अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - भूमिका - अतुल.

Submitted by अतुल. on 13 September, 2024 - 15:33

ती साकारत असलेलं पात्रच तसं होतं. 'रांधा वाढा उष्टी काढा...' या काळातली स्त्री तिने साकारली होती.

पोटात भुकेची आग. पण कामावरची अपार निष्ठा तिला जेवू देत नव्हती. कारण तिचीच प्रमुख भूमिका असलेला हा प्रयोग तिच्यासाठी फार महत्वाचा होता. तो यशस्वी होण्यासाठी तिने जीवापाड मेहनत घेतली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रेक्षागृहातून भरभरून प्रतिसादही मिळत होता.

शेवटचा अंक संपत आला तेंव्हा एकीकडे ती समाधानी होती तर दुसरीकडे भुकेने तिचा जीव व्याकूळ झाला होता. कधी एकदा प्रयोग संपेल असे तिला झाले होते. पडदा पडण्यापूर्वी तिच्या खाष्ट सासूची भूमिका साकारणाऱ्या पात्राच्या तोंडी तिला उद्द्येश्यून संवाद होता, "खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा!"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
शेवटचं वाक्य तिने अगदी कळवळून म्हंटले असणार.