीनुसार म्हणता येइल ? नाही पटत !
ऑफ स्टंप बाहेर वाईड यॉर्कर
ऑफ स्टंप बाहेर वाईड यॉर्कर टाकणं ही स्ट्रेटेजी कॉमन आहे की.. कर्णधाराचे कौतुक यासाठी की पाच वाईड गेले पण विश्वास ठेवला.
सलग 5 वाईड टाकणं हे
सलग 5 वाईड टाकणं हे स्ट्रॅटेजीनुसार म्हणता येइल ? नाही पटत ! >> मी ह्या डोळ्यांनी मॅच पाहिली नि वाईड टाकणे ही स्ट्रॅटेजी होती असे मलाही वाटले नाही. ऑफ स्टंप बाहेर टाकायचा प्रयत्न होता असे म्हणू शकतो. पंत वैतागला होता हेही दिसत होते.
देशासाठी खेळणे हे एक वेगळेच इन्स्पिरेशन असते >> ह्या पुराणाला ह्या संदर्भात अर्थ नाही. स्पर्धा देशासाठी नाहि आहे. तो चुकारपणा करतोय असे वारंवार म्हटल्यावर बाकी विक्रम-पराक्रम युसलेस धरले पाहिजेत. खेळाबद्दल कमिटमेंट नाही . आपल्याला लाखो रुपये देत आहेत त्यांच्या प्रति कामचुकारपणा करणे शोभत नाही वगैरे मुद्दे अनुषंगाने साहजिकच येणार . म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला करण्याआधी दोन मिनिटे वोचार केला तर बरं.
आजकाल मॅच डीप घेऊन जाणे आणि
आजकाल मॅच डीप घेऊन जाणे आणि मग शेवटच्या एक दोन ओव्हरमध्ये मारधाड करून जिंकणे ही स्ट्रेटजी काम करेनाशी झालीय >> स्वरुप मॅचनंतर जयवर्धने काय बोलला ते ऐक. ते + आजच्या केके आर च्या चेसनंतर मुंबईचे नि चेन्नई चे चेस का फसतात हे उघड होतेय.
वाईड टाकणे ही स्ट्रॅटेजी होती
वाईड टाकणे ही स्ट्रॅटेजी होती असे मलाही वाटले नाही. ऑफ स्टंप बाहेर टाकायचा प्रयत्न होता असे म्हणू शकतो
/...
>>>
अहो म्हणजे तेच.. वाईड कोण स्ट्रॅटेजीने टाकेल
वाईड पडले तरी स्ट्रॅटेजी बदलली नाही आणि त्यानेच यश मिळवले याचे कौतुक..
.
.
आजची ठळक घडामोड
ओपनिंग पासून खेळणाऱ्या सेट असलेल्या मैं नही तो कौन बे ला मारता येत नव्हते म्हणून १९ व्या ओव्हरला निवृत्त करावे लागले.
आणि सोळा ओवर संपल्यावर आलेला ४३ वर्षांचा धोनी १२ बॉल २७ मारून गेला.
वाईड पडले तरी स्ट्रॅटेजी
वाईड पडले तरी स्ट्रॅटेजी बदलली नाही आणि त्यानेच यश मिळवले याचे कौतुक..
Submitted by ऋन्मेऽऽष on 8 April, 2025 - 22:52
सलग पाच वाइड टाकणे याला स्पॉट फिक्सिंग म्हणू शकतो , आणि हे आयपीएल मध्ये सहज शक्य आहे
रोहित आयपीएल बॅटिंग सीरीअसली
रोहित आयपीएल बॅटिंग सीरीअसली घेत नाही हे तो कर्णधार असल्या पासून जर ऋ चं म्हणणं असेल तर याचा अर्थ तो संघाप्रती १००% कमिटेड नाही असा होतो ना??
अन् जर कर्णधार १००% कमिटेड नसेल तर मालकांनी त्याला कर्णधार म्हणून का ठेवावं??
