निमित्त आहे डॉन ३ मधे शाहरूख च्या ऐवजी रणवीर सिंगला घ्यायचे..
तेव्हापासून रणवीर सिंग जबरदस्त ट्रोल होतोय . शेवटी त्याने मौन सोडलं. या वेळी एस आर के फॅन्सने गोंधळ घातलाय.
एका युजरने एस आर के शूज मधे रणवीरचा पाय बसणार नाही असे म्हटले.
त्याला उत्तर देताना एकाने बिग बींच्या शूज मधे एस आर के चा तरी पाय कुठे फिट होता असे म्हटले.
दुसर्या एस आर के फॅनने रणबीर सिंग स्ट्रगल करून आलाय या दाव्याची पोलखोल करताना त्याच्या वडलांची कन्स्ट्रक्शन फर्म, दिल्ली, मुंबई आणि अन्य शहरात त्यांचे गेली कित्येक वर्षे चालू असलेले प्रोजेक्टस, सरकारी कंत्राटे यांची यादी दिलीय. तो एका सिंधी फँइलीतुन येतो जी आधीपासून गडगंज श्रीमंत असून बापाने त्याला लाँच करण्यासाठी फिल्म फायनान्स केली होती असे म्हटले. के आर के च्या ट्विटचे स्क्रीन शॉट्स पण दिलेत.
यावर एस आर के सुद्धा इंदिरा गांधीशी त्याच्या आईच्या असलेल्या मैत्रीमुळे मिर्झा ब्रदर्स द्वारा आल्याचे एकाने म्हटले आहे. त्याने फोटोच टाकले.
त्याचे आजोबा सुद्धा हैद्राबाद मधे गडगंज श्रीमंत होते. त्यांची मुलं इग्लंडला शिकायला होती. वडील सुद्धा पाकिस्तानात बडे प्रस्थ होते.
त्यात केजो. यशराज हा कंपू , त्यांचे फिल्म इंडस्ट्रीवरचे वर्चस्व असे आणखी उपविषय आलेत.
त्यामुळं आता वाटतं डॉन ३ मधे याशिवाय कुणी गुणी अभिनेत्याचा विचार का होऊ शकत नाही ?
नवाजुद्दीन, पंकज त्रिपाठी किंवा दुसरा कुणी डॉन का करू शकणार नाहीत ?
जर या अभिनेत्यांचा संघर्ष बनावट असेल तर नेपोटिजमचा आरोप झेलून रणवीर कपूर उगीच बदनाम होतोय असे वाटते. संघर्ष असेल नसेल, किमान स्टारकिडस तसा दावा करू शकत नाहीत.
स्टारकिड्स ना केव्हढा मानसिक त्रास असेल नेपोटिजमचा आरोप सहन करताना. त्यावर मात करून करीना, कमीना, रणवीर कपूर ते गुणी असल्याचेद सिद्ध करतात. नाहीतर तुषार कपूर, अक्षय खन्ना पण चालले असते. बॉबी देओल पण चालला असता.
अॅट द एंड ऑफ द डे संधीची गरज आहे. शेवटी कामगिरी प्रेक्षकांना पसंत पडायला पाहिजे.
बनावट संघर्ष दाखवून सहानुभूती मिळवू नये. कारण आजच्या जमान्यात ते उघड होणारच.
काय वाटते ?
काय गोंधळ चालू आहे हे समजावे म्हणून रणवीर सिंग फॅन्सबाबतची एक लिंक इथे डकवतोय. बाकिच्या शोधून घ्या.
https://www.news18.com/viral/ranveer-singh-fans-come-out-in-support-afte...
हाच तो रणवीर सिंगचा दावा ज्यात त्याने गरिबी पाहिल्याचे म्हटलेय.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/r...
रणवीरने ब्रेक साठी फिल्मला पैसे दिले : दावा
https://www.masalathai.com/krk-comes-forward-with-shocking-claims-that-r...
रणवीर सिंग यांच्या वडलांची
रणवीर सिंग यांच्या वडलांची संपत्ती, व्यवसाय, आजोबा, आजी आणि फॅमिलीची माहिती.
https://popularnetworth.com/jagjit-singh-bhavnani/
अहो दादा, फक्त रणवीरसिंग चीच
अहो दादा, फक्त रणवीरसिंग चीच माहिती देत आहात.
शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनला सुद्धा इंदिराजींच्या शिफारशीमुळे काम मिळाले आहे.
अमिताभ बच्चनकडे सात हिंदुस्थानीचे दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांना देण्यासाठी इंदिराजींचे पत्र होते.
नेपोटीझम फक्त बॉलीवूड मधेच
नेपोटीझम फक्त बॉलीवूड मधेच आहे का?
डॉक्टर, वकील, न्हावी, चांभार, भिक्षुकी इत्यादी सतराशे साठ क्षेत्रात आणि सर्वात वर सत्ताकारणात असणारा नेपोटीझम कुणालाच खुपत नाही का? मग फक्त स्टार किड्सने अभिनयाचा सोडून इतर धंदा करावा असा अट्टाहास तमाम फालतू पब्लिकचा का असावा, कुणी काय करियर करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो असा एक भाबडा गैरसमज आहे माझा, म्हणून हा प्रश्न पडतो कि या सर्व उपटसुम्भाची लायकी काय जे अशी टीका करत सुटतात
@अज्ञान बालक,
@अज्ञान बालक,
नेपोटिझमचा तुम्ही लावलेला अर्थ माझ्या डोक्यावरून गेला.
कष्टाची, हलकी, जातीव्यवस्थेने गळ्यात मारलेली कामे जी कुणी करायला धजावत नाही , त्याचे कंपल्शन असणे याला नेपोटिजम म्हणवत नाही. ही भिंत पार करून शाळेपर्यंत जाणे, तिथे यशस्वी होणे हाच एक संघर्ष असू शकतो कुणासाठी. ज्यांच्या वाटेला ही कामे पोट भरण्यासाठी येतात ते पहिली संधी मिळताच ती सोडू पाहतील.
अशांना गुणवत्ता असूनही बॉलिवूडमधे संधी न मिळण्याचे कारण नेपोटिजम असू शकते, ओळखी पाळखी असू शकते. त्यामुळे टीका होणारच. कारण सिनेमे प्रेक्षकांच्या जिवावर हिट होतात. त्या प्रेक्षकां पैकी काहींना आपल्यालाही संधी मिळावी असे वाटू शकते. हिरोच्या मुलाला चांभार, न्हावी हे काम करायला बंदी नाही.
डॉक्टरचा मुलगा डॉक्टर असे नसते. परी़क्षा द्यावी लागते. बॉलीवूडमधे परीक्षा आहे का ?
खानदानी श्रिमंत असला तर तो
खानदानी श्रिमंत असला तर तो नेपोटिझम वाला होतो का आपोआप?
@रघु आचार्य,
@रघु आचार्य,
जाती व्यवस्थेने गळ्यात मारलेली कामे कंपलसरी परंपरेने करत राहावे याला माझे अज्जिबात समर्थन नाही.
जगण्याच्या शर्यतीत संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. पण आपल्या संघर्षाला न मिळालेल्या यशाचा दोष इतरांना देऊ नये, आज घाणेरडे राजकारण कोणत्या क्षेत्रात नाही आहे? अशा राजकारणाचे बळी कित्येक लायक व्यक्ती ठरतात.
बॉलीवूड मध्ये परीक्षा आहे का ? : कोणती परीक्षा अपेक्षित आहे? बरेचसे स्टार किड्स पण अभिनय शिक्षण घेऊनच येतात ना? फक्त स्टार कीड आहे म्हणून प्रत्येकजण लायकी नसताना यशस्वी होत नाही .
मला अभिनयाची फारशी समज नाही पण रणबीर कपूर किंवा आलिया भट हे टुक्कार अभिनेते आहेत का? किमान मला तरी तसे वाटत नाही तसेच ते दिलीप कुमार किंवा मीना कुमारी पण होऊ शकत नाहीत हे मान्य आहे.
डॉक्टर परीक्षा देऊन डॉक्टर होतो पण प्रत्येक डॉक्टर ची डॉक्टर मुले एमबीबीएस एमडी होऊनच बापाचा धंदा चालवत नाही ना.
अबा. तुम्हाला माझा प्रतिसाद
अबा. तुम्हाला माझा प्रतिसाद समजला कि बोलूयात. धन्यवाद.
जिथं चरावू कुरणे असतात तिथे
जिथं चरावू कुरणे असतात तिथे परिवार वाद असतोच असतो .
