१२ फेब्रुवारी १९८३ हा चंबळ खोर्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी फूलन देवीने आत्मसमर्पण केले आणि बॉलिवूडपर्यंत बँडिट क्वीनची कीर्ति खर्या अर्थाने पोहोचली. तसे बघावे तर बॉलिवूडला लेडी डाकूपटांची ओळख फूलनचे दुधाचे दातही पडले नव्हते त्या काळापासून होती (पुतलीबाई, १९७२). फूलनच्या स्टोरीने त्यांना एक फॅक्टरी प्रॉड्युसिबल टेम्प्लेट मिळवून दिले. त्यानंतर पुढची कैक वर्षे लेडी डाकू हा फॅशनेबल रोल बनला. हा असा रेअर कमर्शिअल रोल होता ज्यात हिरोईनची मुख्य भूमिका असे ना की हिरोची. मग श्रीदेवी, हेमा मालिनी पासून अगदी शिल्पा शिरोडकर, सोनू वालिया पर्यंत सर्वांनी या गंगेत हात धुवून घेतले.
या मायक्रोजॉनरमध्ये डोळ्यासमोर येणारे पहिले नाव शेखर कपूरचा बँडिट क्वीन! परंतु अतीव अभ्यासाअंती आमचे नम्र मत असे आहे की बँडिट क्वीन अतिशय भंपक चित्रपट असून हा मान झीनत अमान अभिनीत डाकू हसीनाला जायला हवा. याची कारणे पुढीलप्रमाणे
अ) कुठलीही गोष्ट परफेक्ट बनण्यासाठी आधी प्रयोग करून पाहावे लागतात. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन लेडी डाकूपट बनवले आहेत. अशोक रॉयने १९७२ मध्ये पुतलीबाई मार्फत पदार्पण केले. मग १९८५ मध्ये कहानी फूलवती की बनवला. या दोन चित्रपटांमध्ये केलेल्या चुकांमधून (अनुक्रमे जयमाला व रिटा भादुरी) बोध घेऊन त्याने १९८७ मध्ये झीनतला घेऊन डाकू हसीना बनवला. हा इतका परफेक्ट आहे की परत त्याने कुठलाच सिनेमा बनवला नाही.
आ) जनरली लेडी डाकू बनण्यासाठी एका मेंटॉरची गरज असते. डाकू हसीनामध्ये हा मेंटॉर रजनीकांत आहे.
इ) डाकू हसीना दरोडेखोर शोभते. बँडिट क्वीनमध्ये जेमतेम दीड दरोडे (एक थोडा बरा, एक आपला असाच) आहेत, ज्यात सीमा बिस्वासचा सहभाग नगण्य आहे. ती स्वत: एकही खून करत नाही. अगदी बेहमाईच्या कुप्रसिद्ध सीनमध्येही ती केवळ एक गोळी, ती देखील कोणाच्या तरी नडगीवर, झाडताना दाखवली आहे. संपूर्ण सिनेमात ती फक्त एकदाच (उपरोक्त सीनमध्ये) बंदूक चालवते. डाकू बिरुदाला साजेशी कोणतीच कामे करताना ती दिसत नाही. याउलट झीनत कमीत कमी वीस खून, तीन संपूर्ण लांबीचे दरोडे आणि रॉबिन हूडसदृश धनवाटप करताना दाखवली आहे.
ई) *** सर्वात महत्त्वाचे कारण ***
डाकू हसीनाचा एक (ऑलमोस्ट सीन टू सीन) रिमेक आहे - हीराबाई (२०००). या रिमेकमध्ये डाकू हसीनाचे बरेचसे संवाद हसीनाच्या जागी हीराबाई फाईंड/रिप्लेस करून जसेच्या तसे घेतलेले आहेत. या नादात यमकभंग झाला आहे पण तरीही हे केले गेले आहे. मुद्दा असा की हीराबाईचा संवादलेखक आहे बशीर बब्बर. जे स्थान मनमोहन देसाईपटांमध्ये कादर खानचे तेच स्थान कांति शाहपटांमध्ये बशीर बब्बरचे. (कानाच्या पाळ्यांना स्पर्श करून) गुंडाचे अजरामर संवाद लिहिण्याचे महान कार्य करणारा पुण्यपुरुष म्हणजे बशीरभाई बब्बर!
जर गुंडाचा संवादलेखक वेळप्रसंगी यमकभंग सहन करूनही एखाद्या चित्रपटातील संवाद जसेच्या तसे वापरत असेल, तर विचार करा की तो काय लेव्हलचा चित्रपट असेल!
तरी अशा लॉस्ट मास्टरपीसचे रसग्रहण करण्याचा हा अल्पसा प्रयत्न!
०) पूर्वाभ्यास
सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की डाकू हसीना लेडी डाकू/आऊटलॉ मायक्रोजॉनरमध्ये मोडतो. अन्यथा हा चित्रपट बघण्यात काहीही हशील नाही. मायक्रोजॉनर ही संज्ञा १९७०च्या दशकात फ्रेंच समीक्षकांनी रुढ केली. मायक्रोजॉनरचा अगदी सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर कलाप्रकाराचे एखादे हायपर-स्पेसिफिक/नीश प्रारुप! उदा. नुजाबेसने मेलडी आणि हिपहॉप बीट्सची सांगड घातलेल्या डाऊनटेम्पो प्रकारातल्या संगीताचे पुढे लो-फी (लो-फिडेलिटी) हिप-हॉप या मायक्रोजॉनरमध्ये रुपांतर झाले. यातल्या काही काही बीट्स इतक्या स्पेसिफिक आहेत की रोलँड एस-पी सीरिजच्या सँपलरमध्ये "लो-फी इफेक्ट" असे वेगळे बटण यायला लागले.
लेडी डाकू हा माझ्यामते जगातला सर्वात जुना मायक्रोजॉनर आहे. अगदी ढोबळ मानाने सांगावे तर यात हिरोईनवर काहीतरी अन्याय होतो - बलात्कार, आई-वडलांचा खून, वारसा हक्क न मिळणे इ. इ. याने ती सूडाने पेटून उठते आणि त्या त्या संस्कृतीतील नीतिमूल्यांशी फारकत घेतलेला मार्ग चोखाळते. जर ती भारतीय उपखंडातील असेल तर ती डाकू बनते. जर ती ब्रिटिश असेल तर ती हायवेवुमन/रॉबिनहूड बनते. जर ती अमेरिकन असेल तर ती बिली द किड/बेले स्टार्र मोल्ड मधील आऊटलॉ बनते. जर ती आयबेरिअन पेनिन्शुलामधील असेल तर ती झोरो किंवा पायरेट बनते. जर ती जपानी असेल तर ती नेझुमी-कोझोवर बेतलेली निंजा असते. डाकू बनल्यानंतर तिने आपल्या सूडाशी संबंधित नसलेला एकतरी गुन्हा करणे अनिवार्य आहे अन्यथा तो रिव्हेंज फ्लिक बनतो. बव्हंशीवेळा लेडी डाकू या अटीची पूर्तता एखादा दरोडा घालून करतात. जवळपास सर्व भाषांत याप्रकारचे कॅरेक्टर आढळते. या सर्वांचे एक नीट डिसिजन ट्री बनवता येते आणि त्यानुसार लेडी डाकू आणि तिची गँग काय काय करू शकते, तिच्यावर कोणकोणते अन्याय होऊ शकतात, ती बदला घेण्यासाठी काय लेव्हलचा अचाटपणा करू शकते याचे प्रचंड स्पेसिफिक नियम-पोटनियम मांडता येतात. उदा. जर चित्रपट हिंदी असेल आणि चित्रपटाच्या सुरुवातीला जुळ्या बहिणी दाखवल्या तर १५-२० मिनिटाच्या रेंजमध्ये काय सीन येतो तो चेक करावा. जर त्या सीनमध्ये दोघींपैकी एकजण कोठ्यात पोहोचली असेल तर अजून मॅक्स पाऊण तासात तिच्यावर बलात्कार होईल, कोठ्याच्या मालकिणीचा ती खून करेल आणि डाकू बनेल. तिची बहीण पोलिस इन्स्पेक्टर तरी असेल किंवा टांगेवाली असेल, दुसरे प्रोफेशन शक्य नाही. जर सीन कोठ्यातील नसेल आणि दाखवलेली बहीण टांगेवाल्याकडे गेली नसेल तर ती डाकू बनेल पण तिच्यावर अतिप्रसंग होईलच असे नाही. जर ती टांगेवाल्याकडे गेली असेल तर दुसरी बहीण एका डाकूकडे वाढेल, डाकू बनेल आणि तिच्यावर अतिप्रसंग होणार नाही. या सर्व केसेसमध्ये मुख्य व्हिलनने त्यांच्या वडलांना लहानपणी मारलेले असेल. त्या दोघींची एका पॉईंटला अदलाबदल होईल आणि बदला घेण्याकरता याने मदत होईल. शेवटी लेडी डाकू कोणाला ना कोणाला वाचवायला मध्ये तडमडून मरेल, अर्थातच व्हिलनला गोळी घातल्यानंतर.
तात्पर्य काय तर, लेडी डाकू इज युनिव्हर्सल!
अस्मादिकांच्या अभ्यासानुसार १९३१ सालचा 'द टेक्सास रेंजर' हा या मायक्रोजॉनरचा पहिला चित्रपट आणि कार्मेलिटा गेरटी ही पहिली लेडी डाकू. लिखित साहित्यामध्ये याहूनही जुनी उदाहरणे आढळतात, जसे की बंकिमचंद्रांची देबी चौधुरानी. फूलन देवीच्या समर्पणानंतर बॉलिवूडला दशकभर तरी या मायक्रोजॉनरची भुरळ पडली. इतकी की लेडी डाकू बनल्याशिवाय तुमचे हिरोईनपण सिद्ध होत नसावे.
लेडी डाकूपटांच्या कमर्शिअल लाटेत लेखक राजीव कौलने १९८७ साली डाकू हसीना लिहिला. तर दिग्दर्शक हर्मेश मल्होत्राने १९८८ साली श्रीदेवीला घेऊन शेरनी बनवला. गंमतीची बाब अशी की याच दोघांनी एकत्र येऊन १९९७ मध्ये दुल्हे राजा बनवला. जर अगदी बारकाव्याने पाहिले तर दुल्हे राजातील सेटपीसेसची स्टाईल डाकू हसीनात बघायला मिळते. केवळ जॉनर चुकल्याने राजीव कौलचे टॅलेंट पूर्णपणे एक्सप्रेस झालेले नाही. स्लॅपस्टिक लिहायची संधी मिळताच त्याने तिचे सोने केले आणि दुल्हे राजामध्ये त्याच्या टॅलेंटचे खर्या अर्थाने चीज झाले.
१) दलाल डाकू
पहिल्याच सीनमध्ये एक म्हातारा अवधी बोलीत लिहिलेल्या रामचरितमानसचे खेमराज कृष्णदास यांनी छापलेले हिंदी भाषांतर वाचत श्रीहनुमन्नमस्कारः (म्हणजे मनोजवं मारुत तुल्य वेगं) हे पारंपारिक संस्कृत स्तोत्र म्हणतो आहे. अशा रीतिने पहिल्या पंधरा सेकंदातच आपल्याला हा सिनेमा मास्टरपीस असल्याचे कळते. मग कॅमेरा वळतो नंदिता पुरीकडे (सोनी टीव्हीच्या कुछ तो लोग कहेंगे मध्ये इशिता शर्माची आई). इथे आपल्याला जबरदस्त लेव्हलवरची सप्लाय चेन बघायला मिळते. आधी दोन गावकरी हिला स्पॉट करतात. मग त्यातला एक तिच्या आईला काही बहाण्याने तिकडून घालवतो. तोवर दुसरा मेन सप्लायरला जाऊन बातमी देतो. मेन सप्लायर मग आपली गँग घेऊन तिथे हजर होतो.
मेन सप्लायर आहे जोगिंदर. जोगिंदरला डाकूपेक्षा कमी दर्जाचा रोल देणे शक्य नसल्याने तो डाकू आहे. डाकू लोकांचा इनकम सोर्स दरोडे, अपहरण, खंडणी इ. असल्याचा अस्मादिकांचा समज जोगिंदरने धुळीस मिळवला आहे कारण त्याचा मुख्य धंदा बायका पुरवणे आहे. डाकू लोक आल्याने कीर्तनास आलेल्या गावकर्यांची पळापळ होते. पण नंदिताला बरोब्बर अडवले जाते. मग जोगिंदर येतो आणि तिला उचलून पुरवठा करायला निघतो. या पुरवठ्याचे मागणीदार दारु ढोसत बसले आहेत. आता आपली सिनेमाच्या उर्वरित व्हिलन्सशी ओळख होते (इन ऑर्डर ऑफ अपिअरन्स)
लाला - चंद्रशेखर दुबे (राम तेरी गंगा मैली मधला पंडित)
ठेकेदार - युनुस परवेझ
राणा - रुपेश कुमार
राजा - रझा मुराद
यात रझा मुराद मुख्य व्हिलन आहे हे कोणीही सांगू शकतं. कारण या सर्वांमध्ये त्याला एकट्यालाच दारु चढलेली नाही. तसेच आपण व्हिलन आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याला छाती खाजवणे, डोळे वटारणे इ. करण्याची जरुर भासलेली नाही, त्याची डायलॉग डिलीव्हरीच पुरेशी आहे. डीलनुसार जोगिंदर नंदिताला घेऊन यांच्या ठिकाणी येतो. येथे जोगिंदरच्या वेषभूषेबद्दल दोन शब्द खर्च केले पाहिजेत. अलिफ लैलामधील दुष्ट राक्षसिणींची ड्रेपरी आपल्याला सहा वर्षे आधी इथे बघावयास मिळते (आय थिंक दामिनीप्रिया अर्थात शहरजादे सुद्धा एका एपिसोडमध्ये हा ड्रेस घालते बट आय डायग्रेस). ड्रेसप्रमाणेच क्लिअरली त्याच्या मापाचा नसलेला विग, खोटी दाढी आणि मण्या-मण्यांचा कंबरपट्टा दिला आहे. हा दुष्ट डाकू आहे हे सिद्ध करण्यासाठी गळ्यात दोरी ओवून एक कडे घातले आहे.