साई सुदर्शन ला ईयर मार्क
साई सुदर्शन ला ईयर मार्क करायला हवे. मॅच्युअर झालाय. शॉत सिलेक्शन इंपेकेबल करतोय, पेशन्स दाखवतोय. आधीचा बॉल विसरून पुढचा खेळण्याची एंटॅलिटी दाखवतोय नि मुख्य म्हणाजे कंसिस्टंसी आहे. फ्लॅशी बॅटींग नसूनही मोठे स्कोअर टाकतोय. चांगले टेक्निक आहे.
अन् जर कर्णधार १००% कमिटेड
अन् जर कर्णधार १००% कमिटेड नसेल तर मालकांनी त्याला कर्णधार म्हणून का ठेवावं??
>>>>>
कारण तो कप्तानीत कसलीच कसर सोडत नाहीये.
तो काही गद्दारी करत नाहीये.
त्याचा सरळ हिशोब आहे. मी आयपीएल मध्ये इतकीच फलंदाजी करणार, पण कप्तानीत पूर्ण योगदान देणार जी माझी स्पेशालिटी आहे. आता बोला मला घ्यायचे का? आणि कितीला घ्यायचे.. हा व्यवसाय आहे लिलावात खेळाडू विकले जातात. मे सिर्फ इतना दे सकता हू, परवडता है तो बोला..
आता मुंबई मॅनेजमेंटने घोडचूक काय केली आहे,
तर तो ज्या फलंदाजीत फारसे योगदान देण्यास उत्सुक नाही त्यासाठी त्याला संघात ठेवले आहे.
आणि ज्यात तो मास्तर आहे ती कर्णधाराची भूमिका मात्र त्याला दिली नाहीये.
सच ए वेस्ट ऑफ रिसोर्स..
अर्थात, रोहित जी ब्रँड व्हॅल्यू सोबत घेऊन येतो त्याने मात्र मुंबई तरीही फायद्यात आहे म्हणू शकतो ते वेगळे..
त्याचा सरळ हिशोब आहे. मी
त्याचा सरळ हिशोब आहे. मी आयपीएल मध्ये इतकीच फलंदाजी करणार >> सरळ प्रश्न आहे कि इतकीच फलंदाजी करणार म्हणजे नक्की काय ? धोनीसारखे का ? कि मॅच कशीही सुरू असो नि कितीही स्ट्राईक रेट हवा असो, मी आपला १६ ओव्हर्स नंतरच येणार तसे मी ओपन करणार, बॅट फिरवणार, पाच ओव्हर पर्यंत टिकलो तर ठीक नाही तर आत जाऊन मस्त लस्सी बिस्सी पित बसणार ? ही अशा प्रकारची बॅटींग त्याने कर्णधार असताना केलेली आठवत नाही. गेल्या वर्षी कर्णाधारपदावरून डच्चू मिळाल्यावर हाय टेंपो बॅटींग सुरू केली त्याला "इतकीच" असे म्हणायचे का ?
धोनीसारखे का?
धोनीसारखे का?
>>>>
करेक्ट!
४३ वर्षांचा झाला आहे तो.
त्याला झेपेल तितकाच जीव तो फलंदाजीत जाळणार. पण विकेट कीपिंग मात्र अफलातून करणार. (यावेळी सुद्धा कमाल केली आहे. बघा हायलाईट शोधून) आपला अनुभव वाटणार. सोबत त्याच्या ब्रँड व्हॅल्यू बद्दल काय बोलावे. ती तर नुसती ओरबाडणे चालू आहे.
आता हे सगळे आपल्याला दिसते आहे ते चेन्नई मॅनेजमेंटला कळत नसावे असे वाटते का?
पण त्यांना हे इतकेच पुरेसे आहे.
