संधी

Submitted by प्रथमेश काटे on 8 August, 2023 - 02:18

संधी

‌‌ उन्हे उतरत आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस घरांच्या रांगा होत्या. काही दगड विटांच्या वा मातीच्या भिंती, पत्र्याच्या जागोजागी पडलेल्या कौलांच्या छतांची साधी घर होती. काही सिमेंटची, कौलारू, थोडीफार टापटीप घरे होती. एखादे बऱ्यापैकी रंगरंगोटी केलेले, एक मजलीच ; पण जरासे ऐसपैस बंगलीवजा घर होते. रस्त्यावरून तो चालला होता. फिकुटलेला चेहरा, दाढीचे खुंट वाढलेले, केस विस्कटले होते. डोळे खोल गेलेले होते.
तो होता रमण. बत्तीस वर्षांचा तरुण. त्याची अशी अवस्था होण्याला तसंच कारणही होतं. आज तो त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून - तुरुंगवास भोगून येत होता. त्याच्या घरासमोर येऊन तो थांबला. तोच, शेजारच्या घरातला मुलगा बॉलशी खेळत खेळत रस्त्यावर आला. रमणची नजर त्याच्याकडे गेली. त्या मुलाने ही रमण कडे पाहिलं. रमाणने स्मित केले. लहानग्याचा चेहराही फुलला ; पण पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद मावळून त्यावर काहीशी भीती उमटली. झटकन बॉल उचलून तो घरात पळून गेला. रमण काय ते समजून गेला. खिन्न चेहऱ्याने तो आपल्या घराकडे वळणार तोच त्याला पाठीमागून हाक आली. त्याने पाहिलं तर त्याच्या घराच्या समोरच असलेल्या त्या एक मजली बंगल्याच्या पोर्चमध्ये एक गृहस्थ हसऱ्या चेहऱ्याने उभे होते. ते अर्थात रमणचे शेजारीच होते. श्री. मेढेकर. त्यांनी रमणची आस्थेने विचारपूस केली. त्याला बरं वाटलं जरा आश्चर्य ही वाटलं. आता आपल्याला ओळखणाऱ्यांपैकी अगदी कुणीच चांगली वागणूक देणार नाही असं त्याला वाटलं होतं. मेढेकरांशी दोन शब्द बोलून तो घराकडे गेला.

रमण चांगला शिकला सवरलेला तरूण ; पण काहीसा आळशी व कामचुकार. सधन घरामध्ये लाडाकोडात वाढलेला असल्याने मेहनत करण्याची गरज व त्यामुळे सवय नव्हती. इच्छा तर त्याहून नव्हती. शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने नोकरी सुरू केली ; पण रस नं वाटल्याने काही दिवसातच ती नोकरी सोडून दिली. पुढेही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या धरून काही महिन्यात सोडून दिल्या. एकटा असताना ठिक होतं. पुढे लग्न झालं. पत्नीही चांगल्या पगाराच्या खासगी नोकरीत होती. तेव्हा तर त्याने प्रयत्न करणं ही कमी केलं. पत्नीच्या पगारावरच घर चालू लागलं. पुढे त्यांना एक मुलगी झाली. आता बायकोला काही काळ नोकरी वैगेरे करणं शक्य नव्हतं. तेव्हा नाईलाजाने पुन्हा त्याला कामधंद्याचा शोध घ्यायला सुरुवात करावी लागली. आणि आता तो एकटाही नव्हता. खांद्यावर जबाबदारी होती ; पण म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं. पुन्हा आधी सारखं नोकरी धरून, काही दिवसात सोडून देणं सुरू झालं. बायकोने विचारल्यावर ' कामांच्या मानाने पगार मिळत नाही.' अशी काहीतरी सबब सांगायचा ; पण तिला रमणचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. तिनं अनेकवार रमणला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ; पण त्याच्यात काही फरक पडला नाही. मग वारंवार त्यांच्यात भांडणं होऊ लागली. रमणला फारशी मेहनत न करता पैसे कमवावेसे वाटत होते. एकदा, त्याला चांगलंच ओळखून असणारा त्याचा एक मित्र त्याला एका व्यक्तीकडे घेऊन गेला. त्या व्यक्तीनं रमणवर एक कामगिरी सोपवली. कसलीतरी बेकायदेशीर कागदपत्रं पोहोचविण्याचं काम होतं. रमणला ते फारसं पटत नव्हतं खरं, मात्र मोबदल्यात मिळणारी रक्कम समजताच तो तयार झाला. चांगलं - वाईट, कायदेशीर - बेकायदेशीर या केवळ माणसाच्या मनातील कल्पना आहेत. झटपट पैसे कमवायचे तर काहीही करावं लागतं, अशी रमणने स्वतःची समजूत घातली. त्याने काम हाती घेतलं खरं ; पण ते पूर्ण होण्याआधीच त्याला पोलिसांनी पकडलं. त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला व त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्याच्या बायकोला तर धक्काच बसला. तिचे आई वडील तिला व बाळाला आपल्या घरी घेऊन गेले. तुरुंगातील एकेक दिवस रमणसाठी असह्य होता, त्यात पत्नी बाळ घेऊन त्याला सोडून गेल्यावर तर त्याच्या दु:खात अजूनच भर पडली. मग मात्र इथून बाहेर पडल्यावर प्रामाणिकपणे पडेल ते काम करून, मेहनत करून अभिमानाने, समाधानी आयुष्य जगायच असा त्याने मनाशी निश्चय करून टाकला होता.

