मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षाहॉ लच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.
मी आत जाऊन माझ्या खुर्चीत बसताच पिन ड्रॉप शांतता पसरली. होय, कारण मी त्यांच्या तोंडी परीक्षेची परीक्षक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत निरनिराळ्या भावना आणि चेहऱ्यावर अनेक भाव दिसत होते त्यात अविश्वास, शंका, गोंधळ, कुतूहल, वैताग काय नव्हतं ? काहींच्या चेहऱ्यावरची नापसंती तर मला उघडपणे जाणवत होती; काही विद्यार्थी शांतपणे भुवया उंचावत, माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करत होते. पण मी मात्र एकदम शांत होते. थोडे पाणी पिऊन मी तोंडी परीक्षेला सुरूवात केली.
त्या खोलीत मी दिसायला आणि वयाने सर्वात लहान व्यक्ती होते; बावीस वर्षांची, अगदी किरकोळ देहयष्टी असलेली, कोणत्याही गर्दीत हरवून जाईल असे नगण्य व्यक्तिमत्व भासणारी मुलगी. याउलट, माझे सर्व विद्यार्थी होते पन्नाशीच्या आतबाहेर असणारे, बहुतेक माझ्या वडिलांच्या वयाचे, मोठ्या दाढी आणि मिशा असलेले प्रौढ पुरुष.
ते 2१ व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.
जसजशा मुलाखती पुढे गेल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले आणि अधिक सकारात्मक होऊ लागले. शंकेची जागा कुतूहलाने, अविश्वासाची जागा माफक हास्याने घेतलेली मला जाणवत होती.
आता तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगते, तेव्हा मला जरी त्यांबद्द्ल सहानभूती वाटत होती किंवा मी तस दाखवत होते तरी आत खोलवर कुठेतरी माझ्यातली खट्याळ आणि नाठाळ मुलगी त्यांच्या डोळ्यातली ती भीती, त्यांचं मनातल्या मनात सोपा प्रश्न येऊ दे म्हणून प्रार्थना करणं, कठीण प्रश्नाचं (त्यांच्यासाठी पण माझ्या दृष्टीने अगदीच सोपा )उत्तर देतानाच अडखळणं मस्त एन्जॉय करत होती.
कारण काही वर्ष त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच मग मी ह्या खुर्चीत बसले होते ना !
"पोस्ट ऑफिस उघडं आहे " ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
तुमचे अल्याडचे किंवा पल्याडचे असे काही किस्से असतील तर जरूर लिहा!
** हा उतारा आधी एका "On The Other Side..." , medium.com ह्या लेखत प्रसिद्ध झाला आहे. "सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण " ह्या कल्पनेशी सम्ब्नधित उतारा त्यातून घेतला आहे.
कागद संपला तसा कॉम्प्युटरही
कागद संपला तसा कॉम्प्युटरही संपलाच. >> आमच्याकडे उलट आहे, घरातलं वर्षाच मुलं मोबाईल एकदा ही हातात मिळालेला नसून ही त्याच्या चित्रांच्या पुस्तकाचं पान फिजिकली न उलटता तर्जनी ने स्क्रोल अप डाऊन करत.
वॉव! इव्हॉल्युशन इन अॅक्शन
वॉव! इव्हॉल्युशन इन अॅक्शन का?
अश्विनीमामी
अश्विनीमामी
Vlookup साठी मानवने दिलेला दुवा पहा....मी vlookup formula कसा लिहावा यांचे उदाहरण दिले आहे.
अमा, उबो, दसां कृपया इथे त्या
अमा, उबो, दसा कृपया इथे त्या विषयावर चर्चा करूया.
मानव दुवा उघडत नाही....
मानव दुवा उघडत नाही....
आता उघडेल.
आता उघडेल.
आम्ही पावत्या संगणकावर करत
आम्ही पावत्या संगणकावर करत असल्यामुळे वेळ लागेल. तसदी बद्दल क्षमस्व >>>
एक किस्सा आठवला...
एक किस्सा आठवला...
