गेल्या तीन चार वर्षात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेन्ज चे परिणाम ठळक पणे दिसायला लागलेत. कॅलिफोर्नियात गेले दोन वर्ष भयंकर दुष्काळ झाला. वणव्यानी अतोनात हानी केली. ह्या वर्षी पाऊस छान धरला, स्नो पडला म्हणून कॅलिफोर्नियावासी सुखावत असतानाच, एकामागून एक वादळे, हिमवर्षाव होतच राहिलाय. जी शेती गेली दोन वर्ष पाणी नाही म्हणून ओसाड झालेली, आज ती जमीन एखादा तलाव असावा अशी शंका यावी एव्हढी पाण्याखाली आहे आणि त्यामुळे पिकांचंही ओघाने नुकसान झालंय.
इंटरनेटमुळे आता जगभर वाऱ्याच्या वेगाने बातम्या पसरतात त्यामुळे वणवे लागले, कि लगेच फोन येतात आम्ही ठीक आहोत ना चेक करायला. पुराच्या बातम्यांनाही ह्यावेळी तेच झाले. बहुतांशी वेळा ते लांब कुठे डोंगरात, समुद्र किनार्याशी झाले असत आणि आम्ही घरी सुरक्षित असू.
पण बुधवारी इकडे पहाटेपासून पाऊस लागलेला. जसा पाऊस उघडला वारा सुरु झाला. सोसाट्याचा वारा, वादळी वारा. नेमकं मला काम असल्यामुळे बाहेर पडले तर ज्या झाडांनी सावली दिली, आज त्यांची भीती वाटत होती. निसर्गाच रौद्र तांडव सुरु झालेलं. निष्पर्ण झाड गदागदा हालत होती त्यांच्या खालून जातानाही मनात धडकी भरली न जाणो एखादि फांदी आपल्या डोक्यात पडायची आणि कपाळमोक्ष व्हायचा.
रस्त्याने उडालेले पत्रे, झाडांच्या फांद्या , काटक्या जागोजागी दिसत होत्या. मी वाऱ्याबरोबर ढकलली जात होते. हा माझा पहिलाच असा अनुभव होता.
घरी आले तर व्हायचचं तेच झालेल. लाईट गेले होते . एव्हढ्या वाऱ्यामध्ये विजेचे खांब / वायरी नादुरुस्त होणे स्वाभाविक होते. गेल्या आठ वर्षांत माझ्या आठवणीत लाईट गेले असं आधी फक्त दोनदा झालंय. तेही फार जास्त नाही पण २-३ तासांसाठी गेलेले. त्यातले एकदा सकाळी शाळेच्या घाईत. आम्हाला कल्पना नव्हती, गॅरेज चा दरवाजा इलेक्ट्रिसिटी वर चालत असल्यामुळे गाडी आताच अडकून पडली. सकाळी मिनिटामिनटाची लढाई असते त्यामुळे ते चांगलंच लक्षात राहिलय.
दोन तासात मुलगा शाळेतून आला, “बाहेर बघितलेस?”
बघतो तर घराचं लाकडी कुंपण वाऱ्याने उडून पडलं होतं. दुसऱ्या बाजूच कुंपण गदागदा हालत होत. हे सगळं आमच्या कल्पनेपलीकडचं होतं. आजूबाजूच्यां कडेही कुंपणं पडलेली. वाऱ्याचा जोर अजून वाढला तर डोक्यावरच्या छप्पराचं पण काही खरं नाही ही तीव्रतेने जाणीव झाली.
हळू हळू त्याच गांभीर्य लक्षात आलं जवळ जवळ सगळा एरिया, हजारो घर, शाळा सगळीकडे वीज गेलेली. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे तो सोडवायला लागणारा वेळही जास्त होता.
इकडे बऱ्याचशा घरात कूकिंगच्या कॉइल्स विजेवर चालणाऱ्या असतात. त्यामुळे जर पॉवर नसेल तर स्वयंपाकही करत येत नाही. इंटरनेट तर आता चैन न राहता गरज झाली आहे. मुलांचा सगळा अभ्यास जरी शाळा पूर्वीसारख्या सुरु झाल्या तरी ऑनलाईन असतो. मोबाइल सर्विस आणि डेटा ही बंद झाला.
काही अंतरावर थोड्य थोड्या एरियात वीज होती. तिकडे बरेच लोक दुकानांत बॅटरी वर चालणारे दिवे, छोटे गॅस सिलेंडर शोधत होते.
