संधी
उन्हे उतरत आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस घरांच्या रांगा होत्या. काही दगड विटांच्या वा मातीच्या भिंती, पत्र्याच्या जागोजागी पडलेल्या कौलांच्या छतांची साधी घर होती. काही सिमेंटची, कौलारू, थोडीफार टापटीप घरे होती. एखादे बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेले, एक मजलीच ; पण जरासे ऐसपैस बंगलीवजा घर होते. रस्त्यावरून तो चालला होता. फिकुटलेला चेहरा, दाढीचे खुंट वाढलेले, केस विस्कटले होते. डोळे खोल गेलेले होते.
तो होता रमण. बत्तीस वर्षांचा तरुण. त्याची अशी अवस्था होण्याला तसंच कारणही होतं. आज तो त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून - तुरुंगवास भोगून येत होता. त्याच्या घरासमोर येऊन तो थांबला. तोच, शेजारच्या घरातला मुलगा बॉलशी खेळत खेळत रस्त्यावर आला. रमणची नजर त्याच्याकडे गेली. त्या मुलाने ही रमण कडे पाहिलं. रमाणने स्मित केले. लहानग्याचा चेहराही फुलला ; पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद मावळून त्यावर काहीशी भीती उमटली. झटकन बॉल उचलून तो घरात पळून गेला. रमण काय ते समजून गेला. खिन्न चेहऱ्याने तो आपल्या घराकडे वळणार तोच त्याला पाठीमागून हाक आली. त्याने पाहिलं तर त्याच्या घराच्या समोरच असलेल्या त्या एक मजली बंगल्याच्या पोर्चमध्ये एक गृहस्थ हसऱ्या चेहऱ्याने उभे होते. ते अर्थात रमणचे शेजारीच होते. श्री. मेढेकर. त्यांनी रमणची आस्थेने विचारपूस केली. त्याला बरं वाटलं जरा आश्चर्य ही वाटलं. आता आपल्याला ओळखणाऱ्यांपैकी अगदी कुणीच चांगली वागणूक देणार नाही असं त्याला वाटलं होतं. मेढेकरांशी दोन शब्द बोलून तो घराकडे गेला.
रमण चांगला शिकला सवरलेला तरूण ; पण काहीसा आळशी व कामचुकार. सधन घरामध्ये लाडाकोडात वाढलेला असल्याने मेहनत करण्याची गरज व त्यामुळे सवय नव्हती. इच्छा तर त्याहून नव्हती. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने नोकरी सुरू केली ; पण रस नं वाटल्याने काही दिवसातच ती नोकरी सोडून दिली. पुढेही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या धरून काही महिन्यात सोडून दिल्या. एकटा असताना ठिक होतं. पुढे लग्न झालं. पत्नीही चांगल्या पगाराच्या खासगी नोकरीत होती. तेव्हा तर त्याने प्रयत्न करणं ही कमी केलं. पत्नीच्या पगारावरच घर चालू लागलं. पुढे त्यांना एक मुलगी झाली. आता बायकोला काही काळ नोकरी वैगेरे करणं शक्य नव्हतं. तेव्हा नाईलाजाने पुन्हा त्याला कामधंद्याचा शोध घ्यायला सुरुवात करावी लागली. आणि आता तो एकटाही नव्हता. खांद्यावर जबाबदारी होती ; पण म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं. पुन्हा आधी सारखं नोकरी धरून, काही दिवसात सोडून देणं सुरू झालं. बायकोने विचारल्यावर ' कामांच्या मानाने पगार मिळत नाही.' अशी काहीतरी सबब सांगायचा ; पण तिला रमणचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. तिनं अनेकवार रमणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ; पण त्याच्यात काही फरक पडला नाही. मग वारंवार त्यांच्यात भांडणं होऊ लागली. रमणला फारशी मेहनत न करता पैसे कमवावेसे वाटत होते. एकदा, त्याला चांगलंच ओळखून असणारा त्याचा एक मित्र त्याला एका व्यक्तीकडे घेऊन गेला. त्या व्यक्तीनं रमणवर एक कामगिरी सोपवली. कसलीतरी बेकायदेशीर कागदपत्रं पोहोचविण्याचं काम होतं. रमणला ते फारसं पटत नव्हतं खरं, मात्र मोबदल्यात मिळणारी रक्कम समजताच तो तयार झाला. चांगलं - वाईट, कायदेशीर - बेकायदेशीर या केवळ माणसाच्या मनातील कल्पना आहेत. झटपट पैसे कमवायचे तर काहीही करावं लागतं, अशी रमणने स्वतःची समजूत घातली. त्याने काम हाती घेतलं खरं ; पण ते पूर्ण होण्याआधीच त्याला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला व त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्याच्या बायकोला तर धक्काच बसला. तिचे आई वडील तिला व बाळाला आपल्या घरी घेऊन गेले. तुरुंगातील एकेक दिवस रमणसाठी असह्य होता, त्यात पत्नी बाळ घेऊन त्याला सोडून गेल्यावर तर त्याच्या दु:खात अजूनच भर पडली. मग मात्र इथून बाहेर पडल्यावर प्रामाणिकपणे पडेल ते काम करून, मेहनत करून अभिमानाने, समाधानी आयुष्य जगायच असा त्याने मनाशी निश्चय करून टाकला होता.
