दरवर्षी येणारी शाळेची पिकनिक. जिची वर्षभर आतुरतेने वाट बघितली जाते. कारण माहोलच तसा असतो. त्या दिवशी सुद्धा तसाच होता. गप्पा टप्पा धमाल मस्ती करत सारे जण स्विमिंग पूलच्या पाण्यात डुंबत होते. मी मात्र डोक्यावर कसलेसे टेन्शन घेऊन, त्यातून बाहेर पडायला हातात मद्याचा प्याला घेऊन, एकटाच कुठेतरी आपल्याच विश्वात रममाण होतो.
ईतर सारे जण पाण्यात तर मी विचारात बुडालेलो होतो. आजारपण यंदा लांबले होते. त्यामुळे मनात उत्साह तर फार होता पण शरीर तितके साथ देत नव्हते. हाडाची काडे आणि छातीच्या बरगड्या झाल्या होत्या. वजन म्हणून जे काही शिल्लक होते त्यात केसांचाच सिंहाच्या आयाळीचा वाटा होता. एका मर्यादेनंतर असह्य झाले आणि जिच्यापासून दूर राहा असा लोकांना आजवर सल्ला देत आलो होतो तिलाच अखेर कवटाळले. भले ती अनंतकाळाची वैरीणी का असेना, त्या क्षणी ती माझी मैत्रीण होती, प्रेयसी होती, फक्त आणि फक्त माझीच होती. तितक्याच हळूवारपणे मी तिला कवेत घेतले होते. आणि त्या बेसावध क्षणी कोणीतरी फोटो क्लिक केला.
मित्रच ते. अशी संधी सोडणार नाहीच. पण त्यानंतर मी देखील 'जे आत तेच बाहेर' या तत्वाला जागून तो फोटो व्हॉटसॲप स्टेटसवर शेअर केला. सोबत एक टॅगलाईन टाकली.. "कौन कंबख्त बरदाश्त करने के लिए पिता है.. हम तो ईस लिये पिते है क्यो की माय लाईफ माय चॉईस!"
मग काय, धडाधडा लोकांच्या मेसेजची मालिका सुरू झाली.
" अरे वेडा आहेस का? मागच्याच आठवड्यात तुझे ऑपरेशन झाले होते ना..'
' दोन मुले आहे तुला.. त्यांचा तरी विचार कर.."
' कसले फोटो शेअर करतो रे.. कौतुक वाटते का दारू पितोस याचे. .'
...तर काही नुसत्याच ईमोजी होत्या.
काही रडवेल्या, काही रागाच्या, काही भयचकित झालेल्या.. तर काही नुसतेच डोळे विस्फारलेल्या..
अगदी काल परवापर्यंत मी निर्व्यसनी होतो. दारू सिगारेट गुटखा तंबाखू दूरच, साधे पान सुपारीचे व्यसन नव्हते. याला मी माझा गुण समजत होतो. पण ते आपले माझे मीच समजत होतो. जगाला याचे शून्य कौतुक होते. अर्थात त्याने मला फरक पडत नव्हता. पण तेच जग आता दारू पिणे याला दुर्गुण समजून मला उपदेश द्यायला पुढे सरसावले होते.
ते हितचिंतकच आहेत याबाबत मनात जराही शंका नाही. कारण गेले कित्येक वर्षे हेच काम मी स्वतः इमानइतबारे करत आलोय. आणि त्या नादात कित्येक जवळच्या लोकांचा रोष ओढावला आहे.
शनिवार संध्याकाळ झाली की शाळेच्या व्हाट्सअप ग्रूपवर धडाधड दारूच्या भरलेल्या ग्लासांचे फोटो पडत एकमेकांना चिअर्स म्हणायला सुरुवात व्हायची. सर्वप्रथम मी याला विरोध केला. आणि सर्वात शेवटी विरोध करणारा सुद्धा मी एकटाच होतो. ग्रूपमध्ये पॉलिटिक्स चर्चा नको, कारण त्याने मित्रांच्या ग्रूपमध्ये फूट पडते असे सर्वांचेच मत होते. पण तेच आपापले दारू पितानाचे फोटो शेअर केल्यास ग्रूपमधील एकजूट कायम राहते यावर देखील सर्वांचे एकमत होते.
