सिल्क्यारा बोगदा कोसळण्याची घटना

Submitted by उदय on 26 November, 2023 - 22:25

चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.

कामगारांना बाहेर सुरक्षित पणे काढण्याचे कार्य सुरु आहे. किचकट आणि आव्हानात्मक काम आहे. या सर्व अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी माझी प्रार्थना.

WhatsApp Image 2023-11-23 at 16.59.11.jpeg
एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?v=liIHfBZ7TvU

अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एव्हढा मोठ्या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्या अगोदर,
(१) Geological/ GeoTechnical/ GeoPhysical survey असे सर्वेक्षण/ अभ्यास झाला होता का?
(२) Environment Impact Assessment या बांधकामाचे पर्यावरणावर काय विपरीत परिणाम होतील याचा अभ्यास झाला होता का? पर्यावरणा बद्दल आस्था असणार्‍या लोकांचा सुरवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. अगदी सर्वोच्च न्यायालया पर्यंत दाद मागण्यात आली होती. ८९० किमी चा प्रकल्प लहान ५३ भागांत दाखवला गेला.
https://www.theindiaforum.in/article/char-dham-pariyojana-high-risk-engi...
(३) सिल्क्यारा geological fault line var आहे. तसे असेल तर बोगद्याच्या कामाला परवानगी मिळालीच कशी?

बांधकामाबद्दल
(१) बोगदा तयार करतांना कुठले तंत्रज्ञान वापरले गेले होते? कुठले तंत्रज्ञान वापरायचे हे तिथल्या लोकल Geology वर अवलंबून आहे.
Drill Blast Method DBM - ड्रिल करायचे, आतमधे डायनामाईट ठेवायचे, आणि उडवायचे पण यामधे तेव्हढे नियंत्रण नसते. ज्या भागांत हे काम सुरु होते त्या भागाचा अभ्यास केला असेल तर असे तंत्रज्ञान वापरणे योग्य नाही. तिथे Tunnel Boring Method TBM वापरायला हवे होते.
(२) ४.५ कि मी लांबीच्या बोगद्यासाठी आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी ( Escape tunnel in case of emergency) कुठेही मार्ग नाही. आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग नसणे हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. सर्व प्रकारच्या सरकारी कागदपत्रात Escape tunnel चा उल्लेख असतांना ही प्रत्यक्षात तो नसणे हे काय दर्शवते?
(३) सिल्क्यारा च्या बाजूने असणार्‍या बोगद्याच्या तोंडा पासून २०० मिटर पर्यंत (मेटल जाळी +सिमेंट काँक्रिटचा ) छताला सपोर्ट आहे, पुढे नव्हता (किंवा आधी होता, नंतर पडला, पुढे काही डागडूजी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा विपरिणाम म्हणून हा अपघांत झाला ? ) आणि तिथेच ६० मीटरचा भाग कोसळला.
(४) डोंगर पोखरल्यावर, वरचा/ बाजूचा भाग कोसळू नये यासाठी जो काही structural सपोर्ट दिला गेला आहे, दिला जाणार होता तो वर असलेल्या भल्या मोठ्या मातीला / दगडाला सर्व काळांत रोखून धरण्यास पुरेसा होता का? यासाठीच वरिल सर्वेक्षणाचा अभ्यास महत्वाचा आहे.

सुरवातीला या पडलेला भागातून माती दूर करत, आतमधे १ मीटर व्यासाचा पाईप टाकणार होते. त्यात अनेक आव्हाने आहेत. आता जोडीला vertical drilling तसेच इतर बाजूनी काही तरी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. जास्त खोलांत न जाता, कुठलिही कृती केली तरी आज जे structure (कोरलेला बोगदा + त्याला लावलेला सपोर्ट + डोंगर सर्व मिळून) आहे ते कमजोर होत रहाणार. बोगद्याचा इतर भाग आज नाही, पण कुठल्या क्षणाला कोसळेल हे सांगता येत नाही.