बरेच दिवस रिकामं असल्याने घरात खूप धूळ, जाळी जळमटं झाली होती. तो उर्वरित दिवस घराची साफसफाई इ. मध्येच गेला. रात्री आठ - सव्वा आठला थकून भागून तो टीव्ही पाहायला बसला होता. अजून जेवण बनवायचं बाकी होतं. इतक्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी लगबगीने उठून दरवाजा उघडला. दारात मेढेकर उभे होते. हे मेढेकर असतील साधारण पंचेचाळीशीचे. उंच, मध्यम अंगकाठी. सावळा रंग, चष्म्याआडचे घारे, भेदक डोळे त्यांच्या हुशारीची साक्ष देत होते. अर्थात ते होतेच विचारी, आणि चाणाक्ष. आणि तितकेच समंजस व सहृदय होते. रमणला जेल होण्याच्या नऊ - दहा महिने अगोदरच ते इथे राहायला आले होते ; पण फारच कमी वेळात रमणच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण झाले होते. ' त्या चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या मित्रापेक्षा यांच्यासारख्या माणसाच्या संगतीत राहिलो असतो तर किती बरं झालं असतं.' त्यांच्याकडे पाहता पाहता रमणच्या मनात एकदम विचार डोकावून गेला.
त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यांच्या पत्नीने रमणसाठी व त्यांच्यासाठी जेवणाचा डबा दिला होता. रमणसोबतच रात्रीचं जेवण करण्याचा त्यांचा विचार होता. त्याने मेढेकरांचे हसून स्वागत केले. मग दोघांनीही गप्पा मारत जेवण केले. मेढेकरांची विनोदबुद्धी लाजवाब होती. त्यांनी आपल्या व्यवसायातील अनेक गमती जमती सांगितल्या. त्यांच्याशी बोलता बोलता रमणचं गांभीर्य, उदासीनता बरंचसं कमी झालं. तोही मोकळेपणाने बोलू लागला. मेढेकरांच्या मनात काहीतरी बोलायचं होतं ; पण ते बोलले मात्र नाहीत. ही वेळ बहुदा त्यांना त्यासाठी योग्य वाटली नसावी. जेवून झाल्यावर काही वेळाने ते घरी गेले.
•••••••
दुसऱ्या दिवशी रमण ला उठायला अंमळ उशीरच झाला. ते साहजिकच होते. शारीरिक नसला, तरी मानसिक थकवा खूप आला होता. काल रात्री बऱ्याच दिवसांनंतर त्याला समाधानाची विश्रांती मिळाली होती.
पटापट शेव्ह करून, आंघोळ करून तो तयार झाला. त्याचं कालचं अजागळ रूप पूर्णपणे पालटलं होतं. सफेद फॉर्मल शर्ट आणि काळी पॅन्ट अशा साध्या पण सोबर पोशाखात त्याचं मूळचं साध्या सरळ, सुशिक्षित तरूणांचं रूप आरशात पाहून त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधान झळकत होतं.
तो बाहेर निघण्याच्या तयारीत होता, तोच सौ. मेढेकर टिफीन घेऊन आल्या. त्यांनी रमणची प्रेमाने विचारपूस केली. त्यावरून त्यांनादेखील रमणबद्दल घृणा, तिरस्कार वैगेरे बिलकुल वाटत नव्हता हे स्पष्टच होतं. रमण मनोमन सुखावला. तशा सौ. मेढेकर ही समजूतदार व प्रेमळ स्वभावाच्या होत्या.