Dr च मुलगा dr च असतो.परीक्षा द्यावी लागते हा पॉइंट काही जास्त महत्वाचा नाही.
सरकारी नाही तर खासगी कॉलेज मधून तो dr होतोच.
त्यासाठी स्वतःची ओळख लावली जातेच.
क्रिकेट र चा मुलगा क्रिकेट र होण्यास कमी त्रास आहे .
पण सामान्य कुटुंबातील मुलगा क्रिकेटर होण्यास खूप संघर्ष आहे.
तेच तत्व बॉलिवूड पण लागू आहे.
वेगळे असे काही नाही
डॉक्टर हे चुकीचे उदाहरण आहे..
डॉक्टर हे चुकीचे उदाहरण आहे... बिजिनेस ची उदाहरणे बघा...
नमिता थापर चे example घ्या... मुकेश अंबानी... आस पास ची जुनी रेस्तारंट्स पहा..तिथे बघा नेपोटीझम...नेपोटीझम सगळीकडे आहे...
प्रत्येक बापाला आपल्या
प्रत्येक बापाला आपल्या अपत्यासाठी काही तरी करावे असे वाटत असते, आणि हे प्रत्येक क्षेत्रात होते, फक्त फिल्म इंडस्ट्री ला पॉईंट आऊट करणे चुकीचे आहे
डॉक्टर हे चुकीचे उदाहरण आहे
डॉक्टर हे चुकीचे उदाहरण आहे
>>>
हो. उदाहरण चुकले आहे.
पण त्यातही डॉकटर बापाने आपल्या मुलाला आपल्याच हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस सुरू करायला मदत केल्याची उदाहरणे आहेत आसपास.
बाप आहे तर तो आपल्या मुलाला फेवर करणारच हे वैश्विक सत्य आहे.
उलट डॉकटर पेशात जर पुरेसे लायक नसलेल्या मुलाला बाप प्रमोट करत असेल तर ते जास्त घातक आहे असे मला वाटते. पिक्चर काय, आपल्यावर आहे. बघा किंवा बघू नका.
तर्कदुष्टतेला उत्तर देऊ नये.
तर्कदुष्टतेला उत्तर देऊ नये. तरीही.
१. वडीलोपार्जित संपत्ती, मिळकत पुढच्या पिढीला मिळणे याला नेपोटिजम म्हणत नाहीत. दुसर्याच्या संपत्तीत इतरांना वाटा असण्याचे कारण नाही. इथे पिढीजात श्रीमंतीचा मुद्दा ज्यांना पडला आहे त्यांना उत्तर मिळावे.
२. पिढीजात व्यवसाय पुढच्या पिढीला मिळणे यातही नेपोटिजम नाही. पण व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत असणे सुद्धा गरजेचे आहे. व्यवसाय बदलता यावा यासाठी समान संधी असणेही गरजेचे आहे.
३. समान संधीचा अर्थ व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असणे. कुणीही कष्टाळू, गुणी, कल्पक, हुषार तरूण एखाद्या व्यवसायाची माहिती घेऊन व्यवसाय करू बघत असेल तर त्यालाही बँकेचे कर्ज मिळायला हवे, त्यालाही एकाच भावाने माल मिळायला हवा, कंपन्यांची कामे मिळायला हवीत, शासनाचे टेंडर्स मिळायला हवेत.
४. जिथे कलागुणांचा संबंध आहे तिथे ज्याच्याकडे कलागुण आहेत त्याला संधी मिळायला हवी. इथे नेपोटिझमची लागण झाली तरी जर कलागुण असतील तर ना़कारता येत नाही. पण १००% नेपोटिजम असेल आणि कलागुण असलेल्यां सामान्यांना संधीच नसेल तर अशा क्षेत्रावर टीका होणारच. जर कलेचे रूपांतर व्यवसायात झाले असेल तर शासनाने कलागुणांना संधी मिळावी म्हणून एन एफ डी सी सारखे उपक्रम राबवले आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, एफ टी आय अशा संस्था उभ्या केल्या आहेत.
दुष्ट तर्कटे काढून वाद घालण्यात वेळ घालवता येतो. या कामासाठी शुभेच्छा !
