“अवि काय विचार केलायस?”
“कशाबद्दल?”
“तुला माहिती आहे कशाबद्दल बोलतेय मी. तृप्ती मावशीच्या रेफरन्सने आलेल्या स्थळाबद्दल बोलतेय मी. काय ठरवलं आहेस? कधी भेटणार आहेस तिला?”
“हे बघ आई, तू अशी दंडूका घेऊन मागे नको लागूस माझ्या. मी बघतो एकदोन दिवसात म्हंटलं ना तुला. सध्या जरा काम खूप आहे ऑफीसमधे. मला घरी यायलाही उशीर होतोय रोज, तू बघत्येस ना.”
“अरे! पण भेटायला ना नाही ना तुझी? ते तर सांग. कालच तृप्ती “काय ठरलं?” विचारत होती. तू हो म्हणाल्याशिवाय मुलीकडच्यांना काही कमीट करु नकोस म्हंटलंय मी तिला”
“बेस्ट केलस. आणि तुला माहिती आहे ना मला शक्यतो माझ्याच प्रोफेशन मधली मुलगी हवी आहे. तृप्ती मावशीने सुचवलेली मुलगी माझ्या प्रोफेशन मधली नाहीये.”
“अरे पण! एकदा भेटून घ्यायला हरकत काय आहे? तुम्ही ते काय ‘क्लिक’ म्हणता ते कुठे कोणाबाबत होईल काय सांगा?”
“ओssके! भेटतो मी तिला, खुश?”
“आत्ता लगेच कळवते तृप्तीला”
झालं मातोश्री लगेच काम पार पाडून मोकळ्याही झाल्या. पुढल्या पाच मिनिटात मला व्हॉट्स ॲपवर मुलीचा नंबरही फॉरवर्ड करुन, उद्या सकाळीच काय ते भेटायचं ठरवा अशी आठवण करुन देण्यात आली.
त्याप्रमाणे त्यांचे मन राखायला मी फोन करुन दोघांच्या सवडीची वेळ आणि ठिकाण फायनल केलं.
आत्ता इथे, ठरवलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेच्या पाच मिनिटे आधीच येऊन वाट बघत बसलो.
खरतर माझं ठरलं होतं 'माझ्या प्रोफेशन मधल्या मुलीशीच मी लग्न करणार होतो'
अरेंज मॅरेज मधे असे प्रेफरन्स नाही ठेवता आले तर काय अर्थ आहे ना मग?
त्यामुळे ही भेट फक्त आई आणि तृप्ती मावशीचं मन राखण्यासाठीच. नकार द्यायचा हे तर पक्कच. पण आता इथे येऊन पंधरा वीस मिनिटं होऊन गेली तरी जिला नकार द्यायचाय तिचा मात्र पत्ताच नव्हता. तिला मेसेज करुन पहावा म्हणून फोन हातात घेतला तेव्हढ्यात तिचाच मेसेज आला.
"सॉरी मला जरा पोहोचायला उशीर होतोय. माझी मिटिंग जरा लांबली आज. तू पोहोचलास का? I am really really sorry."
"नो प्रॉब्लेम. सावकाश ये. मला पण फार नाही वीस मिनिटेच झाल्येत इथे पोहोचून."
रिप्लाय देऊन मी माझ्यासाठी एक कॉफी ऑर्डर केली. अजून वीस मिनिटे नुसत्या पाण्याच्या ग्लासवर इथे मला राहू दिलं नसतंच वेटरने. चार चकरा ऑलरेडी झाल्या होत्या त्याच्या. याचा इंडायरेक्ट अर्थ इतकाच 'एकतर ऑर्डर द्या नाहीतर फुटा'
तिला मारे म्हंटलं मी, 'काही हरकत नाही. ये सावकाश वगैरे वगैरे'. पण वेळ न पाळणारी व्यक्ती आणि मी एका वर्तुळात राहणे कठीणच होते. नकार द्यायचाच हे अजून एकदा पक्कं करुन मी समोर आलेल्या कॉफीचा कप तोंडाला लावला.
