बॉलिवूडला पडलेला कंपूगिरी, मनीमाफिया , नेपोटिझम चा विळखा ?

Submitted by ढंपस टंपू on 10 August, 2023 - 11:17

निमित्त आहे डॉन ३ मधे शाहरूख च्या ऐवजी रणवीर सिंगला घ्यायचे..
तेव्हापासून रणवीर सिंग जबरदस्त ट्रोल होतोय . शेवटी त्याने मौन सोडलं. या वेळी एस आर के फॅन्सने गोंधळ घातलाय.

एका युजरने एस आर के शूज मधे रणवीरचा पाय बसणार नाही असे म्हटले.
त्याला उत्तर देताना एकाने बिग बींच्या शूज मधे एस आर के चा तरी पाय कुठे फिट होता असे म्हटले.

दुसर्‍या एस आर के फॅनने रणबीर सिंग स्ट्रगल करून आलाय या दाव्याची पोलखोल करताना त्याच्या वडलांची कन्स्ट्रक्शन फर्म, दिल्ली, मुंबई आणि अन्य शहरात त्यांचे गेली कित्येक वर्षे चालू असलेले प्रोजेक्टस, सरकारी कंत्राटे यांची यादी दिलीय. तो एका सिंधी फँइलीतुन येतो जी आधीपासून गडगंज श्रीमंत असून बापाने त्याला लाँच करण्यासाठी फिल्म फायनान्स केली होती असे म्हटले. के आर के च्या ट्विटचे स्क्रीन शॉट्स पण दिलेत.

यावर एस आर के सुद्धा इंदिरा गांधीशी त्याच्या आईच्या असलेल्या मैत्रीमुळे मिर्झा ब्रदर्स द्वारा आल्याचे एकाने म्हटले आहे. त्याने फोटोच टाकले.
त्याचे आजोबा सुद्धा हैद्राबाद मधे गडगंज श्रीमंत होते. त्यांची मुलं इग्लंडला शिकायला होती. वडील सुद्धा पाकिस्तानात बडे प्रस्थ होते.
त्यात केजो. यशराज हा कंपू , त्यांचे फिल्म इंडस्ट्रीवरचे वर्चस्व असे आणखी उपविषय आलेत.

त्यामुळं आता वाटतं डॉन ३ मधे याशिवाय कुणी गुणी अभिनेत्याचा विचार का होऊ शकत नाही ?
नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी किंवा दुसरा कुणी डॉन का करू शकणार नाहीत ?

जर या अभिनेत्यांचा संघर्ष बनावट असेल तर नेपोटिजमचा आरोप झेलून रणवीर कपूर उगीच बदनाम होतोय असे वाटते. संघर्ष असेल नसेल, किमान स्टारकिडस तसा दावा करू शकत नाहीत.

स्टारकिड्स ना केव्हढा मानसिक त्रास असेल नेपोटिजमचा आरोप सहन करताना. त्यावर मात करून करीना, कमीना, रणवीर कपूर ते गुणी असल्याचेद सिद्ध करतात. नाहीतर तुषार कपूर, अक्षय खन्ना पण चालले असते. बॉबी देओल पण चालला असता.
अ‍ॅट द एंड ऑफ द डे संधीची गरज आहे. शेवटी कामगिरी प्रेक्षकांना पसंत पडायला पाहिजे.

बनावट संघर्ष दाखवून सहानुभूती मिळवू नये. कारण आजच्या जमान्यात ते उघड होणारच.
काय वाटते ?

काय गोंधळ चालू आहे हे समजावे म्हणून रणवीर सिंग फॅन्सबाबतची एक लिंक इथे डकवतोय. बाकिच्या शोधून घ्या.
https://www.news18.com/viral/ranveer-singh-fans-come-out-in-support-afte...

हाच तो रणवीर सिंगचा दावा ज्यात त्याने गरिबी पाहिल्याचे म्हटलेय.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/r...

रणवीरने ब्रेक साठी फिल्मला पैसे दिले : दावा
https://www.masalathai.com/krk-comes-forward-with-shocking-claims-that-r...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविडमुळे सिनेमाची गणितं बदललीत , वेब मालिका प्रकार सुपरहिट झालाय त्यामुळे नेपो प्रकार जरा कमी झालेला दिसतो.

भारतात एखादा हिरो किंवा हिरॉईन यशस्वी झाले कि त्यांच्या नंतर त्यांच्या मुलांच्यात त्यांची छबी दिसते का हे बघायची आवड असते. वडलांची / आईची आठवणा होत असेल तर स्टार किड चालतात. मुकेश नंतर नितीन मुकेश हे गायक म्हणून, धर्मेद्र चा मुलगा म्हणून सनी यशस्वी झाले. जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर पण यशस्वी झाला. याच्या उलट फ्लॉप असलेले राकेश रोशन आणि सुरेश ओबेरॉय यांची मुलं पण यशस्वी झाली. विवेक ओबेरॉय इतर कारणांमुळं बाहेर गेला.