साधारण २००६ साली स्क्रिन शेअर करणे तसे नवीनच होते. त्यावेळी दुसर्याबरोबर (जो चार टेबल सोडून बसला होता) स्क्रिन शेअर केले होते व त्याला कंट्रोलही दिला होता. (आता आठवत नाही की कसे काय स्क्रिन शेअर केले होते). मी इकडे मोठ्याने बोलत होतो व तो मुलगा माझ्या कोडमध्ये बदल करत होता. त्यावेळी तिसरा एक नवीनच जॉईन झालेला मुलगा माझ्या डेस्कवर आला. त्याला फक्त मी बोलून कसे काय माऊस इकडे तिकडे जातो व automatically typing कसे होते ते कळत नव्हते. नंतर त्याला फसवायला सुरूवात केली. मुद्दामहून कुणाच्या स्क्रिनचा कंट्रोल घेऊन आम्ही त्याला त्याच्या बाजूला उभे करायचो. ज्याचा कंप्युटर तो मोठ्याने हे करा, ते करा असे सांगायचा व आम्ही थोडे लांबवर बसून ते बदल करायचो. ह्या नवीन जॉईनरला फार आश्चर्य वाटत होते. संगणकाला एकाच वेळी हिंदी, मराठी व इंग्रजीत बोललेले समजते कसे काय याचाही तो विचार करायचा. ३-४ वेळा त्याची मजा घेतल्यावर त्याला स्क्रिन शेअर हा प्रकार कळला.
खूपच रिलेट होतंय सगळं. मीही
खूपच रिलेट होतंय सगळं. मीही mazgaon च्या sales tax office मध्ये instructor म्हणून काम केलय. Microbase मधून MS-CIT शिकवायचे . एक DGM लोकां साठी बॅच होती बहुतेक सगळे सिनियर्स होते. त्यांना आम्ही खूप स्मार्ट वाटायचो . पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन शिकवताना जादू झाल्यासारखे अचंबित व्हायचे . खूप एन्जॉय केलं तिथे . त्या बॅच मधल्या एका सरानी तुला sales tax officer म्हणून काम करायला आवडेल का म्हणून चिचारलेले . फक्त एक्साम दे आणि मला सांग असेही सांगितलेले. असे ओळखीने जॉब मिळतात का माहीत नाही . पण खूप प्रेमळ माणसं होती . कितीतरी मॅडम जेवलात का वैगरे आवर्जून विचारायचे , खाऊ द्यायचे .लंच नंतर ची बॅच घेऊन क्लासेस नंतर डायरेक्ट घरी जायचे . मला development मध्ये जॉब लागल्यावर जेव्हा माझा लास्ट डे होता तेव्हा सगळ्यांनी मिळून मला ड्रेसपिस दिला होता. अजूनही माझ्याकडे काही जणांचे तेव्हा घेतलेले कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत
मायक्रो सॉफ्ट एक्सेल च्या
मायक्रो सॉफ्ट एक्सेल च्या आधी Lotus १-२-३ नावाच स्प्रेड्शीट सॉफ्टवेअर होते. मायक्रो सॉफ्ट एक्सेल ने जवळ जवळ सपुर्ण कीज कॉपी केल्या आहेत. किती जणानी १-२-३ वापरल आहे?
sales tax office मध्ये ऑफीसर फाईल उघडत नाही म्हणुन वडलाना बोलवायचे. साधे सोपे काम करायला पण मदत लागायची. २०१७ ला GST आल्यावर सेल्स टॅकस चे काम खुप कमी झाले (नवीन केसेस न्हवत्या पण जुन्या लेटिगेशन्च्या केसेस आजुनही चालु आहेत) . २०२० मध्ये माझगाव sales tax office ला मोठी आग लागली त्यात बर्याच जुन्या सिस्टिम आणि डाटा गेला.
मी लोटस १२३ वर सुरवात केलीय.
मी लोटस १२३ वर सुरवात केलीय. मी लोटस वापरत होते तेव्हा त्याच मशिनवर कॅल्क्युलस नावाचे एक अॅप्लिकेशन होते जे सेम होते असे अंधुक आठवतेय. पण १२३ च्या झंझावातापुढे ते मागे पडले. एक्सेल आले तेव्हा ते इतके १२३ सारखे होते की लोटसच कन्वर्ट केल्यासारखे वाटले. सुरवातीला एक्सेल मध्ये एक गेम पण लपवलेला होता, विशिष्ट किज दाबल्या की तो आपोआअप सुरु होत असे.