बरेच दिवस रिकामं असल्याने घरात खूप धूळ, जाळी जळमटं झाली होती. तो उर्वरित दिवस घराची साफसफाई इ. मध्येच गेला. रात्री आठ - सव्वा आठला थकून भागून तो टीव्ही पाहायला बसला होता. अजून जेवण बनवायचं बाकी होतं. इतक्यात दारावरची बेल वाजली. त्यांनी लगबगीने उठून दरवाजा उघडला. दारात मेढेकर उभे होते. हे मेढेकर असतील साधारण पंचेचाळीशीचे. उंच, मध्यम अंगकाठी. सावळा रंग, चष्म्याआडचे घारे, भेदक डोळे त्यांच्या हुशारीची साक्ष देत होते. अर्थात ते होतेच विचारी, आणि चाणाक्ष. आणि तितकेच समंजस व सहृदय होते. रमणला जेल होण्याच्या नऊ - दहा महिने अगोदरच ते इथे राहायला आले होते ; पण फारच कमी वेळात रमणच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे व आपुलकीचे स्थान निर्माण झाले होते. ' त्या चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या मित्रापेक्षा यांच्यासारख्या माणसाच्या संगतीत राहिलो असतो तर किती बरं झालं असतं.' त्यांच्याकडे पाहता पाहता रमणच्या मनात एकदम विचार डोकावून गेला.

त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यांच्या पत्नीने रमणसाठी व त्यांच्यासाठी जेवणाचा डबा दिला होता. रमणसोबतच रात्रीचं जेवण करण्याचा त्यांचा विचार होता. त्याने मेढेकरांचे हसून स्वागत केले. मग दोघांनीही गप्पा मारत जेवण केले. मेढेकरांची विनोदबुद्धी लाजवाब होती. त्यांनी आपल्या व्यवसायातील अनेक गमती जमती सांगितल्या. त्यांच्याशी बोलता बोलता रमणचं गांभीर्य, उदासीनता बरंचसं कमी झालं. तोही मोकळेपणाने बोलू लागला.‌ मेढेकरांच्या मनात काहीतरी बोलायचं होतं ; पण ते बोलले मात्र नाहीत. ही वेळ बहुदा त्यांना त्यासाठी योग्य वाटली नसावी. जेवून झाल्यावर काही वेळाने ते घरी गेले.

•••••••

दुसऱ्या दिवशी रमण ला उठायला अंमळ उशीरच झाला. ते साहजिकच होते. शारीरिक नसला, तरी मानसिक थकवा खूप आला होता. काल रात्री बऱ्याच दिवसांनंतर त्याला समाधानाची विश्रांती मिळाली होती.
पटापट शेव्ह करून, आंघोळ करून तो तयार झाला. त्याचं कालचं अजागळ रूप पूर्णपणे पालटलं होतं. सफेद फॉर्मल शर्ट आणि काळी पॅन्ट अशा साध्या पण सोबर पोशाखात त्याचं मूळचं साध्या सरळ, सुशिक्षित तरूणांचं रूप आरशात पाहून त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधान झळकत होतं.