चित्रपट बनवताना निर्माते हे
चित्रपट बनवताना निर्माते हे आपल्या खिशातून पैसा घालतात किंवा उभा करतात असं मानून चाललं तर त्यांना त्यात कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा अधिकार आहे असं वाटतं .. सामान्य माणूस म्हणून नेपोटीझम असू नये , सर्वांना समान संधी मिळावी असं आपल्याला वाटणं साहजिक आहे . पण करण जोहरचे 50 कोटी रुपये त्याने एखाद्या नवीन , सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या , उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्यावर इनवेस्ट करायचे की एखाद्या स्टार किड वर हा शेवटी त्याचा निर्णय आहे , आपण सांगू शकत नाही की 50 कोटी खर्च करून या अमुक अभिनेत्याला संधी दे . तो त्याचाच निर्णय आहे आणि त्यात हा अन्याय आहे वगैरे बोलून काही फायदा नाही . उदा . काजोल अजय देवगणच्या मुलीचा सिनेमा आला , बजेट 80 कोटी , त्यातले 50 कोटी तिच्या आईबापांनी आपल्या मुलीसाठी घातलेले नाहीतच याची आपल्याला काय माहिती आहे का ! कोणीही सामान्य बॅकग्राउंडमधील कितीही टॅलेंटेड कलाकाराचे आईवडील हे करू शकत नाहीत .
ज्यांना या सगळ्यात अन्याय वाटतो त्या प्रेक्षकांनी एकमुखाने किंवा बहुसंख्येने नेपो किड्सच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला तर काहीतरी होऊ शकेल पण त्याची फारशी शक्यता दिसत नाही .
अन्याय कशाला म्हणता येईल तर - पाचपन्नास गुणी , टॅलेंटेड कलाकारांनी एकत्र येऊन , पैसा उभा करून फिल्म तयार केली आणि पैशाच्या किंवा ताकदीच्या बळावर त्या फिल्मला थिएटरच मिळू दिलं नाही वगैरे - असे उद्योग जर मोठ्या स्टार्स आणि डिरेक्टर्सनी केले , तर त्याला अन्याय म्हणता येईल .
सामान्य बॅकग्राउंडच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये नेपोटीझम आहे , असणारच आहे , हे ऍक्सेप्ट करून त्या क्षेत्रात वर पोहोचायच्या महत्वाकांक्षा ठेवायच्या असतील तर ठेवाव्यात .. निव्वळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर वर पोहोचू हा आंधळा आशावाद ठेवला तर सुशांत सिंग सारखी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची तयारी ठेवावी .
हातात किती वर्षं आहेत , 25 ते 40 म्हणजे 15 वर्षं . 40 वयानंतर नंतर अचानक हिरो / हिरोईन बनण्याची शक्यता कमीच . या 15 वर्षात नेपोटीझमच्या डोक्यावर पाय देऊन आपल्याला या क्षेत्रात यश कमावणं शक्य होणार आहे का ? की छोटे छोटे रोल्स करण्यातच ही वर्षं निघून जाणार ? भविष्यासाठी आर्थिक पुंजी तरी साठते आहे का ? कदाचित ( कदाचित नाही 90 % ) मोठ्या सिनेमात लीड रोल कधीच मिळणार नाही याची आपल्या मनाची तयारी आहे का ? भविष्याची आर्थिक तरतूद करायचा दुसरा मार्ग / करियरचा ऑप्शन / इन्व्हेस्टमेंट वगैरे आपल्याकडे प्लॅन आहे का .. प्रॅक्टिकल विचार करून या क्षेत्रात उतरावं आणि राहावं .
विषयाला सोडून झालं आहे थोडं .
राधानिशा, कुणाचा अधिकार,
राधानिशा, कुणाचा अधिकार, अन्याय हा विषयच नाही इथे.
एखादे क्षेत्र पूर्णपणे बंद होणे हा विषय आहे. टॅलेंट हा व्यवसाय असू शकत नाही. अपवाद चालून जातो. सुरूवातीला या क्षेत्रात गुणी लोक आले. त्यांना लोकांनी प्रेम दिले. आता त्यांच्या पिढ्यान पिढ्या यात आहेत. त्यांनाही संधी मिळू दे. पण इतरांना संधीच नाही हा विषय आहे. त्याबद्दल बोलू नये असे वातावरण आहे. लोकांना का पुळका का यावा अशा मंडळींचा ?