रस्त्यावरचे बरेचसे सिग्नल्स बंद होते. अशावेळी इकडे एक पध्द्त आहे प्रत्येक वहान सिग्नलला थांबते, टर्न बाय टर्न हळू हळू पुढे जातात. त्यामुळे नेहेमीपेक्षा खूप जास्त वेळ लागतो पण तरी सगळं नियंत्रणात राहत.
मुलाचा महत्वाचा क्लास होता, तो झूम वर असतो. मग आम्ही जवळची वाचनालये शोधायला लागलो लाईट्स आणि wifi / इंटरनेट काँनेक्शन साठी. अपेक्षेप्रमाणे जवळची तिन्ही वाचनालये वीज नसल्यामुळे बंद होती. हळू हळू पुढे पुढे सरकत एक वाचनालय (छोटे तात्पुरते ) मिळाले ज्यात वीज होती. बघितलं तर इतरही मुलं मिळेल त्या जागेत बसून, कोपऱ्यात उभी राहून त्यांचा अभ्यास करत होती.
आम्ही जवळच्या स्टारबक्स मध्ये गेलो. स्टारबक्स मध्ये फ्री डेटा असतो, कितीही वेळ बसता येत. तर आमच्यासारखे बरेच लोकं असेच स्टारबक्स मध्ये वाट बघत वेळ घालवत बसलेले. तेवढ्यात वीज कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन बघितल तर त्याच्या म्हणण्यानुसार आता वीज दुसऱ्या दिवशी रात्री दहापर्यंत येईल अस कळलं.
रात्रीचं जेवण बाहेरच करून घरी गेलो. पूर्ण अंधाराच साम्राज्य पसरलेलं सगळीकडे. इकडे बऱ्याच जणांच्या घराबाहेर छोटे छोटे सोलरवर चालणारे दिवे होते. त्यांचा काय तो काजव्यासारखा मिणमिणता प्रकाश.
त्यातल्यात्यात एक कौतुक वाटलं म्हणजे माझ्या मुलाने शक्कल लढवली आणि आमच्या अंगणातले सोलार दिवे गोळा केले आणि स्वच्छ पुसून घरात घेतले. बॅटरी, मेणबत्या कशाचीच गरज पडली नाही.
गेल्या दोन वर्षांपूर्वी आमच्याकडे दिवसा ढवळ्या चोरीचा प्रयत्न झालेला, तेही सगळेजण घरात असताना.
आता तर घराचं कुंपण पडलेलं , सगळीकडे अंधार, सगळीकडचे कॅमेरे बंद म्हणजे जणू चोरांना आमंत्रणच. अशावेळी म्हणतात ना वैरी न चित्तीं ते मन चिंती. हजारो विचारांच्या कल्लोळात शेवटी एकदाची झोप लागली आणि सुखरूपपणे सकाळ उजाडली.
आता दुसऱ्या दिवशी चहा, नाश्ता काही नाही. पाणी गॅस वर गरम होत असल्यामुळे तो प्रश्न नव्हता. आज बातम्या बघण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हीच आज त्या बातम्यांचा भाग होतो. आता फक्त एक होते लवकरात लवकर लायब्ररी गाठणे. आदल्यादिवशी मुलांना लायब्ररीत कळले होते कि एक पलीकडच्या बाजूच्या मोठ्या लायब्ररीमध्ये लाईट आहेत. मग पहिले ती लायब्ररी गाठली . पण आमच्या पेक्षा वक्तशीर आणि हुशार मंडळी आमच्याही आधी पोहोचली होती. त्यामुळे दहा पंधरा मिनिटे चकरा मारल्यावर पार्किंग स्पॉट मिळाला. आत लायब्ररी मध्ये (प्रार्थमिक ते माध्यमिक शाळेतली) मुलं, त्यांचे आई वडील घरातले सगळे चार्जेर्स, devices घेऊन चार्जिंग पॉईंट जवळचे सगळे स्पॉट्स अडवून आधीच बसले होते. पण मग वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी एक्सटेंशन बोर्डस वगैरे आणून अजून पॉईंट्स उपलब्ध करून दिले. थोड्या वेळातच मुलांना त्यांच्या शाळेतली इतरही मुले अशीच अभ्यासाला (?) आलेली वाचनालयात भेटली. थोड्या वेळातच तिकडे गटगटात फिरणारे/ अभ्यास करणारे / वाचणारे मुलामुलींचे घोळके तयार झाले. एकंदर वाचनालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत लोकं जस जसे चार्जिंग मिळेल तसतसे भिंतीच्या कडेला खालीच मांडी घालून काम करत बसलेले दिसत होते. शेवटी दोनच्या दरम्याने आम्ही लायब्ररीतून निघालो कारण आता पोटात कावळे कोकलत होते. तर आता पुढच्या बॅचची मंडळी वाचनालयाच्या दिशेने चाललेली.