तो बाहेर निघण्याच्या तयारीत होता, तोच सौ. मेढेकर टिफीन घेऊन आल्या. त्यांनी रमणची प्रेमाने विचारपूस केली. त्यावरून त्यांनादेखील रमणबद्दल घृणा, तिरस्कार वैगेरे बिलकुल वाटत नव्हता हे स्पष्टच होतं. रमण मनोमन सुखावला. तशा सौ. मेढेकर ही समजूतदार व प्रेमळ स्वभावाच्या होत्या.
नाश्ता उरकून रमण जो घराबाहेर पडला, तो थेट रात्री साडेआठ नऊच्या सुमारास घरी परतला. तेव्हा तो खूप थकलेला तर होताच, मात्र त्यापेक्षाही अधिक दु:खी, चिंतित अन निराश झालेला दिसत होता.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी रमण असा घराबाहेर असतानाच त्याला मेढेकरांचा फोन आला. त्यांनी रमणला घरी बोलावलं होतं. खरंतर इतक्यात रमणला घरी जायचं नव्हतं ; पण मेढेकरांचं मन मोडणं त्याला पटलं नाही. शिवाय नक्की काय काम असावं अशी एक उत्सुकताही मनात निर्माण झाली होतीच. त्यामुळे लगोलग त्याने परतीचा रस्ता धरला.

मेढेकरांच्या घरात, हॉलमधील सोफ्यावर मेढेकर बसले होते. शेजारील कोचावर रमण बसला होता. नुकतंच त्यांचं जेवण उरकलं होतं. आता दोघेही आरामात गप्पा मारत बसले होते. नेहमीप्रमाणे हास्यविनोद सुरू होते ; पण रमणला मात्र मेढेकरांचं त्याच्याकडे काय काम असावं हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. थोडावेळ इकडचं तिकडचं बोलून मेढेकर मूळ मुद्द्यावर आले -

" रमण, तू नोकरी शोधायला सुरुवात केली असेल ना."

" हो. काल आणि आज दिवसभर ठिकठिकाणी काहीतरी कामधंदा पाहण्यासाठी भटकत होतो, पण..."

" पण ? मनासारखी नोकरी कुठे मिळाली नाही का ? "

" अहो आता कसली मनासारखी नोकरी नि कसलं काय. फक्त जरा बऱ्यापैकी पगाराची, आणि कोणतही साधं सरळ, इज्जतीचं काम असलेली नोकरी मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे, पण तीही पूर्ण होणं अवघड दिसत आहे. अर्थात माझ्यासारख्या एका मोठ्या गुन्ह्याबद्दल तुरुंगात जाऊन आलेल्याला माणसावर विश्वास ठेवून कोण नोकरी देणार म्हणा. साहजिकच आहे. " रमण खिन्नतेने म्हणाला.

" रमण. म्हणजे तू झटपट पैसे कमावण्यासाठी एक अत्यंत चुकीचा, बेकायदेशीर मार्ग अवलंबला होतास, याची तुला जाणीव झालीय तर ? " अगदी हळूवारपणे, विचारपूर्वक एकेक शब्द उच्चारीत मेढेकर बोलत होते.

" हो हो. अर्थात." रमण चटकन उत्तरला.

" मग पुन्हा त्या मार्गाने तू जाणार नाहीस याची तुला खात्री आहे का ? " त्याच्या अंतर्मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत मेढेकरांनी विचारलं.

" हो. आहे." रमण लगेचच निश्चयी सुरात उद्गारला.

" हम्म." ते मान डोलावून पुढे म्हणाले. " रमण. राग मानू नकोस ; पण तू थोडासा कामधंदा करण्याच्या, मेहनत करण्याच्या बाबतीत आळस करणारा होतास. - खरंतर ' होतास ' हा शब्द मेढेकरांनी जाणूनबुजूनच वापरला होता. - आता प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, कष्ट करण्याची तुझी तयारी आहे का ? "

" होय."

मेढेकर काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. मग पुढे म्हणाले -

" माझ्या ऑफिसमध्ये सध्या ... ..ची जागा मोकळी आहे. मी माझ्या वरिष्ठांशी तुझ्याबद्दल बोललो आहे. सगळं नीट समजावून सांगितलं आहे. इच्छा असेल तर परवा त्यांनी इंटरव्ह्यू साठी यायला सांगितलं आहे."

रमणला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. स्वतः ला सावरून तो म्हणाला -

" हो. ऑफकोर्स माझी तयारी आहे. थॅंक्यू."

