टॅंटलस, ऊर्जा आणि शिक्षा !

Submitted by एम.जे. on 21 March, 2024 - 16:55
टॅंटलस, ऊर्जा आणि शिक्षा !

“अमेरिका सोडून उर्वरित जगाचा वीज वापर समजा माझ्या गुडघ्यापर्यंत असेल, तर एकट्या अमेरिकेचा वीज वापर माझ्या कमरेपर्यंत म्हणता येईल. त्यात राज्य म्हणून टेक्सास बघाल तर खांद्यापर्यंत आणि आपल्या ऑस्टिनविषयी बोलायचे झाले तर डोक्यावरून…”

सुखाची सरकारी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायांत पडण्यांत (हा शद्ब दोन्ही अर्थांनी घ्यावा) एक मजा (कम नशा) असते. स्वातंत्र्य आणि खूप काही शिकायला मिळतं. निरनिराळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यांचे चाललेले अगणित उद्योग, जगतातल्या घडामोडी असं काय काय ऐकायला बघायला मिळतं. शिवाय आपणही त्या घडामोडींचा एक भाग सहज बनत जातो.

मागच्यावर्षी मी ऑस्टिनमध्ये एका ऊर्जाविषयक चर्चासत्राला गेलेली होते. विषय होता ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातले वारे आणि नव्या दिशा’. विद्यापीठाच्या पीचडी प्रोफेसरांनी बोलायला सुरुवात केली ती अमेरिकेच्या वीज वापरातल्या उधळपट्टीचा उल्लेख करत. वक्ते ओघवते, अभ्यासू आणि उत्तम विनोदबुद्धीचे असल्यामुळे (आणि आयोजकांनी खाण्या-पिण्याची सोय लावल्यामुळे) श्रोते उत्साहाने बसलेले होते.

दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देत ते म्हणाले की, जगाची एक तक्रार आहे की अमेरिका नेहमी उशीरा येतो… आता पाहा ना दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि काय काय घडून गेलं पण अमेरिकेचा सहभाग अगदी शेवटी मग ते अणुवस्र प्रकरण झालं आणि युद्ध संपलं. तशी अमेरिका अनेक बाबतीत उशिराच जागी होते…

मला ते ऐकताना एक जुनं व्यंगचित्र आठवलं.

चार प्रवक्ते आहेत – एक आफ्रिकन, एक युरोपिअन, एक अरब आणि एक अमेरिकन.

मुलाखत घेणारा विचारतोय की “जगातल्या अन्न तुटवड्याविषयी आपलं काय मत आहे?” (What is your opinion about food shortage in the rest of the world?)

प्रवक्त्यांपैकी आफ्रिकन माणसाला प्रश्न पडलाय की ‘अन्न’… ते काय असतं? (What does ‘food’ mean?)

युरोपिअन माणसाला वाटतंय की ‘तुटवडा’ म्हणजे काय? (What does ‘shortage’ mean?)

अरब म्हणतोय की ‘मत’ म्हणजे काय? (What does ‘opinion’ mean?)

आणि अमेरिकन खांदे उडवतोय, ‘उर्वरित जग’ म्हणजे काय? (What does ‘the rest of the world’ mean?)

माझ्या विचारांची तंद्री भंगली. प्राध्यापक महाशय बोलत होते. ‘अमेरिकेतला पहिला कोविड झालेला आणि त्यातून वाचलेला मीच तो!’ अशी स्वतःवरूनच रंजक कहाण्यांची सुरुवात करून प्रोफेसर ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातले वारे आणि नव्या दिशा’ या विषयाला अनुसरून तास – सव्वा तास खुमासदार बोलले. त्यातली दुसरी कथा होती, ग्रीक पौराणिकांमधली ‘टॅंटलस’ची.

