कभी खुशी कभी गम - एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 19 August, 2024 - 14:40

कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अ‍ॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अचानक चालू करणार. मग तेथील पब्लिकला हळुहळू हे राष्ट्रगीत आहे हे लक्षात आल्यावर ते इकडेतिकडे बघत एक एक करत उभे राहणार असला भंपकपणा आहे >>> टोटली.
ती पू त्यांना डो द डिअर वगैरे काहीतरी शिकवत असते ना? मग ही सिक्रेट शिकवणी कधी होते म्हणे त्यांची? आणि एकाच फॅमिलीतले दोन - दोन लोक्स इतका पिळ मारतायत हे पाहून प्रॅक्टिसकर्ते पळून कसे जात नाहीत?

वेगळेच काहीतरी करायला जमलेल्या लोकांवर उगाच ही जबरदस्तीची राष्ट्रभक्ती >>>>
तर काय. बरं एक वेळ लावा तिकडे भारताचं राष्ट्रगीत पण डोरेमीला कशाला तोंड वेंगाडताय? अशक्य इरिटेटिंग रोल आहे काजोलचा (ऍक्चुअली सगळ्यांचा)

हा पिक्चर बघितला (थिएटरमध्ये!) तेव्हा actually काजोलमुळे जरा सुसह्य वाटला होता. पण आता कधी टीव्हीवर लागला असेल तर काजोलही असह्य होते. सगळंच असह्य आहे.

या सिनेमात दु:ख झाल्याची किंवा एका डोळ्यात आसू एका डोळ्यात हासू चा अतिरेकी अतिरेक झालाच आहे, शिवाय वर या प्रसंगांमधे बेगड्या अभिनयाची स्पर्धा भरवल्यासारखी आहे. जंगली कबूतर हिट झाल्यावर सुमार प्रौढांसाठी नाटकं निघावीत, त्यातले कलाकार प्रसिद्ध होऊन मग त्यांनी ज्या पद्धतीचा अभिनय मेनस्ट्रीम मधे करावा तशा अभिनयाची स्पर्धा आहे.

आवंढा आलाय हे इतक्या वेळा दाखवलंय कि एकालाही उस्फूर्त अभिनय करता आलेला नसावा. मग अनुलोम विलोमचे रामदेवबाबांनी वर्ग घ्यावेत तसे सगळ्यांनी नाकपुड्या एकमेकांना चिकटवून मोदींजींच्या भरल्या गळ्याच्या अभिनयाची शपथ घेऊन संवाद म्हटले आहेत. अमिताभच्या जागेवर तर मोदीजीच हवे होते आणि जयाआंटीच्या जागेवर ममता बॅनर्जी.

पिसं काढण्याच्याच लायकीचा मुव्ही आहे हा! Lol
भारीच आहेत सगळ्ञांनी फाडलेल्या चिंध्या ... लोल

जया बच्चन हसताना किंवा रडताना एक विचित्र प्रकारे गदगदत असते. ती खांद्यातून हसते किंवा रडते असं माझं निरिक्षण आहे . कुठला सिन आठवत नाहीये या मुव्हीमध्ला की अजून कुठे बघितला शाहरूख खान समोर वाकून रडत असते तेव्हा केस मोकळे आहेत एकदम ते पण गदगदतायत.

शाहरूखच्या हेलिकॉप्टर एंट्री सीन ला अमिताभला ती कुंकू लावतेय तेव्हा कशी ऊंची पुरली.. टायसाठी स्टुल घेते तर कपाळ तर अजून वर आहे. कमालच आहे.

राधा निशा +786
तुमची पोस्ट योग्य आहे. पण अस्थानी आहे.

कारण काहीही सिरपैर नसलेल्या चित्रपटांवर आणि त्यातील कलाकारांवर भरभरून प्रेम करणे हे जसे चित्रपटवेड्यांचे लक्षण असते त्याच वेळी लॉजिकची टिंगल उडवणे हा सुद्धा एक मजेशीर कार्यक्रम असतो.

माझा सुद्धा हा अतिशय आवडता आणि कित्येक वेळा पाहिलेला पिक्चर आहे. ज्यात तो शाहरुखच्या एन्ट्रीचा सीन असा आहे की तो बघायला मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन आणि तो बघून प्रत्येक जन्मात त्याच्या प्रेमात पडेन.