मेढेकरांंनी त्यावर केवळ स्मित केलं. थोड्या वेळानंतर तो आपल्या घरी निघून गेला. मेढेकर शांतपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते.

मेढेकर मघाशी रमणशी बोलत असताना त्याचं, त्याच्या देहबोलीचं बारकाईने निरीक्षण करत होते. त्याचा खरेपणा चाचपून बघत होते. त्यांना लक्षात आलं की रमण जे काही बोलतोय ते सगळं अगदी मनापासून, Genuinely बोलत आहे. रमणला आपल्या कृत्याचा खरोखरच पश्चात्ताप झाला आहे. प्रामाणिकपणे कष्ट करून, मेहनत करून पुढचं आयुष्य सरळ मार्गाने जगण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. आणि पूर्णपणे तयारी आहे. त्याला आता गरज होती ती फक्त एका संधीची. आणि ती त्याला मिळवून देण्यासाठी मेढेकरांनी जमेल तसा प्रयत्न केला होता रमण या संधीचं सोनं करेल याबाबत मेढे करांना खात्री होती ; पण या उलट सद्य परिस्थितीत रमणला अशी एकच संधी मिळालीच नसती तर...
रमणला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता. पुन्हा त्या वाटेने जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. हे असे शॉर्ट कट्स सोडून देऊन मेहनत करून, सरळ मार्गाने जगण्याचा त्याने मनाशी निश्चय केला होता. आणि तो मनापासून, ठामपणे केलेला होता. प्रश्नच नव्हता. तो निश्चयाप्रमाणे नक्कीच वागणारही होता, यातही कुठलीच शंका नव्हती ; पण कष्ट करून सुखी, सरळमार्गी आयुष्य जगण्याची इच्छा असूनही, त्यासाठी इतके प्रयत्न करूनही जर त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नसेल तर मात्र काही काळाने त्याचा हा निश्चय कदाचित डगमगला असता. साधं सुखी आयुष्य जगण्यासाठीही पैसा तर हवाच ना. तोच नसेल तर.. शेवटी तोही सामान्य माणूसच होता. त्याच्या सहनशक्तीला मर्यादा होत्या. प्रत्येक वेळी अपयश आणि निराशाच हाती आली असती तर त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला असता. तो पुन्हा चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असं झालं असतं तर मात्र रमणचं ' तिथून ' परतणं, माणसात येणं अशक्यप्राय होऊन बसलं असतं. त्याचं सारं आयुष्यच बरबाद झालं असतं ; आणि तसं काही घडू नये या सद्भावनेतूनच मेढेकरांनी रमणला मदत केली होती.

रमणने पूर्ण आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. तो हुशार होताच. त्याची बुद्धीमत्ता, कॉन्फिडन्स आणि अॅटीट्युड बघून परीक्षक प्रभावित झाले होते.
पुढे तो जॉब त्यालाच मिळाला. रमणने आपल्या मनाशी केलेल्या निश्चयाप्रमाणे आळस, कामचुकारपणा पूर्णतः झटकून टाकला. मन लावून अगदी उत्साहाने काम करण्यास प्रारंभ केला. त्याच्यातून एक नवा रमण ; प्रामाणिक, हुशार, कामसू असलेला रमण निर्माण झाला होता. आपल्या कामात तो स्वतः ला झोकून देऊ लागला. आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू लागला. वरिष्ठ त्याच्या कामावर खूष होते.

रमण आज मेढेकरांच्या घरी आला होता. कामावर रुजू झाल्यानंतर जवळ जवळ वर्षभरातच रमणला प्रमोशन मिळालं होतं. त्याचे पेढे देण्यासाठीच तो आला होता.

" दादा -" रमण मेढेकरांना आदराने दादा म्हणून संबोधत असे. " तुमच्यामुळेच मी आज सुखी आयुष्य जगतोय. माझ्या त्या बिकट परिस्थितीत तुम्ही मला मदत केलीत. म्हणून मला ही प्रगती करता आली."

" नाही रे. तू एक सभ्य, सुशिक्षित तरुण आहेस. एकदा तू जी चूक केलीस, तिच्यातून सावरून प्रामाणिकपणाने, कष्ट करून आयुष्य जगण्याची तुझी मनापासून इच्छा व तयारी होती. गरज होती ती फक्त एका संधीची. ती तुला मिळावी यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केला. बस."