माझ्या स्टेटसवरचा फोटो बघून एका नात्यातल्या व्यक्तीचा मेसेज आला. तू दारू पितोस ते ठिक आहे. आम्हीही पितो कधीतरी. पण त्याची अशी जाहिरात करू नये. अजून चार लोकांना उद्युक्त करू नये.
काल परवा पर्यंत मी हाच मुद्दा घेऊन मायबोलीवर कित्येकांसोबत वाद घातला होता. दारू कशी प्यावी हा धागा देखील नेमके याच कारणासाठी मला खटकत होता. त्यामुळे तिथे जाऊन वेळोवेळी लोकांच्या दारूच्या ग्लासात मिठाचा खडा टाकायचे काम करत होतो. तेथील चर्चा वाचून न पिणाऱ्यांना प्यावेसे वाटू नये किंवा क्वचित पिणाऱ्यांचे प्रमाण वाढू नये याची काळजी घेत होतो. त्या नादात व्हीलन ठरत होतो. पण आज स्वतः दारूच्या आहारी गेलो तेव्हाही काही हिरो झालो नाही.
अर्थात माझी ही ढवळाढवळ करायची सवय मद्यपानाची आवड असणाऱ्यांच्या डोक्यातच जात असणार हे उघड होते. पण दारू पासून दूर राहणारे सुद्धा याला काय पडलीय लोकांच्या वैयक्तिक भानगडीत नाक खुपसायची असेच मला सूनावायचे. शाळेच्या ग्रुप वर सुद्धा इतर न पिणार्याना दारूच्या उदात्तीकरणावर नाही तर माझ्या विरोधावर आक्षेप होता. अनोळखी लोकांना ढवळा ढवळ आवडत नसेल हे समजू शकतो, पण मित्र आणि ओळखीचे लोकं दारूच्या आहारी जात आहेत हे दिसत असताना त्यांना परावृत्त करायला सल्ला देऊ नये हे जमवणे अवघडच होते.
असो,
त्यामुळे आज त्याच व्यक्तीला दारू पिताना बघून सारेच तुटून पडले होते.
त्या लोकांच्या मते मी डबल स्टँडर्ड वागलो.
तर माझ्या मते मला त्यांचे वागणे डबल स्टँडर्ड वाटत आहे.
माहीत नाही कोण आपल्या जागी बरोबर आहे आणि कोण चूक..
जितकी मित्रांची चिंता वाटते तितकीच समाजाची वाटते. रात्रीचे मुलांसोबत फिरताना जितकी भीती कुत्र्यांची वाटत नाही तितकी झिंगलेल्या लोकांची वाटते. कामांध लोकांइतकेच डेंजरस मद्यांध लोकं वाटतात. कारण त्यांनी आपली सारासार विचारशक्ती आणि मेंदूवरचा कंट्रोल गमावला असतो. मुलांना नेहमी सांगतो की रात्रीचे रस्ता मोकळा आहे समजून बिनधास्त रस्त्याकडेने चालू नका, त्याच वेळी धोका जास्त असतो. कोण कसा दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि तो कुठल्या वळणावर भेटेल याची खात्री नसते.
चल छोड उसको पियेला है, कल बात करते है.. असे वाक्य आपण सर्रास ऐकतो. म्हणजे माणसे सारी चांगलीच असतात. पण मद्याच्या अंमलाखाली चांगलीच वागतील बोलतील याची खात्री नसते.
दारूच्या उपस्थितीशिवाय मित्रांचे गेटटूगेदर, पार्ट्या, पिकनिक आणि त्यातून आनंद मिळवणे खरेच इतके अवघड आहे का... की आपणच आपल्या मेंदूला तसे ट्रेन केले आहे.
लिहावे तितके कमी. पण हे सारे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जे वारेमाप पितात त्यांना सुद्धा कुठेतरी कळत असतेच. फक्त आरसा दाखवलेला कोणालाच आवडत नसावे.
कदाचित माझीच पद्धत काहीतरी चुकत असेल. ती बदलायची गरज असेल. कदाचित माझ्या सल्यातून कळकळ न जाणवता ते उपदेशाचे डोस वाटत असतील जे कोणालाच आवडत नाहीत. शेवटी आपला इगो महत्त्वाचा नसतो तर महत्त्वाचा असतो एंड रिझल्ट, म्हणजेच आपले प्रियजन या व्यसनापासून शक्य तितके दूर राहणे..