सामने ते हरत आहेत त्याला जबाबदार धोनीची फलंदाजी नसून इतर कारणे आहेत. त्यांचा मूर्खपणा असा आहे की टॉप ऑर्डर फॉर्म मध्ये नाही तर त्यांनी अतिरिक्त फलंदाज खेळवायला हवे. Impact player rule असून सुद्धा फलंदाजीत डेप्थ नाही त्यांच्या. आहेत त्यात सुद्धा शंकर सारखे फलंदाज भरलेत. ऋतुराज ओपनर का नाही हे तर अनाकलनीय पलीकडे.. मागच्या सामन्यात नूर अहमद चार ओवर पूर्ण नाही केल्या.. त्यानंतर जडेजा ३ ओवर १९ दिलेले त्याला पूर्ण नाही केले.. अनाकलनीय डावपेच आणि संघनिवड..
अरे हो, चेन्नईने यावेळी सर्वाधिक झेल सोडले आहेत हे सुद्धा जोडा यात...
अनाकलनीय डावपेच आणि संघनिवड >
अनाकलनीय डावपेच आणि संघनिवड >> पण धोनी अनुभव वाटतो आहे ना ? मग धोनी असूनही हे सगळे सुरू आहे म्हणजे कमाल आहे.
धोनी किमान किपिंग तरी कर्तो वीस ओव्हर, रोहित तेही करत नाही मग अॅम्कीचा पॉईंट बरोबरच आहे ना ? "तर तो ज्या फलंदाजीत फारसे योगदान देण्यास उत्सुक नाही त्यासाठी त्याला संघात ठेवले आहे." ह्यातून मॅनेजमेंटला काय संदेश जातो कि हा टीम प्लेयर नाही. मला कप्तान केले नाही तर मी बॅटींग करणार नाही ? मग कशाच्या बेसिसवर त्याला कर्णधार करणार ? नुसता अनुभव हवा असेल तर मेंटॉर म्हणून घेतील, एक स्पॉट तरी का अडवायला द्यायचा ?
मला कप्तान केले नाही तर मी
मला कप्तान केले नाही तर मी बॅटींग करणार नाही ?
>>>>
तो कप्तान असताना सुद्धा कुठे जीव जाळून फलंदाजी करायचा?
त्याचा कप्तान असतानाच्या शेवटच्या चार पाच वर्षांचा आयपीएल रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल रेकॉर्ड बघा. फरक स्पष्ट होईल.
आता जास्त वय झाले तसे आणखी कमी जीव जाळणे चालू आहे.
आणि मी कुठे म्हणत आहे की त्याला संघात घ्या.. उलट असे म्हणत आहे की त्याला १६ कोटी खर्चून संघात घेऊन एक जागा अडवायची असेल तर किमान कर्णधार म्हणून घेऊन त्याचा पूर्ण वापर करा किंवा घेऊच नका.
एक स्पॉट काही त्याने अडवला नाहीये. हा काही त्याचा निर्णय नाहीये की हे त्याच्या हातात नाहीये. मुंबईचं ठरवेल काय ते.
पण बहुधा मुंबईला देखील त्याच्यासोबत येणारी जी ब्रँड व्हॅल्यू आहे त्यासाठी तो हवा आहे. आणि कर्णधार हार्दिकला करत आहेत कारण त्यांना तो सुद्धा हवा आहे.
पण या नादात संघाचे वातावरण बिघडवून ठेवले आहे. सूर्या सुद्धा खुश नाहीये. तिलक बाबत शंका आहे. खुद्द बुमराह देखील अश्यात आपले १०० टक्के देईल की आपला फिटनेस इंटरनॅशनल साठी राखून ठेवेल याची खात्री नाही. किंबहुना ते मला तसेच झालेले हवे आहे. त्याला ताजेतवाने बघायचे आहे. फिटनेस टिकून राहायला जी मॅच प्रॅक्टिस गरजेची असते त्या सराव सामने मेंटेलिटीने खेळावे हेच उत्तम.
पण धोनी अनुभव वाटतो आहे ना?
पण धोनी अनुभव वाटतो आहे ना? मग धोनी असूनही हे सगळे सुरू आहे म्हणजे कमाल आहे.