* लेडी डाकूपटांचे पोटनियम - जर डाकू पुरुष असेल आणि त्याने गळ्यात दोरी ओवून कडे घातले असेल तर तो दुष्ट असतो. *
हे जोगिंदरबाबतही सिद्ध करावे लागते कारण लेडी डाकूपटांत जोगिंदरही चांगला डाकू असू शकतो (गंगा जमुना की ललकार,१९९१). इथे याचे नाव दुर्जन असल्याचे कळते. दुर्जन मूर्ख आहे. किंबहुना या सिनेमातले सर्वच्या सर्व व्हिलन मूर्ख आहेत. केवळ इतर जनतेच्या तुलनेत ते किमान नवकोट नारायण (https://www.youtube.com/shorts/1n4ilvyzll0) आणि कमाल अंबानी लेव्हलचे श्रीमंत असल्याने त्यांची व्हिलनगिरी अडीच तास चालते. अन्यथा झीनत-रजनीकांत समोर ते अडीच मिनिट देखील टिकले नसते. वानगीदाखल दुर्जन नंदिताला आपला हात चावू देतो. युनुस परवेझ तिला आपल्या बॉक्स ऑफिसवर लाथ मारू देतो. एक्सपर्ट व्हिलनने नंदिताला बेशुद्ध करूनच आणले असते. दुर्दैवाने आपल्याला असले थर्ड क्लास व्हिलन अडीच तास सहन करावे लागणार आहेत. नंदिताने १९८७ सालापर्यंत आपले हिरोईनपण सिद्ध केले नसल्याने तिचा प्रतिकार फार काळ टिकत नाही. ट्रिगर वॉर्निंग: इथून पुढे ठाकूरवर्गीय हिंदी व्हिलनच्या आद्य कर्तव्याचा सीन आहे जो त्याकाळच्या सिनेमांच्या मानाने बराच ग्राफिक आहे. पुढची दोन मिनिटे स्किप करू शकता.
या दोन मिनिटात नोंद घेण्यालायक दोनच गोष्टी आहेत - १) गावातले पोलिस उपयोगशून्य आहेत, २) आपले सर्व व्हिलन्स ठार वेडे आहेत. ठाकूरगिरी केल्यानंतर रझा मुराद नंदितावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक थैली रिती करतो - तुम्हारे बदन पर हमारे हाथों जितनी भी खराशे लगी हैं, उन खराशों की इन सोने की गिन्नियों से ढक लेना. रुपेशकुमारच्या डायलॉगवरून हे सर्वजण अशी एक थैली घेऊन आलेले आहेत. हा काय मुद्दा आहे? एकंदरीत सर्व गाव यांच्या मुठीत दिसते. वेळ पडल्यास या लोकांची पैसे मोजायची तयारी आहे. मग एवढा एलॅबोरेट सेटअप आणि जोगिंदर कशाला पाहिजे?
२) हिरवीणीची कूळकथा
२.१) अॅक्युरेट भूगोल
कॅलिडोस्कोपिक ब्याकग्राऊंडवर श्रेयनामावली झळकते. त्यानंतर काही लोकांना एक व्यक्ती बदडताना दिसते. केस कधी कुरळे तर कधी सरळ आहेत. स्टंटमॅनला सेम विग द्यायला काय प्रॉब्लेम होता कोणास ठाऊक? भारतीय जनता आपले आद्य कर्तव्य - गठ्ठ्याने बडवले जाणारे लोक बघायला गर्दी करणे - पार पाडते आहे. अचानक "भय्या" अशी हाक ऐकू येते. मग कळते की हा मारधाडकारक, झीनतचा भाऊ, राकेश रोशन आहे. यांची सिनेमात नावे आहेत रुपा सक्सेना व रणजित सक्सेना. हिरोईन-केंद्री चित्रपटाच्या हिरोचे, त्यातही राकेश रोशनचे, नाव रणजीत ठेवून राजीव कौलने आपली विनोदबुद्धि प्रदर्शित केली आहे.
अॅपरंटली हे लोक मुलींची छेड काढत असतात. गांव की गोरी रुपा येऊन आपल्या भय्याला सांगते की या लोकांना शरम की मार मारली पाहिजे. त्यानुसार या लोकांची शब्दश: तोंड काळं करून गाढवावरून धिंड काढली जाते. या प्रसंगातून हिरोईन मुळातच तडफदार असली पाहिजे या लेडी डाकूपट नियमाची पूर्तता केली आहे. पुढे असे कळते की या दोघांचे वडील पूर्वी हवालदार होते. त्यामुळे वडील या पराक्रमावर खूश असतात. पण मध्यमवर्गीय आईचे मात्र "कोणी सांगितल्यात नसत्या उचापती" मताची असते. तिची जयपुरी पद्धतीची बांधणी साडी नोट करा. याचा अर्थ कथावास्तु आग्नेय राजस्थानाजवळ आहे. आपले कथानक चंबळ खोर्यात घडते आहे. चंबळ राजस्थानच्या आग्नेय सीमेवरून वाहते. याचा अर्थ हे गाव राजस्थान-मध्य प्रदेश बॉर्डरजवळ आहे. प्लस डाकूंसाठी लपायला जंगल हवे. अशी दोन जंगले आहेत - रणथंबोर आणि कुनो अभयारण्य. पण यांच्या हिंदीवरील उर्दू प्रभाव बघता हे कथानक मध्य प्रदेशात कुनो अभयारण्याजवळ घडत असल्याची शक्यता अधिक. तसेच पोलिस स्टेशन वगैरे बघता हे तालुक्याचे गाव जवळच असावे. असे गाव गूगल करताच शिवपुरी असल्याचे सांगता येते. याचा अर्थ हे कथानक शिवपुरी परिसरात घडत असल्याचे सांगता येते. उर्वरित चित्रपट बघितल्यावर हे भौगोलिक अनुमान शंभर टक्के बरोबर असल्याचे लक्षात येते.
२.२) साईड हिरवीणीची "तोंडओळख"
कट टू पुढचा सीन. असे कळते की राकेश रोशनला पोलिसात नोकरी मिळाली आहे. झीनतच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहत आहेत. रारो विचारतो की काय झालं? इथून झीनतचे खतरा डायलॉग्ज सुरु होतात - भय्या पोलिस ऑफिसर बना ये जानकर दिल तो बहुत खुश हुआ पर ये आंखे, जिन्हे तुम्हारी जुदाई की आदत नही, खामखां रो पडी. इथेच या सिनेमातली चेकॉव्ह्ज गन धडाडायला लागते. झीनत म्हणते की आता मी तुला पोलिसाच्या गणवेषात बघायला आतुर आहे तर रारो म्हणतो की मला तुला वधू म्हणून सजलेली बघायला आतुर आहे. या दोन्ही इच्छा पूर्ण होणार आहेत पण त्या ज्या पद्धतीने पूर्ण होतात ते बघून स्पोक टू सून म्हणावे लागेल.
झीनतच्या "पहले उस झुल्फोंवाली से तो बात पक्की कर लो" चा क्यू घेऊन रारोच्या हिरोईनची एंट्री होती. जीने नही दूंगा या अजरामर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली रोशनी रारोची हिरोईन आहे. आणि रोशनीला हिरोईन म्हणवून घ्यायचा हक्क आहे कारण ती डाकू हसीनाच्या एक वर्ष आधी डाकू बिजलीमध्ये डाकू बिजली म्हणून झळकलेली आहे. रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगशी परिचित असलेल्या वाचकांसाठी विशेष नोंद: हा रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगचा एकमेव डिसेंट नमुना. रोशनी एका धबधब्यापाशी रारोची वाट बघत थांबली आहे. तिची साडी सिंथेटिक वाटते आहे, ज्यावरून ती गांव की गोरी नसून शहर की लडकी असल्याचे सांगता येते. रारो तिला उत्साहाने आपले अपॉईंटमेंट लेटर दाखवतो. इथे बॅकग्राऊंडला एकजण महत्त्वाच्या कामासाठी नदीकाठी उकिडवा बसला आहे. बट रोशनी इज नॉन-प्लस्ड! तिची रिअॅक्शन - हा मिळाली तुला नोकरी. मग काय आता २६ जानेवारीला महाराष्ट्राच्या फ्लोटवर नाचू? इथे ही भावना दर्शविण्याकरता रोशनीच्या तोंडी "कम-ज़र्फ़" असा भरभक्कम उर्दू शब्द दिलेला पाहून प्रेक्षकाच्या घरात अश्रूंचा पूर येतो. रारोदेखील पोचलेला मनुष्य आहे. त्याने रोशनीकडून आधीच वचन घेतले होते की नोकरी मिळाली तर तू जुम्मा आणि मला चुम्मा. ती थोडे आढेवेढे घेते आणि मग अत्यंत अवघडलेला किस देते.
३) मीनिंगफुल रिपिटिशन फॉर क्लॅरिटी
लेडी डाकूंचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी डाकू हसीनाची पटकथा स्पेशल आहे. यात मीनिंगफुल रिपिटिशन्स आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन-दोन वेळा दाखवली जाते. जसे जॅकी चॅन आणि हाँगकाँगचे दिग्दर्शक प्रत्येक पंच आणि किक दोन वेळा (आधी वाईड शॉट मग क्लोज अप) दाखवून अधिक परिणाम साधतात. तसेच डाकू हसीनामध्ये प्रत्येक सेटअप दोन वेळा दाखवून (एकदा ढोबळ (वाईड शॉट) सेटअप दुसर्यांदा त्याचे संभावित परिणाम, कंगोरे इ. (क्लोज अप)) क्लॅरिटी साधली जाते. तसेच यात गांव की गोरी ते खतरनाक डाकू हे प्रोग्रेशनही सटली अधोरेखित केले आहे. अभ्यास करताना हे लक्षात ठेवणे त्यामुळे क्रमप्राप्त ठरते.
३.१) हिरोईनवर अत्याचार
एवढा वेळ झाला तरी एकही गाणे झालेले नाही. हे बॉलिवूड की शान के खिलाफ आहे. त्यानुसार "प्यार के मोड पर" ही कव्वाली सुरु होते. गायक आहेत दिलावर बाबू आणि परवीन साबा. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार हे दोघेही नामवंत राजस्थानी कव्वाल आहेत. राजस्थान -> आग्नेय सीमा -> कुनो अभयारण्य. पुन्हा एकदा १००% अॅक्युरेट भूगोल! संगीत दिले आहे उशा खन्ना यांनी. उशा खन्ना बॉलिवूडमध्ये दुर्मिळ अशा महिला संगीतकार आहेत. त्यांची काही प्रसिद्ध गाणी म्हणजे "छोडो कल की बातें", "शायद मेरी शादी का ख्याल", आणि "चंद्रकांता की कहानी". अगदी स्पष्ट सांगायचे तर ही क्लासिक कव्वाली आहे. जश्न-ए-आदाब सारख्या नामवंत साहित्योत्सवांमध्ये ही कव्वाली अजूनही सादर केली जाते. कव्वाली संगीतप्रकारात रस असेल तर व्हिडिओकडे दुर्लक्ष करून केवळ गाणे ऐका. इथे राजीव कौलने आपली कव्वालीची आवड दाखवली आहे -> दुल्हे राजामध्ये कव्वालीचा सामना दाखवला आहे. नैना म्युझिकवरील एकतरी "जंगी सामना" व्हिडिओ किंवा तत्सम प्रकार बघितला असेल तरच याचा व्हिडिओ बघा. त्याशिवाय याच्या टेकिंगमधल्या सर्व इंटरेस्टिंग जागा स्पॉट करणे अवघड आहे. तसेही कथानकाच्या दृष्टीने या गाण्याच्या आड जे घडते आहे ते अधिक महत्त्वाचे आहे.