राजा टॅंटलसने म्हणे दुष्टपणाने आपल्याच मुलाचा बळी देऊन त्याचे भोजन देवांना वाढलेलं. देवांच्या सर्वज्ञतेची परीक्षा घ्यायची म्हणून केलेले हे महाभयंकर कृत्य जाणून देवांनी जेवणास नकार दिला आणि टॅंटलसला तडपवणारी शिक्षा सुनावली. पाण्यात राहून ना पाणी पिता येईल आणि फळांनी लगडलेल्या वृक्षाखाली असून ते ना खाता येतील अशी… अन्न पाणी सभोवती असतानाही तहानलेला आणि भुकेलेलाच राहण्याची. त्याच्यावरूनच इंग्रजीतला ‘tantalize’ हा शब्द पडला ज्याचा अर्थ ‘खोटी आशा दाखवणे’.

नोबेल पुरस्कार विजेत्या जॉन गुडइनफ यांच्या बॅटरीविषयक शोधकाम, बकिझ क्लिनर बाथरूम, हॉलिवूड चित्रपटांमध्ये ऊर्जेचे आलेले संदर्भ, विविध ऊर्जास्रोत, वीजनिर्मिती प्रक्रिया, वीज उत्पादन क्षमता, येत्या काळाची गरज, सूर्यऊर्जा ते अणुऊर्जा फायदे-तोटे, तंत्रज्ञानाचा उपयोग, नवे शोध, पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग, भविष्यातली आव्हाने आणि ऊर्जा बचत करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे कशी आवश्यक आहे अशा अनेक मुद्द्यांवर स्पर्श झाला.

“ऊर्जा बचतीचा मुद्दा मला फार आवडला, फक्त दिवसाउजेडी काचेच्या तावदानांना आतून झाकून आणि विजेचे दिवे विनाकारण जाळत आपण हे ऐकतो आहे, नाही का?” समोरच्या नुकतीच तोंडओळख झालेल्या बाईच्या कानाशी मी पुटपुटले तशी ती मागे वळली. माझ्या प्रश्नावर तिला एकदम हसायला आलं तरी त्यावर प्रतिक्रिया कशी आणि काय द्यावी हे तिला कळेना. आता दर शुक्रवारी (म्हणजे TGIF) ‘हॅपी आवर’ (हा-आवर) करणारी अमेरिकन जनता घरी परतताना ज्या रस्त्यावरून जाते, तिथे नियमावलीप्रमाणे ‘नो ड्रिंक अँड ड्राईव्ह’ असतं… असो!

सत्रानंतर हाच प्रश्न मी त्या प्रोफेसरना भेटायच्या रांगेत उभं राहायचा वेळ घालवून विचारला. ‘अरेच्या किमान हे सत्र तरी आपण वीज बचतीचा मुद्दा लक्षात घेऊन करायला हवा होता, जेणेकरून आपण मांडत असलेल्या विषयाला आपल्या आचरणाची जोड मिळेल…’ याच्या जवळपासचं तरी उत्तर मिळेल ही माझी धुकधुकती आशा फोल ठरली. क्षणाचाही विलंब न करता, “That is always been a case…” प्रोफेसरांनी व्यावसायिक कोरं हास्य फेकलं.

“अमेरिकेत जिथे जावं तिथे हीच परिस्थिती पाहायला मिळते…” मी परत माझ्या मुद्द्याची ‘री’ ओढली… “साधी रेस्टारंटस् पाहा. भर दुपारीही आत अंधार करून हे लोक ढीगभर मिणमिणते दिवे जाळतात. शाळा, कॉन्फरेन्स सेन्टरमध्ये हुडहुडी भरेल इतका एसी चालू असतो. अनेक दुकानांमधले दिवे रात्री अपरात्री ‘शो’ नावाखाली चालू असतात… या सत्राच्या निमित्ताने मला हे बोलून दाखवता आले, शक्य असल्यास तुमच्या क्षमतेत त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा व्यक्त करते इतकंच…” प्रोफेसरांनी होकारार्थी मान डोलावली, त्यांच्या हास्यात मिश्किल सच्चेपणा आलेला पाहून मी तिथून निघाले.