हा मार्ग चीन सिमेजवळ नेतो. शस्त्र आणि सैन्याची ने आण करण्यासाठी आणि म्हणून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मार्ग बनत होता असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षातच, या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनांत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि अनेक वेळा मार्ग बंद ठेवावा लागला आहे. युद्धाच्या वेळी अशा बेभरवशाच्या मार्गावर विसंबून रहाणे परवडणारे नाही. CDP मुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचत आहे आणि ते जास्त चिंताजनक आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाला ( डोंगराला) आव्हान देणे विनाशाला आमंत्रण आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व कामगार बाहेर आलेत, छान बातमी. मदतकार्य करणार्‍या प्रत्येकाचे अभिनंदन, कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते.

भारताने वर्ल्ड कप हरावा व भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख व्हावे अशी आशा ठेवलेले, तसं झाल्यावर मायबोलीवर आनंद व्यक्त करणारे पुरोगामी. तेव्हा जसं भारताला अपयश आलं तसंच या लोकांना सुखरूप काढण्याच्या बाबतीत भारताला अपयश यावं अशी अपेक्षा काही मोदीविरोधक नक्कीच ठेवून होते. ४१ पैकी सगळे किंवा निदान थोडे तरी लोक मेले असते तर माजी गो चंदी म्हणत मोदींविरुद्ध शिमगा करण्याची एक आयतीच संधी समोर दिसत होती. सुदैवाने पुरोगाम्यांचे निगेटिव्ह vibes म्हणा, wishes म्हणा- प्रभावी ठरले नाहीत.
चंद्रयान मोहीम अयशस्वी झाल्याचा आनंदही असाच फार काळ टिकला नव्हता कारण चंद्रयान-२ वर्क झालं. आता फक्त न मिळालेल्या वर्ल्ड कपचाच काय तो आनंद आयुष्यात उरला असेल.

सर्व मजूर सुखरुप बाहेर आले
देवाचे आभार
पुन्हा असे होऊ नये याची काळजी घ्यावी.
लेख आणि धाग्यावरील सर्व प्रतिसाद यातील अभ्यासपूर्ण माहितीचा भाग आवडला.
राजकारणाला पास.

अभ्यासपूर्ण माहिती Lol
मुळात अडकलेल्या मजुरांबद्दल काळजी कमी आणि इतर फाफटपसारा (बेभरवशाचा रस्ता, इतका खर्च, पर्यावरण इ.) जास्त होता.
Chilean mining accident चा थरार मी टीव्ही वर प्रत्यक्ष दररोज बघत होतो. कुठल्याही परिस्थितीत ते कामगार वाचले पाहिजेत, हाच एकमेव उद्देश होता. मजूर वाचेपर्यंत एकालाही प्रश्न पडले नाहीत की
सर्वेक्षण अभ्यास झाला होता का, किती खर्च होतोय, हे खाणकाम पर्यावरणाला किती हानिकारक आहे वगैरे.

अशा प्रकारच्या आपत्ती मधे फोकस फक्त अडकलेल्या मजूरांवरच असला पाहिजे असा नियम आहे का ?

सिंहगड रस्ता रूंदीकरण होत असताना २००३ साली ५३ डेरेदार वृक्ष कापण्यात आले. त्या वेळीही विरोध झाला होता. सध्याच्या सत्ताधारी पक्षानेही विरोध केला होता.

१६ ऑक्टोबर २०१९ साली एस पी कॉलेज रोडवरची १६ झाडे कापण्याचा निर्णय या सत्ताधारी पक्षाच्या मनपाने घेतला. त्याविरूद्ध आंदोलन झाले.
१४ नोव्हें २०२० रोजी सिंहगड रस्त्यावरची आणखी ६३ झाडे कापण्याविरोधात आंदोलन झाले.
याच वर्षी एप्रिल मधे पौड रस्त्यावरची हिरवाई छाटून टाकण्या विरोधात आंदोलन झाले.

२००३ साली तत्कालीन आयुक्त देवव्रत मेहता यांनी झाडे कापताना ती अन्यत्र लावली जातील असे सांगितले होते. विरोध करणार्‍यांना विकासाचे मारेकरी म्हटले गेले. माणसापेक्षा झाडाचा जीव महत्वाचा वाटणारी विकृत जमात असा उल्लेख झाला.

