‘भाष्कोर बॅनर्जी'(पिकू) आणि ‘भास्कर पोडूवल'( अँड्रोईड कुन्यप्पन 5.25)

Submitted by ब्लू कोलंबसे on 20 May, 2024 - 12:35

आज ‘पिकू'(२०१५) पहिला. तो पाहत असताना अमिताभ बच्चन यांनी साकारलेली ‘भाष्कोर बॅनर्जी’ या अतरंगी व्यक्तिरेखेची तुलना, सुरज वेन्जारमुडू (वासुदेवन) यांच्या ‘एन्द्रोइड कुन्यप्पन 5.25′(२०१९) या चित्रपटातील ‘भास्कर पोडूवल’ या मल्याळी, बाहेरून तिरसट पण आतून गोड असणाऱ्या म्हाताऱ्याशी करण्याचा मोह आवरला नाही.

ही कल्पना करताच माझं मलाच आश्चर्य वाटलं. इतकी समान सिनेमाची रचना across culture कशी मस्त आपलं ‘भारतीयपण’ दाखवते, नाही का?

‘पिकू’ मधला ‘भाष्कोर’ हा बंगाली, ‘अपचना’च्या मनोविकाराने जगाला वेठीस धरणारा, तर ‘अँड्रोईड कुन्यप्पन 5.25’ मधील भास्कर हा आपल्या हा आपल्या जुन्या तत्त्वाने चालत जगाशी पंगा घेणारा ! चुब्बन (सौबीन शाहीर) आणि पिकू (दीपिका पदुकोण) यांची अस्वस्थताही अगदी तीच. दोघेही आपल्या करियर, कामात (आणि होऊ घालण्याची दाट शक्यता असणाऱ्या Love Life) मध्ये या तर्कट पित्यांमुळे लक्ष देऊ शकत नाहीयेत. मनाने त्यांच्या काळजीत असलेले ते दोघे. त्या दोघांचे वडील या मुलांच्या लग्नाआधीच त्यांचे ‘बाळ’ बनलेत. भारतीय समाजव्यवस्थेत ‘वडिलांना’ अपत्यांनीच सांभाळायचे असते, अशा मूल्यवादी वातावरणात दोघेही वाढलेले, मात्र वडिलांच्या हेकेखोर स्वभावामुळे स्वतःची ‘पर्सनल स्पेस’ हरवून बसलेले असे ते.

रशियावरून बापाच्या ‘ट्रिक’ला फसून धावत येणारा चुब्बन आणि कामाच्या ठिकाणी क्षुल्लक ‘अपचनाचा मेसेज’ मिळणारी पिकु, दोघेही त्याच मनस्तापातून जाताना दिसतात. एक चित्रपट शहरातील बंगाली बाप-लेक दाखवणारा, तर दुसरा ग्रामीण मल्याळी कुटुंबातील बाप-लेकाचे नाते सांगणारा. दोन भौगोलिक टोकांवरच्या या दोन भिन्न संस्कृतीत या ‘तरुण तुर्कांचे’ स्वभाव मात्र आश्चर्यकारकरित्या एकसारखे !

सतत ‘आपल्याला काहीतरी होतंय’, ‘अपचन झालंय’ हा ठाम, घट्ट विचार मनात असणारे बेंगोली ‘भाष्कोर’ आणि स्वतःच्या हाताने चुलीवर स्वयंपाक करणरे, आपल्या जुन्या जगण्याच्या मतांना चिकटून असलेले, मुलाला बाहेरगावी नोकरी करण्यास जाऊ न देणारे मल्याळी ‘भास्कर’ एकाच साच्यातून काढावेत, इतके सुंदर जमलेत.

अजून काही साम्य सध्यातरी काही सुचत नाहीये. वाचकांना याबाबत अजून काही साम्य सुचतंय का? या थीमवरचे आणखी काही कोणत्याही भाषेतील चित्रपट आठवतात का?
याबाबत कमेंटमध्ये जरूर लिहा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हेच लिहायला आले होते. पिकू अगणित वेळा बघितलाय. मला ती नावं सुद्धा आवडतात बघायला.म्हणजे अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत. ते म्युझिक, सगळं सगळं.
पण हा दुसरा पिक्चर अँड्रोईड कुन्यप्पन बघायला हवा.

ॲँड्राईड कुन्यप्पन धमाल चित्रपट आहे. दिग्दर्शक नवीन, पण अस्सल मल्याळी मातीतला. विषय आणि त्यातील चुरचुरीत संवाद, ग्रामीण लोक माझा आणतात.

त्याच दिग्दर्शकाचा ना तान केस कोडू हा अजून एक मास्टर पिस.(Kunchakko boban चा सर्वात बेस्ट अभिनय.)
(चित्रपट डिस्ने हॉट स्टार इथे)

https://youtu.be/nv6B6VPzGoM