कॉफी संपवून मी चिन्याला कॉल लावायचा विचार करतच होतो तोपर्यंत ‘ती’ कॅफेत येताना दिसली.
"हाय! अवनीश? मी सिद्धी. सॉरी फार वेळ वाट बघत बसावे लागले", तिने समोर बसत म्हंटलं.
"Its ok. आणि सॉरी तू येई पर्यंत माझी कॉफी घेऊन झाली." मी म्हंटलं आणि वेटरला बोलवून तिला पाणी द्यायला सांगितलं.
“काय खाणार?” मी विचारलं
"तू काय घेशील? मी उशीर केलाय. ही ट्रीट माझ्यातर्फे. पेनल्टी समज हवतर उशीरा आल्याबद्दल" तिने म्हंटलं
“नाही, ठिक आहे”, असं मॅनर्स म्हणायला सांगत होते माझे पण आधीच इथे आपण काही स्वतःच्या राजीखुशीने आला नाही आहात असं म्हणत बुद्धीने झापलं आणि मी नुसतच “ओके! तू काहीही मागव तुला हवे ते. मला इथे काय चांगलं मिळतं माहिती नाही” असं ऐकवून गप्पं बसलो.
"इथलं सगळच चांगलं आहे अरे! पास्ता, पिझ्झा, सलाड्स, फलाफल, नाचोज सगळच चांगलं आहे, लझानिया तर..अफाट अमेझिंग आहे, फक्तं हॉट चॉकलेट ओके ओके"
या मुलीने तर वेटरला टफ देत लिस्ट ऐकवली. मी पहिल्यांदाच येतोय या कॅफेत. मला बाहेरुन तरी फार काही इंटरेस्टींग वाटलं नाही हे. पण आता ही इतक्या उत्साहात बोलतेय खाण्याबद्दल तर बघू आता कसं निघतय.
"तू दे ऑर्डर काहीही" मी तिला थांबवत म्हंटलं तसं तिने ब्रेक लावत म्हंटलं, "सॉरी फूड वीक पॉईंट आहे आणि इथलं एकंदर डेको फार मस्त आहे. आम्ही आलो की मोस्टली आत बसतो. आतलं डेकोर अफाट आहे एकदम"
मी लाईट काहीही चालेल सांगितलं म्हणून मग तिने पेस्तो पास्ता, मसाला फ्राईज आणि आयरीश कॉफीची ऑर्डर दिली.
ऑर्डर येई पर्यंत मग ज्या कारणासाठी भेटलोय त्याबद्दल बोलून घेऊ असं मीच सुचवलं. नंतर कुठे वेळ घालवत बसायचा यावर. खाल्लं की बील द्यायच आणि मग कायमस्वरूपी टाटा बाय बाय. हे आपलं मनात.
“मी ‘शहा & पार्टनर्स’ मधे सिनियर अॅडव्होकेट आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून मी LLM केलय. सध्या मी नोकरी करत असलो तरी मला स्वतंत्र प्रॅक्टीस करण्यात रस आहे आणि दोन तीन वर्षात ते जमवायचा माझा प्लॅन आहे.
“ओह! ग्रेट. तू ही विजन बोर्डवाला आहेस का?” तिने विचारलं.
“प्राधान्यक्रम ठरवायला सोपं जातं त्यामुळे” या माझ्या वाक्यावर तिनेही समहती दर्शवली. तोपर्यंत ऑर्डर आली. खाणं सुरू झालं. पास्ता अफाट होता. मग त्यावरुन गप्पा कधी खाण्यावर, आवडत्या "फुड जॉईन्ट्सवर" आणि तिच्या माझ्या कामाबद्दल अशा वेगवेळ्या विषयांवर सुरुच राहिल्या.