मी वापरलंय लोटस १२३.
मी वापरलंय लोटस १२३.
एकदा ऑफिसच्या पीसीजमध्ये MS word and excel लायसेन्स्ड कॉपीजच असल्या पाहिजेत असा नियम आला होता तेव्हा हेड ऑफिसने
लोट सच्या सीडीज पाठवल्या होत्या.
छान धागा! किस्सेही मस्त!
छान धागा! किस्सेही मस्त!
शाळेतल्या शिक्षकांना MS-CIT कोर्स अनिवार्य केला होता तेव्हा शाळेतच त्याचे प्रशिक्षण सुरू केले होते. तेव्हा कोथरूड स्टॅंडजवळच्या शाळेत एका बॅचला मी शिकवायला जायचे. सगळ्या शिक्षिका ४५+ होत्या. माऊस कसा पकडायचा पासून सुरूवात होती. पण खूप ऊत्साही बॅच होती. शाळा सुटल्यावर क्लास सुरू व्हायचा तेव्हा खरेतर थकलेल्या असायच्या सगळ्याजणी पण मन लाऊन शिकायच्या. बडबडही खूप करायच्या. त्यांना शांत करता करता माझाच घसा बसला होता
याच्या उलट अनुभव MSEBच्या कर्मचाऱ्यांना शिकवताना आला. हे काय आमच्यावर लादले म्हणून सुरूवातीला वैतागलेली बॅच होती ती. पण तिथेही मजा यायची.
C च्या पेपर ला write a short
C च्या पेपर ला write a short note on scanf, printf असे प्रश्न असायचे .
C वरून आठवलं. आम्ही कॉलेज ला
C वरून आठवलं. आम्ही कॉलेज ला असताना तिथे sp नावाचा एक तरुण peon होता. त्याचं खरं नाव कुणालाच आजवर माहीत नाही. बिचारा ग्रामीण शेतकरी कुटुंबातून आला होता. तो बाहेर सगळ्यांना सांगायला यायचा," चला लवकर आता तुमचा शी चा क्लास आहे."
>>मी लोटस वापरत होते तेव्हा
>>मी लोटस वापरत होते तेव्हा त्याच मशिनवर कॅल्क्युलस नावाचे एक अॅप्लिकेशन होते जे सेम होते असे अंधुक आठवतेय<<
ते विझिकॅल्क, वर्डस्टार किंवा वर्डपर्फेक्ट्च्या कुटुंबात होतं बहुतेक. लोटस १-२-३ अॅक्च्युअली लोटस नोट्स या ऑफिस प्रॉडक्टचा एक भाग होता. त्यात ईमेल, स्प्रेडशिट, टीम चॅट, शेअर्ड रिपाझटरी (नॉलेजबेस करता) वगैरे कॉम्पोनंट्स होते. पुढे आय्बिएमने ती कंपनी विकत घेतली. माय्क्रोसॉफ्ट जे सहसा नविन आय्डिया आणत नाहित पण दुसर्यांच्या आय्डियांवर मेहनत घेऊन मार्केट डॉमिनेट करतात, तोच प्रकार त्यांनी लोटस नोट्सच्या बाबतीत केला.
रेस्ट इज हिस्टरी...
C च्या पेपर ला write a short
C च्या पेपर ला write a short note on scanf, printf असे प्रश्न असायचे >>
लोटस १-२-३ आम्ही बरंच शिकलो
लोटस १-२-३ आम्ही बरंच शिकलो होतो. त्यातले मॅक्रोज लिहायचे म्हणजे करामत वाटायची. कमीतकमी शब्दांत जास्तीत जास्त काम
C च्या पेपर ला write a short note on scanf, printf असे प्रश्न असायचे >>>
मी पण चक्क लोटस डीबेस व वर्ड
मी पण चक्क लोटस डीबेस व वर्ड स्टार चा एक कोर्स केलेला. व वापरले पण. मग पुढे एक्सेल वर्ड व अॅक्सेस त्यातूनच जन्मले असा संशय येत राहायचा. आता एक्सेल जीवी व अॅक्सेस युजर. जोडी जोडीने अॅपल च्या सिस्तींम पण इवॉल्व्ह होत होत्या व वापरात येत होत्या. दूर टाइप सेटर कडे जाउन अॅड्स चे टाइप सेंटिन्ग करुन आणावे लागे. चार/ आठ पानांची मासिके एडिट करुन फॉर्मेत केलेली. मजा होती.
