२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

.

मी अमरावती म्युनिसिपाल्टीमध्ये उंदीर पकडण्याचे काम करतो.

(सगळ्यांनी अशी या धाग्यावर लिहिण्यासाठी आपापली पात्रता सांगा बघु.)

ग्लोबलायझेशन च्या या युगात अमेरिकेतील ( किंवा कॅनडा, इंग्लड मधील) निवडणूक निकालाचे बरे वाईट परिणाम भारतीयांना भोगावे लागत असतीलच. त्यामुळे केवळ अमेरिकन नागरिकांनीच चर्चा करावी हा आग्रह चुकिचा आहे. शिवाय तो माझ्यामते तरी मायबोलीच्या स्पिरिट च्या सुद्धा विरुद्ध आहे. ( या धाग्यावर पोस्ट करणार्‍या सर्वांनी आपापला एस एस एन व अमेरिकन पासपोर्ट नंबर लिहावा का? ")

<<<(सगळ्यांनी अशी या धाग्यावर लिहिण्यासाठी आपापली पात्रता सांगा बघु.)>>>
अहो तुम्ही मायबोलीवर फक्त गेली दहा वर्षे आहात. इथे मायबोली सुरु झाल्यापा॑सूनचे लोक आहेत. मायबोलीत लिहायला पात्रता लागत नाही हे इथल्या सर्वांना माहित आहे. पात्रता बघून लिहायचे ठरवले तर त्यात काही गंमत नाही. मग कशाला पाहिजे मायबोली?
माझा अनुभव असा आहे की जगभरातील मराठी लिहिणार्‍या लोकांची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून मायबोली चालू केली. मतभेद होत असतातच. सगळे खेळीमेळीचे वातावरण होते, भारतात रहाणार्‍यांची संख्या मायबोलीवर वाढली नि वैयक्तिक शिव्यागाळी सुरु झाली असे माझे मत आहे.
स्वतः मला अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यापासून इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया इ ठिकाणच्या कित्येक मित्र मैत्रिणींना भेटायचे भाग्य केवळ मायबोली मुळे लाभले आहे.

मानव Lol

<नॉन अमेरिकन लोक अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात इतका इंटरेस्ट घेतात, हे बघून गंमत वाटली.>
या गंमत वाटण्याची गंमत वाटली. तसंच अशी गंमत वाटताना तुम्ही आरशात पहात होता का हा उपप्रश्न. अमेरिकन निवडणूक , निकाल यांबद्दल फक्त बातमीच नव्हे, तर विश्लेषणात्मक काही ना काही गेले दहा दिवस इंडियन एक्प्रेसमध्ये येते आहे. लोकसत्तेने अग्रलेख लिहिला. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने ट्रंपजी आल्याने भारताला कसा लाभ होईल हे सांगणारा लेख लिहिला. त्यात ट्रेड बॅरियर्सबद्दल शेवटी चार ओळी लिहिल्या.

<<<(सगळ्यांनी अशी या धाग्यावर लिहिण्यासाठी आपापली पात्रता सांगा बघु.)>>>
अहो तुम्ही मायबोलीवर फक्त गेली दहा वर्षे आहात. इथे मायबोली सुरु झाल्यापा॑सूनचे लोक आहेत. मायबोलीत लिहायला पात्रता लागत नाही हे इथल्या सर्वांना माहित आहे. <<<

मायबोलीवर फार वर्ष झाली की Sarcasm समजेनासा होतो की काय ?

अमारा गौतम भाई सूं कहे छे?
https://x.com/gautam_adani/status/1854145439492157665

या सगळ्या विशेषणांनी युक्त एकच पुरुष पृथ्वीतलावर आहे आणि तो म्हणजे ट्रंपजी. आमच्या आदर्णीय मोदीजींनी कुणाच्या तोंडाकडे बघावं आता?

https://x.com/gautam_adani/status/1856679498311184665

इथले लोक नाही का तिकडे भारतातील राजकारणावर भरभरून लिहीत!

विवेक आणि इलॉन "डोज" लीड करणार आणि नोकरशाही कमी करणार ऐकल्यावर मला "ऑफिस स्पेस" मधले ते दोन "बॉब" आठवले.
https://www.youtube.com/watch?v=af8DVIZ5LX4

किंवा यस मिनिस्टर चे एक दोन एपिसोड्स.