आम्ही एका जवळच्या हॉटेलात पटकन खाऊन घेतलं कारण परत दुपारच्या क्लाससाठी वाचनालय गाठायचं होतं.
त्यांच्या कुठल्या कुठल्या टेस्ट्स होत्या त्या आजच्या उद्यावर ढकललेल्या. पण एकंदर उद्या रात्री लाईट येणार असं कळल्यामुळे मंडळी निवांत होती. तेव्हढ्यात शाळेकडून मेसेजेस यायला लागले, “उद्या शाळा चालू आहेत” . मग लगेच पुढचा मेसेज, “शाळेत लाईट आले.”
घर शाळेच्या जवळच असल्याने आम्ही विचार केला कदाचित घरी पण लाईट आले असावेत म्हणून गाडी घराकडे वळवली. घराबाहेर गाडी थाम्बत्ये न थांबत्ये तोच मागून मुलगा जोरात चित्कारला, “Wi Fi “. कधी नव्हे त्या प्रचंड वेगाने दोघही घराकडे पळाली. एव्हाना आमच्या लँड लेडीने कुंपण फिक्स करून घेतले होते. २४ तासांनी घर परत पूर्वपदावर आले होते. ते साजर करायला साहजिकच मी आलं घालून चहाच आधण गॅसवर चढवले कारण चौवीस तसंच चहाचा उपास घडला होता ना? कारण इकडे स्टारबक्सकडे चाय टी लाटे नावाचं जे प्रकरण मिळत त्यापेक्षा त्यांची फ्रेश बनवलेली कॉफी बरी वाटते.
पण बऱ्याच घरांमध्ये तीन दिवस होऊन गेले तरीही वीज आली नाही.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन बघतलं तर एक झाड मुळापासून उपटलेलं. हे झाड म्हणजे तीस एक फूट उंच मोठं झाड होतं, ज्या व्यक्तीने परवाच्या वादळात ते झाड पडताना बघितलं तिच्या शब्दात “वाऱ्याने गदागदा हलणार ते झाड, एकदम वस्तू उचलावी तस उचललं गेलं, आणि वाऱ्याबरोबर फिरल्या सारखं होऊन धाडकन जमिनीवर पडलं. खूप भीतीदायक होतं ते दृश्य.“ नशीब बलवत्तर म्हणून ते वर्गांवर न पडता विरुद्ध बाजूला पडले. नाहीतर कल्पनाही करवत नाही काय झालं असतं ?


कॅलिफोर्नियात अतिपावसामुळे झाडं मुळापासून उन्मळून पडत असल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या होत्या. दुर्दैवाने त्यात एका महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच होऊन गेलेली. पण इतकं मोठं झाड वाऱ्याने उन्मळून पडलेल आम्ही प्रथमच प्रत्यक्ष बघत होतो.
शेजारची आजी ५२ वर्षांपासून त्याच घरात राह्त्ये ती पण म्हणाली, "ह्या आधी हे असं कधी बघितलं नव्हतं ."
तीनेक तास चाललेल्या वादळातून बाहेर पडून स्थिरस्थावर व्हायला तीन दिवसांहूनही खूप जास्त कालावधी लागतोय हे खरे!
वादळाचे व्हिदीओ>>
https://youtube.com/playlist?list=PL8qvyUzv5W0Xonfq2qH7QmCW1of1lnqH-
वीज नसूनही शाळांना सुट्टी
वीज नसूनही शाळांना सुट्टी नाही दिलेली?
वीज नसूनही शाळांना सुट्टी
वीज नसूनही शाळांना सुट्टी नाही दिलेली?>> दिली.
पण दुसऱ्या दिवशी वीज नसती आली तरी शाळा चालू करणार होते कारण इकडे शाळां नसल्या तर लंच आणि नोकरी करणाऱ्या पालकांना day केअर ची सोय करायला लागते.