>>बिचारा ग्रामीण शेतकरी
>>बिचारा ग्रामीण शेतकरी कुटुंबातून आला होता. तो बाहेर सगळ्यांना सांगायला यायचा," चला लवकर आता तुमचा शी चा क्लास आहे."
बेस्ट धागा आहे हा. अजून आठवणी जागवा लोकहो.
व्हीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन असायचे तेव्हा चुकून फोन उचलला तर अशक्य भयंकर आवाज यायचे
फोन उचलला की इंटरनेट कट होत
फोन उचलला की इंटरनेट कट होत असे.मुळात डायल अप इंटरनेट कनेक्शन लागणे ह्यासाठी मारामारी करावी लागत असे. सुरुवातीला टेक्स्ट बेस्ड नेट होते. नंतर ग्राफिक वाले (टीसीपी आयपी) आले. नेटस्केप हा तेव्हाचा लोकप्रिय browser होता. अल्ताविस्ता हे सर्च इंजिन, मग याहू.
Text based याला Shell
Text based याला Shell connection म्हणत.
Shell connection वर्षाला ५,००० तर tcp/IP साठी वर्षाला १५,००० होते.
मग Shell sock म्हणून एक freeware आले. ते इन्स्टॉल केले की Shell connection वर नेटस्केप नेट ब्राऊजर वापरता यायचा. VSNL ने त्यावर बंदीही आणली होती पण फार strict नव्हती.
काही नेटकॅफे वाले तेव्हा back orifice हे hacking tool वापरून इतरांचे account hack करायचे, आणि थोडक्या पैशात दुसऱ्या कुणाला log in user ID ani pwd द्यायचे.
Press "any key" to continue
Press "any key" to continue ही की बरेच वेळा कि बोर्ड वर शोधलि जायची
कीबोर्ड वरून आठवलं, आमच्या
कीबोर्ड वरून आठवलं, आमच्या सरांनी एक किस्सा सांगितलेला
एका अशाच अति हुशार विद्यार्थ्याने querty कीबोर्ड समजत नाही,लक्षात राहत नाही म्हणून सगळी बटणे उचकटून abcd आशा क्रमाने लावली होती
आणि तरीही पीसी वर जुनीच अक्षरे उमटत असल्याची तक्रार घेऊन आला होता
मी vsnl ची एजन्सी।घेतली होती.
मी vsnl ची एजन्सी।घेतली होती. काही टेलिफोन exchange च्या ठिकाणी मॉडेम configure करणे हा मोठा ताप असे. तिथे फक्त hayes ची मॉडेम चालायची. 14400 , नंतर 33600 आणि शेवटी 56k स्पीड ने नेट चालत असे.
शी चा क्लास
शी चा क्लास
शी चा क्लास
शी चा क्लास
यावरून आठवलं. आमच्या ऑफिस मध्ये नव्याने लागलेल्या एका मुलाला pc मध्ये फक्त c drive होती. त्याला partition करून हवं होतं तर तो सांगत आला की सर partition करून पायजेल, काहीही टाका कंपुतरात, ते शी मध्येच जातंय.
तेच पोरगं windows Vista ला विष्टा म्हणायचा
आणि तरीही पीसी वर जुनीच
आणि तरीही पीसी वर जुनीच अक्षरे उमटत असल्याची तक्रार घेऊन आला होता >>>
ते शी मध्येच जातंय. >>
ते शी मध्येच जातंय. >>
तेच पोरगं windows Vista ला विष्टा म्हणायचा >> अगागा
windows Vista ला विष्टा >> ते
windows Vista ला विष्टा >> ते व्हर्जन विष्ठा म्हणण्याच्याच लायकीचं होतं. मी विष्ठाच म्हणायचो.
Pages