प्रेक्षकाला आता या चित्रपटातील व्हिलनची मोडस ऑपरंडी ठाऊक आहे. इथे आता डिटेलिंग बघायला मिळते. जर प्रत्येकवेळी जोगिंदर किर्तनाच्या कार्यक्रमातच मुली पळवायला लागला तर प्लॅनिंग फेल जाईल त्यामुळे व्हिलन्स अतिहुषारी दाखवत यावेळी कव्वालीचा आडोसा घेतला आहे. तसेच पंचक्रोशीतील देखण्या मुलींचा डेटाबेस ठेवणे अशक्य असल्याने कव्वालीच्या एंजॉय करण्याच्या नावाखाली हे चौघे प्रत्यक्षात मुली ताडून कोणावर अत्याचार करायचा हेही ठरवत आहेत. ऑफकोर्स या केसमध्ये त्यांची नजर झीनतवर पडते. इथे झीनतच्या एक्सप्रेशन्सवरून तिलाही शंका आल्याचे दाखविले आहे, पण तिचे काही एक चालणार नाही आहे कारण सिनेमा पुढे सरकायला हवा. जनरली बॉलिवूडमध्ये उलटे असते - व्हिलन टाळता येण्यासारख्या चुका करतात जेणेकरून हिरो लोक जिंकावेत. इथे झीनत इतकी ओव्हरपॉवर्ड हिरोईन आहे की व्हिलन लोकांना व्हिलनगिरी करता यावी म्हणून ती गुंगीचे औषध घातलेले सरबत पिते.
मग काय व्हायचे ते होते - जोगिंदर येतो आणि बेशुद्ध पडलेल्या झीनतला पळवून नेतो. इथे डिटेलिंग - जर एखादा गावकरी शौर्य दाखवायच्या फंदात पडलाच तर त्याचे काय होईल: झीनतच्या मैत्रिणीला जोगिंदर बिनदिक्कतपणे गोळी घालतो. पुन्हा एकदा ट्रिगर वॉर्निंग: रझा मुराद झीनत शुद्धीवर यायची वाट बघतो आणि व्हिलनच्या आद्य कर्तव्याचा दुसरा (आणि अधिक ग्राफिक) सीन होतो. झीनत पुरती शुद्धीवर आलेली नसल्याने तिचा प्रतिकार तोकडा पडतो. त्यात रझा मुरादचे झीनतच्या वडलांशी काही जुने वैर असते. इथे असे सूचित केले आहे की रझा रारो गावाबाहेर पडण्याची वाट बघत होता. रारो पोलिस ट्रेनिंगसाठी जाताच रझाने डाव साधला. त्यानुसार जोगिंदर जाऊन तिच्या आई-वडलांना ठार करतो आणि तिच्या घराला जाळतो. इकडे नेहमीप्रमाणे काम झाल्यावर रझा आणि कंपनी झीनतला सोन्याची नाणी देऊन दारू प्यायला निघून जातात. हा रिपीट कार्यक्रम असल्याने यावेळेस आऊटकम वेगळे आहे. झीनत बंगल्याच्या पहारेकर्याच्या डोक्यात व्हिस्कीची बाटली फोडून तिथून पळ काढते.
३.२) पुनरावृत्तीचे विपरीत परिणाम
इथून मीनिंगफुल रिपीटिशन सुरु होते. नंदिताच्या केसमध्ये नंदिता पॉसिबली मारली गेली आणि तिचे आई-वडील पोलिसात गेले होते. इथे झीनत जिवंत राहते आणि तिचे आई-वडील मारले जातात. पोलिस तिच्या मागावर असतातच. ठाणेदार तिला चौकीवर नेतो आणि चौकीचे दार बंद करतो. झीनतच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो. मग तो ठाणेदार खुल्लमखुल्ला सांगतो की तू तक्रार केलीस तरी मी असा रिपोर्ट बनवेन की तुला या लोकांनी सोन्याची नाणी दिली होती आणि तू वाईट चालीची आहेस. पण जर तू मला कोऑपरेट केलंस तर मी जमेल तेवढी तुझी मदत करेन. इतर व्हिलन्सप्रमाणे हा ठाणेदारही माठ आहे. झीनत आता पूर्ण शुद्धीत आहे. जी तरुणी एखाद्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गावात धिंड काढू शकते तिला अंडरएस्टिमेट करणे म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर सही करणे. तसेच होते - झीनत चहाचा कप घ्यावा तसे त्याच्या हातून पिस्तुल काढून घेते आणि त्याला चार गोळ्या घालते (खून क्र. १). इथे तिचे मोरल हायस्टँडिंग दाखवण्यासाठी तिला टेबलावर उभे केले आहे.
पिस्तुलाचा आवाज ऐकून इतर पोलिस धावत येतात आणि झीनतला तिथून पळ काढावा लागतो. पोलिसाचा खून केल्यामुळे तिच्यामागे बरेच पोलिस लागतात आणि अखेर तिला एका दरीच्या कडेला पकडतात. निरुपाय म्हणून ती दरीत उडी घेते. अजिबात झीनतसारखा न दिसणारा एक पुतळा दरीत पडतो आणि तिच्या किंचाळीचा आवाज दरीत चहा पीत बसलेल्या एका डाकूच्या कानी पडतो. पोलिसांना वाटते की झीनत मेली. आपल्या परिवाराची झालेली राखरांगोळी खांद्यावर बेल्ट घेऊन हिंडणार्या रारोच्या कानी पडते. तो लगेच गावी परत जायच्या गप्पा करतो. गंजीफ्रॉक घातलेला त्याचा एक सहपाठी म्हणतो की तू असा पॅनिक होऊ नकोस. तुझी फॅमिली तर सगळी ठार झाली मग तू आता गावी जाऊन काय करणार? जर तू कायदा हातात घेतलास तर तुझ्यात आणि व्हिलन्समध्ये काय फरक राहिला? इथे रारो म्हणू शकला असता की अरे भंपक माणसा, माझ्या फॅमिलीचा अंत्यविधी तर करावाच लागेल ना! गावाला जाऊन बदला घेणे एवढं एकच काम आहे का मला? पण एवढी बुद्धि त्याच्या डोक्यात भरलेली नसल्याने (आता रोशनीच्या प्रेमात पडणारा हिरो बुद्धिमान असून कसे चालेल? जसा जीने नही दूंगा मध्ये बाज रब्बर तसा इथे रारो) तो हताश होऊन बसकण मारतो.
३.३) मेंटॉरची एंट्री
प्रेक्षकाला पुनरावृत्तीचा विपरीत परिणाम दाखवल्यानंतर पुढच्या पुनरावृत्तींचे सेटअप करायला घ्यायला हवेत. यासाठी झीनत डाकू बनणे अनिवार्य आहे. हिंदी चित्रपटांमध्ये लेडी डाकूला मेंटॉर असणे आवश्यक आहे. मेंटॉर असला/ली की रेडिमेड गँग, डाकूगिरीचे ट्रेनिंग, सपोर्ट सिस्टिम, गावागावांमधले काँटॅक्ट्स आयते मिळतात आणि हे सर्व तिने कसे मॅनेज केले असेल असे प्रश्न प्रेक्षकाला पडत नाहीत. याला बॉलिवूडमधील एकमेव अपवाद - तिलकची (१९९२) शिल्पा शिरोडकर. तरी आता मेंटॉरची एंट्री क्रमप्राप्त आहे.
झीनत शुद्धीवर येते तर तिला दिसते की आपण एका किल्ल्यात आहोत आणि आपल्या चारही बाजूंना खूपसे डाकू आहेत. पुन्हा एकदा: हा किल्ला पोहरीचा किल्ला आहे जो शिवपुरी जिल्ह्यात आहे. राजस्थान >> आग्नेय सीमा >> कुनो अभयारण्य >> शिवपुरी जिल्हा >> पोहरी किल्ला. १००% अॅक्युरेट भूगोल! नंतर सिनेमात नरवर किल्ल्याचेही दर्शन घडते जो पुन्हा शिवपुरी जिल्ह्यातच कुठेशी आहे. इतका अॅक्युरेट भूगोल अगदी क्वचित बघायला मिळतो.
इथे एका डाकूचे नाव रहमतुल्ला दाखवून ही टोळी धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवले आहे. जो डाकू दरीत चहा पीत बसला होता तो सांगतो की या टोळीच्या सरदाराचे नाव मंगलसिंह आहे आणि त्याने तिचा जीव वाचवला. झीनत भडकते. एका खूनी डाकूने तिचा जीव वाचवावा हे तिला सहन होत नाही. नोंद घ्या की इथे ती तिचे संवाद अॅबनॉर्मल वेगात म्हणते. याने ती आपले नैतिक उच्चस्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करते आहे. याचीही पुनरावृत्ती होणार आहे.
हरिया नामक डाकू याने चिडतो. तो झीनतला धमकावतो की आमच्या सरदारला नावं ठेवलीस तर परिणाम वाईट होतील.
*लेडी डाकूपटांचे पोटनियम - लेडी डाकूच्या मेंटॉरच्या गँगमध्ये जो मेंबर मेंटॉरच्या नावाखाली अनावश्यक अॅग्रेशन दाखवतो तो नंतर गद्दारी करतो. त्यामुळे आपण आत्ताच सांगू शकतो की हरिया गद्दार निघणार आहे.*
हरियाचा चढलेला आवाज ऐकून किल्ल्याच्या इमारतीतून रजनीकांत बाहेर येतो. हाच मंगलसिंह. इथून पुढचा सीन ही अनुभवण्याची चीज आहे - https://youtu.be/LJkKht_sYGM?t=200
झीनतचे म्हणणे असते की डाकू वाईट असतात. रजनीकांतला हे म्हणणे खोडून काढायचे आहे. त्यामुळे तोही आपले नैतिक स्थान अधोरेखित करण्यासाठी आवाजात अॅबनॉर्मल चढउतार करतो. तो म्हणतो की तूही खूनी आहेसच की. ती म्हणते की एकतर तू खूप जास्त खून केले आहेस आणि दुसरे म्हणजे मी स्वसंरक्षणासाठी त्या ठाणेदाराला मारलं. रजनीकांत हसून म्हणतो की मग मी पण कोणा ना कोणाला वाचवण्यासाठीच लोकांना मारलं. इथे दोघेही आपापली नैतिकता अधोरेखित करण्याच्या नादात काहीही बोलत आहेत. हे प्रेक्षकाच्या मनावर ठसवले जाते जेव्हा रजनीकांत डाकूची स्वप्नाळू व्याख्या सांगतो - जंगल जिसका ठिकाना, पत्थर जिसका बिछोना, आसमान जिसकी छत वो डाकू हैं, बागी हैं.
झीनत म्हणते की हे सगळं ठीक आहे पण म्हणून डाकू बनायचं? एका कसलेल्या मेंटॉरप्रमाणे रजनीकांतच्या लक्षात येते की हिला आपला फ्लॅशबॅक सांगितल्याशिवाय ही नाही ऐकायची. तो तिला हाताला धरून ओढत नेतो आणि एका ट्रंकसमोर उभं करतो. ट्रंकमध्ये वकीलाच्या वेषातील विजय अरोराचा फोटो असतो. विजय अरोरा रजनीकांतचा धाकटा भाऊ सोमनाथ आहे. रजनीकांत झीनतवर खेकसतो की हा फोटो उचल. त्या फोटोखाली विजय अरोराच्या रक्तबंबाळ प्रेताचा फोटो. झीनत हादरते. तिच्या लक्षात येते की एक म्हणजे रजनीकांतवरही काहीतरी जबरदस्त अन्याय झाला आहे आणि दुसरे म्हणजे रजनीकांतचे स्क्रू ढिले आहेत - आपल्याच भावाच्या प्रेताचा फोटो काढून, तो फ्रेम करून कोण ठेवतं?
रजनीकांतच्या डोळ्यांतील अश्रू सांगत आहेत की फ्लॅशबॅकमध्ये काहीतर डेंजर प्रकार घडला आहे. अर्थातच रजनीचा फ्लॅशबॅक ऐकून झीनत डाकू हसीना बनते. पण कथा पुढे अभ्यासण्याआधी एक अल्पविराम जेणेकरून एवढा अभ्यास पचवता यावा. उर्वरित रसग्रहण लवकरच प्रतिसादात.
पुढील विश्लेषणाच्या प्रतिसादांच्या लिंका
(४) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4927886
(५) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4928261
(६) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4928593
(७) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4929076
(८) - https://www.maayboli.com/node/83794#comment-4929306
(९) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4929476
(१०) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4929731
(११) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930000
(१२) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930301
(१३) - https://www.maayboli.com/node/83794?page=1#comment-4930605
(संपूर्ण)
९) चंबळची राणी
९) चंबळची राणी
९.१) व्हिलन लोकांचा पहिला प्रतिवार
रुपेशकुमार मेल्यानंतर (खून क्र. ८) रझा हसीनारुपी टांगत्या तलवारीचा गांभीर्याने विचार करू लागतो. बीनाला हसीनाचा अड्डा माहित आहे हे कळल्यानंतर तो बीनाला गाठतो. बीना अर्थातच त्याला नकार देते. रझाचा प्लॅन आहे की बीनाच्या मुलीचा वापर करून तिला ब्लॅकमेल करायचे आणि हसीनाचा पत्ता काढायचा. पण या सिनेमातल्या सर्व व्हिलन्सप्रमाणे रझाही बंडल आहे. ती मुलगी रझाच्या हाताचा चावा घेऊन पळ काढते. रझा नेम धरून गोळी झाडतो पण बीना मध्ये पडून तिला वाचवते. बीनाच्या डाव्या खांद्यात लागलेली गोळी तिच्या पोटातून बाहेर पडण्याचा अद्भुत चमत्कारही घडतो. हसीनाला या प्रकाराची कुणकुण लागली असावी कारण ती तिथे थडकते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून रझा सुमडीत तिथून पळ काढतो. गुड्डीला हसीना विचारते की काय घडलं? गुड्डी ढिम्म! खोदून खोदून विचारल्यानंतर गुड्डी मोठ्ठा "आ" करते.