तिच्या बोलण्यातून ती डॉग ट्रेनर आहे समजलं. बाब्बो! ड्येंजर काम आहे. आत्तापर्यंत माझा डॉग्जशी संबंध एकतर लहानपणी कुत्रं चावल्यामुळे इन्जेक्षन घेण्यापुरता आलेला होता आणि आता माझ्या मित्राने डॉग अॅडॉप्ट केल्याने दोन हात लांबून का होईना पण डॉग आयुष्यात अॅड झाला होता. पण या उप्पर काही संबंधच नाही आपला. एरव्ही त्यांच जग वेगळं माझं वेगळं आणि ही मुलगी त्यांना ट्रेन करते..
"आज माहिमला गजानन महाराज मंदीर आहे तिथे समोरच्या सोसायटीत फर्स्ट सेशन होतं. ते जरा जास्तच लांबलं म्हणून उशीर झाला" तिने सांगितलं.
“ग्रेट! वेगळच प्रोफेशन आहे तुझं, पण मला डॉग्ज आणि एकंदरीत पेट्स बद्दल फारशी माहिती नाही. माझ्या मित्राने नुकताच डॉग अॅडॉप्ट केलाय आणि तो इतका अॅग्रेसिव्ह आहे की आम्हाला त्याच्या दाराची बेल वाजवायची भिती वाटते. न जाणो लकीच यायचा दार उघडल्यावर समोर आणि घ्यायचा आमच्या पायाची टेस्ट.”
माझ्या वाक्यावर ती भडकते की काय वाटलं होतं, कारण आमच्या मित्राच कुत्राप्रेम पाहिलं होतं मी. पण हिने जोक म्हणून घेतलं वाक्य म्हणून वाचलो.
"त्याला ट्रेनिंगची गरज आहे." तिने आयरीश कॉफीचा घोट घेत म्हंटलं
"सांगतो मित्राला. तुझा नंबर दिला त्याला तर चालेल ना? तो शोधतोच आहे ट्रेनर कुत्र्यासाठी सॉरी सॉरी त्याच्या लकीसाठी. कुत्रं नाही म्हणायच नाही का" मी समोरुन ऑब्जेक्शन येण्याआधीच म्हणून टाकलं.
“नंबर दे पण मी मित्राला ट्रेनिंगची गरज आहे म्हंटलं, कुत्र्याला नाही. आणि म्हण रे कुत्र्याला कुत्रा तू. नाव लकी आहे पण आहे कुत्राच ना.
“होss! पण मित्र रागावतो आमच्यावर. म्हणतो “लकी फॅमिली मेंबर आहे. कुत्रा कुत्रा म्हणू नका त्याला”
“त्याच्या भावना समजू शकतेच मी. माझ्याकडेही झुबी आहे. इंडी रेस्क्यू फिमेल डॉग. फॅमिली मेंबरच आहे ती पण म्हणून काही ती ह्युमन नाही. कुत्र्याला कुत्रा म्हणून बघितल तर ना त्याचं वागणं कळणार आपल्याला. सॉरी पण आज सिमिलर सेशनच घेऊन आले म्हणून जरा पटकन मत मांडलं गेलं माझ्याकडून. इंटरेस्ट नसलेली व्यक्ती नक्कीच बोअर होऊ शकते.”
“नाही! नाही! इंटरेस्टींग आहे हे. तुझ्या कामाबद्दल ऐकायला आवडेल अजून.”
“Thank you. पण आपण तुझ्या विषयी बोलूया आता. मी फारच वेळ स्वतःबद्दल बोलतेय असं वाटायला लागलय. घरी कोण कोण असतं तुझ्या?”
“मी आणि आई. बाबाला जाऊन पाच वर्ष होतील आता. आई LIC मधे डेव्हलपमेंट ऑफीसर आहे. बाबा सिव्हिल इंजिनिअर होता, प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. तुझ्या घरी कोण कोण असतं?”
“मी, आई, बाबा आणि झुबी. आई प्रोफेसर आहे. बाबाने व्हिआरएस घेतलेय गेल्या वर्षी. तो पोस्टात होता. झुबी ४ वर्षांची आहे.”
“आणि तू किती वर्ष या फिल्ड मधे आहेस?”
