मराठी गझलकार आणि शायरांना त्यांच्या गझल सादर करण्याचे सप्रेम आमंत्रण.

Submitted by कपीला on 29 July, 2024 - 20:16
ठिकाण/पत्ता: 
ब्लू बेल , पेनसिल्वानिया , १९४२२, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (नक्की येणाऱ्यांना पत्ता आणि मार्ग , तसेच अधिक संदर्भ पाठविला जाईल )

मराठी गझलकार आणि शायरांना त्यांच्या गझल सादर करण्याचे सप्रेम आमंत्रण.
कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण : गझलकार पुलस्ती चौधरी
तारीख : २६ एप्रिल , २०२५
वेळ : ७ ते ९ संध्याकाळी
भोजन: ६ ते ७ संध्याकाळी
स्थळ : ब्लू बेल , पेनसिल्वानिया , १९४२२, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

तुम्हाला यायला आवडेल आणि जमेल का? कृपया उत्तर पाठवणे : choudhary.poorva@gmail.com

माहितीचा स्रोत: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2025 - 18:00 to 20:00
Group content visibility: 
Use group defaults

काश, austin मध्ये असा काही कार्यक्रम असता.. मी सर्वात आधी पोहोचलो असतो. कार्यक्रमासाठी शुभेच्छा. क्षणचित्रे प्रकाशित केलीत तर वाचायला नक्कीच आवडेल.

वाह ! शुभेच्छा.

ब्लू बेल , पेनसिल्वानिया , १९४२२, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
विषय संपला. मुडॉफ.

-दिलीप बिरुटे

मै शायर तो नही
मगर ये.......इंविटेशन देखा
और शायरी आ गयी.
तरी पण मुशायऱ्याला येऊ शकणार नाही. क्षमस्व.
काही संभाव्य कारणे.
१)मागल्या साली बर्न स्वित्झर्लंड मधून असेच एक आमंत्रण आले होते. काय करणार त्यांचे मन मोडवेना म्हणून शर्टमोड करून गेलो तर काय बाहेर हॉलवर पाटी होती, "काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे." काय करणार उलट्या विमानाने परत आलो. आता कानाला दगड लावला आहे यायचे जायचे रिक्षा भाडे आगावू मिळाले तरच जायचे. शायर नाही आहे पण उगाचच "व्वा, वाहवा .क्या बात है "असे म्हणायलाही पैसे लागतात. शायर काय एक धुंडो हजार... पण खरा रसिक हजारात एखादाच. असो.
२) मी पेन का काय ते तिथे असतो तर अवश्य आलो असतो. पण मी इथे आणि मुशायरा तिथे.
३) नेमके त्याच दिवशी आमच्या घरी मंगल कार्य योजले आहे. मीच तुम्हाला आमंत्रण/ निमंत्रण देतोय. नक्की केलेत तर डिटेलवार पत्ता देण्यात येईल.
४)तुमच्या पेन सिल्वानिया म्हणजे ट्रान्स सिल्वानिया जवळ आहे का हो. भीति वाटते म्हणून विचारले.
अशी अनेक कारणे आहेत. आठवेल तशी लिहीन.