पण त्याचवेळी इथे लोकांनी हेलिकॉप्टरच्या आवाजावरून जे विनोद केले ते सुद्धा वाचायला मजा आली.

चित्रपटांच्या आ आ आ गाण्यावर इथे बरीच चर्चा झाली. या निमित्ताने ते गाणे साक्षात लता दीदींचे होते हे मला आज समजले. त्यावरून इथे बरीच खेचली गेली जे योग्यच वाटले कारण त्यांच्या इतर गाण्यांसमोर हे काहीच नाही.. पण म्हणून लताच्या चाहत्यानी भावना दुखावून घेण्यात अर्थ नाही.

पण त्याचवेळी या चित्रपटातील गाणी मस्त आहेत, आजही ऐकावीशी वाटतात, शाहरुख आणि करण ही जोडी नेहमीच मेलोड्डीयस गाणी देत आलेत जे आज दुर्मिळ झालेय हे सुद्धा कोणीच अमान्य करणार नाही. हा धागा वाचतानाही माझ्या कानात बॅकग्राऊंडला ती वाजत आहेत.

जसे काजोलचा विषय निघाला की तिला शाहरुख पहिल्यांदा बघतो ते कुडीयेss कुडीये गाणे ऐकू येते. काय मस्त सीन आहे तो सुद्धा. तिला बघून शाहरुख एक पायरी घसरून पडतो तेव्हाचे त्याचे एक्स्प्रेशन. डोळ्यात बदाम बदाम बदाम.. (यावर वेगळा धागा हवा) आणि त्यानंतर त्याचे खांदे सुद्धा त्या गाण्यावर ताल धरू लागतात. तुम्हाला तुमचे लव्ह at फर्स्ट साईट आठवायलाच हवे.

शाहरुखचा या जगात माझ्या सारखा चाहता नसेल. तरी इथल्या त्याच्या गाजलेल्या चित्रपटांच्या खेचलेल्या पोस्ट वाचायला मजा येते कारण मला शाहरूख बद्दल काहीही वाचायला आवडते. अगदी आता मी त्याच्या बद्दल लिहितोय या विचारानेही लिहीता लिहीता माझ्या हातावर काटा आला आहे.

उद्या तुम्ही शाहरुखला या धाग्याची लिंक द्या. तो स्वतः एक डुआयडी काढेल आणि स्वतःच आपल्या चित्रपटांची खिल्ली उडवून जाईल. कारण तो शाहरूख आहे., किंबहुना म्हणून तो शाहरूख आहे Happy

मोराल ऑफ द स्टोरी - टेन्शन नही लेने का.. वाचून एन्जॉय करनेका Happy

एंट्री सीन ला अमिताभला ती कुंकू लावतेय तेव्हा कशी ऊंची पुरली.. टायसाठी स्टुल घेते तर कपाळ तर अजून वर आहे.
>>>>>

पण हे लॉजिकल आहे. कुंकू लावताना हात जाईल तितका वर केला आणि एक बोट चिकटवून खाली आणले की काम झाले.
टाय बांधताना जी खटपट करावी लागते. ती अशी हात फार वेळ वर करून शक्य नाही.... (असे मला वाटते. मी अजून कोणा उंच व्यक्तीच्या टाय बांधला नाही)

प्रेम रतन धन पायो चित्रपटातलं मायबोलीवर गाजलेलं जे बाकडं आहे ते बच्चनच्या घरी आहे असे म्हणतात.
( बच्चन त्याच्यावर लवंडला कि मग जया आंटी टिळा लावतात असे ऐकले आहे. खखोबजा)

शाहरूख खान समोर वाकून रडत असते तेव्हा केस मोकळे आहेत
>>>
वहिदा रेहमानचे केस पाहून मला नेहमी सॉल्ट न पेप्पर लूक ठेवायचा मोह व्हायचा. पण या पिक्चरमधला जयाच्या केसांचा भयाण लूक पाहता तो बेत रद्द करतेय मी. (कु का त कु का)

बाकडं >>> Biggrin

म्हणजे सोनम कपूर पोज मधे का हो? >>>>
अगं ए, म्हातारा आहे गं तो. आधीच उंचीमुळे प्रॉब्लेम असेल. स्पॉंडिलायसिस होईल ना गं.