“तसं मी कॉलेजमधे असतानाही डॉग शेल्टर्समधे वॉलेंटिअरिंग करायचे. मी केलय एम कॉम पण इंटरेस्ट प्राण्यांच्या संदर्भात काम करण्यातच होता.”
“यात काही कोर्सेस असतात की अनुभवातून शिकलीस?”
“दोन्ही. मी मुंबईतल्याच एका इंस्टीट्यूटमधून कोर्स केलाय डॉग ट्रेनिंगचा. स्पेशली डॉग बिहेवियर आणि सायकॉलॉजीचा अभ्यास केलाय. K9 सर्टिफाईड ट्रेनर आहे मी आणि त्यांच्या रेफरन्सने एक दोन डॉग ट्रेनर्सकडे हॅंड्स ऑन एक्स्पिरिअन्सही घेतलाय. त्या जोडीला शेल्टर्समधला अनुभव. स्वतंत्र ट्रेनर म्हणून सुरुवात करुन दिड वर्ष होईल आता.”
“पण हेच का निवडावेसे वाटले?”
‘पॅशन हे मुख्य कारण आणि यात मार्केट आहे म्हणजे हा बिझिनेस म्हणून नक्की वाढेल याची खात्री वाटली हे दुसरे कारण.“
“हम्म! मला कल्पना नव्हती याला इतकं मार्केट आहे याची. आमच्या घरात कधीच कोणता प्राणी पाळला गेला नाही. त्यामुळे हे सगळं जगच निराळं आहे माझ्यासाठी.”
“I know. प्राणी असलेल्या घरातही ट्रेनर म्हणजे ‘sit -eat –jump’ अशा कमांड शिकवणारी व्यक्ती असं मानणारी लोकं आहेत अरे! त्यामुळे मला पिचिंगची सवय झालेय आता. तू तुझ्याबद्दल सांग की. जॉब सोडून स्वतंत्र प्रॅक्टीस करणं कोणत्याच क्षेत्रात सोपं नाही.”
“हो खरय. सोपं नाहीच ते. त्यातूनही घरात नोकरीचीच परंपरा असेल आणि कोणी दूर दूरचा नातेवाई, पूर्वज व्यवसाय करणारा नसेल तर जास्तच कठीण जातं उडी मारण. पण मला पहिल्यापासूनच स्वतंत्र प्रॅक्टीसमधेच इंटरेस्ट होता. इथे अनुभव मिळतोय, पगार आणि पर्क्स चांगले आहेत म्हणून अजून इथे टिकून आहे. बायकोही याच प्रोफेशन मधली आणि तिलाही स्वतंत्र प्रॅक्टीसची आवड असेल अशी करायची आणि मग दोघांनी मिळून नोकरी सोडून यात उडी मारायची असं मी ठरवलेलं चित्र होतं पहिल्यापासून.”
“ओह! मग इथे नॉन लॉयर बरोबर काय आयरीश कॉफी पीत वेळ काढतोयस?”
तिच्या वाक्यामुळे लक्षात आलं मी काय बोलून गेलो विजन शेअर करण्याच्या भरात.
“I am so sorry”
“Its ok. I was just pulling your legs. मी पण तर तेच करतेय”
“म्हणजे?”
“म्हणजे मलाही माझ्या फिल्डच्या जवळचं काही करिअर असेलला नवरा हवा आहे. म्हणजे गृमर किंवा वेटर्नरी डॉक्टर किंवा ट्रेनर वगैरे. म्हणजे भविष्यात दोघे मिळून काही मोठा प्रोजेक्ट करता येऊ शकेल बिझिनेसच्या दृष्टीने.”
“ओह! Ok! तू कोणाला दुखवायच नाही म्हणून भेटायला तयार झालीस?”
“आईला आणि आसावरीला. आसावरी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. समोर बसवून शाळा घेतली तिने माझी. मला म्हणे, "रमीचा सिक्वेन्स लावताना समोरचं पान उचलून बघायची रिस्क तर घ्यावीच लागते ना? न जाणो ते पान प्युअर सिक्वेन्स बनवणारं निघायचं. पान अपेक्षेप्रमाणे नसेल तर द्यायचं सोडून आणि पुढचं उचलायचं आपली टर्न आल्यावर.”
