२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अजून पहिला निकाल यायला सुद्धा एक दोन तास आहेत. तेवढ्यात लिहून घेतो. आज ट्रम्प जिंकला तर त्याचे सगळे दोष जमेस धरून सुद्धा एक बिगेस्ट कमबॅक म्हणून त्याला मानावे लागेल. कमला जिंकली तर केवळ दोन-तीन महिन्यात लढलेल्या व पूर्ण गाळात गेलेल्या स्थितीतून डेम्सना वर आणणार्‍या तिच्या कॅम्पेनमुळे तिला.

एखाद्या मोठ्या फॅमिलीत किंवा ग्रूप मधे सर्वांच्या चर्चेनंतर तेथील ३-४ डॉमिनंट लोक काय ते निर्णय घेतात तसे सर्व राज्यांनी मते दिल्यावर प्रत्यक्षात निर्णय ही ५-७ स्विंग स्टेट्स घेणार आहेत Happy

शेंडेनक्षत्र, राज ट्रम्पबरोबर तुमचेही अभिनंदन!

आता तो ही दुसरी टर्म कशी वापरतो हे बघणे इंटरेस्टींग असेल. उद्या तो कोणाला प्रथम जेलमधे टाकतो त्यावरुन ते कळेल.

खर म्हणजे त्याच्या हातात अमेरिकेच्या चारी ब्रँचेस आल्या आहेत( व्हाइट हाउस, सेनेट, हाउस व सुप्रिम कोर्ट) . त्यामुळे तो राजा/ हुकुमशहा सारखा वागतो की त्याचा उपयोग करुन देशासाठी खरच काही चांगल करतो ते बघणेही इंटरेस्टिंग असेल.

डेमोक्रॅटिक पार्टी एकदम विस्कळित व क्लिअर मेसेज नसलेली वाटली. बायडन व हॅरीस हे दोघेही उमेदवार एकदम पुचाट, डळमळीत व अनपॉप्युलर होते.

दिवाळीचे रोषणाईचे दिवे उतरवावेत की राहू देत काही दिवस? मिठायांची ऑर्डर द्यावी की अजून थोडी वाट पहावी? जाणकारांनी मार्गदर्शन करावे!

मिठाई नेहमी ताजी खावी.
नंतर काही भानगड नको.

ताजी खाल्याने पोट बिघडत नाही.
अंदाज चुकले तर लपवून खावी लागत नाही.
Wink

पण शक्यतो जिलभी टाळा.
त्यात हल्ली फसवणूकीचे प्रकार फार वाढले आहेत म्हणे.
Happy

मेन स्ट्रीम मिडिया मधले बहुतेक सर्व लोक एका बबल मध्ये रहात असावेत.
ट्रंप च्या लोकप्रियतेचा व सहानुभुतीचा अंडरकरंट त्यांच्या लक्षात येऊ नये ?
ज्या न्यूयॉर्क राज्यातील डेम्स नी 'adjudicated rapist' , 'convicted felon' ही लेबले लावण्यासाठी त्याच्यावर तीन तीन खटले भरले तिथे व शेजारी न्यू जर्सीत
New York: D+23 -> D+12
New Jersey: D+16 -> D+4

असो, पुन्हा लिहितो, ट्रंप ला अडकवण्यासाठी जी एनर्जी वाया घातली ती चांगला कारभार करायला वापरली असती तर ...

>>शेंडेनक्षत्र, राज ट्रम्पबरोबर तुमचेही अभिनंदन!<<
अरे, माझं अभिनंदन कशाला, एकवेळ शेंडेनक्षत्र डिझर्व्स इट..

अभिनंदन करायचंच झालं तर तर ते अमेरिकन्सचं करायला हवं. अन्लाइक फ्यु डिम्विट्स, दे पुट इकानमी, नॅशनल सिक्युरिटी ऑन द टॉप प्रायॉरिटी. ए स्ट्राँग मेसेज हॅज बीन सेंट, बाय इलेक्टिंग बोथ हाउसेस्+प्रेसिडेंट फ्रॉम द रिपब्लिकन्स...

