Submitted by प्राचीन on 24 September, 2023 - 04:27
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
त्याची चिडचिड बघून तिनं विचारलं,
" काय झालं? "
" सगळ्याचाच वैताग आलाय. लोक किती विचित्र वागतात! कधी आपल्याला किंमत देणार, तर कधी आपण त्यांच्या दृष्टीने मातीमोल असणार. "
" त्यांचं आपल्याशिवाय फारसं अडलेलं नाही, याचं वैषम्य वाटतंय का?"
तिनं नेमकं वर्मावर बोट ठेवल्यानं तो आणखीनच लाल झाला.
" असंच असतंय बाबा.. आयुष्यात चढउतार यायचेच. कधी आपला
भाव वधारला, तर उतूमातू नये नि कवडीमोल ठरलो तरी त्रासू नये.
" तिचं नेहमीप्रमाणे स्थिर असणं.. 'तागडी'च ती.. कोणालाही झुकतं माप कशी देणार?
तेवढ्यात आलेल्या हातगाडीवर टुणकन् बसताना टॉमेटोनं कान टवकारले..
"वीस रुपये किलो.. " भाजीवाल्याचा पुकारा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच
भारीच
मस्त... थोडी कल्पना आलेली
मस्त... थोडी कल्पना आलेली
वा!
वा!
मस्त .... किती छान सत्यवचन...
मस्त ....
किती छान सत्यवचन...
मस्त !
मस्त !
छान!
छान!
>>>>>" तिचं नेहमीप्रमाणे
>>>>>" तिचं नेहमीप्रमाणे स्थिर असणं.. 'तागडी'च ती.. कोणालाही झुकतं माप कशी देणार?
वाह!!
आवडली.
मस्त!
मस्त!
छान आहे आवडली
छान आहे आवडली
छान
छान
छान! वेगळी कल्पना. टॉमेटो नि
छान! वेगळी कल्पना. टॉमेटो नि तागडी.
>> कधी आपला भाव वधारला, तर उतूमातू नये नि कवडीमोल ठरलो तरी त्रासू नये
+१११