माझं चुकतही असेल , खूप अंगं
माझं चुकतही असेल , खूप अंगं असलेला विषय आहे .. चूक बरोबर पटकन नाही समजत . सामान्य बॅकग्राउंडमधून आलेल्या कलाकारांनी प्रस्थापित प्रॉडक्शन हाउसेस , दिग्दर्शक - प्रोड्यूसर्स वर अवलंबून न राहता लो बजेट सिनेमे कमी प्रसिद्ध पण चांगल्या दिग्दर्शकांसोबत केले , वेब सिरिज , शॉर्ट फिल्म्स यासारख्या क्षेत्रांकडे वळले तर त्यांचा फायदा वाटतो आणि हे होऊ लागलं आहे आता हळूहळू . मोठ्या प्रोड्युसर्स - दिग्दर्शकांकडून संधीची अपेक्षा ठेवणं हा भाबडेपणा सोडून द्यावा .. सध्याची पिढी तशी प्रॅक्टिकल आहे , त्यांना समजत असेल हे ऑलरेडी .
१) मक्तेदारी निर्माण करून
१) मक्तेदारी निर्माण करून दुसऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचणी निर्माण करणे ह्याला स्पर्धा म्हणत नाहीत.
पण सर्रास जग भर अगदी शुल्लक व्यवसाय पासून मोठ्या उद्योग समूहात पण सर्रास चालते.
२) एअरटेल, व्होडाफोन,jio ह्या व्यतिरिक्त दुसरे सक्षम पर्याय आहेत का टेलिकॉम मध्ये..
किती तरी लोक त्या क्षेत्रात उतरण्यास सक्षम आहेत पण कोणी तसा प्रयत्न जरी केला तरी ही बडी थेंड त्याला धुळीस मिळवतील.
३)
स्टार,सोनी,झी, ह्या ग्रुप शिवाय नवीन कोणी का येत नाही.
ह्या उद्योग मध्ये.
हे काही उद्योग झाले.
नवीन वडापाव ची गाडी जरी टाकली तरी त्याला सुरवातीला मुश्किल केले जाते
चित्रपट बनवताना निर्माते हे
चित्रपट बनवताना निर्माते हे आपल्या खिशातून पैसा घालतात किंवा उभा करतात असं मानून चाललं तर त्यांना त्यात कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा अधिकार आहे असं वाटतं >>> अशा सिनेमासाठी प्रेक्षक पण तेच लोक असावेत. इतरांनी तो पाहिला नाही तर तो त्यांचा अधिकार आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा वापर करायला सुरूवात केली कि मग बॉयकॉट मोहिमांबद्दल कुठल्या तोंडाने बोलणार ?
बॉयकॉट मोहिमा घातक आहेत तसेच कलाक्षेत्रात परिवारवाद जोपासणे हे देखील. एक कीड संपवायला दुसरी फोफावते.
नेपोटिझम भारतातच अधिक
नेपोटिझम भारतातच अधिक प्रमाणात दिसतो आणि इतर देशात कमी असतो, असं मला वाटतं.
आपल्या मुलाने कोणत्या क्षेत्रात करियर करावं, हे ठरविण्याचा अधिकार/ मुभा भारतीय पालक फार जास्त प्रमाणात घेतात. परदेशात मात्र, मुलाच्या वयाच्या १८ वर्षानंतर त्याच्या करियर मधे आणि आयुष्यात पालक फार ढवळाढवळ करायला जात नाहीत. त्यामुळे तिकडे "नेपोटिझम" कमी दिसतो.
मुलांना पालकांचा पैसा मिळतो पण त्यांनी केलेला व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याची सक्ती/ अपेक्षा नसते. हे भारतीय पालकांनी पुरेश्या प्रमाणात स्वीकारलं, तर आपल्याकडेही नेपोटिझम कमी होईल.
ह्याला ठोस नाही पण बऱ्यापैकी
ह्याला ठोस नाही पण बऱ्यापैकी परिणाम कारक उत्तर एका शार्क टँकच्या एपिसोड मध्ये काही लोकल कलाकारांनी आपल्या अंगभूत अभिनयाच्या कलाकृती / सिनेमे लोकल भाषेत सादर करून चित्रपट निर्मिती आणि त्यातून यशस्वी व्यवसायिकता जपणारी टेक्निक ह्याचं छान प्रदर्शन केलेले होतं. ह्या सर्व प्रकारात सिनेसृष्टीतील नेपोटीझमचा दहशतवाद निकालात निघू शकतो.