आज हा विकास होऊनही सिंहगड रस्ता अपुराच पडतोय. बेकायदेशीर बांधकामे रोखणे हे देवव्रत मेहता यांचे काम होते. ते त्यांनी केले नाही. झाडांवर कुर्‍हाड चालवली.

पर्यावरणाच्या बाजूने बोलणार्‍यांचे क्रिमीनलायजेशन होते. दोन्हीही बाजूंनी.
हिमालयातली विकासकामे धोकादायक आहेत असे सांगणारे मजूरांच्या जिवाची काळजी करत नाहीत असे सुचवणे हे सुद्धा त्याच प्रकारात मोडते.

आज जर याला आळा घातला गेला नाही तर उद्या पुन्हा मजूर अडकतील, त्याची चिंता या मंडळींना नाही असे म्हटले तर ?
गेल्या वेळी याच भागात धरणाला तडा गेल्याने मजूर वाहून गेले होते. यातल्या किती जणांनी त्याबद्दल संबंधितांचा साधा निषेध केला ?

हे न्यूयॉर्कचं सेंट्रल पार्क आहे.
न्यूयॉर्क भारतातल्या कोणत्याही शहरापेक्षा जास्त विकसित आहे. रोजगारच्या संधी जास्त आहेत. तरीही एव्हढा मोठा पट्टा शहराच्या मधोमध झाडांसाठी मोकळा सोडला आहे. नशीब कि भारतातले राजकारणी तिथे जाऊन सेटल झालेले नाहीत. नाहीतर विकासाच्या नावाखाली इथे आधी लिंक रोड काढले असते,मग हळू हळू बिल्डर लॉबीने या पार्कचा ताबा घेतला असता. झाडे कापली गेली असती. विरोध करणार्‍यांना विकासविरोधी असे लेबल चिपकवले गेले असते. विकासकामांच्या खर्चाचे आकडे आणि बिल्डर लॉबीकडून मिळणारा मलिदा असला कि मग विकासाला पाय फुटलेच समजा.

अशा देशात पर्यावरण विषयक जागरूकता असल्याने हे असले प्रकार होत नाहीत.

download (4).jpeg

कुठल्याही परिस्थितीत माणसांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, मग त्यासाठी ५३ वृक्ष कापावे लागले तरी हरकत नाही.

(जेम्स वेब टेलिस्कोपचा मुद्दा नको म्हणताना, सिंहगडच्या झाडांचा मुद्दा कशाला? त्याने त्या ४१ मजुरांचा जीव वाचणार होता का?)

काहीही करून काहीतरी खुसपट काढून मुद्दा राजकारणावर न्यायचा, हा उद्देश होता का धागा लेखकाचा आणि तुमचा? जर तसे नसेल आणि राजकारण टाळूनच चर्चा असेल, तर(च) तुमच्याशी सहमत आहे.

कुठल्याही परिस्थितीत माणसांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, मग त्यासाठी ५३ वृक्ष कापावे लागले तरी हरकत नाही.

मानव जातीचा जीव वाचवा म्हणून तर झाडे हवीत.

न्यूयॉर्क मध्ये शो साठी झाडे हवीत म्हणून जागा रिझर्व्ह ठेवलेली नाही.
न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी झाडे आवशक्य आहेत म्हणून तो सर्व खटाटोप केलेला आहे.

हा धागा आज वाचला.
मजुरांची सुखरूप सुटका झाली हे उत्तम.यावर डॉक्युमेंटरी बनून, जर प्रोजेक्ट प्लॅन मध्ये काही चुका असतील तर पुढच्या वेळी सुधारल्या जाव्यात.
बाकी धोके पत्करून कामं, उंच इमारती, समुद्रमार्ग बांधकामं होत राहिली आहेत.त्यातल्या त्यात जिथे शक्य तिथे माणूस न पाठवता रोबो पाठवणे, चांगले सुरक्षितता उपाय, दुर्दैवाने काही झाल्यास कुटुंबाला चांगले विमा कव्हरेज या गोष्टी नक्की असाव्यात.

(जेम्स वेब टेलिस्कोपचा मुद्दा नको म्हणताना, सिंहगडच्या झाडांचा मुद्दा कशाला? त्याने त्या ४१ मजुरांचा जीव वाचणार होता का?)