" ती संधीच तर माझ्यासाठी महत्वाची होती. ती तुमच्यामुळे मिळाली, म्हणून मी माझं आयुष्य सावरू शकलो. खरोखरच तुमच्यासारखा मोठ्या भावासारखा मार्गदर्शक मला शेजारी म्हणून लाभल्याबद्दल मी परमेश्वराचा ऋणी राहीन."

मेढेकरांनी काही नं बोलता फक्त मंदसे स्मित केले.

समाप्त
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जर त्यांची कमेंट चालवून घेता येत असेल तर माझं उत्तरही चालवून घ्यायलाच लागेल. किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई करायची म्हटलं तरी दोघांवर करावी लागेल, माझ्या एकट्यावर करता येणार नाही>> प्रतिसाद देऊन चुक झाली. माफी असावी.

कुठल्याही प्रकारची कारवाई करायची म्हटलं तरी दोघांवर करावी लागेल, माझ्या एकट्यावर करता येणार नाही
,,>>>>>>>

हो, तुम्ही देखील पातळी सोडली तर दोघांवर कारवाई होईल.
दोघांचा आयडी उडेल.
ते दुसरा आयडी घेऊन परत अवतरतील. तुम्ही काय करणार सांगा Happy

तुम्हाला कोणी इथे अन्याय सहन करायला बिलकुल सांगत नाहीये. उलट एखादे सेलिब्रिटी असल्यासारखे वागा. अश्या टीका इग्नोर करा.

उदाहरणार्थ तो कमाल खान नेहमी शाहरुखवर पातळी सोडून टीका करत असतो. तुम्ही कधी शाहरूखला पाहिले आहे का त्याला सिरीअसली घेताना? नाही ना.. का ते विचार करा Happy

याउपर एडमिन कडे तक्रार करायचा पर्याय उपलब्ध आहेच. मी तर ते कष्टही कधी घेतले नाहीत. कारण मी खरेच स्वताला मायबोलीचा शाहरूख समजतो Happy

कथा उद्या वाचतो. आता झोप आलीय. शुभ रात्री Happy

याउपर एडमिन कडे तक्रार करायचा पर्याय उपलब्ध आहेच. >> जर च्रप्स यांच्याकडे अ‍ॅडमिनचा पासवर्ड असेल तर तुम्हाला गरज नाहीच. पण च्रप्स हे स्वतःच साधा माणूस सारखा आयडी घेऊन माझ्या धाग्यावर विनाकारण त्रास देत असतील तर तक्रार कुणाकडे करणार ? जे उडत नाहीत ते आयडी च्रप्स यांच्या मर्जीतले. जे नकोत त्यांच्यावर काही आयडी सोडण्यात येतात. ते उडणार नाहीत.

लेखकाच्या चित्रपट संगीताचा प्रवास या हिट धाग्यावरचे प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. त्यातली एक कमेंट.
Screenshot_20230814_075628_Chrome.jpg

तुम्हाला कोणी इथे अन्याय सहन करायला बिलकुल
सांगत नाहीये. उलट एखादे सेलिब्रिटी असल्यासारखे
वागा. अश्या टीका इग्नोर करा. >> Correct आहे सर. आता नक्की असंच करेल. थॅंक्यू. एक चांगले लेखक असण्यासोबत तुम्ही एक हुशार, समंजस व्यक्तीही आहात हे समजलं. खूप थॅंक्यू.

ढंपस टंपू - थॅंक्यू सर. माझ्या, प्रत्येक कमेंट्स वर offend होण्यामुळे मी एक अविचारी, रागीट मनुष्य असल्याचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असता ; पण तुम्ही मी कमेंट्स करणाऱ्यांना दिलेल्या replies चा अगदी योग्य असा स्क्रीनशॉट टाकून माझी संयम, समजूतदारपणा ( जो प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावेळी मी जरा कमीच दाखवला. मात्र आता अजून धीराने, समजूतदारपणाने वागेन ) ही दुसरी बाजूही दाखवलीत. आभारी आहे. आणि माझ्या कमेंट्स ही आपल्याला वाचनीय वाटतात, हे वाचून आनंद झाला. माझ्या कथाही नक्की वाचा, त्या देखील आपल्याला अजूनच आवडतील.