किल्ल्यात तिच्यासाठी डॉक्टर बोलावतात. डॉक्टर येऊन निदान करतो की गुड्डी मुकी झाली असून आता कुदरत का करिश्माच तिची वाचा परत आणू शकतो. सर्वप्रथम, हा पूर्णपणे विदिन रिआम ऑफ लॉजिक मुद्दा आहे. ट्रॉमामुळे वाचा जाऊ शकते. त्याला पोस्ट-ट्रॉमॅटिक म्युटिजम म्हणतात आणि लहान मुलांमध्ये हे घडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच हा मानसिक आजार असल्याने त्यांनी आणलेला जनरल फिझिशिअन काहीच करू शकत नाही. तसेच या मुकेपणाचा क्लायमॅक्सला पे-ऑफही मिळतो पण इथून पटकथा थोडी थोडी घसरायला सुरुवात होते. जसे की रजनी हरियाला डॉक्टरला सोडून यायला सांगतो तेव्हा डॉक्टरच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. रजनी-झीनत अचानक संसारी जोडप्याप्रमाणे वागू लागतात. ती मुलगी सुद्धा झीनतचे सांत्वन करताना पाटीवर लिहिते की माझी वाचा गेली जेणेकरून मी आईची आठवण काढून रडणार नाही. पण आवाज जाण्याचा आणि रडण्याचा काय संबंध? मुख्य प्रॉब्लेम असा आहे की व्हिलन्स ट्राईड टू फाईट बॅक. डिडन्ट क्वाईट वर्क, बट दे ट्राईड. त्यांच्या बंडल कॅरेक्टरायझेशनच्या हे पूर्णपणे विरोधात जाते.
९.२) क्या यह सुशासन की सरकार हैं?
झीनत आता प्रॉपर थ्रिल-सीकर गुन्हेगार बनली आहे. मीनिंगफुल रिपिटिशन्सच्या नियमानुसार तिला पुढचा बदला घेण्याआधी एखादा गुन्हा करणे भाग आहे. त्यानुसार तिने आता सरकारी खजिना लुटण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिची रग एवढ्याने जिरत नाही. तिने बालेकरवी चिठ्ठी लिहून कलेक्टरला पाठवली आहे - कि बाबा मी डाकू हसीना आहे. मी थम्स अप प्यायलं आहे आणि आता कुछ तुफानी करते हैं योजने अंतर्गत मी अख्ख्या जिल्ह्याची गंगाजळी लुटणार आहे. बाले म्हणतो की हे करण्याची काय गरज आहे? सुमडीत जाऊन तिजोरी साफ करूया ना.
"बाले, हसीना ने जब से ये वर्दी पहनी हैं तब से दुष्मन का सिर्फ सीनाही चीरा हैं. पीठ नही."
रजनी तिला समजावण्याचा लास्ट डिच एफर्ट मारून बघतो. तो म्हणतो की तुझी चिठ्ठी वाचून रारो तिथे नक्की सेक्युरिटी म्हणून असेल. तू त्याचा सामना नाही करू शकणार. पण तो हे विसरतो आहे की आता ती रुपा नाही, हसीना आहे. सांगताना मात्र मारे जर रारोने तिला गोळी घातली तर मला त्याचा अभिमान वाटेल वगैरे बाता मारते. अॅक्चुअली तिला खात्री आहे की काहीतरी हँडिकॅप दिल्याखेरीज तिच्या केसालाही धक्का लावणे रारो के बस की बात नही. दरोड्याचा दिवस उजाडतो. इन्स्पेक्टर रेगेच्या नेतृत्वाखाली पन्नास तरी पोलिस तैनात केले आहेत. रारो कलेक्टरला ऑफिसपर्यंत लिफ्ट देतो आणि थोड्या वेळापुरता रामपुरला जातो. तो गेल्यानंतर तीन जीप अजून येतात. जीपमधून चाचा उतरताच आपल्याला कळते की हे सगळे डाकू आहेत. रेगे व मूठभर सबइन्स्पेक्टर्सना बंधक बनवून तैनात सर्व पोलिसांना बंदुका खाली टाकायला भाग पाडले जाते. मग घोड्यावर बसून झीनत आणि तिची गँग येते. रजनीने या दरोड्यातून माघार घेतलेली दिसते. हे बघता झीनतचा हा दरोडा अजूनच इंप्रेसिव्ह आहे.
मुख्य ऑफिसमधल्या मूठभर शिपायांना मारले जाते. यातल्या एकाला झीनत शुअरशॉट गोळी मारते (खून क्र. ९). कल्ला कलेक्टरला खुर्चीला बांधतो. हसीना गोळी मारून तिजोर्या फोडते. मग एका पोत्यात तो सगळा खजिना भरते. एवढे कोट्यावधी रुपये त्या छोट्याशा पोत्यात मावतात हे बघून प्रेक्षक अचंबित होतो. रारो परत येतो तेव्हा झीनतची लुटालूट पूर्ण झालेली असते. ती तिथून पळ काढू बघते. इथे तिचा स्टंट डबल आहे कारण पळताना डबल चेहर्यासमोर लुटीची पिशवी धरून पळतो, चेहरा दिसू नये यासाठी. पळताना स्मोक बाँब्ज फोडून धूर केला जातो. तरीही रारो तिला जस्ट गाठतो. आणि अखेर रारोला आपली बहीणच डाकू हसीना असल्याचा साक्षात्कार होतो.
"जब मेरी वर्दी देखोगे भैया तब जिंदगी तुमपर बोझ बन जाएगी."
रारोला त्याच थिजलेल्या क्षणात सोडून झीनत तिथून निघून जाते.
९.३) भोक्ता रोल
हा होता दरोडा क्र. ३. नक्की किती लुटले सांगणे कठीण आहे पण मध्य प्रदेशचे आजचे बजेट (२,२५,२९७ कोटी रुपये), इन्फ्लेशन इंडेक्स (१२.४९), शिवपुरी जिल्हा वगैरे बाबी जमेस धरता त्या जिल्ह्याचा १९८७ मधील वार्षिक महसूल अंदाजे ३६० कोटी रुपये असावा. जर हसीनाने एक महिन्याचा महसूल लुटला असे पकडले तरी तिने जवळजवळ ३० कोटी रुपयांचा दरोडा घातला (२०२३ चे साडे तीन अब्ज रुपये). हिंदी चित्रपटसृष्टीतील हा आर्ग्युएबली सर्वात मोठ्ठा दरोडा आहे. एवढे मोठे यश सेलिब्रेट केलेच पाहिजे. त्यानुसार गाणे सुरु होते.
झीनत एका लोडाला टेकून बसते. तिच्या मनोरंजनासाठी खास कव्वाल मागवले आहेत. मुख्य कव्वाल आहे मजहर खान म्हणजे झीनतचा प्रत्यक्ष आयुष्यातील नवरा. केवळ एवढ्या एकाच कारणासाठी हे गाणे मस्ट वॉच ठरावे. विचार करा, हे गाणे तिच्या मनोरंजनासाठी सादर होते आहे. श्रद्धाने रुढ केलेल्या टर्मिनॉलॉजीनुसार ती भोक्ता रोलमध्ये आहे (https://www.maayboli.com/node/11435). बॉलिवूडमध्ये भोक्ता बनून एंजॉय करण्याची संधी फक्त व्हिलन्सना मिळते, हिरोईन्स फारच लांब राहिल्या. पण झीनतला ती संधी दिली आहे आणि समोर तिचाच नवरा नाचवला आहे. अस्मादिकांच्या माहितीनुसार झीनत आणि फूल बनी फूलनमधील सोनू वालिया या दोनच अशा हिरोईन्स ज्यांना भोक्ता बनून नाचगाण्याचा आस्वाद घेऊ दिला गेला आहे.
कव्वाली आहे "तू पहले क्या थी, और अब क्या हो गयी". गायक बडे युसुफ आजाद नामवंत कव्वाल आहे आणि गीतकार सईदी प्रसिद्ध कव्वाली आणि गझल लेखक आहेत (यांनी जगजित सिंग वगैरे लोकांसाठी गझल लिहिल्या आहेत). तसेच हुशारी दाखवत फुटवर्कचा अभाव असलेल्या झीनतला एका जागी बसवून ठेवले आहे. अपेक्षा नसताना एवढा क्वालिटी कंट्रोल बघून प्रेक्षक थक्क होतो. मुख्य कव्वाल म्हणून मजहरही ओक्के दिसला आहे. फक्त अधून मधून त्याला झटके येतात. हे गाणेही स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड आहे. दीड तास इतका डेन्स सिनेमा प्रेक्षकावर मारल्यानंतर आपल्याला आत्तापर्यंत घडलेले सर्वकाही पुन्हा एकदा गाण्यातून सांगितले जाते. सर्वकाही दोन वेळा दाखवून क्लॅरिटी!
आणखी एक खास बाब म्हणजे या गाण्यात तीनच वाद्ये वाजत आहेत - तबला, ढोलक, आणि हार्मोनियम. स्क्रीनवरही हीच तीन वाद्ये दिसत आहेत. इतर हिंदी गाण्यांप्रमाणे वाजते आहे अॅकॉस्टिक गिटार, भाईच्या हातात इलेक्ट्रिक गिटार प्रकार केलेला नाही. इतकेच काय एडिटरनेही यात मास्टरपीस लेव्हलची हुशारी दाखवली आहे. बेसिकली, डाकू हसीनाची वारेमाप स्तुती चालू आहे आणि मध्ये मध्ये फ्लॅशबॅक सीन्स (तिच्यावरचा अन्याय, तिची घोडदौड, तिचे दरोडे इ.). एडिटरने यात रिजेक्टेड फूटेज जोडले आहे कारण ते वाया का घालवा? उदा. "कांप उठा हर कातिल कमीना, रुपा बनी जब डाकू हसीना" या ओळीला आपण चाचाला लालाला धमकावताना पाहतो, जे प्रत्यक्षात घडतच नाही. "बिजली के जैसी तेरी नजर हैं" या ओळीला युनुस परवेझला हरिया अडवतो आहे पण युनुसला मारताना हसीना एकटीच गेली होती. "वो बन के उठी एक धमाका" या ओळीला डोक्याला पट्टी न बांधलेली झीनत कोणत्या तरी हवेलीत वरच्या मजल्यावरून उडी मारते आहे. हे सर्व रिजेक्टेड फूटेज आहे. रिशूट-रिराईटच्या आधी पटकथेत काय काय घडणार होते याची ती झलक आहे. फ्रेम बाय फ्रेम अॅनालाईज करण्याइतका मालमसाला या गाण्यात आहे आणि वर आणखी एक क्लासिक कव्वाली. त्यामुळे ओवर अॅनालाईज करत नाही. सिनेमा बघताना डोन्ट स्किप इट!
हसीना आता चंबळची अनभिषिक्त राणी झाली आहे. व्हिलन्स आणि रारो तिचा सामना करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखतील?
१०) जोगिंदरचा अंत
१०) जोगिंदरचा अंत
रारो आता द्विधा मन:स्थितीत आहे. एकीकडे बहिणीवरचे प्रेम, दुसरीकडे कर्तव्याची जाण. दुसरे काही न सुचल्याने तो सुट्टी टाकून आपल्या बेबला म्हणजे रोशनीला भेटायला शहरात जातो. त्याने रेघारेघांचा तर तिने चेक्सचा शर्ट घातला आहे. रारोचे रडगाणे ऐकून रोशनी म्हणते की तुला मेंटल सपोर्टची गरज आहे, मी पण तुझ्यासोबत गावाला येते. इथे रमेश देवला या दोघांच्या लग्नाला संमती असल्याची बिनकामाची माहिती मिळते. पण लग्नासाठी रारोला उसंत नसल्याने ते दोघे गावाला जाऊन लिव्ह-इन सुरु करतात (वे-अहेड ऑफ इट्स टाईम!).
रझाला मेंटल सपोर्टची आवश्यकता नाही. मुळात रझा मुराद मूलभूत पातळीवर उत्कृष्ट दर्जाचा व्हिलन आहे. त्याचे पडोसी की बिवी किंवा ना इन्साफी अशा चित्रपटांमधले मास्टर प्लॅन्स त्याच्या क्षमतेची ग्वाही देतात. फक्त सोन्यावरची धूळ झटकायला हवी. दिग्दर्शकाच्या लक्षात येते की गुड्डी नामक वीकपॉईंट दिला तरी जोवर व्हिलन साईड प्रोअॅक्टिव्हली थोडे तरी प्रयत्न करीत नाही तोवर झीनतच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे रझाला दिग्दर्शक थोडी अक्कल वापरायची परवानगी देतो. रझा जाऊन जोगिंदरला भेटतो. जोगिंदर बंडल व्हिलन असल्याने त्याची धाव दारु ढोसून नंदिताला छळण्यापर्यंत. मग रझा जोगिंदरला सांगतो की रारो झीनतसमोर फिका का पडला? जोगिंदर म्हणतो कारण ती त्याची बहीण आहे. मग रझा जोगिंदरला विचारतो की तसे असेल तर रारोदेखील झीनतचा भाऊ आहे, आपण या गोष्टीचा फायदा का नाही घेत? जोगिंदर माठ असल्याने रझाला सगळं इस्कटून सांगावे लागते. तो म्हणतो की तू तसाही डाकू कमी आणि दलाल जास्त आहेस. तू जाऊन झीनतच्या होणार्या वहिनीला, म्हणजे रोशनीला उचल. ती स्वत:च्या पावलांनी आपल्या एरियात आली आहे. आपण तिच्यामार्फत झीनतला त्रास देऊ, झीनत क्रुद्ध होईल, आणि तिला वाचवण्याच्या नादात आयती आपल्या जाळ्यात अडकेल. जोगिंदर म्हणतो की ठीक आहे, हे पण ट्राय करू. आता ती नाहीतर मी, एकच कोणीतरी जिवंत राहील. हा डायलॉग मारून जोगिंदर आपल्या मृत्युनाम्यावर स्वाक्षरी करतो.
