आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे सचिन शंभरावे शतक करायला स्लो खेळला हे सत्य आहे. तसेच सचिन आणि कपिल यांनी आपली कारकीर्द सुद्धा लांबवली. हे काही आरोप नाही, की यावरून मुद्दाम त्यांना कोणी चिडवायला जात नाही. पण जे आहे ते आहे.

पण याने सचिनची किंवा कपिलची महानता काही कमी होत नाही हे देखील तितकेच खरे आहे.

असो, कोणत्याही आवडत्या थोर पुरुषाला, व्यक्तीला, खेळाडूला देव बनवले की मग काहीच विरोधात ऐकून घेता येत नाही याची कल्पना आहे Happy

जुरेलचा आजचा हेझलवूडसमोरचा खेळ बघून स्टार्क समोर तो...
>>>>
ज्युरेल आज सगळ्यांसमोर असाच खेळत होता. Bat वर बॉल च बसत नव्हता.
आणि त्यादिवशी हेटमायर सुद्धा होताच.
आणि हे दोघेच का बाकीचे सुद्धा असेच खेळत आहेत.
या लोकांना जिंकण्यात काही इंटरेस्ट नाही हे मला कळले आहे.

*आवडत्या थोर पुरुषाला, व्यक्तीला, खेळाडूला देव बनवले की मग काहीच विरोधात ऐकून घेता येत नाही याची कल्पना आहे * - असा थोर पुरुष हा देव नसून दगडच आहे हे ओढून ताणून दाखवण्याची कांहीं मूर्तीभंजकाना खूपच खुमखुमी असते, हेही तितकेच खरे !!!! Wink

>>राजस्थानचा फॅन म्हणून आता परत एकदा राजस्थानला मिड टेबल बघायची तयारी केलेली आहे..... प्लेऑफला वगैरे गेले तर तो सुखद धक्का असेल Happy
Submitted by स्वरुप on 27 November, 2024 - 18:06

सुखद धक्का मिळण्याच्या उरल्यासुरल्या अंधुक शक्यता काल राजस्थानने धुळीला मिळवल्या..... अनाकलनीय रिटेंशन्स, त्यातून पुढे गंडलेले ऑक्शन, रील्स बनवण्यात रमलेले खेळाडू, सुस्त सपोर्ट स्टाफ, द्रवीडबद्दल पूर्ण आदर राखून असे म्हणावेसे वाटते की sanga did much better job last few years!!
फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यवंशीला बसवून impact sub specialist म्हणवणाऱ्या दुबेला खेळवत राहता की ज्याला आजपर्यंत एकदाही impact दाखवता आला नाही.... टोटली फ्लॉप ठरलेल्या देशपांडेला इतका long rope का? कॅप्टन्सीचा घोळ, गलथान फिल्डिंग, दिशाहिन बॉलिंग, पोस्टमॅचमध्ये अर्थहीन स्पष्टीकरणे, वेळीच चुकातून न शिकता त्या रिपीट करणे आणि सगळ्यावर कडी म्हणजे अत्यंत विचारशून्य व्युव्हरचना!!
राजस्थान ने यावेळी नेहमीपेक्षा जरा जास्तच निराश केले!!

Pages