हा लेख देखील छान. माबोवर ईतकी
हा लेख देखील छान. माबोवर ईतकी अमेरीकेतली जनता असून असे संकलित केलेले लेखन वाचनात आले नव्हते माझ्या. व्हॉटसप चॅटवरील गप्पांतून बरेच समजायचे तसे, पण ते गप्पांमध्ये विषय निघेल तसे. असे विषयवार लिहिलेले नाही. कदाचित त्यात काय लिहायचे असे वाटत असावे. पण माझ्यासारख्याना यातून बरेच नवनवीन कळतेय. त्याबद्दल धन्यवाद.
बाई दवे,
या लेखमालेचा रट्टा मारला तर मी अमेरीकेतला डुआयडी देखील सहज काढू शकतो असे वाटते
एक-दोन दिवस वीज नसेल तर
एक-दोन दिवस वीज नसेल तर जिवाची इतकी घालमेल? फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम फारच गंभीर वाटताहेत.
छान माहिती.
छान माहिती.
एक-दोन दिवस वीज नसेल तर जिवाची इतकी घालमेल? फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम फारच गंभीर वाटताहेत.>>>>
आयुष्य विजेवर अवलंबुन असेल तर असे होणारच.. मुंबईतही विज नसेल तर घरात पाणी नाही, रात्री घरात गरमी व डासांमुळे झोपणे अशक्य हे होतेच. रात्री दोन वाजता
विज अर्धातास जरी गेली तरी आमच्या बेलापुर कॉलनीत लोक रस्त्यावर उतरतात, घरात बसणे अशक्य होते.
इथे गावी मात्र निवांत. आठ आठ दिवस सलग विज गेली तरी काहीही फरक पडत नाही. विहिर पाणी देते, रात्री गरम व्हायचा प्रश्न येतच नाही आणी घरचे राशन संपले तर शेजारी जाऊन बिनदिक्कत मागता येते.
वीज नसूनही शाळांना सुट्टी
वीज नसूनही शाळांना सुट्टी नाही दिलेली? >> आमच्या लहानपणी तीर्थरूप म्हणाले असते, 'तुम्ही शाळेत दिवे लावताच! मग कशाला हवी सुट्टी?'
आयुष्य विजेवर अवलंबुन असेल तर
आयुष्य विजेवर अवलंबुन असेल तर असे होणारच.. मुंबईतही विज नसेल तर घरात पाणी नाही, >> आमचे असे कालच झाले त्यामुळे इट इज रिलेटेबल. फक्त दोन तास दिवे नव्हते व त्यातही एक फेज गेलेली त्यामुळे पूर्ण बिल्डिन्ग मधे आमच्याच मजल्यावरचे दिवे गेलेले. त्यामुळे कोणाला काही पडलेली नव्हती. त्यातच नेमके लेकीला अर्जंट काम आले दुपारी तीन वाजता!! संडेला. तर मग नेट नाही. सर्व फोन्स वगैरे ३० % व लेस चार्ज्ड. तिचे अॅपल व माझे घरचे सर्व एंड्रोइन्ड. त्यामुळे माझ्या लॅपटोपला हॉट स्पॉट निर्माण करून ते काम निपटले. खाली जाउन कटकट केली तेव्हा तीन तासांनी आले लाइट. आमच्या घरी इंडक्षन कुकटॉप आहे फक्त त्यामुळे तसेच झाले काही चहा पाणी पण नाही. असे होउ शकते.
पूर्वी शाळा, परीक्षा सगळं वीज
पूर्वी शाळा, परीक्षा सगळं वीज नसली तरी सुरळीत सुरु राहत होते. कारण खिडक्या उघड्या असत त्यातून प्रकाश, हवा येई. संगणकाचा तर प्रश्नच नव्हता.
इकडे शाळेत AC/ हीटर , प्रोजेक्टर, इंटरनेट, शिक्षकांना मायक्रोफोन सगळं साग्रसंगीत लागतं.
आता वीज, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क सगळ्यांवरच आपलं जीवन अवलंबून (?) आहे.