गेल्या वर्षभरात पठडी बाहेरचे
गेल्या वर्षभरात पठडी बाहेरचे म्हणजे आयुष्यमान किंवा राजकुमार राव चे नाही, नव्या रक्ताचे आपण किती सिनेमे बघितले?
ते आवडले असतील तर त्यावर लेख लिहून आपण किती वेळा इतरांना बघायला उद्युक्त केले?
आपल्याला सिनेमा आवडला की नाही, आवडला असेल तर का आवडला हे आपल्याला समजतं का? आपण त्यावर विचार करतो का?
आज केजो सिनेमे सोडून किती तरी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात अनेकानेक नावे चेहरे कायम दिसतात. नेपो बॉलिवूड आपण न बघता ते बघू लागा. त्यात नाही सापडलं तर जगाचा कंटेन्ट आणखी वैविध्यपूर्ण आहे. निगेटिव्ह दृष्टी सोडून काय पॉझिटिव्ह आहे ते बघा. किंमत देऊ नका, झाले नेपो दुकान बंद उत्तम. नाही झाले तरी तुम्ही सुखी आहेत नव्या करमणूकीत. जग तसही फेअर कधीच नसतं.
कसला अन्याय आणि काय बळच चर्चा
कसला अन्याय आणि काय बळच चर्चा
प्रसिद्ध लेखकाच्या मुलाने/ मुलीने लिहलेली पुस्तके तुम्ही आवर्जून विकत घेऊन वाचता का?
प्रसिद्ध चित्रकाराच्या मुलांची पेंटिंग्ज बघायला जाता का?
मग इथं काय सक्ती आहे की यांचे सिनेमे बघायलाच हवेत म्हणून, असे काय डोंबल आशयघन सिनेमे बनवतात की ते बघितले नाही तर आयुष्यात काहीतरी मिसिंग वाटेल
मनोरंजनच हवं असेल तर ते आजकाल ओटीती वेबसिरीज पासून नाटके, सिरीयल, हॉलिवूड, साऊथ, फिल्म फेस्टिव्हल मधले देशोदेशीचे चित्रपट असे आयुष्यभर पुरतील इतका साठा आहे
बॉलिवूड कलाकार काय कुठल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतात का सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर परिणाम पडेल असे निर्णय घेतात?
ते तिथल्या नेपोटीझम बद्दल तर सगळ्यात जास्त आक्षेप घ्यायला पाहिजे
कसलाही अनुभव नसलेला पोरगा अचानक युवा नेता, युवा मोर्चा अध्यक्ष म्हणत फॉर्च्युनर फिरवत पदाधिकारी, आमदार खासदार बनतो
अचानक त्यांची संपत्ती 150 200 कोटी होते
कागदावर त्यांच्याकडे अर्धा एकर शेती असते फक्त
त्यांची लग्ने होतात ताई साहेब, वहिणीसाहेब मग महिला आघाडी अध्यक्ष होतात, त्यांची पोरे उनाडक्या करतात, इंटरनॅशनल शाळेत जातात आणि वयात आले की कार्यकर्ते त्यांना निमुटपणे आपल्या डोक्यावर बसवून नाचतात
या लोकांच्या हातात आपण आपल्या देशाचे भवितव्य देतो पण त्याबद्दल कुणाला ना खंत ना खेद
त्रास काय तर या हिरोचा पोरगा हिरो झाला आणि त्या हिरोईन ची पोरगी हिरोईन झाली
कुणीच इथं कलेसाठी येत नाही, आमच्यावर अन्याय झाला हो म्हणणारे पण पैसे कमवायलाच येतात, आता या पोरांच्या बापानी गडगंज पैसा कमावला आहे तो ते पोरावर खर्च नई करणार तर काय वर घेऊन जाणार का
नसेल तुमची ऐपत तर दुसरे क्षेत्र बघा, सगळ्यांनीच काय हिरो व्हायला हवं का?
आशुचँप पोस्टला टोटल +१.
आशुचँप पोस्टला टोटल +१.

पण हे असे लेफ्ट अलाईन्ड, प्रत्येक ओळ नव्या रांगेत, डोळ्याला दिसायला तुमच्या पोस्टचं अक्षर ओळखीचं वाटलं आणि अगदीच धडकी भरली राव!