विवेक व मस्क दोघांच्याही मुलाखती पाहिल्या याबद्दल. अजून सुरूवातच आहे त्यामुळे इतक्यात काही डिटेल्स येणार नाहीत. दोघांपैकी मस्कचे बोलणे जास्त प्रॅक्टिकल वाटले. दोघेही काही न पटण्यासारखे बोलले नाहीत. पण हे नक्की कसे करणार ते क्लिअर होत जाईल तसा हे किती त्याबद्दल सिरीयस आहेत आणि त्याहीपेक्षा नोकरशाहीचे नियम ई बद्दल यांना किती सखोल जाता येते याचा अंदाज येईल. नाहीतर ऑप्टिक्स पुरते २-४ प्रोजेक्ट्स रद्द करून श्रेय घेतील, आणि बाकीचे तसेच चालू राहील.

जुलै २०२६ पर्यंत हे डिपार्टमेण्ट असणार आहे. तितकीच मुदत आहे. असे जाहीर करण्याचा उद्देश चांगला आहे. ट्र्म्पचा सपोर्ट असेल तर सुरूवातीला दणादण कटिंग करणे अवघड नाही. पण त्यातून चांगले प्रोजेक्ट्स रद्द होणे व लोकांचे नुकसान होणे हे न होऊ देता ते करणे सोपे नाही. ४५०+ पेक्षा जास्त फेडरल डिपार्टमेन्ट्स आहेत म्हणे!

नुसते एक नवीन डिपार्टमेन्ट उभे करायचे तर सध्याच्या प्रोसेस मधे त्याकरता ५-१० स्टेप्स असतील . त्या डावलून ते उभे करणे व त्याला अधिकृत अधिकार असणे हे करायला प्रेसिडेण्टला घटनात्मक अधिकार असतो का हे पाहणे, नसेल तर ज्यांना तो असतो त्यांना यात सामील करणे व त्यांच्यातर्फे हे अमलात आणणे असे करावे लागेल. तसा अधिकार नसताना केले ते सगळे कोर्टात जाउन अडकेल. तेथे ट्रम्पने नेमलेले अनेक जजेस असले तरी सगळे त्याला बांधील नाहीत हे अनेकदा दिसलेले आहे. नाहीतर इतर डिपार्टमेण्ट्समधे हस्तक्षेप करून त्यांच्या प्रमुखांना काही नियम घ्यायला लावणे हे करावे लागेल. मग बायडेन जे करतो म्हणून इतकी वर्षे हे लोक टीका करत होते तेच यांनाही करावे लागेल.

नोकरशाहीचे नियम व त्यांचे वागणे कोळून प्यायलेला माणूस हे करू शकतो. बाहेरून आणलेला माणूस दणादण काहीतरी बदल करण्याच्या नादात केऑस निर्माण करण्याची शक्यता जास्त असते, किंवा नोकरशाहीने त्यालाच गिळंकृत करण्याची सुद्धा. किंवा थोडेफार काहीतरी करून त्याचा गाजावाजा करून स्वतःला श्रेय घेउन हे लोक "मूव्ह ऑन" करतील व बाकीचे सगळे आहे तसेच राहील असेही होते. हे सरकारी नोकरशाहीबद्दलच नाही तर जेथे मोठ्या संख्येने लोक एकत्र काम करतात अशा कोणत्याही खाजगी कंपनीतही लागू होते.

थोडेफार काहीतरी करून त्याचा गाजावाजा करून स्वतःला श्रेय घेउन हे लोक "मूव्ह ऑन" करतील >> ह्यापेक्षा बाकी काहीही होणार नाही ह्याची खात्री आहे. ट्वीटर विकत घेऊन मॅनेज करताना किती बोर्‍या वाजला मस्कचा ते बघून इतरांना उपदेश करणे सोपे असते हे लक्षात येते. विवेक ला बोलणे नि करणे ह्यातला फरक कळेलच.

बर ते नासाकडचे मस्कचे काँट्रॅक्ट पण ह्यात असेल का रीव्ह्यूसाठी ? Wink

त्रम्प्या नि त्याचे लोक यांच्या मते घटनेचा पुनर्विचार करायला पाहिजे. ACLU घटनेचा फायदा घेऊन बरेच काही काही करतात, ते सर्व बेकायदेशीर नागरिकांना हुसकाऊन लावण्याच्या मार्गात अडथळे आणतात. घटनेत सरकारी नोकरांना बरेच कक्क आहेत, ते काढून सरकार सुद्धा खाजगी धंद्याप्रमाणे चालवावे असे त्रम्प्याच्या लोकांचे मत आहे. थोडक्यात आता त्रंप्या म्हणेल ती पूर्वदिशा!