@ऋन्मेष - आणि कथा आठवणीने नक्की वाचा. आपल्याला आवडेल अशी खात्री आहे. प्रतिसाद ( अनुकूल / प्रतिकूल कसाही असला, तरी स्वागतच आहे.) द्यायला बिलकूल विसरू नका.

प्रथमेश
एक खूप जुना मायबोलीवर म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमच्या लेखानावर लक्ष केंद्रीत करा.
काही वाचक कदाचित तुम्हाला मुद्दाम डीवचण्याचा प्रयत्न करत असतील, तुमच्या इतर लेखांवरच्या कमेंट्स पट्कन चाळल्या, तिथंही असा प्रकार झाल्या सारखं वाटलं.
तुमचे लेख, कथा वेगळ्या प्रकारच्या आहेत, माझ्या सारखे तुमच्या लेखनाचे चाहते इथे आहेत, आणि तुमच्या कडून खूप अपेक्षा ठेवत आहोत.

तुमची ही कथा खूप आवडली, सेकंड चान्स मिळायला हवा आणि त्याच सोन करण्या इतपत बदल स्वतः मधे घडवावा लागतो.
हे खरंय की कथा वाचताना काही तरी वाईट घडणार, ट्विस्ट येणार अस वाटत होत पण हे सद्य परिस्थितीत घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या वर किती परिणाम होतोय ह्याच उदाहरण आहे, एक साधी सरळ गोष्ट सुध्दा आपल्याला अनपेक्षित वाटते पण खरंच असे मेढेकर वास्तवात असावेत.

अवघ्या कालातील एक अत्यंत सुंदर मराठी कथा ही आहे - मुख्य पात्र रमण व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी प्रेरित होतील. परिपूर्ण व्यक्तिमत्व, त्याच्या भावनांची विविधता आणि त्याच्या आत्मविश्वासाची या कथेतील चार्मिंग घटनांनी वाचनांकनांतर अत्यंत कौतुकपूर्ण प्रभाव उत्पन्न करतो. ह्या कथेच्या आधारे, व्यक्तिमत्वाची मूल मूर्तीची अद्वितीयता आणि त्याच्या भावनेच्या सुंदरतेची मराठी साहित्यातील एक मातीची उच्चतम प्रतिष्ठा आहे.

@manya - धन्यवाद. आणि होय मी आतापासून ' असल्या ' प्रकारांकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे. आणि हे चाहता वैगेरे म्हणून तुम्ही मला लाजवत आहात सर. मी आपला एक beginner आहे. तुमच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.
कथेचा मतितार्थ आपल्या बरोबर लक्षात आला आहे.

•••••

प्रतिसाद देऊन चुक झाली. माफी असावी. >> सर प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आपला हेतू नक्कीच प्रामाणिक होता हे मला माहीत आहे. मी फक्त माझी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला.

मुख्य पात्र रमण व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या
विचारांच्या अभिव्यक्तीसाठी प्रेरित होतील.
परिपूर्ण व्यक्तिमत्व, त्याच्या भावनांची विविधता
आणि त्याच्या आत्मविश्वासाची या कथेतील
चार्मिंग घटनांनी वाचनांकनांतर अत्यंत कौतुकपूर्ण
प्रभाव उत्पन्न करतो. ह्या कथेच्या आधारे,
व्यक्तिमत्वाची मूल मूर्तीची अद्वितीयता आणि
त्याच्या भावनेच्या सुंदरतेची मराठी साहित्यातील
एक मातीची उच्चतम प्रतिष्ठा आहे. >> सर कथानकाचा एवढा बारकाईने विचार तर मीसुद्धा ही कथा लिहीता ना केला नव्हता. असो. थॅंक्यू.

इथे ईमोजी कसे टाकतात हे कुणी सांगेल का ?

मेढेकर धूळीने माखलेल्या आरशाच्या तुकड्याला पाहू शकले. आणि एक आयुष्य सावरले गेले. यावरुन एक सुविचार आठवला -
A friend is someone who knows the song in your heart, and can sing it back you when you have forgotten the words.