>>>>
याचा अर्थ धोनी सध्या चेन्नई थिंक टँक मध्ये फार ढवळाढवळ करत नाहीये असे वाटते. तसे मैदानावर बॉलिंग चेंज निर्णय सुद्धा बहुधा गायकवाडवरच सोपवले आहेत असे वाटते.
अन्यथा मायकल हसी, फाफ डुप्लेसी, शेन वॉटसन अश्या सलामीवीरांनी जोरदार सुरुवात द्यावी, भले मग ते एखादा सीजन फेल गेले तरी सातत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी विचारधारा असणारा संघ गायकवाड सारखा त्याच लेव्हलचे यश मिळवलेला ओपनर कुठे तिसऱ्या नंबरवर खेळूवून त्रिपाठी रचीन वगैरे ट्राय करत आहेत हे खरेच अनाकलनीय.
त्याचा कप्तान असतानाच्या
त्याचा कप्तान असतानाच्या शेवटच्या चार पाच वर्षांचा आयपीएल रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल रेकॉर्ड बघा. >> शेवटची चार-पाच वर्षेच का बघायची सगळी कारकिर्द का नाही बघायची हे कळले नाही. हा अॅटिट्यूड मधला फरक भारताची कप्तान्शिप मिळाल्यावर आला का ? तोवर स्वतःला एव्हढे एस्टॅब्लिश्ड करायचे कि बस्स रे बस्स असा डावपेच होता का ? हार्दिकने पण असेच केले तर त्याला बू करणार का ? कि हे नियम फक्त काही ठराविक खेळाडूंनाच लागू आहेत ? कोहली तर आयपील सामने तेव्हढ्याच जिगरीने खेळताना दिसतोय. अय्यर तर सुसाट सुटला आहे. सिराज पॉईंट प्रूव्ह करायचा ध्यास असल्यासारखा बॉलिंग करतोय.
फिटनेस टिकून राहायला जी मॅच प्रॅक्टिस गरजेची असते त्या सराव सामने मेंटेलिटीने खेळावे हेच उत्तम. >> आयपील् खेळताना जेव्हढा पैसा मिळतो नि ज्या जोमाने तरुण खेळाडू जागा घ्यायला पुढे सरसावत आहेत नि एक खेळाडू म्हणून स्वतःची जी इमेज स्वतःच्याच डोक्यात असते ती बघता असा कामचुकारपणा करणे कुठलाही खेळाडू सातत्याने प्रदीर्घकाळ करत असेल हे अशक्य आहे. असा कोणी असेल तर त्याला खुशाल डच्चू द्यावा. त्याबद्दल त्याच्या पी आर अजन्सी किंवा पाठीराख्यांनी बोंबाबोंब केली तर त्यांनाही पार्श्वभागावर फटके द्यावे असे मी म्हणेन. खेळाची इंटीग्रिटी खेळाडूपेक्षा मह्त्वाची आहे. सुपरस्टार कल्चर नको ! बरोबर ना ?
याचा अर्थ धोनी सध्या चेन्नई
याचा अर्थ धोनी सध्या चेन्नई थिंक टँक मध्ये फार ढवळाढवळ करत नाहीये असे वाटते. >> फ्लेमिंग ने सरळसरळ धोनी त्याला हवी तशी बॅटींग हवी तेंव्हा करेल असे सांगितले आहे. ह्याहून अधिक ढवळाढवळ काय करणार धोनी ?
शेवटची चार-पाच वर्षेच का
शेवटची चार-पाच वर्षेच का बघायची सगळी कारकिर्द का नाही बघायची हे कळले नाही.
>>>>
जोपर्यंत त्याला भारतीय संघातील जागा टिकवायचे टेन्शन होते तोपर्यंत आयपीएलमध्ये परफॉर्म करून स्वतःला सिद्ध करणे भाग होते.
जेव्हा ती गरज संपली तेव्हापासून तो कॅज्युअल खेळायला लागला.