बच्चन त्याच्यावर लवंडला कि मग जया आंटी टिळा लावतात असे ऐकले आहे. खखोबजा)
>>> टिळा टिळा बाकावर लवंड ? Lol
'तिळा, तिळा दार उघड'च्या चालीत वाचायलाच हवे असे काही नाही.

वहिदा रेहमानचे केस पाहून मला नेहमी सॉल्ट न पेप्पर लूक ठेवायचा मोह व्हायचा. पण या पिक्चरमधला जयाच्या केसांचा भयाण लूक पाहता तो बेत रद्द करतेय मी. (कु का त कु का)>>> Lol

Rmd, सोनम सारखं पालथं व्हायला सांगत आहेस ह्या वयात , हे काही 'दंगल-दंगल'चे वय नाही. Lol

माझेमन , अस्मिता Lol
"आता काय पाठीवर टिळा लावू का काय?" - जया

आचार्य Proud

2010 नंतर आलेले हिंदी चित्रपट मी पाहिलेले मोजले तर दहापण होणार नाहीत , 1990 ते 2010 या काळातले मोजले तर 30 - 35 कदाचित .. कदाचित चित्रपट पाहण्याची जास्त आवड होती त्या काळात पाहिलेले जास्त आवडत असतील .

एखादा सिनेमा तुम्ही कोणत्या वयात पाहता त्यावरही तो किती आवडतो हे थोडंफार अवलंबून असावं ... तशी शोले , दीवार , आनंद वगैरेचीही लॉजिकच्या दृष्टीने पिसं काढता येऊ शकतात , पण आधीच्या पिढीतल्या अनेक लोकांसाठी शोले इज नॉट ए मुव्ही इट्स ऍन इमोशन असं फिलिंग असू शकतं आणि त्यात लॉजिक कुठे शोधायला जाता असं त्यांना वाटू शकतं ..

तसं विवाह वगैरे सिनेमे ज्यांनी वयाच्या 10 - 12 व्या वर्षीच्या जवळपास बघितले असतील त्यांना ते असह्य न वाटता प्रेमाची परमावधी , भारतीय संस्कृतीचा एपिटोम असे काहीतरी वाटत असू शकतात .. एखादा चित्रपट वयाच्या कोणत्या टप्प्यावर बघता यानेही थोडाफार फरक पडत असावा .

तशी शोले , दीवार , आनंद वगैरेचीही लॉजिकच्या दृष्टीने पिसं काढता येऊ शकतात >>> नक्कीच. लोकांशी रिझोनेट झाले तर त्यावरही अनेकजण लिहीतील. पिक्चर बघताना आपल्याला जे वाटले तसेच वाटणारे समविचारी किती आहेत यावर आहे.

दीवार वर असा धागा आहे. पिक्चरच्या मुख्य गाभ्याला धक्का न लावता इतर बाबींची भरपूर खिल्ली उडवली आहे Happy एखाद्या फॅनने लिहावे तसा लेख आहे.
https://www.maayboli.com/node/44417

काही चित्रपट त्यातील सादरीकरणाच्या ताकदीमुळे आपल्याला एंगेज करतात. मग दोन तीन वेळा पाहिले की इतर गोष्टी दिसू लागतात. उदा: दीवार मधे रवीला शाळेत जायला विजयने काम करायची गरज नव्हती. महापालिकेच्या शाळा तेव्हाही फुकट होत्या. पण हे दुय्यम सीन मधे असल्याने पहिल्यांदा पाहताना लक्षात येत नाही.

याउलट काही पिक्चर्सच्या बाबतीत पहिल्यांदाच पाहतानाही काय पकवत आहेत असे फिलिंग येते Happy मला के३जी ला तसे झाले.

एखादा चित्रपट वयाच्या कोणत्या टप्प्यावर बघता यानेही थोडाफार फरक पडत असावा
>>>>
वय कुठलेही असो. काळासोबत चालावे. टीनेजर मुलांना काय आवडते ते आपल्यालाही आवडते का बघावे. आणि आजच्या तारखेला सुद्धा या वयाच्या मुलामुलीमध्ये शाहरूख हिट आहे. याचे कारण नुसते रोमान्स नाही तर त्याच्यातील एनर्जी त्यांना रिलेट होते.

कभी खुशी कभी गम मधून शाहरूखला वजा केले तर त्याचा मुझसे दोस्ती करोगे होऊन जाईल.