जोगिंदरचे चित्त खरंच थार्यावर नाही. तो त्याची डिस्ट्रॅक्शन मोडस ऑपरंडी बाजूला सारून रोशनीला घेऊन चाललेल्या पोलिस फोर्सवर थेट हल्ला चढवतो. त्याने आपली अख्खी गँग पणाला लावण्याचा गाढवपणा केला आहे. य:कश्चित रोशनीसाठी त्याने अमूल्य मनुष्यबळ गमावले. असो, पांढरा हवाई शर्ट काळी पँट घातलेली रोशनी जोगिंदरच्या तावडीत सापडते. ही बातमी रारो आणि रजनीला कळते. रजनी गँगला सांगतो की हसीनाच्या डोक्यात जास्त हवा झाली आहे. ती अविचाराने एकटीच जाऊन मरेल. त्यामुळे तेरी भी चुप, मेरी भी चुप. तसेही त्याचा जोगिंदरचा जुना हिशोब आहे. मग तो जग्गाला सोबत घेऊन जोगिंदरच्या किल्ल्याकडे प्रस्थान ठेवतो.
जोगिंदरला रोशनीचे कलर कॉम्बिनेशन न आवडल्याने त्याने तिला पांढर्या शर्टाऐवजी गुलाबी कार्डिगन स्वेटर घालायला दिले आहे. तिच्या शिव्याशापांकडे साफ दुर्लक्ष करून तो कार्यक्रम सुरु करणार एवढ्यात चमत्कार घडतो. ऑफस्क्रीन रजनीने काळ्यापांढर्या चेहर्याच्या मेंबरला आणि जग्गाने आणखी एका मेंबरला ठार केले. मग ते दोघे त्या मेंबर्सच्या प्रेतांमागे पाठमोरे स्वार झाले. पहार्यावरच्या डाकूंना हे दोघे मागे बसले आहेत हे लक्षात येत नाही आणि ते दोघे किल्ल्यात घुसतात. दोघांकडे मशीनगन्स आहेत. काही कळण्याच्या आत जोगिंदरची उरलीसुरली गँग खलास! धक्कातंत्राच्या प्रभावी वापरानंतर रजनी जोगिंदरला गाठतो. मधल्या काळात जोगिंदरने दाढी वाढवल्यामुळे रजनीला इतके दिवस विजय अरोराचा खुनी हाच हे कळलेले नसते. त्या आठवणीही परत डोके वर काढतात.
आता रजनी जोगिंदरला सोडणे शक्यच नाही. जोगिंदरने विजयवर गोळी झाडली नव्हती त्यामुळे रजनीही त्याला ठार करायला रासवट पद्धत वापरतो. जोगिंदरला कुत्ते असे संबोधून रजनी त्याला यथेच्छ तुडवतो. मध्येच रोशनीचाही एका चिल्लर डाकूच्या बॉक्स ऑफिसवर लाथ मारतानाचा शॉट. हे जग्गा इतर डाकूंना मारण्यात बिझी असल्याचे कळवण्यासाठी. मग रजनीलाच तिच्या मदतीला जावे लागते. जोगिंदर या संधीचा फायदा उठवून तिथून पळून जातो. रजनीला प्रायोरिटीज कळत असल्याने तो जोगिंदरचा नाद सोडतो आणि रोशनीला घोड्यावर बसवून तिथून निघतो.
वाटेत त्याला रारो आणि त्याची पोलिस फोर्स भेटतात. रारो उगाच वल्गना करतो की मैं तुम्हे गोलियों से भून दूंगा वगैरे. रजनीसाठी ही कल्पनाच हास्यास्पद आहे पण आत्ता मुद्दा वेगळा असल्याने तो रोशनीला रारोच्या ताब्यात देतो. इथे रजनीला झीनत आवडत असल्याचा पहिला इशारा मिळतो (तुम्हारी मौत से अगर किसी की आंख में येक भी आंसू आ गया, तो मुझसे बरदाश्त नही होगा). रोशनीलाही आपल्या नणंदेच्या मॅटरची जाणीव होते. तसेही रजनीचे तिच्यावर उपकार आहेत. त्यामुळे ती मध्ये पडते आणि रजनीला जाण्यासाठी वाट मोकळी करून देते. तो गेल्यावर रोशनी सांगते की हा जोगिंदर नाही, हा रजनी आहे. रजनीची ओळख पटल्यावर रारोला सगळा मामला क्लिअर होतो. च्यायला रारोच्या पोलिसखात्याकडे एकाही डाकूचा फोटो नाही?
रजनी आता स्वस्थ बसू शकत नाही. तो बालेला जोगिंदरची बातमी काढायला सांगतो. बाले म्हणतो की जोगिंदरने रजनीच्या भीतिने सरेंडर केलंय. उद्या सकाळी त्याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात हलवणार आहेत. पुन्हा एकदा - शिवपुरी -> ग्वाल्हेर विभाग -> पोलिस मुख्यालय ग्वाल्हेर -> ग्वाल्हेर जेल. १००% अॅक्युरेट भूगोल. झीनत कुठेतरी दरोडे घालत हिंडते आहे. रजनी याचा फायदा घेऊन तिला तसेच अंधारात ठेवून उद्याच जोगिंदरची प्राणाहुति द्यायचा प्लॅन करतो.
*लेडी डाकूपटांचे पोटनियम - अपवादात्मक परिस्थिती वगळता लेडी डाकूचा बदला लेडी डाकूनेच घ्यायला हवा. अपवादात्मक परिस्थिती: १) सिनेमा आर्ट फिल्म आहे. २) अन्याय करणार्याने मल्टिपल अन्याय केले आहेत. पण असे असेल तर लेडी डाकू सब्स्टिट्यूटही डाकूच असायला हवा/वी.*
उपरोक्त पोटनियम अपवाद २ नुसार जोगिंदर झीनतचाही अपराधी आहे पण त्याला मारण्याचा मान रजनीकांतला दिला आहे. दुसर्या दिवशी जोगिंदरला घेऊन पोलिस व्हॅन निघते. इतक्या दिवसांमध्ये रजनी झीनतकडून चार गोष्टी शिकला आहे. तिच्या घोडे सोडून डिस्ट्रॅक्ट करण्याच्या प्लॅनपासून रजनी प्रेरणा घेतो आणि रस्त्यात बर्याचशा गाई सोडतो (सर्व काही दोन वेळा दाखवले जाते). गुराख्याचे सोंग घेतलेला रजनी या डिस्ट्रॅक्शनचा फायदा घेऊन जोगिंदरसकट व्हॅन घेऊन पळतो. पोलिस जीपचे टायर तितके जाड नसल्याचे ध्यानात घेऊन तो मुद्दाम नदीतून गाडी काढतो. व्हॅन पुढे जाते, जीप अडकून पडते. जिथे विजय अरोरा मेला त्या ठिकाणी येऊन व्हॅन थांबते.
जोगिंदरला त्याच्या कृष्णकृत्याची आठवण करून दिल्यानंतर पुन्हा एकदा तुडवा तुडवी सत्र सुरु होते. आता जोगिंदर पडला ढेबरा. विजय अरोरा कसा थोड्या फटक्यांमध्येच कै. झाला होता. जोगिंदरला त्याच प्रकारे मारण्यासाठी त्यापेक्षा बरीच जास्त मेहनत लागणार. एवढा पेशन्स काही रजनीमध्ये नाही. मनासारखे बुकलून झाल्यानंतर तो जोगिंदरला एका फांदीला बांधतो आणि मशीनगनची सगळी मॅगझीन त्याच्यावर रिती करतो. जोगिंदर खलास!
अच्छा, जोगिंदरला रजनी मारणार
अच्छा, जोगिंदरला रजनी मारणार होता म्हणून सोन्याच्या काडतुसांची क्वान्टिटी कमी केली होती होय...उगीच मौल्यवान रिसोर्सेसचा अपव्यय व्हायला नको म्हंणून.... मग ती गोळी सुद्धा झीनी बेबीने दान करून टाकली असेल का?
जोगिंदरला रजनी मारणार होता
जोगिंदरला रजनी मारणार होता म्हणून सोन्याच्या काडतुसांची क्वान्टिटी कमी केली होती होय >>
MazeMan भारी मुद्दा आहे. असे म्हणता येईल की लेखकाने आपल्याला आधीच क्लू दिला होता की झीनत जोगिंदरला मारणार नाही. नोटिस केल्याबद्दल धन्यवाद, माझ्याकडून हे सुटले होते.
११) डाकू बिवी बच्ची समेत
११) डाकू बिवी बच्ची समेत
११.१) व्हिलन साईडची यशस्वी माघार
जोगिंदर मेलेला बघून लालाची टरकते. तो रझाला म्हणतो की आता आपल्या दोघांचा नंबर. रेड लेबलचे दोन घोट घशाखाली ढकलल्यावर रझाला योग्य तो डिफेन्स सुचतो. तो म्हणतो की आपण मरण्याचे नाटक करू. त्यानुसार रामसिंह आणि वीरसिंह या दोन नोकरांना बोलावले जाते. त्यांना रझाचा नौलखा हार आणि लालाची अंगठी बक्षीस देण्याचे नाटक करून गोळ्या घातल्या जातात. मग त्यांच्या प्रेतांवर दारु ओतून हवेलीला आग लावून दिली जाते. सुदैवाने पोलिस बंडल आहेत म्हणून नाहीतर जळून मेलेले रझा आणि लाला नाहीत हे सांगायला दोन मिनिटेही लागणार नाहीत. दोन्ही प्रेतांची अंगकाठी पूर्णपणे वेगळी आहे. पोस्टमॉर्टेम मध्ये मृत्यु गोळी घातल्याने झाला आहे हे उघडकीस येईल. जर इन फॉर्म रझा मुरादने हा प्लॅन बनवला असता तर त्याने दोघांना दारु ढोसून बेशुद्ध केले असते आणि मग गुपचुप आग लावली असती, वर हे हवेलीत रझा व लाला एकटेच होते हे सांगणारे चार साक्षीदार अॅरेंज केले असते.
असो, पेपरात यांच्या मृत्युची बातमी छापून येते आणि दोन तासांनी आपल्याला रझा व लालाचे चित्रपटातले पूर्ण नाव कळते (राजा रघुबीर सिंह आणि लाला गुनीराम). ही बातमी ऐकून रझाने अंदाज बांधल्याप्रमाणे झीनत वेडीपिशी होते. ती गळ्यातला नेकलेस फेकून देते, जो गुड्डी गुपचूप उचलून घेते (सेटअप). देवीच्या मूर्तीसमोर उभी राहून ती आकांडतांडव करते आणि आत्महत्येचा निर्णय घेते कारण उसकी जिंदगी का फैसला वो खुद करेगी. गुड्डी जाऊन बहुतेक रजनीला सावध करते. मग रजनी काही अनर्थ घडायच्या आत झीनतला अडवतो. ती म्हणते की मला मरू देत, आता माझ्या जीवनात काही अर्थ राहिला नाही. हे लक्षणीय आहे की क्षणभरही तिच्या मनात सरेंडरचा विचार येत नाही. रजनी म्हणतो की ठीक आहे, मग आपण दोघं डेटिंग सुरु करू. इतके दिवस नफरतसाठी जगलीस आता मोहोब्बतसाठी जग. झीनत रजनीला निरखते - नॉट बॅड ड्यूड, नॉट बॅड अॅट ऑल.
११.२) गद्दार
नव्या नव्या प्रेमाच्या साक्षीला नवे गाणे झालेच पाहिजे. बोल आहेत "नगर नगर हैं ताजा खबर, प्यार के नाजूक हथकडियों में जकडी गयी | जिसने डाले डाके पे डाके वो डाकू हसीना पकडी गयी || ", आवाज दिला आहे आशा भोसल्यांनी. पुन्हा एकदा चांगली कव्वाली दिल्यानंतर म्युझिक डिपार्टमेंटने पाट्या टाकल्या आहेत (सर्व काही दोन वेळा). झीनत तिचा युनिफॉर्म काढून गुलाबी टॉप-लहंगा घालून डान्स करते, पण कंबरेला दोन बेल्ट तसेच. तिच्यासाठी मिक्स ऑफ कंबर हलवणे आणि अमिताभ स्टेप्स अशी कोरिओग्राफी आहे. दिग्दर्शकानेही समोर झीनत आहे हे लक्षात घेऊन अधून मधून अपेक्षित अँगल्स लावले आहेत आणि रोशनीचे झटके जसे वाया घालवले तसे झीनतचे घालवलेले नाहीत. हा प्रकार सुसह्य असला तरी आवर्जून बघण्याजोगाही नाही. मुख्य मुद्दा असा की झीनत एकटीच नाचते, रजनी नाचत नाही.