नाश्ता उरकून रमण जो घराबाहेर पडला, तो थेट रात्री साडेआठ नऊच्या सुमारास घरी परतला. तेव्हा तो खूप थकलेला तर होताच, मात्र त्यापेक्षाही अधिक दु:खी, चिंतित अन निराश झालेला दिसत होता.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी रमण असा घराबाहेर असतानाच त्याला मेढेकरांचा फोन आला. त्यांनी रमणला घरी बोलावलं होतं. खरंतर इतक्यात रमणला घरी जायचं नव्हतं ; पण मेढेकरांचं मन मोडणं त्याला पटलं नाही. शिवाय नक्की काय काम असावं अशी एक उत्सुकताही मनात निर्माण झाली होतीच. त्यामुळे लगोलग त्याने परतीचा रस्ता धरला.
मेढेकरांच्या घरात, हॉलमधील सोफ्यावर मेढेकर बसले होते. शेजारील कोचावर रमण बसला होता. नुकतंच त्यांचं जेवण उरकलं होतं. आता दोघेही आरामात गप्पा मारत बसले होते. नेहमीप्रमाणे हास्यविनोद सुरू होते ; पण रमणला मात्र मेढेकरांचं त्याच्याकडे काय काम असावं हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. थोडावेळ इकडचं तिकडचं बोलून मेढेकर मूळ मुद्द्यावर आले -
" रमण, तू नोकरी शोधायला सुरुवात केली असेल ना."
" हो. काल आणि आज दिवसभर ठिकठिकाणी काहीतरी कामधंदा पाहण्यासाठी भटकत होतो, पण..."
" पण ? मनासारखी नोकरी कुठे मिळाली नाही का ? "
" अहो आता कसली मनासारखी नोकरी नि कसलं काय. फक्त जरा बऱ्यापैकी पगाराची, आणि कोणतही साधं सरळ, इज्जतीचं काम असलेली नोकरी मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे, पण तीही पूर्ण होणं अवघड दिसत आहे. अर्थात माझ्यासारख्या एका मोठ्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात जाऊन आलेल्याला माणसावर विश्वास ठेवून कोण नोकरी देणार म्हणा. साहजिकच आहे. " रमण खिन्नतेने म्हणाला.
" रमण. म्हणजे तू झटपट पैसे कमावण्यासाठी एक अत्यंत चुकीचा, बेकायदेशीर मार्ग अवलंबला होतास, याची तुला जाणीव झालीय तर ? " अगदी हळूवारपणे, विचारपूर्वक एकेक शब्द उच्चारीत मेढेकर बोलत होते.
" हो हो. अर्थात." रमण चटकन उत्तरला.
" मग पुन्हा त्या मार्गाने तू जाणार नाहीस याची तुला खात्री आहे का ? " त्याच्या अंतर्मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत मेढेकरांनी विचारलं.
" हो. आहे." रमण लगेचच निश्चयी सुरात उद्गारला.
" हम्म." ते मान डोलावून पुढे म्हणाले. " रमण. राग मानू नकोस ; पण तू थोडासा कामधंदा करण्याच्या, मेहनत करण्याच्या बाबतीत आळस करणारा होतास. - खरंतर ' होतास ' हा शब्द मेढेकरांनी जाणूनबुजूनच वापरला होता. - आता प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची तुझी तयारी आहे का ? "
" होय."
मेढेकर काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. मग पुढे म्हणाले -
" माझ्या ऑफिसमध्ये सध्या ... ..ची जागा मोकळी आहे. मी माझ्या वरिष्ठांशी तुझ्याबद्दल बोललो आहे. सगळं नीट समजावून सांगितलं आहे. इच्छा असेल तर परवा त्यांनी इंटरव्ह्यू साठी यायला सांगितलं आहे."
रमणला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. स्वतः ला सावरून तो म्हणाला -
" हो. ऑफकोर्स माझी तयारी आहे. थॅंक्यू."
मेढेकरांंनी त्यावर केवळ स्मित केलं. थोड्या वेळानंतर तो आपल्या घरी निघून गेला. मेढेकर शांतपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते.
मेढेकर मघाशी रमणशी बोलत असताना त्याचं, त्याच्या देहबोलीचं बारकाईने निरीक्षण करत होते. त्याचा खरेपणा चाचपून बघत होते. त्यांना लक्षात आलं की रमण जे काही बोलतोय ते सगळं अगदी मनापासून, Genuinely बोलत आहे. रमणला आपल्या कृत्याचा खरोखरच पश्चात्ताप झाला आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून, मेहनत करून पुढचं आयुष्य सरळ मार्गाने जगण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. आणि पूर्णपणे तयारी आहे. त्याला आता गरज होती ती फक्त एका संधीची. आणि ती त्याला मिळवून देण्यासाठी मेढेकरांनी जमेल तसा प्रयत्न केला होता रमण या संधीचं सोनं करेल याबाबत मेढे करांना खात्री होती ; पण या उलट सद्य परिस्थितीत रमणला अशी एकच संधी मिळालीच नसती तर...