त्यामुळे आज मैत्रीदिनादिवशी तरी सर्वांच्या माय लाईफ माय चॉईसचा आदर करत सर्वानाच चिअर्स करायचे ठरवले आहे.. तसेही आज योगायोगाने मैत्रीदिवस आणि गटारी एकाच दिवशी आली आहे.. चिअर्स!!
(तांत्रिक कारणामुळे फोटो इथे शेअर करायला अडचण येत आहे)
थँक्यू ऋन्मेऽऽष
थँक्यू ऋन्मेऽऽष
(No subject)
काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, logout झाले की दरवेळी हा मेसेज येतो.
मला देखील आला. मी पासवर्ड
मला देखील आला. मी पासवर्ड बदलला आणि लॉगिन केले. >> मी दोनदा
करेक्ट असेच होत आहे.
करेक्ट असेच होत आहे.
मी फोटो अपलोड आयडी तिथून उघडतो. मला वाटले प्रशासनाला त्यावर काही हरकत असेल म्हणून बॅन केले...
चेक करतो उद्या पासवर्ड बदलून.. धन्यवाद
आज विनोद कांबळीचा दारू पिऊन
आज विनोद कांबळीचा दारू पिऊन लडखडतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे... आपल्या कर्माने त्याने वाट लावली. पण बघून फार वाईट वाटले.
https://www.freepressjournal.in/sports/shocking-video-drunk-vinod-kambli...
माझा पण IP ब्लॉक झाला होता.
माझा पण IP ब्लॉक झाला होता. पासवर्ड रिसेट केला. आता बघू काय होतंय. विराट झमेला. टेक्निकल लोचा.
नवीन पासवर्ड ईमेलवर पाठवलं
नवीन पासवर्ड ईमेलवर पाठवलं आहे म्हणतात.
मी इमेलच विसरलो आहे.
नवीन प्रोफाईल बनवावे लागेल आता फोटो अपलोड करायला..
बाकी धागा काय आणि आपण बोलतोय काय...
बाकी धागा काय आणि आपण बोलतोय
बाकी धागा काय आणि आपण बोलतोय काय...

>>
माय लाईफ माय चॉईस
पेरावे तसे उगवते..
पेरावे तसे उगवते..
लोक हो आंधळा झालोय
लोक हो आंधळा झालोय
विकेंडला डोळे येतील..
तेव्हा प्रतिसादतो
ह्या धाग्यावर काहीही चूक ना
ह्या धाग्यावर काहीही चूक ना करता प्रतिसाद, आणित्या दुसऱ्या धाग्यावर voice टायपिंग केलं म्हणे
माझ्या स्टेटसवरचा फोटो बघून
माझ्या स्टेटसवरचा फोटो बघून एका नात्यातल्या व्यक्तीचा मेसेज आला. तू दारू पितोस ते ठिक आहे. आम्हीही पितो कधीतरी. पण त्याची अशी जाहिरात करू नये. अजून चार लोकांना उद्युक्त करू नये.>>>सहमत!
त्या लोकांच्या मते मी डबल स्टँडर्ड वागलो.>ते बरोबर तर बोलत आहेत.
एक मात्र लक्षात आले नाही, सर, तुम्ही प्यालात कि नाही. पोस्ट वरून असे दिसतंय कि नाही प्यालात. फक्त नाटक.
ऋन्मेष लेख खरा असेल तर पिऊ
ऋन्मेष लेख खरा असेल तर पिऊ नकोस हेच सांगेन. अर्थात माझं वैयक्तिक मत. मी या विषयावर कधी लिहीत नाही. सांगावसे वाटलं म्हणून लिहिलं.
वर उपाशी बोका यांनी टाकलेला रेड कलरमधला मेसेज मला मोबाईलवर येतोय, तिथे आणि पीसी दोन्हीवर मी log in असते, अचानक मोबाईलवर आपोआप log out झाले, मी नव्हतं केलं. नंतर परत log in करताना हा मेसेज आला. मी कुठे लिहू विचार करत होते. हे मागच्या आठवड्यात झालं. मी पीसीवर log in आहे, तिथे नीट आहे. मला पोस्टस टाकता येतायेत म्हणून मी तिथूनच येते आता मायबोलीवर.
इनकोग्निटो ब्राऊजर मोड मध्ये
इनकोग्निटो ब्राऊजर मोड मध्ये येणार नाही शक्यतो.
मला ही 4 दिवसांपूर्वी येत होती, आता येत नाहीये.