“म्हणून आलीस प्युअर सिक्वेन्स लागतोय का बघायला?”
“सॉरी! आमचा गृप असं काहीही वेड्यासारखं बोलत असतो.”
“अधूनमधून शहाण्यासारखही बोलता हे काय कमी आहे”
“Oh! सर्कॅझम? आवडेश.”
माझ्या चेहर्यावरचे भाव बघून तीच पुढे म्हणाली,” अरे दुर्मिळ होत चालल्येत प्युअर सर्कॅझम करणारी आणि कळणारी जमात आपल्यासारखी”
तिच्या वाक्यावर मला हसायला आलं. ही एकदम किर्ती आहे याबाबतीत. तिला म्हंटलं, “तुझं आणि माझ्या एका मैत्रिणीचं चांगलं पटेल. वरुन साधी सोज्वळ दिसते ती पण तुझ्यासारखीच आहे एक नंबर अतरंगी.”
“एका वाक्यात किती मारणारेस?”
“का? मी काय केलं?”
“साधी सोज्वळ पण आणि अतरंगी पण म्हणून मोकळा झालास एकाच वाक्यात”
“अर्र! ते कॉंप्लिमेंट म्हणून होतं. फक्र है हमे, अतरंगी है हम. असय ते. कौतुक आहे ते”
“वोक्के! शुक्रिया वकील साहब.”
“बर पण मगाशी बोलताना तू तुझं इंस्टा अकाऊंट आहे म्हणालीस ना?”
“हो, आहे ना”
“बेस्ट. मग जरा ते शेअर करशील! त्याचीही लिंक पाठवतो मित्राला नंबरा बरोबर. मगाशी म्हंटलं ना ट्रेनर शोधतोय तो”
मधेच वेटर येऊन अजून काही हवे आहे का विचारुन गेला. त्याला बील आणायला सांगून तिने माझ्याकडे बघत उत्तर दिलं, “@Siddhivinayak हे इंस्टा आहे माझं.”
“सिद्धी विनायक?“ घंटा वाजवून नमस्कार केल्याची अॅक्शन करत मी विचारलं
"हे ते वालं नाही" तिने अॅक्शन रिपीट करत उत्तर दिलं
“माझ्या नावातून आडनाव वगळलंय फक्तं. लोकांना सिद्धिविनायक मंदिर माहिती असतंच त्यामुळे एकदा नाव ऐकलं की विसरत नाहीत ते. वेगळी जाहिरात करायलाच नको मला." तिने हसत ऐकवलं
"हे सॉलिड आहे." मी म्हंटलं.
तोपर्यंत बील आलं. माझ्या आधी तिने उचलून ती पेमेंट करणार हे डिक्लेअर करुन टाकलं. असं नाही चालत वगैरे माझ्या म्हणण्याला हाणून पाडत उशीरा आल्याची पेनल्टी म्हणून समज असं म्हणत तिने बील चुकतही केलं आणि आम्ही बाहेर पडलो.
“Nice to meet you” वाक्याची देवाणघेवाण करुन आम्ही आपापल्या टॅक्सीत बसून घरी निघालो.
पंधरा मिनिटात भेट घेऊन निघायचं ठरवलं होतं पण तब्बल अडीच तीन तास गप्पा मारुन बाहेर पडलो. आईला आणि तृप्ती मावशीला सांगण्यासाठी दोघांनी मिळून आयरीश कॉफीच्या साक्षीने एक कारण फायनल केलं होतं.
या नकाराचं वाईट वाटलं पण भेटीच मात्र ओझं नाही वाटलं. वेगळीच कांदेपोहे डेट करुन आम्ही बाहेर पडलो होतो.
क्रमशः
छान !
छान !
मस्त सुरुवात... आवडेश
मस्त सुरुवात... आवडेश
मस्त!
मस्त!