रमणला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता. पुन्हा त्या वाटेने जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. हे असे शॉर्ट कट्स सोडून देऊन मेहनत करून, सरळ मार्गाने जगण्याचा त्याने मनाशी निश्चय केला होता. आणि तो मनापासून, ठामपणे केलेला होता. प्रश्नच नव्हता. तो निश्चयाप्रमाणे नक्कीच वागणारही होता, यातही कुठलीच शंका नव्हती ; पण कष्ट करून सुखी, सरळमार्गी आयुष्य जगण्याची इच्छा असूनही, त्यासाठी इतके प्रयत्न करूनही जर त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसेल तर मात्र काही काळाने त्याचा हा निश्चय कदाचित डगमगला असता. साधं सुखी आयुष्य जगण्यासाठीही पैसा तर हवाच ना. तोच नसेल तर.. शेवटी तोही सामान्य माणूसच होता. त्याच्या सहनशक्तीला मर्यादा होत्या. प्रत्येक वेळी अपयश आणि निराशाच हाती आली असती तर त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला असता. तो पुन्हा चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असं झालं असतं तर मात्र रमणचं ' तिथून ' परतणं, माणसात येणं अशक्यप्राय होऊन बसलं असतं. त्याचं सारं आयुष्यच बरबाद झालं असतं ; आणि तसं काही घडू नये या सद्भावनेतूनच मेढेकरांनी रमणला मदत केली होती.
रमणने पूर्ण आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. तो हुशार होताच. त्याची बुद्धीमत्ता, कॉन्फिडन्स आणि अॅटीट्युड बघून परीक्षक प्रभावित झाले होते.
पुढे तो जॉब त्यालाच मिळाला. रमणने आपल्या मनाशी केलेल्या निश्चयाप्रमाणे आळस, कामचुकारपणा पूर्णतः झटकून टाकला. मन लावून अगदी उत्साहाने काम करण्यास प्रारंभ केला. त्याच्यातून एक नवा रमण ; प्रामाणिक, हुशार, कामसू असलेला रमण निर्माण झाला होता. आपल्या कामात तो स्वतः ला झोकून देऊ लागला. आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू लागला. वरिष्ठ त्याच्या कामावर खूष होते.
रमण आज मेढेकरांच्या घरी आला होता. कामावर रुजू झाल्यानंतर जवळ जवळ वर्षभरातच रमणला प्रमोशन मिळालं होतं. त्याचे पेढे देण्यासाठीच तो आला होता.
" दादा -" रमण मेढेकरांना आदराने दादा म्हणून संबोधत असे. " तुमच्यामुळेच मी आज सुखी आयुष्य जगतोय. माझ्या त्या बिकट परिस्थितीत तुम्ही मला मदत केलीत. म्हणून मला ही प्रगती करता आली."
" नाही रे. तू एक सभ्य, सुशिक्षित तरुण आहेस. एकदा तू जी चूक केलीस, तिच्यातून सावरून प्रामाणिकपणाने, कष्ट करून आयुष्य जगण्याची तुझी मनापासून इच्छा व तयारी होती. गरज होती ती फक्त एका संधीची. ती तुला मिळावी यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केला. बस."
" ती संधीच तर माझ्यासाठी महत्वाची होती. ती तुमच्यामुळे मिळाली, म्हणून मी माझं आयुष्य सावरू शकलो. खरोखरच तुमच्यासारखा मोठ्या भावासारखा मार्गदर्शक मला शेजारी म्हणून लाभल्याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी राहीन."
मेढेकरांनी काही नं बोलता फक्त मंदसे स्मित केले.
समाप्त
@ प्रथमेश काटे
१००
१००
केशवकुल- मला नाही असे वाटत...
केशवकुल- मला नाही असे वाटत... हा एकच व्यक्ती आहे जो परत परत वेगवेगळे आयडी घेऊन येतो... माझा अंदाज-
मानसिक रोग नसावा...
रिटायर्ड आहे बहुतेक ज्याचे उद्दिष्ट्य फक्त टाईमपास आहे...
भारतात असावा कारण मेजॉरिटी कमेंट्स इंडियन टाईम मध्ये असतात...