काटेजी प्रतिसाद वाचता वाचता तुमची कथा वाचायची राहूनच गेली. कथा वाचली आणि समजलं कि यासारखी उत्तुंग कथा कधी वाचली नाही. मी आमच्या गावच्या पारावर जाऊन सगळ्यांना तुमची कथा वाचून दाखवली तर सगळे भारावून गेलेत. काटेजी कोण आहेत आम्हाला त्यांना भेटायचं आहे म्हणून मागे लागलेत. तसेच आमच्या गावी दरवर्षी गणपतीत एका उत्कृष्ट लेखकाला बोलावून त्याचा सत्कार करतात. यावर्षी सगळ्यांनी तुम्हाला तो पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे. नारळ शाल देऊन तुमचा सत्कार करणार आहेत आणि गिफ्ट्स पण असणार आहेत Happy . तुम्ही कधी येणार ते कळवा म्हणजे मला तसे बॅनर तयार करायला.

छान आहे साधी सरळ कथा
पण प्रतिसादा प्रमाणे मी देखील काही ट्विस्ट येईल याची वाट बघत होतो.
निदान त्या मेढेकरांची मुलगी रमणच्या प्रेमात आहे आणि त्याला आपला जावई करून घेतील असे तरी वाटलेले Happy ( संदर्भ - वेड चित्रपट)

हे बघा महाशय, कथा लेखन करणं एवढ सोपं नसतं. खूप विचार आणि मेहनत करून कथा लिहावी लागते. आणि तुम्ही थट्टा करत आहात ? मी तुम्हाला रिकामटेकडा बोललो मान्य आहे. कदाचित माझा शब्द जरा आत्यंतिक असेल ; पण कुणीतरी माथेफिरू मला विनाकारण त्रास देतो, मी हे का सहन करेन ? म्हणून मी त्याला प्रत्युत्तर दिलं तर तुम्हाला हे सगळं मनोरंजनात्मक वैगेरे वाटत आहे. आपला कुणी उगीच अपमान केला तर कसं वाटतं हे तुम्हाला नाही समजणार.

@ऋन्मेष - थॅंक्यू सर.

निदान त्या मेढेकरांची मुलगी रमणच्या प्रेमात आहे
आणि त्याला आपला जावई करून घेतील असे तरी
वाटलेले >> Lol Lol तो Marrid आहे ना.

अहो पण बायको गेलीय ना सोडून.. बरे येतेय परत अशीही लक्षणे दिसली नाही कथेत. म्हणून वाटले तसे.

सर मी तुमचा कुठलाही लेख वाचला नव्हता. कथा वाचलेल्या, आणि त्या मला खूप आवडतात हे मी सांगितलेलच आहे ; पण आता सहज तुमच्या नावावर क्लिक करून तुमचे लेख पाहिले. त्यात स ई ताम्हणकर वरचा लेख दिसला. तो वाचून काढला. तुमच्या कथांप्रमाणेच लेखही आवडला ; पण कमेंट्स वर नजर पडल्यावर एक गोष्ट लक्षात आली की स ई ताम्हणकरचं तुम्ही केलेलं कौतुक काहींना‌ आवडलं नाही. ' कुठे तुलना करता ' वैगेरे कमेंट्स होत्या. हे सांगण्याचं कारण म्हणजे मीही ' म हा ज ' या कार्यक्रमावर लेख लिहिला होता, त्यातही असाच अनुभव आला. कुणी माझ्या लेखनाला अनुमोदन दिलं, सहमती दर्शवली, तर कुणी शो, प्रहसने, कलाकारांबद्दल पाणचट, फालतू अशी विशेषणं वापरली.
मी कुणावर टीका मुळीच करत नाही, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असूच शकतात. सर्वांच्या मतांचा आदर आहेच. आणि याच वाचकांनी तुमच्या माझ्या कथांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल मी मा बो वरील वाचकांचा आभारीच आहे ; पण माझ्या लेखावरील अनुभवावरून आणि तुमचा लेख पाहून एक गोष्ट ध्यानात आली की मा बो वर एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीवर, आवडत्या चित्रपट वा कार्यक्रमावर लिहायला नको. कारण बऱ्याचदा अशा कमेंट्स येतात ज्यांचा काही कारण नसतानाही आपल्या विचारांवर, आपल्या मतांवर नकारात्मक परिणाम होऊन आपली त्या व्यक्ती / कार्यक्रम / चित्रपटाची आवड नावडीत बदलू शकते. म्हणूनच मी माझा लेख डिलीट केला. इथे फक्त कथा लिहायला हव्या.