<<<बर ते नासाकडचे मस्कचे काँट्रॅक्ट पण ह्यात असेल का रीव्ह्यूसाठी ?>>>
नाही नाही. उलट नासा चे बजेट कमी करून मस्कला जास्तीचे काँट्रॅक्ट्स देणार.

डेमोक्रॅट्स ना सर्व काही फेडरल सरकारने करावे असे वाटते, रिपब्लिकनांचा जोर खाजगी मधे.
अबॉर्शन म्हंटले की माय बॉडी माय चॉइस, पण वॅक्सिन मात्र मँडेट! असे असते डेमोक्रॅट्स चे.

दोन मधे फरक आहे.

अबॉर्शन च्या निर्णयामुळे होणारा परिणाम हा त्या व्यक्ती आणि कुटुंबा पुरताच मर्यादित रहातो.

असंसर्गजन्य आजार असेल ( हात मोडला, बायपास करायचे आहे, शुगर जास्त आहे, BP कमी आहे) तर त्याचे परिणाम त्या व्यक्ती पर्यंतच मर्यादित रहातात. आजारावर काय उपाय करायचे ( किंवा नाही करायचे) याचे स्वातंत्र त्या व्यक्तीला आहेच.

संसर्गजन्य आजार/ रोग असेल तो एका पासून चार लोकांना आणि पुढे १६ लोकांना होण्याची शक्यता असते. त्याला नियंत्रणांत आणायचे असेल तर रोग पसरण्याची साखळी तोडणे महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीमधे रोगाची लक्षणे दिसणार नाहीत पण रोग पसरण्यास (asymptomatic disease transmission ) व्यक्ती मदत करु शकतो. येथे वॅक्सिनची जरुर मदत होते.

व्हॅक्सिन मुळेच पोलिओ, स्मॉल पॉक्स सारखे रोग नियंत्रणांत आलेले आहेत. व्हॅक्सिन घेणे अनिवार्य असायला हवे/ नको हा वादाचा मुद्दा आहे. जबरदस्ती नकोच.

'माय बॉडी माय चॉईस' हे केवळ अ‍ॅबॉर्शनपुरतेच मर्यादित आहे का? मला तरी वाटते ते तसे नाही, नव्हते. स्रीचे आरोग्य हे तिच्या एकंदरीतच जननसंस्थेच्या आरोग्याशी मोठ्या प्रमाणात जोडलेले आहे. त्यात दर वेळी येणारे गर्भारपण हे तिच्या जिवावर बेतायची शक्यता काही प्रमाणात असतेच. फक्त गर्भारपणाचा अमेरिकन कायद्याच्या दृष्टेने विचार करायचा तर केवळ स्री गर्भार आहे म्हणून कामाच्या ठिकाणी अन्यायकारक वागणूक मिळत होती/मिळते. त्यावर उपाय म्हणून - प्रेग्नंसी डिस्क्रिमिनेशन आणि प्रेग्नंसी रिलेटेड डिसॅबिलेटी डिस्क्रिमिनेशन यासाठी कायदेच करावे लागले.
Title VII of the Civil Rights Act of 1964,
Pregnant Workers Fairness Act,
Americans with Disabilities Act
आजही अमेरीकेत स्त्रीला पेड मॅटर्निटी लिव मिळत नाही. थोडक्यात जन्माला न आलेला गर्भ म्हणजे पर्सन म्हणताना त्या बाळाला आणि त्याच्या आईला गर्भार काळात आणि नंतरच्या रिकव्हरीच्या काळात चांगली वागणूक देण्याची डिसेंन्सी नाही. त्यासाठी पुन्हा आईने झगडा करायचा.
गर्भार राहू नये म्हणून गर्भनिरोधक मिळवायचे तर फार्मसीतली व्यक्ती 'माझे धार्मिक स्वातंत्र्य ' म्हणत डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन भरायला नकार देतात. काही ठिकाणी चक्क १०० मैल प्रवास करावा लागतो. स्त्रीला फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करुन घेतानाही अमेरीकेत बर्‍याच अडचणी येतात. दोन मुले झाल्यावरही बरेचदा वय लहान आहे च्या नावाखाली ऑपरेशनसाठी नकार दिला जातो. लग्न झाले असेल तर नवर्‍याची परवानगी, त्याच्याशी बोलायचे आहे म्हणून आग्रह धरला जातो, आणि नकार मिळतो. असेच लग्न झालेले नाही म्हणूनही प्रोसिजरसाठी नकार दिला जातो. कागदोपत्री कसलीही अट नसताना हे घडते कारण डॉक्टरची मर्जी , त्याचे स्वत:चे विचार. याबद्दल काही करता येत नाही. कारण आयुष्य धोक्यात नाही तेव्हा डॉक्टर सर्विस देणे नाकारु शकतात. या सगळ्या अडथळ्याच्या परीस्थितीतून गर्भधारणा होवू नये काळजी घ्यायची आणि चुकून प्लॅनिंग फसलेच तर अ‍ॅबॉर्शनचा मार्ग ही बंद. त्याशिवाय बाळ हवे आहे पण जन्मानंतर फार काळ जगूच शकणार नाही , रेपमधून राहीलेला गर्भ वगैरे केसेस आहेत त्या वेगळ्याच.