ही बिजी 'बिझी' नसून रिकामटेकडी असते. >>>
अभद्र आलाप>>>
आय लव्ह माय इण्डिया" वगैरे मुखड्यात टोटल कल्पनादारिद्र्य असलेले का होईना पण स्वतंत्र गाणे होते>>> हसून हसून मेले. प्रतिक्रिया अजून च मजेशीर Rofl

भारी भारी पोस्ट आहेत सगळ्या
पर्णीका खूपच लॉजिकल अपेक्षा केल्यात तुम्ही Lol
रघु आचार्य - करण जोहरचं भूगोल ज्ञान Lol
शाहरुख ला सी थ्रू शर्ट मध्ये बघणे आणि दाखवणे फँटसी त्याच्या खास मित्रांचीच असते. उदा करण जोहर , फराह खान
त्याची acting दिसेल असे काही करण्यासाठी पेक्षा चमकोगिरी जास्त असते.
लतादीदी चे गायलेले आ आ आ आ हे एकमेव नावडते गाणे आहे एकदम पीळ.
ओव्हरमार्केटिंग केलेला चित्रपट.

काजोल समोर नाच ग घुमा मधली मुक्ताचे character सुसह्य वाटेल. ( दगडापेक्षा वीट मउ लॉजीकने)

कलंक मधल्या भूगोलाच वर्णन इथेच वाचलं होतं.
ते तर फार अचाट होतं. नदी नावाडी आणि काय काय.
इथली चर्चा वाचायला मजा येत आहे पण काल फा ने दिलेला चंद्रकला सीन बघून आले. बघू शकले.

सिनेमातली फ्रेमन फ्रेम सुंदरच असावी हा केजो चा अट्टाहास कधी कधी असह्य होतो. आजीला अग्नी देण्याचा प्रसंग, आर्किटेक्ट ने तयार करावे तसे आखीव रेखीव स्मशान. सर्व उपस्थित (कोण हे?) मॅचिंग व परफेक्ट फिटिंग चे पांढरे कपडे घालून आयताकृती उभे. एनडीए ची ची पास आउट परेडच जणू. मेन पात्रांनाही पांढरेच कपडे , पण खास डिझायनर टच. तिथेही परफेक्ट फिटिंग. लाकडे अगदी नीट रचून ठेवलेली, अग्नी देण्यासाठी अमिताभ ने हातात घेतलेला पलिताही एखाद्या सी एन सी मशीन वर केल्यासारखा परफेक्ट.

सिनेमातली फ्रेमन फ्रेम सुंदरच असावी हा केजो चा अट्टाहास कधी कधी असह्य होतो. >>>>
हो. मला तर वाटले आश्रमाच्या मधल्या चौकातच दाहसंस्कार करताहेत की काय? म्हणजे स्मशान काय भयाण असावे असे नाही. पण लोकांना वरून खिडकीतून बघायची सोय केली की काय असे वाटत राहते. आणि सगळे हात बांधून उभे. अरे स्मशानात आहात, समूहगीतासाठी उभे नाही आहात.

हो हे मात्र खरे आहे. ते स्मशानात पांढरे कपडे पद्धत आपल्या मराठी लोकांत नाही हे बरे आहे. आधीच मी पांढरे कपडे कमी घेतो. त्यात दरवर्षी 15 ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असे दोन जोड कंपलसरी लागतात. त्यानंतर रंग छान उठून दिसावेत म्हणून होळी-रंगपंचमीला एक वाया घालवावा लागतो. अश्यात वर्षाला ओळखी पाळखीतले दोन चार लोकं टपकले तरी इतके सफेद कपडे कुठून आणायचे प्रश्नच पडला असता.

वर्षाला ओळखी पाळखीतले दोन चार लोकं टपकले तरी इतके सफेद कपडे कुठून आणायचे प्रश्नच पडला असता.>>>>
अरे दरवेळी रिपीट न करायला ते काय लग्न आहे? कोण हिशोब ठेवणार आहे की गेल्या मयताला पण ऋन्मेषने हाच कुर्ता घातला होता?

@माझेमन Lol Lol हेच डोक्यात आलेले.

सिनेमातली फ्रेमन फ्रेम सुंदरच असावी हा केजो चा अट्टाहास कधी कधी असह्य होतो >>> Lol या अट्टाहासावर 'आय हेट लव्ह स्टोरीज' पिक्चरमधे छान ताशेरे ओढले आहेत.

माझेमन Rofl

Pages