किती अन् काय काय बोलावं या सामन्यात बद्दल. पूर्ण टूर्नामेंट मध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या विराट कोहलीने अगदी योग्य वेळ साधून केलेले पुनरागमन. त्याची नियोजनपूर्वक, शानदार खेळी. दुसरीकडून मधल्या फळीची मिळालेली भक्कम साथ. ही झाली फलंदाजीची गोष्ट.
मग दुसऱ्या डावात बुमराह - अर्शदीपचे सुरुवातीचे बळी झटपट घेउन विजयाच्या आशा वाढवणं. त्यानंतर निर्माण झालेला थरार. जमलेली वेगवान आणि चिवट भागीदारी. विकेट्सची दीर्घ प्रतिक्षा. पुन्हा थोड्या अंतराने दोन विकेट्स घेऊन विजय टप्प्यात आणणं. मग क्लासेनने एकामागून एक षटकार, चौकार लगावून एका षटकात चोवीस धावा केल्यानंतर वाढलेली धाकधूक ; पण मग बुमराह, अर्शदीप आणि पांड्या ची अत्यंत सावधगिरीने, मोठ्या धैर्याने केलेली सुरेख गोलंदाजी. सुर्याने अत्यंत चपळाईने, आणि काळजीपूर्वक घेतलेला, सामना क्षणात फिरविणारा झेल. या सगळ्या सोबत रोहित शर्माचे संयत, आश्वासक आणि भक्कम नेतृत्व. आणि शेवटी या अत्यंत रोमांचक आणि रंगतदार सामन्यात झालेला अभूतपूर्व असा विजय.
मी माझ्या कळत्या वयात पाहिलेला विश्वचषकातील पहिला विजय. २००७ साली क्रिकेट बद्दल माहितही झालेलं नव्हतं. २०११ सालीच्या वन डे वर्ल्डकप विजय पाहिला, त्याचा आनंदही घेतला ; पण विश्वचषकाचे खरं महत्व समजण्याचं बहुतेक ते वय नव्हते.
वेळेचं गणित केलं, तर या लेखाला कदाचित जरा उशीर झालाय खरा ; पण या बहुप्रतिक्षित विजयाची नशा इंडियन क्रिकेट फॅन्सच्या मनांवर बराच काळ राहणार आहे. हा आनंद आपापल्या पद्धतीने व्यक्त करायला वेळेचं बंधन नसावं. बरोबर ना ?
इतका अनमोल, अद्भूत विजय मिळवल्याबद्दल संघाचे खूप अभिनंदन. आणि शतशः आभार.
© प्रथमेश काटे
अगदी खरे आहे..
अगदी खरे आहे..
आयुष्यभर पुरणार हा अनुभव...
मलाही बरेच लिहायचे आहे..
बघूया वेळ कधी मिळतो..
एक सूचना कम विनंती
एक सूचना कम विनंती
धाग्यात शर्मा सोबत पूर्ण संघाचा फोटो असू द्या..
जी गोष्ट शर्माला स्पेशल बनवते तीच हिरावून घेऊ नका..
@ऋन्मेष - थॅन्क्स.
@ऋन्मेष - थॅन्क्स