हा कसला टाईमपास? हा
हा कसला टाईमपास? हा क्रूरपणा आहे.
देवा, उचील रे मला!
देवा, उचील रे मला!
कसला टाईमपास? हा क्रूरपणा आहे
कसला टाईमपास? हा क्रूरपणा आहे
हे स्टेटमेंट इतराना अंधभक्त भक्ताडे उगीच म्हणताना बी ध्यानात असू द्यावे म्हाराज
कहासे कहा.
कहासे कहा.
हम किस गलीमे आ गये है. पना कोई ठिकाना नही.
और मायबोली पे किया हुवा
और मायबोली पे किया हुवा स्टेटमेंट कोई भूलता नही
ही अशीच सुरुवात होत असते (नाहक कोणाला दुखावणे वा तत्सम) ट्रोल आणि ड्यू आयडी वाल्यांची ह्यासाठी फक्त माझ्या माहितीतील उदाहरण दिलंय.
हा काते ह्येंच्यातला हाये हे
हा काते ह्येंच्यातला हाये हे आत सिदध झाल. >> तू माझ्या कथेवर ' येकदम भन्गार ' अशी कमेंट केली तिथून आपला वाद सुरू झाला. आधी तू Limit cross केलीस म्हणून. नाहीतर मला तुझ्या नादी लागण्याची हौस नव्हती. मी कुणाशी सामील नाही.
रिक्षाचालक- गूगल इंडिक
रिक्षाचालक- गूगल इंडिक कीबोर्ड एप वापरा- काय लिहिता कळायला सोपे पडेल... बाकी तुमची मर्जी...
एक वर्ष सहन करा त्यांना आहे
एक वर्ष (किंवा तुम्ही /एडमिन त्यांचा आयडी उडवत नाही तोवर) सहन करा त्यांना आहे त्या कीबोर्ड वरून च्रप्स
तुम्हाला सुद्धा अनेक वेळा अनेक जणांनी सांगून सुद्धा किती महिन्या नंतर वापर सुरु केला ते एकदा आठवून पहा
मला माहित नाही आत काय झाल ते.
मला माहित नाही आत काय झाल ते.
परन्तु मी त्या धाग्यावर वार्निन्ग टाकली, violation ची
admin (Sameer Sarawate) => mail takali asking them to remove the story as it was a violation.
Within an hour I saw it was taken down and the id doesn't seem to be there either.
मी खूप घाबरलो आहे, आणि म्हणून
मी खूप घाबरलो आहे, आणि म्हणून पळून जात आहे.
माझा आयडी उडवू नका प्लीज!
अले ढमक्या, तुला हउस नवति तर
अले ढमक्या, तुला हउस नवति तर मग चन्दिफन्दि
यान्च्या धाग्यवर जाउन हि हउस का दाकवलि रे
दुरक्या ? >> अच्छा त्या सगळ्यांचा प्रतिनिधी ( या शब्दाचा अर्थ मला नाही समजावता येणार रे व्याकरण द्वेष्ट्या. स्वारी बाबा.) बनून तू माझ्या पोस्टवर कमेंट केलीस तर. फारच खाज आहे तुला इतरांचा मसीहा बनायची. आला थोबाड वर करून मुर्खासारखी टीका करायला, आणि स्वतः मुर्ख आहेस हे सगळ्यांसमोर दाखवायला. ठिक आहे माझा जरा गैरसमज झाला होता. आणि अविचाराने मी कमेंट करून टाकली. ती माझी चूक झाली होती. आणि मी ती मान्यही केली ; पण मी आरोप करतानाही सभ्य भाषा वापरली होती. आणि माझ्या मनात काय विचार चालले होते, माझ्या अशा वागण्यामागे काय कारण होतं हे माझं मलाच माहिती. ते तुझ्यासारख्या मठ्ठ डोक्याच्या माणसाला नाही कळणार.
तुल कमेन्तच पायजे तर मग मि केलि कमेन्त. ति पन तुला
पायजेल तशिच करायचा नीयम कुनि बनवला ? >> माझ्या अपेक्षेप्रमाणेच कमेंट असावी अशी काही माझी अपेक्षा नव्हतीच. कुणाला कथा आवडली नाही तर त्यांच्याकडून प्रतिकूल मतं स्वीकारायची तयारी होतीच माझी ; पण ती सभ्य भाषेत असायला हवी एवढंच. आणि असायलाच पाहिजे भाषा सभ्य. नसेल तर आधी शिकावी आणि मगच अशा वेबसाईट्स वैगेरेंवर सक्रिय व्हावं. अडाणी कुठचा. मॅनर्सलेस.