आम्हाला कल्पना नव्हती, गॅरेज
आम्हाला कल्पना नव्हती, गॅरेज चा दरवाजा इलेक्ट्रिसिटी वर चालत असल्यामुळे गाडी आताच अडकून पडली. >> बहुतेक ठिकाणी गराज डोअर मॅन्युअली ओपन करता येतो. आत सेंट्रल आर्म जवळ एक दोरी असेल ती खेचली कि लॅच मोकळॅ होते नि मग हाताने दरवाजा वर -खाली करता येतो. दरवाजा जड असल्यामूळे खाली येताना जोरात खाली येतो ह्याचे भान असू द्या. लहान मुळे असतील तर अधिक काळजी घ्या कारण नुसत्या दोरीने कंट्रोल करताना जिकिरीचे असते. तसेच दरवाजा आतून लॉक करण्यासाठी एक कडी असते ती वापरावी लागते. ती कडी लावली असेल तर लाईट आले कि आधी कडी काढण्याची आठवण ठेवा नाहितर दरवाजा ऑटो ओपन करताना तुटू शकतो.
हो. आतुन दोरीने ओपन होते. पण
हो. आतुन दोरीने ओपन होते. पण बाहेरुन उघडायला (बॅटरी बॅकप नसेल तर) काहीच मार्ग नसतो. घरची किल्ली डोअर मॅट खाली ठेवायची सवय नसेल आणि जास्त डोकं चालवून बॅकयार्डचं दार आतून बंद करायची कोणाला खोड असेल तर मग बोंब होते.
आमच्या पोरांना अभ्यासाचं, परिक्षांचं वेड नाही हे एक बरं आहे. गेल्या स्टॉर्मला आम्ही निवांत घरी पडून राह्यलो. फायरप्लेसचा पायलट गेला की तिकडे सेल टाकले आणि लायटर मध्ये ठिणगी उडवण्यापुरते फ्युएल असलं की काय प्रश्न येत नाही. बारा एक तासात आलेले आमचे अर्थात. तेवढंच जरा आदिमानव फीलिंग येतं. त्यानिमित्ताने सोमीवर शेकोटी पोस्ट टाकता येतात.
आमच्या पोरांना अभ्यासाचं,
आमच्या पोरांना अभ्यासाचं, परिक्षांचं वेड नाही हे एक बरं आहे. गेल्या स्टॉर्मला आम्ही निवांत घरी पडून राह्यलो. >>> हे भारी आहे, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का गाणं आठवलं.
बाकी वादळामुळे छंदीफंदी आणि फॅमिलीला झालेल्या त्रासाचं वाचून वाईट वाटलं.
छान लेख.
छान लेख.
हरिकेन सॅंडीची आठवण आली. तेव्हा आमच्याकडे ५ दिवस लाईट नव्हते. सगळं विजेवर चालणारे त्यामुळे घरात काहीच करता आले नाही, त्यात खूप ठंडीची भर. बाहेर मोटेल मधे एकही रूम रिकामी नव्हती. गॅस स्टेशनही बंद होते. मॅालमधे जिथे जागा मिळेल तिथे लोक लॅपटॅाप घेऊन बसले होते.
<< जिथे जागा मिळेल तिथे लोक
<< जिथे जागा मिळेल तिथे लोक लॅपटॅाप घेऊन बसले होते. >>
यालाच म्हणतो मी फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम.
मोठ्ठे वादळ येणार असेल तर बहुतेकदा पूर्वसूचना मिळते. त्यानुसार ठरवायचे की दूर कुठे जायचे की घरीच राहायचे. वादळ आले की वीज बऱ्याचदा जातेच (किंवा कधी कधी मुद्दाम बंद करतात). अश्या परिस्थितीत third world मधला माणूस काय विचार करेल? की घरात प्यायला/संडासात पुरेसे पाणी आहे का? अन्नाची सोय आहे का? फोनमध्ये चार्ज आहे का? बास्स इतकेच. फारतर वीज कंपनीला विचारेल की वीज कधी येईल आणि मग वीज यायची वाट बघत बसेल.
फर्स्ट वर्ल्डमध्ये लोकं जातील मॉलमध्ये, स्टारबक्समध्ये, लायब्ररीत, की कुठे लॅपटॉप वापरता येईल का, कुठे मला वायफाय मिळेल, झूम कॉल करता येईल का याचा शोध घेत.