Irrespective of धागा आणि धागामालक ---
कोणाही सजाण व्यक्तिस दुसऱ्या व्यक्तींच्या समक्ष भेट किंवा आभासी भेटीच्या मत प्रदर्शनातून स्वतःला प्रभावित होण्याची वेळ यावी आणि अनेक काळ जपलेल्या आवडी निवडी बदलल्या जाव्यात हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण असते. एवढं इंफ्लुएन्स होण्याची खरंच गरज आहे का हे मनापासून तपासून घेणे आवश्यक असते अन्यथा कोणीही यावी आणि टपली मारावी ज्यामुळे आपण आपल्या चालण्याची दिशा बदलावी हे अनेक पातळीवर नुकसानीस कारणीभूत ठरेल.

@बोकलत - हे बघा महाशय, कथा लेखन करणं एवढ सोपं नसतं. खूप
विचार आणि मेहनत करून कथा लिहावी लागते. >> ही कमेंट दिसली नाही का ?

कोणाही सजाण व्यक्तिस दुसऱ्या व्यक्तींच्या समक्ष
भेट किंवा आभासी भेटीच्या मत प्रदर्शनातून
स्वतःला प्रभावित होण्याची वेळ यावी आणि
अनेक काळ जपलेल्या आवडी निवडी बदलल्या
जाव्यात हे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण असते. एवढं
इंफ्लुएन्स होण्याची खरंच गरज आहे >> हे इन्फ्लूएन्स होणं नसतं.‌ एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रतिकूल मतं निदर्शनास आली तर आपल्या स्वतःच्या ही आवडीनिवडी बद्दल साशंकता निर्माण होते. हे साहजिकच आहे. यात प्रतिकूल मतं मांडणाऱ्यांची काही चूक असते असं मुळीच नाही ; पण ही सर्वसाधारण मानसिकता असते. यात मतं मांडणाऱ्या ची किंवा लेखकाचा दोष नाही.

आणि मी फक्त माबो वर आपल्या आवडत्या व्यक्ती/ कार्यक्रम/ चित्रपटाबद्दल लिहायला नको एवढंच माझं म्हणणं मांडलं आहे. त्यात Offend होण्याची मुळीच गरज नाही.

एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रतिकूल मतं निदर्शनास आली तर आपल्या स्वतःच्या ही आवडीनिवडी बद्दल साशंकता निर्माण होते. हे साहजिकच आहे---- बिलकुल साहजिक नाही
हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. केलेली कॉमेंट डबल पोस्ट नसतानाही काढून टाकणे / लिहिलेले लिखाण उडवून तिकडे ब्लैंक लिहिणे ही ह्याचीच काही उदाहरणे म्हणता येतील.

त्यात Offend होण्याची मुळीच गरज नाही.--- एवढं स्पष्ट लिहिलं होतं irrespective of धागा आणि धागा लेखक --- तरी कोण ऑफेंड झालंय हे सर्वाना समजलेले आहे Biggrin

बिलकुल साहजिक नाही >> निरर्थक, अनावश्यक अट्टाहास. हा निर्णय घेणारे तुम्ही कोण ? पूर्णपणे साहजिक आहेच.

हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. केलेली कॉमेंट डबल पोस्ट
नसतानाही काढून टाकणे / लिहिलेले लिखाण उडवून
तिकडे ब्लैंक लिहिणे ही ह्याचीच काही उदाहरणे
म्हणता येतील.>> मला कमकुवत म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? बोटांना लगाम द्यायचा. आणि आवडीनिवडींना मर्यादा असते. त्या काही प्रेम, Passion, प्रोफेशन यांच्यासारख्या नसतात. यांत फरक काय असतो हेही तुम्हाला कळत असेल असं वाटत नाही. पण असो. तर आवडीनिवडींना मर्यादा असतात. त्यांच्यासाठी आपण एकदम Aggressive होऊ शकत नाही. त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींबाबत इतरांची मते वेगळी असू शकतात. काहीशी आत्यंतिक वाटू शकतील अशी ही असतात. दरवेळी दुर्लक्ष करता येतच असं नाही. मग अशी बरीचशी एकाच आशयाची मतं वाचण्यात आल्यानंतर लगेच आपल्या आवडी बदलतात असं नाही पण नकळत मन विचार करायला प्रवृत्त होतं. आणि एकदम विरुद्ध बाजूने विचार केला तर काही गोष्टी पटण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही समजलं असेल असं वाटत नाही.

Biggrin adminपण आले yz काटे आगे बढ़ो

Pages