कॅपिटलिजमचं वैशिष्ट्य आहे कि
कॅपिटलिजमचं वैशिष्ट्य आहे कि तो त्याच्या समर्थनार्थ हिरीरीने उतरणार्यांची संख्या कॅपिटलिजमचा शिकार असलेल्यांच्यातून वाढवतो. हे लोक आक्रमक प्रचाराचे शिकार असतात, शिवाय आपल्यातल्यांना तीच भाषा वापरून झोपडपायला तत्पर असतात.
जे सिनेमे बनवत नाहीत, त्यांनी इतक्या हिरीरीने सिनेमावाल्यांची बाजू मांडण्याचे काय कारण ? इथे सिनेमा बनवणार्याने ती बाजू मांडणे समजू शकतेत्या पण सगळे आपल्यासारखे आहेत म्हणून एखादा आपल्या भावना शेअर करत असेल तर अरे बघ तू या विषयावर मतं मांडायला कसा नालायक आहेस हे सांगावंसं का वाटतं ?
राजकारण्याचं अनुभव नसलेलं पोरगं राजकारणात येतं हे चूक आहे कि बरोबर ? त्याला चूक म्हणणार्यांना सुद्धा असेच ट्रोल केले जाते. घराणेशाहीचे भक्त तुटून पडतात. त्यांच्याकडे निरनिराळे तर्क असतात. कि राजकारण येरागबाळ्याचं काम नोहे, मग कुणीच करायचं नाही का ? अभिनेत्याचं पोरगं अभिनेता होतं तर राजकारण्याचं का नको ?
हे म्हणजे परस्पर दोन बडे गुंड मैदानात आहेत. अ गुंडाचे दाखले देऊन ब गुंडाचे समर्थक सामान्याला सांगतात कि बाबा आवाज उठवू नकोस कारण अ चं कसं चालवून घेतोस ? मग अ चे गुंड येऊन म्हणणार कि अ बद्दल काही वेडंव्वाकडं बोलायचं नाही, कारण ब पण तेच करतो.
अरे पण अ आणि ब दोन्हीतलं एक मान्यच आहे बाकिच्यांना हे ठरवणारे तुम्ही कोण ?
तुषार कपूरला लोकांनी रिजेक्ट केलंय, अभिषेक बच्चनला रिजेक्ट केलंय. अक्षय खन्ना सुद्धा म्हणावा तसा चालला नाही. तरीही तुषार कपूरला गोलमाल सिरीज मधे एक पात्र बनवून लोकांच्या माथी मारले जाते. ही सक्ती कुणी केलीये ? लोकांच्या आश्रयाने सिनेमे चालतात. त्यांनी मत मांडायचंच नाही का ?
एक से एक भंगार मालिका निघत राहतात. त्यात तेच तेच पकाऊ लोक अभिनय करत राहतात. मग तेच चित्रपटात पण दिसत राहतात.
तुमच्या मुलांकडे गोड गळा असेल, गाणं येत असेल त्याला उभेच केले जात नाही. त्याने पैसे कमवले तर तो गुन्हा झाला का ? फुकट संधी दिली तरी चालेल, त्याला फेम मिळाली तर तुमचं काय जातंय ?
चित्रपटद्योगाकडून अशी मतं दाबायचं कॉण्ट्रॅक्ट केल्यासारखं का करावं ? मांडू द्या कि मत सर्वांना. तुम्हीही मांडा.
नेपोटिझम ही चुकीची गोष्ट आहे
नेपोटिझम ही चुकीची गोष्ट आहे कि नाही याबद्दल तुमचं मत काय आहे ?
ज्याला ती चुकीची वाटतेय, त्याच्या एकट्याच्या नेपो किडसचे चित्रपट न पाहण्याने काय फरक पडणार ?
सामान्य जनता शक्यतो लांबचा विचार करत नाही. चाललंय ते ठीक आहे या मताची असते. मग या पद्धतीने चालू सरकारबद्दल बोलणे सुद्धा भयंकर अपराध होईल, कि नाही ?
एखाद्या मतदारसंघाच्या उमेदवाराबद्दल नकारार्थी बोलणे हे सुद्धा तुम्ही नालायक असण्याचे लक्षण होईल.
एखादी गोष्ट चूक आहे असे मला वाटते हे सार्वजनिक रित्या सांगितल्याशिवाय समविचारी लोक एकत्र कसे येतील ?
उद्या नेपो किडस वर सामूहिक बहीष्कार टाकून अद्दल घडवायची म्हटले तरी मत मांडावेच लागेल ना ? कि गुन्हा होतो लगेच तो ?