आता प्रॉब्लेम असा होतो की प्रेम वगैरे ठीक आहे पण हे सगळे गँगला क्लिअर केले पाहिजे. तिला एकटीलाच नाचताना पाहून हरियाचा होतो गैरसमज. तो आणि जग्गा येऊन तिला म्हणतात की तू एवढी एक्साईट आहेस तर आम्ही पण माजावर आलोच आहोत. काही होणार इतक्यात रजनी आडवा येतो. या दोघांनी इथे कॅरेक्टर ब्रेक केले आहे कारण या पॉईंटपर्यंत हे दोघे वासनांध असल्याची कसलीच हिंट चित्रपटात नाही. माझ्यामते लेखक लेडी डाकूपटांच्या नियमांचे धार्मिक पालन करण्याच्या नादात हुकला आहे. लेडी डाकू गँगचा किमान एक मेंबर गद्दार असावा लागतो पण हरियाला गद्दारी करण्याचे काही कारणच नाही. मग त्याचा अपमान करून हे कृत्रिम कारण पुढे केले आहे.
हरिया म्हणतो की तू हसीनावरून एवढा का उखडतो आहेस? ती तुझी लग्नाची बाईल थोडीच आहे? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यावर रजनी-झीनत भडकतात आणि हरिया-जग्गाची धुलाई होते. बाले मध्यस्थी करून त्या दोघांचा जीव वाचवतो. पण रजनीला रारोप्रमाणे आपल्याला लिव्ह-इनची लक्झरी परवडण्याजोगी नाही हे लक्षात येते. तो झीनतला म्हणतो की आपण लग्न करणंच इष्ट. झीनत मूक संमती देते. तो चाचाला सर्व व्यवस्था करायला सांगतो.
११.३) किकअॅस लग्न
एक अख्खं देऊळ बंधक बनवून लग्न सोहळा सुरु होतो. भटजी खूप घाबरलेला आहे. रजनी त्याला धीर देत म्हणतो की टेन्शन नको घेऊस मी खूप धार्मिक डाकू आहे, तुला मारणं माझ्यासाठी पाप आहे. तिकडे हरियाने गद्दारी करून रारोला यांच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. रारो देवळाला वेढा देतो. त्याचा आवाज ऐकून रजनी त्याला डिवचतो की तुला झीनतला शादी के जोडे में बघायचं होतं ना, बघ आता. झीनतही डायलॉग मारण्यात कमी नाही.
"रंजीत सक्सेना. दूध पीते बच्चे की तरह चांद को हासिल करने जैसी हसीना को गिरफ्तार करने अपनी ये जिद छोड दो."
रारो म्हणतो की देवळाबाहेर ये, मला देवळात रक्तपात करायचा नाहीये. हा काय बावळटपणा आहे? मग तर झीनत देवळाबाहेर येणारच नाही. ती निवांत बसून एस्केप राऊट मिळेपर्यंत टाईमपास करेल. झीनत त्याला म्हणते की मग बस बोंबलत, आता आमच्या बंदुकाच तुला उत्तर देतील. रारो नाईलाजाने गोळीबार सुरु करतो. दोन्ही बाजूंकडे आता बाँब देखील आलेत. रजनी आणि झीनत सात फेरे घेताना ज्या निवांतपणे गोळ्या झाडतात ते बघून प्रेक्षक स्तिमित होतो. झीनत इथे पाच तरी पोलिस मारते (खून क्र. १० ते १४). तिच्या बाजूचेही बरेच लोक मारले जातात. अजून मनुष्यहानि नको म्हणून रजनी म्हणतो की ठीक आहे, आम्ही सरेंडर करतो.
चेहरा झाकणार्या मुंडावळ्या बांधलेले एक जोडपे हात वर करून बाहेर येते. इथे "आश्रम में जूता पहन कर जाना मना है | " ही पाटी आणि त्याला साजेसा मरून पडलेला अनवाणी डाकू बघून प्रेक्षक चकित होतो. अर्थात हे रजनी-झीनत नाहीत. ही पुजार्याची मुले. रारोला दिसते की रजनी-झीनतसारखे कोणी घोड्यावरून पसार होते आहे. मग सगळे पोलिस त्यांच्या मागावर. त्यांना पकडतात तर ते दोघेही भलतेच कोणीतरी. खरे रजनी-झीनत पाठीमागच्या एंट्रन्सने पसार होतात. हुशार पोलिसाने आधी त्यांचे घोडे ताब्यात घेतले असते. जाता जाता रजनी हरियाला अतिशय स्टायलिश पद्धतीने ठार करतो. अशा रीतिने रारोला उल्लू बनवून हे जोडपे आणि उर्वरित गँग सुखरुप अड्ड्यावर परतते.
अनवाणी डाकू!
हरीयाला रजनी गोळ्या घालतो तेव्हा हरीया पायाखाली स्प्रिंगा लावल्यासारखा जो उसळतो त्याला तोड नाही
हरीयाला रजनी गोळ्या घालतो
हरीयाला रजनी गोळ्या घालतो तेव्हा हरीया पायाखाली स्प्रिंगा लावल्यासारखा जो उसळतो त्याला तोड नाही >> rmd +१ तो एक कहर प्रकार आहे
अरे तू स्पेसिफिक लिहायला
अरे तू स्पेसिफिक लिहायला विसरलास - पंडिताला रजनी म्हणतो की "पंडितजी हम डाकू जरूर है लेकीन हिंदू है. गो हत्या और ब्रह्महत्या (रजनी भाषेत - भ्रम हत्या) को हम भी पाप समझते है. "
बहुतेक आताच्या काळात हा डाकू लैच हीट झाला असता
झीनत रजनीला निरखते - नॉट बॅड
झीनत रजनीला निरखते - नॉट बॅड ड्यूड, नॉट बॅड अॅट ऑल.
जिसने डाले डाके पे डाके वो डाकू हसीना पकडी गयी || ", आवाज दिला आहे आशा भोसल्यांनी. >>> हे गाणे आशाताईंनी का म्हटले असावे?
बहुतेक आताच्या काळात हा डाकू लैच हीट झाला असता >>>

बहुतेक आताच्या काळात हा डाकू
बहुतेक आताच्या काळात हा डाकू लैच हीट झाला असता >>>
हे लक्षणीय आहे की क्षणभरही तिच्या मनात सरेंडरचा विचार येत नाही. रजनी म्हणतो की ठीक आहे, >>>
हे आपल्या पिक्चर्स मधला एक महत्त्वाचा ट्रेण्ड दाखवते. त्यामुळे याचा आवर्जून उल्लेख करायलाच हवा. खरे तर लेखातही बोल्ड मधे हवे (म्हणजे बोल्ड अक्षरात. उगाच गैरसमज नकोत).
तो ट्रेण्ड म्हणजे हीरो/हिरॉइन लोक सध्या डील करत असलेली समस्या व डायरेक्ट मरणे - याच्या मधे बरेच इतर मार्ग उपलब्ध असतात याचे त्यांना अजिबात ट्रेनिंग नसणे. इथे ती डाकू आहे म्हणजे बरेच अन्याय ऑलरेडी झाले व केले असतील. इथे निदान गंभीर गुन्हे आहेत. पण अनेकदा जेमतेम (if you are to believe their character's stated age) विशीतील लोक आपण जिच्या प्रेमात आहोत ती दुसर्याच्या प्रेमात आहे म्हणून किंवा कधी कधी तर तिच्या प्रेमात आपला दोस्त आहे म्हणून डायरेक मरायला निघतात. तेव्हा बॉलीवूड लीड्स करता असे ट्रेनिंग गरजेचे आहे.
हे केवळ "क्विक ग्लान्स" मधे दिसलेल्या वाक्यांवर. अजून पूर्ण लेखात बराच मागे आहे मी. कॅच अप करतोय.
बहुतेक आताच्या काळात हा डाकू
बहुतेक आताच्या काळात हा डाकू लैच हीट झाला असता >> धनि
सध्याच्या काळात त्याचा डायलॉग व्हायरल होण्याचे मटेरिअल आहे.
१२) ओल्यासोबत सुकेही जळते
१२.१) मास्टर प्लॅन
रझाप्रमाणेच रारोच्या लक्षात येते की ही डझन्ट स्टँड अ चान्स! मग तो टॅक्टिक्स बदलतो. तो जाऊन त्या मास्टरला शोधतो ज्याने रजनीसाठी विजय अरोराचा डायिंग मेसेज ट्रान्स्लेट केलेला. तो मास्टरला म्हणतो की जोगिंदर मेला, हसीनाचेही सगळे व्हिलन्स ऑन पेपर मेले (रझा आणि लाला जिवंत असल्याचे इतर कोणाला ठाऊक नाही). त्यामुळे रजनी आणि झीनतकडे डाकू बनण्याचे काही कारणच नाही. तरी तू जाऊन त्या दोघांना कन्व्हिन्स कर. झीनत नाही तरी रजनी नक्की तुझं ऐकेल. मास्टर त्रयस्थ व्यक्ती असल्याने त्याला अक्कल वापरायची परवानगी आहे. तो थोडा विचार करून म्हणतो की ओके, मी प्रयत्न करतो.
त्याचा प्रयत्न म्हणजे विचारपूर्वक आखलेला प्लॅन आहे. तो मास्टरचा प्लॅन असल्याने अर्थातच मास्टरप्लॅन आहे
तो रजनीच्या किल्ल्यावर जाऊन रजनीची भेट घेतो. रजनी देखील गुळण्या करण्याचे काम बाजूला ठेवून त्याच्या पाया पडतो. मास्टर म्हणतो की सूनबाई कुठायत? रजनीने हाक मारताच झीनतही मास्टरची भेट घेते, पाया पडते. मास्टरही अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देतो. मग मास्टर मुद्द्यावर येतो. तो म्हणतो की मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या "सर की सलामती" पाहिजे. रजनीच्या अल्पमतीस ते झेपत नाही. मग मास्टर सांगतो की ए वेड्या सरेंडर कर.
रजनी अर्थातच नकार देतो - सूरज से कहिए की वो राख का ढेर बनकर बिखर जाए, मगर ये ना कहिए की वो वक्त से पहले रात की गोद में मुंह छुपा ले. पण मास्टर तयारीनिशी आला आहे. त्याचा पहिला मुद्दा असा की जर रजनीने सरेंडर केले नाही तर कधी ना कधी रजनी पोलिसांकडून मारला जाणारच (फ्रँकली कान्ट सी दॅट हॅपनिंग, बट शुअर). मग त्याने झीनतला दिलेला आशीर्वाद खोटा ठरेल. दुसरा मुद्दा असा की तुमच्या संसारात गुड्डी देखील आहे. तिचं काय करणार? तिला डाकू म्हणून वाढवणार का? ती सुद्धा एखाद्या डाकूप्रमाणेच पोलिसांच्या हातून गोळी खाणार का? इथे रजनी आणि झीनत लगेच गुड्डीला डाकूच्या वेषात, बंदूक घेऊन, गोळी खाताना कल्पतात. त्या दोघांना गुड्डीचे चांगले भवितव्य हवे आहे. पण मास्टर म्हणतो की या वेगाने गुड्डी यातर ऑन फील्ड मरेल किंवा फासावर लटकेल. रजनीला हे पटते आणि तो सरेंडर करायला तयार होतो.
टू प्ले डेव्हिल्स अॅड्व्होकेट, रजनीकडे यापेक्षा सरस कमीत कमी ३ पर्याय आहेत - १) गुड्डीला दुसर्या एखाद्या फॅमिलीला देऊन टाकणे, २) योजनाबद्ध रीतिने राजकारणात घुसणे. झीनत आणि त्याला इतकं गुडविल आहे की ते सहज निवडून येतील, ३) डाकूगिरीतून अपग्रेड होऊन लुटीचे भांडवल वापरून एखादा धंदा सुरु करणे. या दोघांचे फोटो पोलिस फायलीत नाही आहेत हे बघता, नवीन आयडेंटिटी घेऊन दूरच्या शहरात सेटल होणे त्या काळात प्लॉजिबल आहे. कदाचित ऑलरेडी इतका कॉम्प्लेक्स सिनेमा झाल्यामुळे लेखकाला या अॅडिशनल कॉम्प्लिकेशन्स प्रशस्त वाटल्या नसाव्यात.
१२.२) रजनीचा अंत
फूलन देवी संदर्भ असल्याने हा आत्मसमर्पणाचा सीन टाकण्यात आला असावा. यात खूपशा गोष्टी मॅच होतात. फूलनची अट होती की ती मध्य प्रदेशातच सरेंडर करेल, उत्तर प्रदेशात नाही कारण उत्तर प्रदेशातल्या पोलिसांवर तिचा विश्वास नव्हता. आपले कथानक मध्य प्रदेशात घडते (१००% अॅक्युरेट भूगोल) आणि झीनत इतर कोणत्याही पोलिसापेक्षा रारोवर विश्वास ठेवेल. फूलनची अट होती की सरेंडरच्या ठिकाणी गांधीजी आणि दुर्गामातेचे फोटो असतील. इथेही आहेत. तिच्या सरेंडरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हजर होते (ही पण बहुतेक एक अट होती). इथेही मंत्र्यासारखा दिसणारा कोणीतरी हजर आहे.
