अंत: अस्ति प्रारंभ: - १ - चिमूट - सामो

Submitted by सामो on 9 September, 2024 - 23:44

तीघे मजेमजेने गाणे गात सहलीला निघाले होत-चोलीके पीछे क्या है…. चुनरीके नीचे क्या है. खिदळत, एक्मेकांबरोबर हास्यविनोद करत त्या सुंदर, नितळ डोंगरमाथ्यावर जरा विसावले. एकाने उत्साहाने जागेवरच जॉगिंग सुरु केली तर दुसरा आकंठ रसपान करु लागला. तो जरा विसावला.

इतक्यात कर्णभेदी किंकाळी ऐकू आली व पूर्वजांनी सातत्याने वॉर्निंग दिलेली ती भयानक ‘चिमूट’’ दिसली.
उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून तिघे सैरावैरा पळू लागले. त्याने रस्त्याकडे (खरे तर खोल दरीकडे )धाव घेतली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके.
गुड नाईट
स्लीप टाईट
मेक शुअर बेडबग्ज डोन्ट बाईट

झोपते.

कथा नव्वदीच्या दशकातील आहे इतकेच समजले
पूर्वज पेशव्यांच्या काळातील होते की पांडवांच्या हे नाही समजले.

कविन अगदी बरोब्बर Happy
ढेकूण
ढेकणाचं जॉगिंग म्हणजे केवढ इरिटेशन असेल बघ हाहाहा

दुसरा आकंठ रसपान करु लागला... कर्णभेदी किंकाळी ऐकू..पूर्वजांनी सातत्याने वॉर्निंग दिलेली ती भयानक ‘चिमूट’’ दिसली.
>>> Lol Lol Lol

काय लिहिलंय. सामो... कसं सुचत असं ?? Lol Lol Lol

अय्याया
प्रतिसादात कळाली कथा
कहर आहे Lol
चुनरिके पिछे गाण्याचे प्रयोजन कळाले.
Slumdog मधले एक गाणे आठवले
रिंगा रिंगा
चेक करा

अय्याया
प्रतिसादात कळाली कथा
कहर आहे ....... अगदी.मग परत कथा वाचली.

जबरा सामो ! "चोलीके पीछे क्या है…. चुनरीके नीचे क्या है" ह्याला पण वेगळाच आयाम प्राप्त झाला आता Happy