कॅलिफोर्नियात रहात असल्यामुळे माझ्या मताचा देखील ट्रंपसाहेबांना काही उपयोग झाला नाही ह्याची नम्र जाणीव आहे. पण तरी ट्रंपला विजय मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे! (अर्थात आता त्याच्यावर अनेक खटले दाखल होतील. मोस्टली पीसफुल दंगे होतील ह्याची भीती आहे)

ओहायो स्प्रिंगफील्डमधील कुत्री आणि मांजरे (जी शिल्लक आहेत ती!) खूप खूष आहेत म्हणे!

अनंतकोटी ब्र्ह्मांडनायकाने आणि अनंतकोटी ब्र्ह्मांडनायिकेने (अर्थात बराक आणि मिशेल) आपल्या भक्तांची कठोर निर्भत्सना करून त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला!
पुढच्या खेपेस निर्भत्सना न करता विनवणी करून, मनधरणी करून मतदार बदलतील का ह्याचा विचार कैलासात (की वैकुंठात) परत गेल्यावर करावा ही विनंती!

गुगल, फेसबुक ह्या बड्या धेंडांनी ट्रंपचा गौरव होईल अशा सर्व स्टोर्या दाबून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पहिल्या भयानक हत्या प्रयत्नानंतर रक्तबंबाळ झालेला, तरी एक हात उंचावून फाईट फाईट म्हणणारा ट्रंपचा अविस्मरणीय फोटो गुगलच्या सर्च इंजिन मधून गायब केला गेला. कित्येक दिवस "Trump assassination" असे शब्द वापरले तरी "त्या" हत्येच्या प्रयत्नाबद्दल कुठलेही उत्तर मिळणार नाही ह्याची खबरदारी घेतली (आणि नंतर सॉरी, सॉरी, कशी चूक झाली बुवा? वगैरे मानभावीपणा केला गेला).
समस्त माध्यमे (फॉक्स वगळता) आणि समस्त बड्या हायटेक कंपन्या (एक्स सोडून) कंबर कसून ट्रंपविरोधी प्रचार करत होत्या.
कुणी हिटलर म्हणा, कुणी मुसोलिनी, कुणी स्टालिन तर कुणी पोळपाट! कंबरेचे सोडून डोक्याला बांधून नाचण्यासारखा आचरट प्रकार चालू होता.
तरी ट्रंप सगळ्याला पुरून उरला असे दिसते आहे.
बिनडोक कमलाचे चेटकीणीसारखे विकट हास्य पुन्हा ऐकू येणार नाही. सुटलो एकदाचा!

Rofl तुम्ही मध्यंतरी हाय खाल्लेली तेव्हा प्रश्न पडलेला आमचं कसं होणार. आता जोमात लिहायला लागलात हे बेस झालं. पोळपाट Rofl वेड लिहिता हो तुम्ही!

>>>>>>>>>>जवळपास अर्ध्या अमेरिकन जनतेला डिमविट म्हणणं योग्य नाही.
हां, गॅर्बेज किंवा डिप्लोरेबल म्हणू शकता Wink

Happy Happy

गर्भातील अर्भकाला हवे तेव्हा ठार मारण्याचे हक्क (अर्थात गर्भपात) हा मुद्दा निवडणुकीसाठी फार महत्त्वाचा नव्हता असे म्हणता येईल.
नाही का?

आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे, ती कुठल्या गुन्ह्याला बळी पडू नये, खेळात भाग घेतला तर एखादा पुरुष स्त्री बनून त्याने तिची चटणी बनवू नये, तिला नोकरी मिळावी, घर घेता यावे असा विचार आईवडील करतील की हे सगळे गेले खड्ड्यात, फक्त ती गर्भवती झाल्यावर तिला आपल्या अर्भकाला, आपल्या नातवाला/नातीला ठार मारण्याचे स्वातंत्र्य असणे जास्त महत्त्वाचे आहे असा विचार केला असेल?