ऊर्जा काय एकूणच संसाधनांचा बेपर्वा वापर करणाऱ्यांना टॅंटलससारखी जवळ असून वापर करता येत नाही, उपभोग घेता येणार नाही अशी जालीम शिक्षा किंवा किमान त्याची झलक ठेवली जायला हवी का?

~
सायली मोकाटे-जोग

https://sayalimokatejog.wordpress.com/2024/03/02/tantalus-urja-shiksha/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीक अवर्सला मॅक्झिमम डिमांड कमी झाली की वीज पक्षी एनर्जी रिसोर्सेस वाचतील आणि प्रदूषण कमी होईल.
ऑफ पीकला खंड न पडु नये याची दक्षता घेउन पॉवर प्लांट मधील जेवढे युनिट्स सुरु ठेवायचे आहेत, त्याची मॅक्झिमम इफियंन्सी ज्या लोडला असेल त्या पेक्षा बरीच कमी डिमांड असेल तर पॉवर कंपनीचे नुकसान आहे आणि थोडी एनर्जी उगाच वाया जात आहे. अशा वेळेस आपण विनाकारण वीज वापरणे टाळले तर फक्त आपले बिल तेवढे कमी होईल, ऊर्जा बचत होणार नाही.

Reducing energy use in your home saves you money, increases our energy security, and reduces the pollution that is emitted from non-renewable sources of energy. ~ Department of Engergy, USA.

अमितव - टोटली सहमत! असं कालचक्र उलट नाही फिरवता येत. दुसरं म्हणजे इंडस्ट्रियल, कमर्शियल उपयोगासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात उर्जा वापरली जात असताना, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर्सनी (जरी तो सेक्टर सगळ्यात मोठा कन्झ्युमर असला तरी) असं सिलेक्टीव्ह पॉवर सेव्हिंग करून (खारीचा वाटा, थेंबे थेंबे तळे) काही मोठा फरक पडेल ही अपेक्षा मला तरी भाबडेपणाची वाटते - सरकारी पातळीवर चायनाकडून मोठ्या प्रमाणात आयात सुरू असताना, नागरिकांनी मेड इन चायना दिव्याच्या माळा दिवाळीत न घेऊन चायनीज इकॉनॉमी मोडकळीस आणण्याच्या प्लॅन इfunction at() {
[native code]
}अकीच.

“ पीक अवर्सला मॅक्झिमम डिमांड कमी झाली की वीज पक्षी एनर्जी रिसोर्सेस वाचतील आणि प्रदूषण कमी होईल.” - मानवजी, जेव्हा टेंपरेचर्स १००+ जातात, तेव्हा A/C चं सेटिंग ७८ वर ठेवा हे ऐकायला जरी छान वाटलं, तरी प्रत्यक्षात ते सहज शक्य नाहीये. ज्यांना परवडतं ते त्यांच्या कन्व्हिनियन्स चा च विचार करतात आणि त्यात फारसं गैरही काही नाहीये.

स्प्रिंग आणि समर मध्ये कपडे उन्हात वाळवले तर त्यांना एक प्रकारचा ताजा सुगंध येतो आणि वर "बर्ड शीट" चा बोनस मिळतो वेगळा.

लेख आवडला, छान आहे.
मी टेक्सासमधेच राहते, डलासजवळ. इथे खूपदा विंडी असतं हवामान. आणि अर्ध्यापेक्षा जास्त वेळ बॅकयार्डातला हॅमॉक आडवा झाला असतो Happy
तसल्या वार्‍यात धूळ आणि पोलन मुळे कपडे खराब होतील.
पण उन्हाळ्यात ड्रायर बिघडला असताना पिकनिक टेबलावर कपडे वाळवले आहेत छान!

Pages