अवांतर: फूलन देवीचे सरेंडर आणि सरेंडरसाठीच्या तिच्या अटी हा एक गहन विषय आहे. पण तिने ज्या हिकमतीने तिला हव्या त्या अटी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारकडून मान्य करवून घेतल्या त्याची दाद द्यावीच लागेल.
रारो रजनी, झीनत आणि कंपनीला सरेंडरच्या ठिकाणी घेऊन येतो. डिआयजी रमेश देव आणि इतका वेळ न दिसलेला कमिशनर प्रदीप कुमारही हजर आहेत. दूरवर एका पद्मिनीत बसून रझा आणि लालादेखील नजर ठेवून आहेत. या दोघांचा प्लॅन आहे की इथे हसीनाला ठार करायचे. कशाला? गप तिला सरेंडर करू द्यावं, मग परत आपले धंदे राजरोसपणे सुरु करावेत. अगदीच हौस असेल तर जेलमधून जाऊन तिला टुकटुक माकड करून यावं आणि ती जेलमधून बाहेर येईपर्यंतची वर्षे मजेत जगावीत. पण हे दोघे हुशार नाही तर बंडल व्हिलन आहेत. त्यामुळे ते खाजवून खरुज काढत आहेत.
सरेंडरचे सोपस्कार सुरु होतात. प्रकुला डाकूंना इतका भाव दिलेला आवडत नाही. त्यामुळे तो झीनतला ऐकू जाईल अशा बेताने टोमणे मारतो. प्रत्यक्ष घडले होते त्यानुसार झीनत व रजनी बंदुका उंचावतात, गांधी-दुर्गामाता यांच्या तसबिरीसमोर डोके टेकवतात. त्याचक्षणी रझा स्नायपरने गोळ्या झाडतो. इथेही मुख्य धोका झीनतला ठार करण्याऐवजी तो रजनीला ठार करतो. गोळ्यांच्या आवाजाने एकच गोंधळ माजतो आणि झीनतवर नेम धरणे अशक्य होते. लगेच झीनत आणि गँग तिथे उपस्थित पोलिसांना बंधक बनवतात. एवढी मोठी डाकू सरेंडर करते आहे आणि तिथे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच पोलिस बघून प्रेक्षक कपाळावर हात मारून घेतो. रारो सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो की यात पोलिसांचा काही संबंध नाही. पण बिथरलेली झीनत काही एक ऐकून न घेता तिथून पसार होते. हे सर्व रझाने केले आहे हे नंदिता बघते. रझा तिला घेऊन तिथून पसार होतो. रारो, प्रकु, आणि रमेश हात चोळत बसतात.
१२.३) हाहाकार
बॅक टू अड्डा. रजनी चाचाच्या मांडीत डोके ठेवून पडला आहे. रजनीला बॉलिवूडमध्ये मारण्याची जुनी परंपरा आहे ती इथे कंटिन्यू केली आहे. रजनी झीनतला बोलावून घेतो. ती परत आत्महत्येच्या फंदात पडू नये म्हणून तो तिला बजावतो की गुड्डीची जबाबदारी तुझ्यावर आहे. झीनतला अश्रू आवरत नाहीत. रजनी म्हणतो की ठीक आहे गं, मी माझा बदला घेतला. जोगिंदरला ठार केलं. दु:ख इतकंच की मला धोक्याने मारणार्या पोलिसांचे मी काहीच वाकडे करू शकत नाही. हे बोलता बोलता तो प्राण सोडतो. झीनतला शोक अनावर होतो. आधीच तिला प्रकुने विनाकारण डिवचलेले, त्यात रजनीचा मृत्यु आणि त्याचे हे अखेरचे प्रक्षोभक बोल.
"सिंदूर का रंग खून से कही ज्यादा गहरा होता हैं. मुझे कसम हैं उस सिंदूर की जो तुमने मेरी मांग में भरा हैं. मैं सिंदूर की कीमत वसूल करने के लिए खून की नदियां बहा दूंगी."
यानंतर झीनत पोलिसांना अक्षरश: दे माय धरणी ठाय करते. मधल्या काळात तिचा नेम पुष्कळ सुधारला आहेच पण आता बाँबफेकही चांगली जमू लागली आहे. तिची सगळी गँग शोधून शोधून पोलिस ठार करत सुटते. स्वत: झीनत जातीने इन्स्पेक्टर रेगेला गोळ्या घालते. रेगे धरून आपण झीनत कमीत कमी तीन पोलिसांना ठार करते हे कन्फर्म सांगू शकतो (खून क्र. १५ ते १७). या पॉईंटला सिनेमाचे बजेटही संपत आल्याचे लक्षात येते कारण इथून पुढचे बरेचसे सीन स्टुडिओत शूट झाल्याचे कळून येते. क्रोधाग्नीत जळणार्या तिला आता मूल्यांची जाणीव उरलेली नाही. ती खर्या अर्थाने खूंखार डाकू बनली आहे.
पोलिस खाते हतबल झाल्याने कमिशनर प्रकु संतापतो. तो सगळ्या मुख्य अधिकार्यांची मीटिंग बोलावतो. मीटिंगमध्ये उपयुक्त चर्चा करण्याचे सोडून तो नुसते ताशेरे ओढतो. पण मी म्हणतो तुला सांगितलं कोणी होतं झीनतला डिवचायला? आणि कमिशनर म्हणून सरेंडरच्या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था करणे ही तुझी जबाबदारी नाही का? अस्मादिकांच्या मते या पोलिस अधिकार्यांनीच उलट प्रकुला एका खुर्चीत बसवून झाडलं पाहिजे. पण प्रकुच्या कॅमिओत अजून आगीत तेल ओतणे बाकी आहे. रारो प्रकुला म्हणतो की याआधी पण मोठमोठ्या डाकूंनी पोलिसांशी थेट पंगा घेतला आणि पोलिसांनी त्यांचा यशस्वी बीमोड केला. हसीनाचाही तोच शेवट होईल. प्रकु म्हणतो की ओहो. म्हणजे ती एसपी रणजीत सक्सेनाची बहीण आहे म्हणून तिचा इतर डाकूंप्रमाणे बीमोड होत नाही आहे का? (अरे यार कमिशनरने तरी रारोला एएसपी म्हणावे.)
रारोला हा आरोप जिव्हारी लागतो. तो म्हणतो की आता खूप बिल झालं, सिनेमा संपवायची वेळ झाली आहे. क्लायमॅक्समध्ये मी माझ्या माथी लागलेला हा कलंक धुवून टाकेन.
मी म्हणतो तुला सांगितलं कोणी
मी म्हणतो तुला सांगितलं कोणी होतं झीनतला डिवचायला?
>>>>
प्रकुच्या अभिनय किंवा संवादफेकीने कुणी डिवचलं गेलंय हे जरा जास्तच नाही का? किती सिनेमॅटीक लिबर्टी घ्यावी दिग्दर्शकाने?
सूनबाई कुठायत? रजनीने हाक
सूनबाई कुठायत? रजनीने हाक मारताच झीनतही मास्टरची भेट घेते, पाया पडते. >>> इथे बॅकग्राऊंडला अगदी घरगुती म्युझिक मारलं आहे. क्षणभर आपण कौटुंबिक पिक्चर बघतोय असा भास होतो.
गुड्डीला डाकूच्या वेषात, बंदूक घेऊन, गोळी खाताना कल्पतात >>> हा सीन पाहताना धूम मधल्या अलीच्या imaginations ची आठवण येते.
प्रकुच्या अभिनय किंवा
प्रकुच्या अभिनय किंवा संवादफेकीने कुणी डिवचलं गेलंय हे जरा जास्तच नाही का? किती सिनेमॅटीक लिबर्टी घ्यावी दिग्दर्शकाने? >>
तसे बघावे तर एवढा रमेश देव डीआयजी असताना प्रकुचा कॅमिओ टाकणे हीच केवढी मोठी लिबर्टी आहे.
हा सीन पाहताना धूम मधल्या अलीच्या imaginations ची आठवण येते. >>
येस्स, अगदी तसेच दाखवले आहे.
सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार. प्रतिसादांचे विशेष आभार. हा चित्रपट मसालापटांमध्येही थोडासा हार्डकोअर म्हणावा लागेल पण जर हा पचवू शकलात आणि लेडी डाकू मायक्रोजॉनरमध्ये इंटरेस्ट निर्माण झालाच तर पुढल्या इयत्तांचा अभ्यासक्रम असा - कानून मेरी मुठ्ठी में (परवीन बाबी + कोर्ट रूम ड्रामा), महावीरा (डिंपल + शॉटगन + दोन दोन राजकुमार), आणि खूपच धाडसी असाल तर द पॉवर ऑफ वुमेन: तेजाब (यात तीन लेडी डाकू आहेत आणि त्यातली मुख्य डाकू खराखुरा जिवंत नाग गळ्यात घालून फिरते).
असो, क्लायमॅक्ससोबत डाकू हसीनापुराण पूर्ण करूयात.
१३) क्लायमॅक्स
१३) क्लायमॅक्स
१३.१) शिष्टाई
*लेडी डाकूपटांचे पोटनियम: जर लेडी डाकूचा भाऊ किंवा प्रियकर एकजण पोलिस असेल आणि चित्रपट भारतीय असेल तर त्या दोघांची एकांतात भेट व्हावीच लागते आणि तो तिला सरेंडरसाठी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो.*
रारोने अप्रत्यक्षरित्या बरेच प्रयत्न केले असले तरी तो स्वत: डाकू हसीनाला समोरासमोर भेटलेला नाही. त्यानुसार तो शिष्टाईचा अखेरचा प्रयत्न करायचे ठरवतो. बाले येऊन हसीनाला सांगतो एसपीला तुला एकांतात भेटायचं आहे. ती विचारते कुठं? बाले म्हणतो उद्या सकाळी, फूटी कोठीवर. ती म्हणते ओके. बाले म्हणतो की आपण थोडं प्लॅनिंग करू, या पोलिसांचा काही भरवसा नाही.
"सरकारने आजतक ऐसी कोई गोली नही बनायी, जो हसीना का सीना चीर सके. हसीना जाएगी."
स्वॅगर मॅक्स कॉन्फिडन्स! बाले काही तिला जायला नको म्हणत नाही आहे. तो फक्त म्हणतो आहे की तू एकटी नको जाऊस. त्याचं म्हणणं लॉजिकल आहे. ऑलमोस्ट सर्व लेडी डाकूपटांमध्ये अशा सीनमध्ये शिष्टाई असफल झाल्यानंतर भाऊ/प्रियकर लेडी डाकूला अरेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण झीनतला पूर्ण खात्री आहे की असं काहीही करणं रारोच्या कुवतीबाहेरचे काम आहे. तसेच आपला भाऊ इतका सज्जन आहे की तो इतर कोणा पोलिसाला फिरकू देणार नाही. रारो तिच्या अपेक्षेप्रमाणे खरंच दुसरा कोणी पोलिस सोबत आणत नाही पण झीनतचा कॉन्फिडन्स आता ओव्हर कॉन्फिडन्स होऊ लागला आहे. प्रत्यक्ष सीनमध्ये ते लक्षात येते.
झीनत रारोला भेटायला पूर्णपणे नि:शस्त्र गेली आहे. एवढेच नाही तर तिचा घोडाही लांब कुठेशी पार्क करते तर रारोची जीप भेटीच्या ठिकाणीच आहे. वे टू रेकलेस! रारो तिला डाकू हसीना म्हणताच ती त्याला आठवण करून देते की तो तिला प्रेमाने 'बिल्ली' म्हणायचा. रारो डॉनमध्ये नसल्याने तो पंच रजिस्टर न होऊ देता पटकन मुद्द्यावर येतो. तो म्हणतो की तू क्रूरकर्मा दरोडेखोर आहेस, तू माझी बहीण असू शकत नाहीस. इथे फिलॉसॉफिकल डिबेट सुरु होतो. झीनत रजनीने तिला सिनेमाच्या सुरुवातीला दिल्या त्याच आर्ग्युमेंट्स वापरते. तिने कोणा निरपरध्याचा खून नाही केला (खोटं, तिने आत्तापर्यंत किमान ९ निर्दोष पोलिसांचे खून केले आहेत), क्लासिक व्हाटअबाऊटरी (रावण को मारने का राम को किसने अधिकार दिया था) इ. रारोला एथिकल ट्रेनिंग दिले असल्याने त्याला कळून चुकते की हिच्या डोक्यात शिरलेले व्हिजिलँटिजमचे खूळ उतरणे अशक्य आहे. जर रझा आणि लालाला ठार करण्याचा हिला चान्स मिळता तर कदाचित हिची सारासार विवेकबुद्धि शाबूत राहिली असती पण आता ही थ्रिल-सीकर आहे. तरी प्रयत्न करणे भाग आहे.