यावर एस आर के सुद्धा इंदिरा
यावर एस आर के सुद्धा इंदिरा गांधीशी त्याच्या आईच्या असलेल्या मैत्रीमुळे मिर्झा ब्रदर्स द्वारा आल्याचे एकाने म्हटले आहे. त्याने फोटोच टाकले.>>> हे खरखोट काहि माहिती नाही पण पुर्विच्या शाखाच्या अनेक मुलाखतित त्याने एका थीएटर अॅक्तरच नाव घेतल होत...अन्गुर सिनेमा पाहिला असेल तर त्यात इन्स्पेक्टरचा रोल करणारा कलाकार याचा फॅमिली फ्रेन्ड होता त्याने शाखाचे नाव सर्कस साठी सुचवले होते.
शाखाच्या मुव्हिपेक्षा त्याच्या मुलाखति बघण जास्त एन्टरटेनिग होत...हुशार्,विटी,आणी हजरजबाबी.याचा अर्थ माज नाही अस नाही तो पहिल्यापासुन आहे पण तेव्हा इग्न्रोर केला होता.
यावर एस आर के सुद्धा इंदिरा
यावर एस आर के सुद्धा इंदिरा गांधीशी त्याच्या आईच्या असलेल्या मैत्रीमुळे मिर्झा ब्रदर्स द्वारा आल्याचे एकाने म्हटले आहे. त्याने फोटोच टाकले.>>> हे खरखोट काहि माहिती नाही पण पुर्विच्या शाखाच्या अनेक मुलाखतित त्याने एका थीएटर अॅक्तरच नाव घेतल होत...अन्गुर सिनेमा पाहिला असेल तर त्यात इन्स्पेक्टरचा रोल करणारा कलाकार याचा फॅमिली फ्रेन्ड होता त्याने शाखाचे नाव सर्कस साठी सुचवले होते.
शाखाच्या मुव्हिपेक्षा त्याच्या मुलाखति बघण जास्त एन्टरटेनिग होत...हुशार्,विटी,आणी हजरजबाबी.याचा अर्थ माज नाही अस नाही तो पहिल्यापासुन आहे पण तेव्हा इग्न्रोर केला होता.
यावर एस आर के सुद्धा इंदिरा
यावर एस आर के सुद्धा इंदिरा गांधीशी त्याच्या आईच्या असलेल्या मैत्रीमुळे मिर्झा ब्रदर्स द्वारा आल्याचे एकाने म्हटले आहे. त्याने फोटोच टाकले.>>> हे खरखोट काहि माहिती नाही >>
https://www.indiatimes.com/ampstories/entertainment/rare-photos-of-shah-...
https://www.shethepeople.tv/art-culture/lateef-fatima-khan-indira-gandhi/
शाहरूख खानचे आजोबा ( आईचे वडील)
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/kannada/movies/news/wh...
ओळख सांगुन कधी कुठला जॉबच
ओळख सांगुन कधी कुठला जॉबच केलेला नाही असं इथे कोणी आहे का?
टेक क्षेत्रात नव्या ठिकाणी मला अप्लाय करायचं असेल तरी मी लिंक्डइन वर कोणी ओळखीचं आहे का बघुन, नसेल तर ओळख करुन त्याच्या/ तिच्या थ्रू रेझ्युमे देईन. हे १५-२० वर्षांंच्या अनुभवानंतर ही. अर्थात रँडम अप्लाय करुनही जॉब मिळालेले आहेत, पण रिकृटर किंवा ओळखीतून गेलं की लो रेझिस्टंस पाथ होतो. आमच्या सध्या कंपनीत फ्रेंड्स अॅंड फॅमिली को-ऑप/ इंटर्न पोझिशन्स ही असतात. राजरोस सिस्टॅमिक नेपोटिझम
मी आहे. मला कुठलाच जॉब ओळख
मी आहे. मला कुठलाच जॉब ओळख सांगून मिळाला नाही.
माझ्या कॉलेजचे मित्र पण बिना ओळखी पाळखीचे जॉबला लागले.
ओळखी पाळखीने जॉब मिळालाच तर
ओळखी पाळखीने जॉब मिळालाच तर खूप स्ट्रगल करावा लागला असं सांगण्याची हिंमत नाही होणार.
Pages