यालाच म्हणतो मी फर्स्ट
यालाच म्हणतो मी फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम. >> कटरीना नंतर हरिकेन प्रोन भागांमधे मोठ्या हरिकेन च्या आधी घरात पाआणी, सुके खाणे ह्यांचा बंदोबस्त करून ठेवा असे वारंवार सांगितले जाते. बहुतेक जनता ते करते. अल्टरनेट पॉवर सोय होतील का ते बघते. इंटरनेट असेल तर लोकांअना इतरांशी कनेक्टेड आहोत असे वाटून हायसे वाटते. न्यू इंङ्लंड मधल्या बर्फ वादळांचा नि इथल्या हरिकेन् चा अनुभव घेऊन हे म्हणतोय.
फर्स्ट वर्ल्डमध्ये लोकं जातील
फर्स्ट वर्ल्डमध्ये लोकं जातील मॉलमध्ये, स्टारबक्समध्ये, लायब्ररीत, की कुठे लॅपटॉप वापरता येईल का, कुठे मला वायफाय मिळेल, झूम कॉल करता येईल का याचा शोध घेत.>>>>>
हा हा…. तेवढा फरक पाहिजेच हो..
दिवे गेल तर किंवा घरी असले
दिवे गेल तर किंवा घरी असले तरी बरीच भारतीय तरुण जनता स्टारबक्स मध्ये काम करत बसते. कधी कधी सुपर अर्जन्सी असते. काम वेळेत डिलिव्हर नाही केले तर नोकरीतूनच डच्चू मिळू शकतो. हा वैश्विक प्रॉब्लेम आहे हो. चार्जिन्ग नसले तर हार्ट अॅटेक येउ शकतो.
तसेही मॅालमधे फक्त बसून काय
तसेही मॅालमधे फक्त बसून काय करणार? आहे वायफाय फ्री तर वापरा म्हणून लॅपटॅाप वर काम किंवा टाईमपासही करत असतील.
बरीच भारतीय तरुण जनता >>
बरीच भारतीय तरुण जनता >> खरंच? कारण ठाण्यात मला दोन किंवा तीन स्टारबक्स आठवताहेत. ती ही मोस्टली मॉल मध्येच होती. तिकडे काम करणारी तरुण लोकं काही आठवत नाहीत. ठाण्याला डाऊन मार्केट म्हणत असाल तर साऊथ मुंबई/ वेस्टर्न सबर्ब मध्येही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच स्टारबक्स मॅप मध्ये दिसत आहेत. लाईट गेले आणि काम वेळेवर डिलिव्हर केलं नाही तर नोकरीतुन डच्चूवाल्या वेठबिगार जन्तेला स्टारबक्स परवडतं का?
वादळात इंटरनेटवर स्कूल आणि काम करणारी जन्ता असते हे मला ही नविनच आहे.
ते नको म्हणून आम्ही बिडे लावलंय.
पाणी गेलेलं सेकंड वर्ल्ड मध्ये ऐकलेलं नाही. ते झालं तरी पॉवर आऊट झाल्यावर सगळ्यांची पोटं का बिघडतील हे मला न सुटलेलं कोडं आहे. अरे दोन चार रोल ठेवले ठीक आहे. अगदी एखादं कॉस्ट्को साईझ पोतं ठेवा. पण गराज भरुन रोल्स ही काय इन्सेक्युरिटी आहे हे समजत नाही. बरं दर हरिकेन/ वादळात रोल भरुन ठेवायचे. मग ते वापरायचे कधी? 
फर्स्ट वर्ल्ड मध्ये मी ही इमर्जंसी बकेट, टॉयलेट रोल्स, बॅटरी, रेडिओ, टिकेल असे खाणे, पाणी, पाणी स्वच्छ करायला ड्रॉप्स, लक्ष वेधून घ्यायला शिट्टी, फायरप्लेस चालू करायला लायटर, जनरेटर असेल तर त्याला फ्युएल, गरम ब्लँकेट्स, फोन चार्ज ठेवायला बॅटरी बॅकप असल्या वस्तू गोळा करणारी जन्ता पाहिली आहे.
इमरजन्सी मध्ये काम डिलिवर केलं नाही म्हणून जॉब गेला अशी वेळ फर्स्ट वर्ल्ड मध्ये तरी कोणावर येऊ नये. तेच शाळेचे. पॉवर नसताना ऑनलाईन शाळा हा प्रकारही कधी ऐकलेला नाही. त्यामुळे आम्ही सेकेंड वर्ल्ड मधले असू बहुतेक.
मला तर कसली इमरजंसी आली की दुकानातुन टॉयलेट रोल्स गायब होणे हा सुद्धा हास्यास्पद आणि फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम वाटायचा.