तो तिला पोटतिडकीने सांगतो की किमान ठरवून पोलिस मारण्याचा जो नवीन प्रोग्राम तू सुरु केला आहे तो बंद कर. त्याचे म्हणणे बरोबर आहे. झीनत कितीही केपेबल डाकू असली तरी संपूर्ण राज्याची पोलिस फोर्स तिच्या मागे लागली तर ती सुद्धा फार काळ जिवंत राहू शकत नाही. पण आता झीनत डिल्युजनल झाली आहे. ती गर्वाने सांगते की मी असे कित्येक पोलिस किडामुंगीप्रमाणे चिरडून टाकले. ती म्हणते की रजनी तुमच्यामुळे मेला. आता त्याचा बदला म्हणून कोणाला सोडणार नाही, अगदी प्रकुला सुद्धा. वर तिचे पालुपद
"रुपा नही हसीना कहो. डाकू हसीना. और हसीना जो कहती हैं कर के दिखाती हैं."
रारोच्या लक्षात येते की प्रकरण हाताबाहेर गेले आहे. तो तिच्या नावाची गोळी सरकारने बनवायला टाकली असल्याचे शुभ वर्तमान कळवून तिला जय हिंद करतो. ती देखील त्याला जय भवानी करते. आणि दोघे आपल्या वाटेने निघून जातात.
१३.२) रझा व लालाचा अंत
एके दिवशी अचानक नंदिता मृतप्राय अवस्थेत किल्ल्यावर येते. झीनतला धक्काच बसतो की ही जिवंत कशी? नंदिता तिला सांगते की व्हिलन लोकांनी ती मेल्याची खोटी बातमी पसरवण्याची व्यवस्था केली होती. तसेच रझा व लाला जिवंत आहेत. इथे झीनत शुड सेन्स अ ट्रॅप. नंदिता रझाच्या तावडीतून कशी काय सुटली? आणि अशा अवस्थेत किल्ल्यापर्यंत कशी काय पोहोचली? रझाची माणसे जवळपासच असली पाहिजेत. पण ब्लड रशमध्ये ती भराभरा तयार होते. गुड्डी याच क्षणासाठी जपून ठेवलेली गोळ्यांची माळही तिला देते. ती गुड्डीला चाचाच्या ताब्यात देऊन मोहिमेवर निघते. इथे जग्गा दिसतो. म्हणजे जग्गाने रझासोबत हातमिळवणी केली असून नंदिताला इथे आणणे हा त्याचा प्लॅन होता.
या सर्वापासून अनभिज्ञ झीनत रझाच्या अड्ड्यावर पोहोचते. इथून पुढचा संपूर्ण चित्रपट स्टुडिओत आहे कारण बजेट पूर्ण संपले आहे. कसलीही विचारपूस न करता तिच्या आज्ञेनुसार गँग रझाचे बरेचसे लोक ठार करतात. मध्यंतरी जग्गा शॉर्टकटने रझाकडे परतला आहे. तिला आपल्या अड्ड्यावर आणूनही आपली डाळ शिजत नसल्याचे ध्यानात येताच रझा आपली चाल खेळतो. तिच्यासमोर जग्गा फ्लेमथ्रोअरने चाचाचे प्रेत जाळतो. आता गवताच्या गंजीवर उभ्या केलेल्या गुड्डीची पाळी. रझा म्हणतो की बंदूक फेकून दे आणि माझ्याजवळ ये. इथे रझा तिला लांबूनच गोळी घालू शकला असता पण अनाकलनीय कारणाने तो तसे करत नाही. मग झीनत ही संधी साधून उडी मारण्याचे कसब प्रदर्शित करते, फ्लेमथ्रोअरला डॉज करते, आणि गुड्डीला वाचवते. यातल्या स्टंट डबल शॉटमध्ये चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात विद्रुप बाहुल्यांपैकी एक गुड्डीच्या जागी बघायला मिळतो. रझाच्या लक्षात येते की आपला प्लॅन फसला कारण तो, लाला, आणि जग्गा असे तिघेच शिल्लक आहेत आणि हसीनाच्या गँगचा (चाचा वगळता) एकही मेंबर मारला गेला नाही. तो पळ काढतो. हसीना गुड्डीच्या रक्षणाची व्यवस्था करून त्याचा पाठलाग करते.
थोडा पाठलाग होतो. गँग घोड्यांवर तर रझा-त्रिकूट पद्मिनीत. आता झीनतला नेमबाजीचा काहीच प्रॉब्लेम नसल्याने (प्रॅक्टिस किती केली तिने सिनेमाभर) ती धावत्या घोड्यावर बसून परफेक्ट बाँबफेक करते. रझाची गाडी आणि जग्गा खलास (खून क्र. १८). आता रझा व लाला दोघेच राहिले. हे बाँबस्फोटात गाडीत बसलेले असूनही कसे काय वाचतात देव जाणे. नदीकाठच्या खडकांमध्ये ते लपतात. पोलिसांची गाडी बघून डोके वर काढतात तर झीनत त्यांना पकडते. चेहरे त्यांचे काळे झाले आहेतच. झीनत त्यांना फरफटत नेऊन त्यांची धिंड काढते. इथे बजेट साफ झाल्याची लक्षणे, रारोच्या जीपवर खडूने "पुलिस Police" असे लिहिले आहे.
रारो झीनतचा पाठलाग करतो. नेम धरून तो झीनतने यांच्या गळ्यात बांधलेली दोरी तोडतो. झीनत ऑन द स्पॉट निर्णय घेऊन तिथून पळून गेल्याचे नाटक करते. रारो रझा व लाला जिवंत असल्याचे बघून आश्चर्य व्यक्त करतो. पण आत्ता या सगळ्याला वेळ नसल्याने रारो म्हणतो की जीपमध्ये बसा. बाकी नंतर बघू. आधीचा अनुभव लक्षात घेऊन रारोने यावेळेस पाचशे तरी पोलिस आणले आहेत. झीनतलाही जाणीव झाली असावी की शी कान्ट विन धिस. मग ती हुषारी दाखवते. पोलिसांची दोन प्रेते बाजूला काढली जातात आणि तिचेच दोन मेंबर पोलिसाचा वेष धरून रारोला फसवतात. ते म्हणतात की हे दोन पोलिस खूप जखमी आहेत, त्यांना हॉस्पिटलला न्यायची गरज आहे. रारोला देखील रझाची जबाबदारी कोणावर तरी सोपवायची असतेच. मग तो यांना म्हणतो की व्हॅनमधून जा आणि रझा व लालाला सोबत घेऊन जा. मग तो आज गँगचा समूळ नाश करायचाच या निर्धाराने फायटिंग जॉईन करतो.
अर्थात त्या प्रेतांच्या खाली झीनत लपली आहे. ती चालत्या व्हॅनमध्ये रजनीने जोगिंदरला बडवले होते तसे या दोघांना बडवते. तिकडे रारो लीलया तिच्या टोळीचे सदस्य एक एक करत टिपतो आहे. झीनत या दोघांना रझाच्या गाडीच्या अवशेषांपाशी आणते. त्यांना गाडीच्या सीटांना बांधले जाते. इथे रझाचे थकल्याचे एक्सप्रेशन्स न चुकवण्यासारखे. झीनत म्हणते की तुम्ही दोघे फारच नीच आहात त्यामुळे तुम्हाला सोन्याची गोळी नाही. असे म्हणून ती उरलेल्या दोन सोन्याच्या गोळ्या फेकून देते. मग गुलाबसिंह नावाच्या डाकूला म्हणते यांचा कडेलोट कर. तिच्या आज्ञेनुसार त्या दोघांच्या पुतळ्यांचा गाडीसकट कडेलोट होतो. एकदाचे त्यांच्या गाडीतील पेट्रोल पेट घेते आणि ते दोघे जळून मरतात. (खून क्र. १९ व २०). झीनत घृणामिश्रित उन्मादाने आपली जुल्फे उडवते.
१३.३) झीनतचा अंत
*लेडी डाकूपटांचे पोटनियम: बॉलिवूड लेडी डाकूने सिनेमाच्या शेवटी जिवंत राहण्यासाठी पुढील सर्व अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. १) तिला प्रियकर असल्यास तो पोलिस नसावा, एकमेव अपवाद शेरनीतील श्रीदेवी-शत्रुघ्न सिन्हा जोडी, २) तिला बहीण असल्यास ती पोलिस नसावी, ३) तिने आपल्या बदल्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींची हत्या केलेली नसावी. जर या अटींची पूर्तता केली नसेल तर ती तेव्हाच जिवंत राहू शकते जेव्हा तिने डाकू बिरुदास साजेशी कोणतीच कामे केली नसतील कारण मग ती तांत्रिक दृष्ट्या लेडी डाकूच नाही.*
झीनतने या अटींची पूर्तता केलेली नसल्याने ती मरणार हे फिक्स! तसेही तिच्यासारखी थ्रिल-सीकर सरेंडर करण्याची सुतराम शक्यता नाही. पण ती ओव्हर पॉवर्ड असल्याने याच क्षणासाठी प्लांट केलेला तिचा वीक पॉईंट वापरायची वेळ झाली आहे. तिचा बदला पूर्ण होईपर्यंत रारोने तिचे सर्व गँग मेंबर ठार केले आहेत. फक्त गुड्डीचे रक्षण करणारा गँग मेंबर कसाबसा लपून छपून पळण्याचा प्रयत्न करतो आहे. अखेर तोही मारला जातो आणि गुड्डी कड्याशी लटकते. झीनतकडे स्वत: जाऊन तिला वाचवण्याखेरीज पर्याय उरत नाही.
दुर्दैवाने यासाठी तिला रारोच्या समोर धावणे भाग आहे. रारो या संधीचा फायदा घेऊन तिच्या पाठीवर बेछूट गोळीबार करतो. पण याची तमा न बाळगता झीनत गुड्डीचा कॅच पकडून तिला वाचवते. एका खडकाशी ती टेकते. आता शत्रुत्व संपले असल्याने रारो तिच्यापाशी जाऊन दु:ख व्यक्त करतो. आता एकच सेटअप उरला असल्याने तो वापरण्याची वेळ झाली आहे. झीनत रारोला गुड्डीचा सांभाळ करायला सांगून प्राणत्याग करते. गुड्डीची एक आई गेल्याने वाचा गेली होती. दुसरी आई गेल्याने तिची वाचा परत येते. रारो वचनाला जागून गुड्डीला जवळ घेतो आणि मृत डाकू हसीनाच्या फ्रेमवर सिनेमा संपतो.
हा चित्रपट आधीपासून माहिती
हा चित्रपट आधीपासून माहिती असेल तर डाकू आणि हसीना हे दोन वेगवेगळे सिनेमे पाहण्याची गरज नाही ना ?.
कसलं भारी लिहिलंय!
कसलं भारी लिहिलंय!
रारोच्या जीपवर खडूने "पुलिस
रारोच्या जीपवर खडूने "पुलिस Police" असे लिहिले आहे.>>> This was epic. I thought distributors probably were screaming at this point - release the movie!!! Lavish budget was over, Rajni was gone, MP shooting is over now only Mumbai studios can save us haha
तिच्या आज्ञेनुसार त्या
तिच्या आज्ञेनुसार त्या दोघांच्या पुतळ्यांचा गाडीसकट कडेलोट होतो....
आधी आम्ही तसेच वाचून पुढे जातो..आणि लक्षात आल्यावर पुन्हा एकदा वाचून हसायला लागतो !!!! हॅट्स ऑफ!!!
अशक्य भारी रसग्रहण आहे तुमचं,
अशक्य भारी रसग्रहण आहे तुमचं, मुळात 'लेडी डाकु' हा विषय अभ्यासाला घेऊन त्यातील प्रत्येक रत्न बघण्याची हिंमत दाखवल्या बद्दल आधी तुम्हाला एक शौर्य पुरस्कार दिला पाहिजे.
लोकांना अन्यायाबद्दल सहानुभूती वाटते टोकाचे अन्याय दाखवा, हिरो-हिरोइन ने बदला घेतलेला आवडतो संबंधित (आणि संबंध नसलेले पण) ५/५० लोकांचे पडद्यावर खुन पाडा अशा 'जो जे वांछील ते होलसेल मध्ये लाभो' अशा खास हिंदी पिक्चर ला शोभेलशा फॉर्म्युला नुसार ह्या रत्नांची निर्मिती झाली असावी असे रसग्रहण वाचुन वाटले (बघण्याची हिंमत नाही). त्यामुळे तुम्ही सुरुवातीला त्यांना भुगोल, कपडेपट इ. साठी जे मार्क्स दिलेत त्यात त्यांचा अभ्यास नसुन निव्वळ फ्लुक असावा अशी शंका आली.
पायसने लिहिलेला आक्खा
पायसने लिहिलेला आक्खा रिव्ह्यू कुठलिही प्रतिक्रिया न देता वाचण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग असावा. काय कमाल लिहिलंयस!! तुफान!! हॅट्स ऑफ टू यू पायस!!
जीपवर खडूने "पुलिस Police"
जीपवर खडूने "पुलिस Police" असे लिहिले आहे >>> हे पाहून टोटल फुटले होते
खूप भन्नाट लिहिलंयस, पायस! मजा आली वाचायला.
नवीन प्रतिसादांचे आभार
नवीन प्रतिसादांचे आभार
Pages