•••••••
ज्या आयडीने आपल्या धाग्यावर आपल्या मतांशी
सहमत नसणार्यांना झोड झोड झोडपले आहे >> माझ्या मतांशी सहमत असण्या नसण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त कमेंट्स सभ्य भाषेत, आणि मर्यादेत असाव्यात हीच माफक अपेक्षा होती माझी ; पण बऱ्याच जणांनी आक्रमक पवित्रा घेऊनच टीका केली, आणि त्यांना तशीच उत्तरे मिळाली. मी हे सगळंच बहुदा मागच्या रिप्लाय मध्ये स्पष्ट केलं आहे. तो रिप्लाय वाचला नसावा बहुतेक, कारण इतरांवर विनाकारणघ तोंड सोडायचं म्हटल्यावर त्याची गरजच नाही. आणि म्हणूनच माझ्या पोस्ट्स आणि त्यांवर नक्की कशा प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या, हेही माहिती नसणार. नाही का ? उगाच बोलायचं म्हणून बोलायचं.
त्यामुळे
त्याच्या कथांकडे माबोकरांनी दुर्लक्ष केल्यावर
भलत्याच ठिकाणी जाऊन माबोकरांवर आरोप करत
खुस्पट काढले आणि मग आरोप केले म्हणून प्रतिकूल
प्रतिसाद दिल्यावर पुन्हा झोडपणे चालू केले आहे, >> मी आधी बऱ्याचदा स्पष्ट केलं आहे की अनुकूल प्रतिकूल सर्व मतांचं स्वागतच असेल. पण मर्यादा पाळली गेली पाहिजे. आणि ही कसली भाषा ? अंगावर धावून गेले, झोडपणे चालू केले वैगेरे ?
इकडे कंटाळा आला म्हणून "तिकडे
इकडे कंटाळा आला म्हणून "तिकडे" वाचायला गेलो. तर तिथे रत्नांचा खजिनाच हाती लागला.
त्यातली काही गाळीव रत्ने!
१.आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर/कथांवर विरजण घालून मिळेल.
२.रामोन ल्युलची "चरम कला" - माकडांसाठी समयसाधक यंत्र
25 Oct 2009 - 3:57 am | धनंजय
रामोन ल्युल या १३व्या शतकातील विचारवंताने माकडांची सोय करण्यासाठी टंकलेखकाऐवजी एक चांगले यंत्र (कल्पनेत) बनवले. त्यात एक चक्र फिरवले की कुठलेही नाम, एक चक्र फिरवले की कुठलेही क्रियापद... अशा प्रकारे शब्द निवडून वाक्य तयार होते.
या प्रकारे अगदी बिनडोक पद्धतीने तयार केलेले वाक्यही "अर्थपूर्ण" निघेलच अशी व्यवस्था होते. अशा प्रकारे हॅम्लेट लिहिण्यासाठीचा वेळ थोडा कमी होईल. कदाचित "टु बी ऑर नॉट टु बी" वाक्य शंभरएक वर्षांत लिहूनही होईल.
३.काही माकडांना हाकलून लावल्यानंतरही वेगळ्याच रंगाचे ढुंगण धारण करून येतात. वेगळ्या रंगाचा पृष्ठभाग धारण केल्यावर त्यांचे टंकन अधिकाधिक प्रमाणात होते.
(#metoo)हे कंसातले माझे आहे बरका. -केकू
https://misalpav.com/node/9875
मुळातून प्रतीवादान्सकट वाचावे. वेळ सत्कारणी लागेल अशी आमची गॅॅरंंटी!
आणि विज्ञानाचे ज्ञान वाढवायचे असेल तर
TeV is about the energy of motion of a flying mosquito. What makes the LHC so extraordinary is that it squeezes energy into a space about a million million times smaller than a mosquito. TeV stands for tera electron Volts. That is 1,000,000,000,000 electron Volts or 10^12 electron Volts
हे मायबोलीचे सर्वेसर्वा आहेत
हे मायबोलीचे सर्वेसर्वा आहेत का ?
नवीन Submitted by सामना on 27 August, 2023 - 23:11
>>> येस ... बराबर बोला ... तुमची कळकळ समजतेय पण इथे विषयांतर नकोच प्लिज...
विषयांतर नकोच प्लिज...>>>
विषयांतर नकोच प्लिज...>>>
थॅंक्यू अॅडमिन
थॅंक्यू अॅडमिन
Pages