मी माझ्या स्वतःच्या आयुष्यापुरती प्रो लाईफ आहे मात्र दुसर्‍या स्त्रीच्या गर्भारपणाचा जो काही निर्णय आहे त्याचा अधिकार त्या स्त्रीलाच असावा असे माझे ठाम मत आहे.

सध्या स्त्रीयांना, मुलींना उद्देशुन 'युवर बॉडी माय चॉईस' म्हणणे, तसे मेसेज पाठवणे वगैरे सुरु झाले आहे. त्याबद्दल काय वाटते?

ट्रंप च्या अनपेक्षित विजयाची (जो मला अनपेक्षित नव्हता) जी अनेक कारणे आहेत त्यातले वोकिझम चा अतिरेक हे एक आहे.

ज्या मायग्रंट ने एका मुलीची हत्या केली त्याचा उल्लेख बायडेन यांनी इल्लिगल असा केला आणी एकच गदरोळ उठला. नंतर त्यांना सारवासारव करावी लागली.

जेंडर आयडिऑलोजी जनतेच्या छातीवर बसून त्यांच्या घशात कोंबण्याचा प्रयत्न हाही त्यातलाच एक प्रकार. मुलांनी मुलींच्या स्पोर्ट्स मध्ये भाग घेऊ नये, त्यांना मुलींच्या बाथरूम्स मध्ये प्रवेश असू नये ही तर अगदी कॉमन सेन्स भूमिका. हेही बोलणे पाप समजले गेले. (तरी नशीब, ट्रम्प जिंकला, तिकडे इंग्लंड मध्ये स्टार्मर च्या राज्यात असे बोलले तर तुरुंगवास होतो) शेजारच्या जोडप्याची दहा वर्षाची मुलगी शाळेत आहे, तिथे एखाद्या मुलाने 'मी मुलगी आहे' असे जाहीर केले तर लगेच त्याला जिकडे तिकडे मुक्त प्रवेश हे त्यांनाही रुचले नाही व त्यंनी ट्रम्प ला मत दिले. असे सायलेंट ट्रंप समर्थक बरेच होते. आता एका डेम काँग्रेस मन ला उपरती झाली व त्याने नाराजीचा सूर लावला, तर त्याच्या कँपेन मॅनेजर ने राजिनामा दिला व त्याला बहुदा डेम पक्ष वाळीत टाकेल.

सयंघोषित लिबरल्स ना आपल्याएवढे हुष्षार कोणीही नाही अस दर्प असतो व गिरे तो भी टांग ऊपर असे असते त्यांचे.
उदा जॉन ऑलिव्हर
https://x.com/WillKingston/status/1857732562908500247

शो नाही पण क्लिप्स पाहिल्या. बिल मारचाही अंदाज चुकलाच, त्याने ट्रम्प पॉप्युलर व्होट जिंकणार नाही असे छातीठोक पणे सांगितले होते. पण निदान आपले चुकले कोठे याचा विचार करण्याचा समंजस पणा आहे त्याच्याकडे.

पण मस्कला ठेंगा दाखवला का ट्रम्पने?
डोज ही एक गैर सरकारी संस्था असणार आहे असे वाचले. म्हणजे त्याचे काम फक्त रेकमंडेशन देणे. त्यांच्या निर्णयाना गंभीरपणे घ्यायचे का केराची टोपली दाखवायची हे ट्रम्प कडे आहे. मस्कच्या ट्विटवरून त्याची काही वेगळी समजूत होती असे वाटते.

पण काही चुकीच्या गोष्टी आतापासून जाणवत आहेत. ट्रम्प आणि झेलेंसकीच्या कॉल मध्ये मस्क असण्याचे काय काम?

आणखी एक गंमत. अर्जेंटिनाच्या मिलेईने इम्पोर्ट टॅक्सेस कमी केले तर मस्क त्याचे कौतुक करत होता. इथे ट्रम्प तेच वाढवण्याच्या धोरणावर निवडून आला आहे.