बाबाला एकेरी हाक मारणारी पिढी आता लग्नाच्या वयाची झाली हे जाणवलं
(आधीच्या पिढ्यांमधेही होते, पण फार कमी)
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!
धन्यवाद साद, आबा, वावे आणि
धन्यवाद साद, आबा, वावे आणि चना@१२
बाबाला एकेरी हाक मारणारी पिढी आता लग्नाच्या वयाची झाली हे जाणवलं Lol>>>
खरय. भाच्यांकडे बघून मलाही हे जाणवलेय
छान सुरवात
छान सुरवात
मस्त लिहितेस
मस्त लिहितेस

खुप मस्त
खुप मस्त
मस्तच
मस्तच
मस्त. इंटरेस्टींग सुरुवात.
मस्त. इंटरेस्टींग सुरुवात.
धन्यवाद झकासराव, प्रिती,
धन्यवाद झकासराव, प्रिती, अज्ञानी, उर्मिला आणि धनश्री
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या पुढचे भाग.
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या पुढचे भाग.
मस्त चाललंय. La flor del
मस्त चाललंय. La flor del amor सारखी क्यूट स्टोरी असेल तर मज्जाच
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!
किती छान, क्युट गोष्ट आहे.
किती छान, क्युट गोष्ट आहे. पुभाप्र.
LIC मधील डेव्हलपमेंट ऑफीसर आई
LIC मधील डेव्हलपमेंट ऑफीसर आई भयंकर आवडली आहे, गोष्ट वाचतेय..
मस्त सुरूवात..पुभाप्र!
मस्त सुरूवात..पुभाप्र!
बाबाला एकेरी हाक मारणारी पिढी आता लग्नाच्या वयाची झाली हे जाणवलं >खरंच!!
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या
छान सुरुवात! वाचतोय, येऊ द्या पुढचे भाग.
>>>> +१०००
धन्यवाद अमितव, प्रज्ञा, धनि,
धन्यवाद अमितव, प्रज्ञा, धनि, मामी, सुहृद, जाई, रायगड
La flor del amor सारखी क्यूट स्टोरी असेल तर मज्जाच Wink>> fingers crossed. मला लिहिण्याच्या प्रोसेसमधे मजा आली. वाचताना तुम्हालाही मजा येवो अशी इच्छा तर आहेच माझीही
LIC मधील डेव्हलपमेंट ऑफीसर आई भयंकर आवडली आहे,>> धन्यवाद
पुढचा भाग परवा नक्की पोस्ट करणार.
छान आहे सुरुवात!
छान आहे सुरुवात!
हे असे एका दिवसाआड एक एक भाग
हे असे एका दिवसाआड एक एक भाग टाकून छळ मांडताय.
छान वाटते आहे. सिक्वेन्स
छान वाटते आहे. सिक्वेन्स लागणार बहुतेक.
जबरी सुरुवात आहे , कविन.
जबरी सुरुवात आहे , कविन. पुढचे भाग पटापटा येऊदे.
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!
ए वॉव मस्त आवडली कथा & नरेशन
ए वॉव मस्त आवडली कथा & नरेशन नव्या पीढी ची
)
किती क्लियर विचार आणि सहज मान्य वागणूक नविन पीढी ची, आपण किती बावळट होतो वगैरे आठवून गेले :p (काय अपेक्षा होत्या तर उंची & खांदे ब्रॉड वगैरे
धन्यवाद मैत्रेयी, असामी,
धन्यवाद मैत्रेयी, असामी, सामो, रमड, स्वाती आणि आशू२९
मस्त सुरुवात. पटापट लिही.
मस्त सुरुवात. पटापट लिही.
कविन is back! लिही पटापटा
कविन is back!
लिही पटापटा
मस्त सुरुवात.
मस्त सुरुवात.
आपण किती बावळट होतो वगैरे आठवून गेले>> खरंच.
बाकी ही आठवण बरेचदा 'आजकालचे' अरेंज्ड मॅरेज किस्से ऐकताना होत असते
Pages