गर्भातील अर्भकाला हवे तेव्हा ठार मारण्याचे हक्क (अर्थात गर्भपात) हा मुद्दा निवडणुकीसाठी फार महत्त्वाचा नव्हता असे म्हणता येईल.
नाही का? >> दहा स्टेटस मधे ह्या मुद्द्यांवर प्रश्न होते नि सात स्टेट्स मधे तत्कालीन मध्ययुगीन लॉज च्या विरुद्ध मत दिले आहे.

ट्रंप आणि व्हान्स हे स्त्रियांचे सगळे अधिकार हिरावून घेणार आहेत (ज्यात अपत्याला ठार मारण्याचा अधिकारही समाविष्ट होतो) असा प्रचार होत होता. तो कुणी मनावर नाही घेतला का?

मातेला गर्भातील अर्भकाला ठार हवे तेव्हा हवे तसे ठार मारता यावे हे काहीसे असुरी नाही वाटत का? किती महिन्यापर्यंत असले पाशवी कृत्य करण्याची परवानगी असावी असे वाटते?
आई आणि बाप दोन्ही असल्याशिवाय गर्भ धरत नाही. पण बापाला कुठलाही हक्क नसावा. फक्त माता आणि तिचा परमेश्वरस्वरूप डॉक्टर यांनाच अर्भकाला ठार मारण्याची पूर्ण मुभा असावी असे का?
तो गर्भ एक मानव होण्याची क्षमता बाळगून असतो. त्या गर्भाला कुठल्याही टप्प्यात कुठलेही मानवाधिकार नाहीत? बेकायदा घुसखोरांच्या सगळ्या अधिकारांबद्दल जागरुक असणारे ह्या गर्भाच्या कुठल्याही हक्काला विचारात का घेत नाहीत?

हे लक्षात घ्या कि गर्भपाताचा हक्क म्हणजे गर्भवती झालेली बाई लगेच गर्भपात करायला धावत सुटणार असे नसून 'हा निर्णय घेण्याचा हक्क तिचा नि फक्त तिचाच आहे' हा असा होतो. गर्भाच्या हक्कांचा विचार करताना गर्भवतींच्या हक्काला विचारात का घेत नाहीत?

पण बापाला कुठलाही हक्क नसावा हे नवे शेपूट आहे. जर हा हक्क असावा हा आग्रह असेल तर त्याबरोबरच त्या अपत्याची जबाबदारी पण कंपलसरी असावी असे पाहिजे.

ट्रम्प, व्हान्स व त्यांच्या इथल्या सर्व चाहत्यांचे अभिनंदन! Happy

इलेक्टोरल कॉलेज, पॉप्युलर वोट, दोन्ही सभागृहे - अगदी निर्विवाद विजय आहे.

I hope this truly ushers in the "golden age of America" as Trump called it - for all Americans!

डेम्सच्या दृष्टीने ही कॅम्पेन पहिल्या डिबेटनंतर व रिपब्लिकन कन्वेन्शन नंतर संपली होती. कमला व वॉल्झ ने ती रिवाइव्ह केली व इतपर्यंत क्लोज लढत दिली हे क्रेडिटेबल आहे. त्यांनी सिरीयसली ड्रॉइंग बोर्ड वर परत जाउन पब्लिकशी त्यांची लिंक कोठे तुटली आहे त्यावर काहीतरी केले पाहिजे.

तो गर्भ एक मानव होण्याची क्षमता बाळगून असतो. त्या गर्भाला कुठल्याही टप्प्यात कुठलेही मानवाधिकार नाहीत? >>>> या वाक्याच्या रचनेवरून कळते की तुम्हाला चांगले माहित आहे गर्भ आणि बालक यातला फरक. उगीच ट्रोलिंग करण्यासाठी "बाळाला ठार मरणे" वगैरे शब्दप्रयोग इथे करायची काहीच गरज नाही.

तो गर्भ एक मानव होण्याची क्षमता बाळगून असतो. >>> मग तो पेशींचा समूह " मानव" या स्टेज ला केव्हा येतो हेही वाचून घ्या आता. तुम्हाला आपोआप उत्तर मिळेल.

Pages