हे पटलं.
Richard Dawkins
@RichardDawkins
·
Nov 7
Others have been elected in spite of being obnoxious. It’s quite a feat to get elected BECAUSE you’re obnoxious.

But there’s another, better reason. Voters fed up with being told they must be racist just because they’re white. And patronised if they deny women can have penises.

Richard Dawkins
@RichardDawkins
·
Nov 8
To offer an explanation for why he was elected is not tantamount to approval.
Trump is a self-obsessed, vindictive, lying, incompetent, ignorant criminal, a catastrophe for the entire world.
I was offering sympathetic understanding of why some voted for him: condescending wokeism

डॉकिन्स यांचे अगदी बरोबर आहे. आडगावच्या कम्यूनिटी कॉलेज मधून जेंडर स्टडीज ची डिग्री घेतलेली वोक मुलेमुली 'डॉकिन्स ना काय कळतय ?' असे म्हणतात तेव्हा हसूही येत नाही.

https://www.bbc.com/news/articles/c789x0y91vvo
Biden allows Ukraine to strike inside Russia with missiles

हा बायडेन मनुष्य धन्य आहे. जाता जाता तरुण पीढीला, तीसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटण्याची तरतूद करुन जातोय. स्वतः फार जगणार नसल्याने, अन्य कोणाला जगू देणार नाही.

आग विझवायची म्हणजे नक्की काय करणे अपेक्षित आहे ? युक्रेनचा तुकडा तोडून द्यावा रशियाला तात्या म्हणतो तसे कि युक्रेन ला वार्‍यावर सोडून द्यावे ? अमेरिकन सैनिक उतरत नाहियेत मैदानामधे. युक्रेन ने वॉर कसे लढावे म्हणजे त्यांच्या सर्वभौमत्वाला धक्का लागणार नाही असे तुला वाटते ? रशिया च्या बाजूने नॉर्थ कोरियाचे सैनिक येऊनही लढत आहेत ह्याची कल्पना आहे का ?

होय नॉर्थ कोरियाचे सैनिक लढायला आलेत हे ऐकले (वाचले) पण लाँग रेंज मिसाईल्स युक्रेनला देउन, बाजू घेतलीच कशाला? मध्यस्ती करा, काय नेतृत्व राहीलय अमेरीकेचे? नाही तर गप्प बसा जर मध्यस्तीत कोणी ऐकत नसेल तर.
तात्या म्हणतो मला वॉर संपविण्यात इन्टरेस्ट आहे. कोण जिंकले-हरले यात नाही. बाकी त्याची मते माहीत नाहीत.

>>>>> कि युक्रेन ला वार्‍यावर सोडून द्यावे ?
कोणालाही वार्‍यावर न सोडण्याचा मक्ता घेतलाय का अमेरिकेने? आपल्याच पैशाचह धूर होतोय ना.

>>>>>सामो आता काश्मीर पण पाकला देऊन टाका असेल म्हणेल.
हा भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यात अमेरिका पडली तर कसे वाटेल?

बेगानी शादीमे अब्दुल्ला नाचलेला नकोय. कोण्या टॉमडिकहॅरीच्या लढाईत अमेरिकन टॅक्स पेयर्स च्या पैशाचा धूर नको.

बेगानी शादीमे अब्दुल्ला नाचलेला नकोय. कोण्या टॉमडिकहॅरीच्या लढाईत अमेरिकन टॅक्स पेयर्स च्या पैशाचा धूर नको. >> एव्हढे सरळसोट आहे का सामो ? समजा युक्रेनच्या "भानगडी" मधे नाही पडले तर उद्या चायना जेंव्हा तैवानवर अ‍ॅटॅक करेल तेंव्हा काय बोलता येईल ? तैवान चे मह्त्व अमेरिकेच्या दृष्टीने माहित असेल अशी अपेक्षा आहे. जागतिक इकॉनॉमी मधे एकमेकांची तंगडी एकमेकांच्या गळ्यात अडकली असताना अब्दुल्लाला नाचण्यावाचून पर्याय उरत नाही.

मध्यस्ती करा, काय नेतृत्व राहीलय अमेरीकेचे? >> नक्की काय करणे अपेक्षित आहे हे अजूनही कळलेले नाही. कदाचित मिसाईल्स ची धमकी दिल्यामूळे रशियाला वाटाघाटींसाठी तयार करणे असे असू शकेल. (आहे कि नाही मला माहित नाही कारण आम्ही डीम्विटमधे येतो. इथल्या ज्ञानदिपांना कल्पना असेल कदाचित Wink )

Pages