पी सी वरून चुकून log out
पी सी वरून चुकून log out झाले तर बहुतेक पासवर्ड बदलावा लागेल.
भ्रमर,
भ्रमर,
जेव्हा आजूबाजूला कोणी नसते तेव्हा मी व्हॉईस टायपिंग च करतो. नंतर काही चुकलेले शब्द सुधारावे लागतात. कधी आळस आला तर न सुधारता करतो पोस्ट...
ऋन्मेष लेख खरा असेल तर पिऊ
ऋन्मेष लेख खरा असेल तर पिऊ नकोस हेच सांगेन.
>>>
धन्यवाद अंजू.. आणि नोटेड!
केशव कूल
लेखात काय किती खरे ते लिहितो जमल्यास उद्या परवा.. विकेंड बीजी आहे
एव्हढ्या दिवसांमधे ग्लास सोडा
एव्हढ्या दिवसांमधे ग्लास सोडा बाटलीही संपली असेल. आता रिकाम्या बाटलीचे फोटो टाक
मला पूनम पांडेचा स्टंट आठवतोय
मला पूनम पांडेचा स्टंट आठवतोय .
अनया पांडे नाव आहे तिचे. चंकी
अनया पांडे नाव आहे तिचे. चंकी पांडेची मुलगी..
ओह सॉरी आता गूगल केले. ओके अनिरुद्ध. तुम्ही बरोबर आहात. दोन्ही वेगळ्या आहेत. मला पेज थ्री न्यूज आणि गॉसिपमध्ये जास्त इंटरेस्ट नाही त्यामुळे होते असे
आता रिकाम्या बाटलीचे फोटो टाक
आता रिकाम्या बाटलीचे फोटो टाक
>>>
असामी फोटोच तर टाकायचे वांधे केलेत मायबोलीने..
तरी फेसबूक वर पिकनिक फोटो टाकले त्यात तो फोटो सुद्धा टाकला आहे. सेटिंग सुद्धा पब्लिक आहे. अगदीच कोणाला विश्वास बसत नसल्यास हुडकून बघू शकता.
आज कित्येकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा तोच फोटो शेअर करून चिअर्स करत दिल्या. लोकांना चिअर्स करायला दारूच का लागते समजत नाही... कधीच समजले नाही. नवीन धाग्यात घेतो हा विषय. इथे फार झालेत आधीच.
माझा आयपी पुन्हा ब्लोच्क
माझा आयपी पुन्हा ब्लॉक झालाय.
आता user name च्या ऐवजी इ-मैल वापरून लॉग इन केले आहे. तर ठीक झाले.
आता admin ना कळवायला हवं
आता admin ना कळवायला हवं बहुतेक. सगळ्यांना हा prblm येतोय.
Admin चौकशी धागा कोणीतरी
Admin चौकशी धागा कोणीतरी शोधून वर काढा
मला सापडला नव्हता त्या दिवशी..
अजून बरेच जण असतील आपल्या बोटीत
अजून बरेच जण असतील आपल्या
अजून बरेच जण असतील आपल्या बोटीत>> हो. मला पण पासवर्ड बदलायला लागला.
अरे प्रॉब्लेम सुटला वाटते..
अरे प्रॉब्लेम सुटला वाटते..
आज लॉगिन झाले हे अकाउंट...
लोकहो चेक करा..
हो सर. प्रॉब्लेम सुटला वाटतोय
हो सर. प्रॉब्लेम सुटला वाटतोय.
मी पण नेहमी प्रमाणे लॉग इन केले.
मला पेज थ्री न्यूज आणि
मला पेज थ्री न्यूज आणि गॉसिपमध्ये जास्त इंटरेस्ट नाही त्यामुळे होते असे >>> किती निखळ विनोद, खूप दिवसांनी इतकी हसले
पूनम पांडे वाली स्ट्रॅटेजीच आहे ही
aashu
aashu
मला सिरिअसली इंटरेस्ट नाही.
माझे बॉलीवूड जग शाहरूख पलीकडे संपते. इतरांच्या बातमीवर मी कधी क्लिक करत नाही. इतका वेळ नाहीये माझ्या आयुष्यात..
पुन्हा तोच इश्यू सुरू झाला..
पुन्हा तोच इश्यू सुरू झाला.. नेमके नवीन धागा काढतेवेळी..
Pages