खरंच? कारण ठाण्यात मला दोन
खरंच? कारण ठाण्यात मला दोन किंवा तीन स्टारबक्स आठवताहेत. ती ही मोस्टली मॉल मध्येच होती. तिकडे काम करणारी तरुण लोकं काही आठवत नाहीत. ठाण्याला डाऊन मार्केट म्हणत असाल तर साऊथ मुंबई/ वेस्टर्न सबर्ब मध्येही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच स्टारबक्स मॅप मध्ये दिसत आहेत. लाईट गेले आणि काम वेळेवर डिलिव्हर केलं नाही तर नोकरीतुन डच्चूवाल्या वेठबिगार जन्तेला स्टारबक्स परवडतं का?>> इतर पण भरपूर इंडिअन कॅफे अस्तात. वाय फाय तर रेल्वे स्टेशन वर पन उपलब्ध असते.
पण हा इशू फर्स्ट वर्ल्ड प्रोब्लेम म्हणूनच सीमित ठेवायचा असेल तर क्षमस्व स्टारबक्स न परवडायला काय झालं ?! बट अगेन वी पे इन रुपीज. हाउ डौनमार्केट.
Amit is right. There are only
Amit is right. There are only 63 starbucks in Mumbai including 6 in Thane. So Thane is better placed compared to Mumbai
>> वादळात इंटरनेटवर स्कूल आणि
>> वादळात इंटरनेटवर स्कूल आणि काम करणारी जन्ता असते हे मला ही नविनच आहे.>> मलाही. पण लेखात मुलाचा झूमवर क्लास वगैरे वाचून जरा आश्चर्य वाटलं पण कंपिटिटिव्ह स्कूल डिस्ट्रिक्ट आणि त्यातूनही कंपिटिटिव्ह देसी आईवडिल असणार्या भागांतून दिसत असेलही असं चित्र.
>>>>
>>>>
स्टारबक्स न परवडायला काय झालं ?
>>>>
गल्लोगल्ली स्टार बक्स का नाहीत .. याचं उत्तर आणि थोडी आजूबाजूच्या लोकांची जाणीव असेल तर "स्टारबक्स न परवडायला काय झालं ?" चं उत्तर मिळायला सोप्पं आहे....
>>>
>>>
वादळात इंटरनेटवर स्कूल आणि काम करणारी जन्ता असते हे मला ही नविनच आहे.
>>>
अशा शाळेत लेकीला जायला लागत नाही असा विचार करून हुश्श वाटलं
गल्लोगल्ली स्टार बक्स का
गल्लोगल्ली स्टार बक्स का नाहीत .. याचं उत्तर आणि थोडी आजूबाजूच्या लोकांची जाणीव असेल तर "स्टारबक्स न परवडायला काय झालं ?" चं उत्तर मिळायला सोप्पं आहे....>> ती जाणीव नसेलच असे आपल्याला का वाट्ते काकू?
स्टारबक्स मध्ये बसून काम करणे हा खरेच आनंद दायी अनुभव आहे. भारतात सुद्धा. पण त्यासाठी वेगळा धागा काढते. एक धागा दु:खाचा एक धागा सुखाचा.