काहीही करून काहीतरी खुसपट काढून मुद्दा राजकारणावर न्यायचा, हा उद्देश होता का >>>> Lol

चालू द्या!

कोलंबसाचे गर्वगीत

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

काहीही करून काहीतरी खुसपट काढून मुद्दा राजकारणावर न्यायचा, हा उद्देश होता का >

Obvious आहे की ते. आता बसतील वाट बघत- आणखी कुठे काही वाईट होतंय का भारताचं.
जसे गोळे मास्तर फक्त गोपिकाबाईंचा पुत्रशोक शिकवताना मन लावून शिकवतात तसे हे लोक भारतात कुठे काही वाईट- एखादा खेळात किंवा सायन्स प्रोजेक्टमधला पराभव, लोकांचे अपमृत्यू, कुठल्यातरी जागतिक क्रमवारीत भारताचं स्थान खाली जाणं - असं काहीतरी शोधून वरवर दुःख झाल्याचं दाखवत मनापासून enjoy करतात.

कुठल्याही परिस्थितीत माणसांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, मग त्यासाठी ५३ वृक्ष कापावे लागले तरी हरकत नाही.>>> हो का. गोरक्षक जेव्हा गायींच्या नावाखाली माणसं मारतात तेव्हा का नाही सुचत हे.

काम करणारे बाहेर आले
हे चांगले झाले
आणि हो अक्षय कुमारला कदचित या घटनेवर आधारीत चित्रपट निघाला तर रोल फिक्स आहे.

< मजूर वाचेपर्यंत एकालाही प्रश्न पडले नाहीत की
सर्वेक्षण अभ्यास झाला होता का, किती खर्च होतोय, हे खाणकाम पर्यावरणाला किती हानिकारक आहे वगैरे.> अपघात होऊन मजूर अडकले म्हणून या प्रश्नांची चर्चा तरी झाली. नाहीतर अ‍ॅट एनी कॉस्ट विकास हवाच म्हणणारे आहेतच. फक्त ज्यांना विकासाचा लाभ होतो आणि ज्यांचं नुकसान होतं ते लोक वेगवेगळे असतात, हे व्यवस्थित दुर्लक्षित केलं जातं. हे याच नाही तर कोणत्याही विकास कार्याबद्दल.
आताही मजूर सुखरूप बाहेर आले, तेव्हा हे प्रश्न पुन्हा जाजमाखाली ढकलायला हरकत नाही.

हा अपघात उत्तराखंडमध्ये झाला. इथेच भूस्खलन , फ्लॅश फ्लड्स यामुळे याच वर्षात कितीतरी नुकसान झालेलं आहे आणि त्याचा संबंध तिथे होत असलेल्या अंदाधुंद विकास कार्याशी जोडला जातो आहे.

वर बऱ्याचदा मी Chilean mining accident चा उल्लेख केला आहे. याबाबत माहिती हवी असेल तर इच्छुकांनी The Chilean mining accident and rescue ही डॉक्युमेंटरी बघावी, अशी शिफारस करेन.

STRAWMANHAT
पुरोगाम्यांना पुरोगामी काय विचार करतात हे सांगणारे विद्वान

https://www.bbc.com/marathi/articles/cqepjrlvm07o?fbclid=IwAR0vGQVU-13n0...

हा माणूस खरेच अतिशय हुशार आणि तज्ञ आहे.
अगदी योग्य आणि समर्पक त्यांनी उत्तर दिली आहेत.

हेच प्रश्न भारतीय तज्ञ लोकांस विचारली असती तर भलतीच उत्तर त्यांनी दिली असतो.
Dix is great

बीबीसी ची लिंक देण्याचे कारण
दुर्घटना का घडली याचा तपास होणे गरजेचे आहे. अशी चर्चा होणे हे भविष्यात उपयोगी पडणारे आहे. यावर डिक्स यांचे सकारात्मक मत आहे. अशी चर्चा नकारात्मक ठरविणाऱ्या राजकीय प्रपोगंडा चालकांनी बोध घ्यावा आणि तारतम्याने व्यक्त व्हावे.
( माफ करा मराठीत टंकताना मोबाईल भयंकर त्रास देत आहे).

Pages