मुळात असे खेळण्यात प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला एखादा भारतीय खेळाडू देशासाठी परफॉर्म करायला हवा आहे की आयपीएलसाठी परफॉर्म करायला हवा आहे? आयपीएल मध्ये त्यांनी किती खेळायचे ते त्याला ठरवू दे आणि त्याचा संघमालक बघेल.
भारतासाठी मात्र शंभर टक्के योगदानच हवे. जे तो देत आहे तोपर्यंत तो मला भारतीय संघात हवा आहे.
फ्लेमिंग ने सरळसरळ धोनी
फ्लेमिंग ने सरळसरळ धोनी त्याला हवी तशी बॅटींग हवी तेंव्हा करेल असे सांगितले आहे.
>>>>
ते फ्लेमिंगनी सांगायची गरज काय आहे? धोनी स्वतःबद्दलचे निर्णय स्वतः घेतोय हे दिसते डोळ्यांनी..
पण इतरांचे म्हणजे संघाचे निर्णय तो आता घेत नसावा असे वाटते.
आणखी एक तुम्हाला पटणार नाही
आणखी एक तुम्हाला पटणार नाही पण ऐका,
धोनीची फटकेबाजी पण हल्ली स्क्रिप्टेड असते .
सामना हातातून गेला आहे तिथे त्याला मोकळी फटकेबाजी करायला देतात, त्याची हातातली कॅच सोडतात, फाईन लेग फिल्डर आत लावून त्याला लेग स्टम्पवर बॉलिंग टाकतात, फुलटॉस टाकतात, शॉर्ट बॉल टाकतात. पण जिथे सामना चुरशीचा आहे तिथे त्याला जखडून टाकतात. जिथे सामन्याचा निकाल आधीच लागला आहे तिथे कोणीतरी मुद्दाम रनआऊट होतो आणि त्याला विनिंग शॉट मारायला मैदानावर बोलावतात. कारण आयपीएल हे मनोरंजन आहे. चेन्नईची फलंदाजी चालू असताना एक कॅमेरा सतत ड्रेसिंग रूम मधील धोनीवर असतो. कॉमेंट्री करणाऱ्यांना प्रत्येक ओव्हरला धोनीचे नाव एकदा घेणे बंधनकारक असते. रायडूला तर धोनी शिवाय दुसऱ्या कोणाचे नाव घेण्याची परवानगीच नाहीये.
आपलाच खेळाडू आऊट झाल्यावर चेन्नईची पब्लिक नाचू लागते कारण धोनी बॅटिंगला येणार असतो. धोनीच्या एन्ट्रीला मैदानात लोकांचा आवाज किती डेसिबल मोठा आहे हे दाखवले जाते. धोनी फलंदाजीला आल्यावर जिओची viewership किती वाढली हे दाखवले जाते. माझे क्रिकेटचे रेकॉर्ड असलेले आकडे बघून तुम्ही लोकं वैतागता. आणि असे बिनकामाचे आकडे बघून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही मला कमाल वाटते
आयपीएल ही आयपीएल सारखीच एन्जॉय करा...
देशासाठी खेळतानाचे निकष याला लावू नका!
“ त्याचा सरळ हिशोब आहे. मी
“ त्याचा सरळ हिशोब आहे. मी आयपीएल मध्ये इतकीच फलंदाजी करणार, पण कप्तानीत पूर्ण योगदान देणार जी माझी स्पेशालिटी आहे. आता बोला मला घ्यायचे का?”
“ सूर्या सुद्धा खुश नाहीये. तिलक बाबत शंका आहे.”
हा प्रश्न गैरलागू आहे पण विचारतो - हे कसं कळलं? कुणी सांगितलं?
“ तसे मैदानावर बॉलिंग चेंज निर्णय सुद्धा बहुधा गायकवाडवरच सोपवले आहेत असे वाटते.” - गायकवाडच कॅप्टन आहे ना? मग तोच घेणार ना?
Pages