आईस स्टॉर्म, ब्लिझर्ड, इतर
आईस स्टॉर्म, ब्लिझर्ड, इतर प्रकारचे वादळ यास्तव वीज गेल्यास ती किती दिवस गेली आहे, कशा प्रकारचे नुकसान आहे यावर बरेच काही बदलते. यात पाण्याला प्रेशर नाही, शुद्ध पाणी करायचे स्टेशन बंद पडणे यापासून सुवर सिस्टिम प्रॉब्लेम असे बरेच काही घडू शकते. तुमच्या गावात आठवडाभर वीज नाही तरी दुसरीकडे व्यवहार चालू असे असू शकते. अशावेळी ऑफिसचे काम घरुन करणे असेल तर किती दिवस थांबणार? इथे काही युनिवर्सिटीजची पॉलिसी आहे, शक्यतो सुट्टी देत नाहीत, त्यांची स्वतंत्र ग्रीड, जनरेटर वगैरे सेट अप असते. फेब्रुअरी एंडला आईस स्टॉर्ममुळे मुलाच्या गावात ५ दिवस लाईट नव्हते. तो आणि त्याचा मित्र (दुसरी कंपनी) ऑफिसचे काम रोज स्टुडंट आयडीवर युनिवर्सिटीच्या लाउंजमधे बसून करत होते. असे काम करणारी ऑटो इंडस्ट्रीवाली अशी भरपूर मंडळी होती. फायनान्सवाली पण होती. नोकरीतून डच्चू मिळणे या भीतीने नव्हे तर काम अडल्याने पुढे डॉमिनो इफेक्टने अजून कुणाला तरी अडचण असे होत प्रॉब्लेम्समधे भर पडू नये म्हणून शक्य होईल तसे काम सुरु होते. ज्यांना लहान मुले आहेत, इतर काही अडचण आहे त्यांना सूट होतीच. हिट नसल्याने लोकांसाठी जी हिटिंग सेंटर्स उघडली होती तिथेही काम करण्यासाठी इंटरनेटची सोय केली होती. प्लांट्समधे जे काही नुकसान झाले आहे त्यासाठी तिथेही लोकं काम करत होतेच. इमर्जन्सीमधे सिस्टिम पूर्वपदाला येण्यासाठी बरेच जण काम करतात, नेहमीपेक्षा जास्त तास काम करतात आणि त्यात तुमचे काम कॉप्युटर वापरुन करायचे असेल तर इंटरनेट वापरणे गरजेचे होते.
मी फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम
मी फर्स्ट वर्ल्डचे प्रॉब्लेम >> फर्स्ट वर्ल्ड मधे प्रॉब्लेम नसावेतच असं कुठंय.
आमच्या इथे बर्याच घरांमधे प्यायचं पाणी आणि सांडपाण्याची सिस्टम प्रायव्हेट असते. आणि वीज नसली की दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. दीर्घ काळ वीज नसेल तर त्याची तयारी म्हणून बरेच लोक नॅचरल गॅस किंवा गॅसोलिन वर चालणारे जनरेटर बाळगतात.
ज्यांच्याकडे जनरेटर्स आहेत असे लोक शेजार्या पाजार्यांना बर्फ देणे , त्यांच्या फ्रीझर मधल्या गोष्टी ठेवून घेणे, डिव्हाइस चार्जिंग, वायफाय वर ऑफिस / शाळा या करता मदत असे करतात
फर्स्ट वर्ल्ड मधे प्रॉब्लेम
फर्स्ट वर्ल्ड मधे प्रॉब्लेम नसावेतच असं कुठं कोणी म्हटलंय? (उलट लेख वाचून वाटले की ते जास्तच गंभीर आहेत). आता तुमचाच प्रतिसाद बघा, वीज गेली तर third world मध्ये लोकं प्यायला पाणी आणि फ्रीजमधील अन्न/दूध खराब होईल का? याचा विचार करतील, बर्फ मिळेल की नाही? हा विचार नाही करणार.
बर्फ देऊन आईस गोळा (नो पन
बर्फ देऊन आईस गोळा (नो पन इंटेंडेड) करत असतील वाटलं ना तुम्हाला!
धो धो पावसात वीज गेल्यानंतर
धो धो पावसात वीज गेल्यानंतर संप पंप चालत नसल्यास आणि काही कारणाने त्याचा बॅटरी बॅकअप ही गंडल्यास (अनेक दिवस न वापरल्याने हे हमखास होते)आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच घराच्या बेसमेंट मध्ये ईंच ईंच पाणी भरतांना पाहून 'गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून' गुणगुणत बसावे लागते. पुन्हा बेसमेंट फिनिश्ड असेल किंवा तिथे वॉटर हीटर, एसी युनिट वगैरे असेल तर वर्षाचा अर्धा पगार बेसमेंट पूर्ववत करण्यात जाऊन, घराची वॅल्यू मेजर डाऊनग्रेड होऊन आपल्या आयुष्यभराच्या जमा पुंजीचा कणाच मोडतो की काय असा जीवाला घोर पडणे हा कुठल्या वर्ल्डचा प्रॉब्लेम आहे हे सूज्ञ वाचकांवर सोडून देते.
बर्फ देऊन आईस गोळा (नो पन
बर्फ देऊन आईस गोळा (नो पन इंटेंडेड) करत असतील वाटलं ना तुम्हाला! >> वीज नाही, थंडी आहे मग रात्रीच्या सहकुटुंब घ्यायच्या विस्की ऑन द रॉक्स साठी हवा ना बर्फ.
Pages