लेखक सलीम, जावेद यांची मुलं हिरो म्हणून गाजली. निर्माता काका / वडील पण मुलगा अभिनेता म्हणून आमीर खान / उदय चोप्रा.
निर्माता / दिग्दर्शक / अभिनेता फिरोज खानचा मुलगा परदीन खान. ड्रग्ज मुळे बाहेर गेला. आता वजन कमी करून परत येतोय.

अभिनेता जितेंद्रची मुलगी निर्माती म्हणून यशस्वी आहे. टीव्ही इंडस्ट्रीत एक नंबर आहे. स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.

नेपो किड्स प्लस टॅलेन्ट असेल तरच टिकतात... अरमान कोहली, उदय चोप्रा, अक्षरा हसन,जॅकी भगनानी, हरमन बावेजा, अभिषेक बच्चन अशी भरपूर उदाहरणे आहेत...

शाहरुख़ खान का बचपन राजिंदर नगर के इलाके में बिता जहा उनकी फैमिली एक किराये के मकान में रहती थी और उनके पिता एक रेस्टोरेंट चलाया करते थे। शाहरुख़ खान ने अपनी शुरुआती पढ़ाई दिल्ली के सेंत कोलम्बिअस से की और पढ़ाई में अच्छे होने की वजह से उन्होंने स्कूल का सबसे बड़ा अवॉर्ड सोर्ड ऑफ़ ऑनर भी जीता था। लेकिन सिर्फ 16 साल की उम्र में शाहरुख़ खान के जीवन में एक दुखद पल तब आया जब उनके पिता की मृत्यु हो गयी हलाकि इतने कम उम्र में पिता के खोने के बाद भी शाहरुख़ के अंदर परेशानियों से लड़ने का जज्बा कभी भी ख़त्म नहीं हुआ। उन्होंने 1985 में हंसराज कॉलेज में एडमिशन ले लिया जहा पर उन्होंने एक थिएटर ग्रुप ज्वाइन किया और उस ग्रुप में रहते हुए बैरी जहां के अंतर्गत एक्टिंग सीखी। इसके बाद शाहरुख़ मास कम्युनिकेशन में मास्टर डिग्री लेने का फैसला किया लेकिन एक्टिंग के लिया पढ़ाई बिच में छोड़ दी और फिर इसी बिच उन्होंने नेशनल स्कूल ऑफ़ ड्रामा में भी एडमिशन लिया जहा पर वे एक्टिंग के गुण सीखते रहे। शाहरुख़ खान का पहला रोल टीवी सीरीज “दिल दरिया“ में था लेकिन कुछ प्रोडक्शन परेशानियों के चलते यह टीवी सीरीज एक साल के बाद रिलीज़ हुआ और इसी बिच शाहरुख़ खान फौजी नाम के एक टीवी सीरियल में काम कर लिया था तो इस तरह से इनका टेलीविज़न डेब्यू एक टीवी से मिला। इसके बाद इन्होने कई और टीवी सीरीज की जैसे सर्कस, वागले की दुनिया, इडियट और उम्मीद में काम किया और उस टाइम में शाहरुख़ खान ने जिस तरीके से एक्टिंग की थी उनकी तुलना लोगो ने लेजेंड्री दिलीप कुमार से करनी सुरु कर दी थी। फिर 1991 में उन्होंने अपने प्रेमिका गौरी के साथ शादी कर ली, गौरी और शाहरुख़ खान के बिच पिछले कई दिनों से प्रेम सम्बन्ध थे लेकिन कई सारी रूकावट और परेशानियों का सामना करने के बाद यह रिस्ता संभव हो पाया था। शाहरुख़ खान का एक्टिंग करियर अभी सुरु ही हुआ था की फिर और एक बड़ा सदमा लगा जब 1991 में उन्होंने अपनी माँ को भी खो दिया और फिर वो इस दुःख को भुलाने के लिए मुंबई चले गए और अपने आप को एक्टिंग में पूरी तरह से झोख दिया। मुंबई जाकर उनकी किस्मत भी उनका साथ दिया और एक्टिंग को देखते हुए उन्हें कई सारे फिल्मो में काम करने को भी मिल गया जैसे की सबसे पहले उन्हें हेमा मालिनी के डायरेक्शन में दिल आशना है के नाम के फिल्म में शाइन किया गया। यह हेमा मालिनी का एक डायरेक्टर के तौर पर डेब्यू फिल्म था। लेकिन 1992 में रिलीज दीवाना मूवी शाहरुख़ खान की डेब्यू फिल्म बनी इस मूवी में उनके साथ उस टाइम के स्टार एक्टर ऋषि कपूर ने भी काम किया था और फिर दीवाना बॉक्स ऑफिस पर हिट साबित हुयी और इसने शाहरुख़ खान के बॉलीवुड करियर को एक अच्छा स्टार दिया। एक मूवी के लिए उन्हें Film Fair The Best Male डेब्यू से नवाजा गया।

किधर से उठाया क्या पुरा प्यारा
>>>

हो. अजूनही बरेच होते. गरजेचे उचलले. शाहरूख जिथून आलाय आणि जिथे पोहोचलाय त्याचा अभिमान आहे. आदर आहे. कौतुक आहे.

Pages