मी खोलीत प्रवेश केला, खोली कसली एखादे छोटे सभागृहाचं म्हणा ना ! आतमध्ये सुमारे पन्नास विद्यार्थी बसलेले, मी आजूबाजूला एक नजर फिरवली तर खोलीत तणाव जाणवला. काही विद्यार्थी त्यांच्या नोट्सची उजळणी करत होते, इतर एकमेकांशी कुजबुजत होते; नजर सारखी त्यांच्या मनगटाकडे जात होती.
कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षेआधी परीक्षाहॉ लच्या बाहेर साधारण असच चिंताग्रस्त वातावरण असतं.
मी आत जाऊन माझ्या खुर्चीत बसताच पिन ड्रॉप शांतता पसरली. होय, कारण मी त्यांच्या तोंडी परीक्षेची परीक्षक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत निरनिराळ्या भावना आणि चेहऱ्यावर अनेक भाव दिसत होते त्यात अविश्वास, शंका, गोंधळ, कुतूहल, वैताग काय नव्हतं ? काहींच्या चेहऱ्यावरची नापसंती तर मला उघडपणे जाणवत होती; काही विद्यार्थी शांतपणे भुवया उंचावत, माझ्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करत होते. पण मी मात्र एकदम शांत होते. थोडे पाणी पिऊन मी तोंडी परीक्षेला सुरूवात केली.
त्या खोलीत मी दिसायला आणि वयाने सर्वात लहान व्यक्ती होते; बावीस वर्षांची, अगदी किरकोळ देहयष्टी असलेली, कोणत्याही गर्दीत हरवून जाईल असे नगण्य व्यक्तिमत्व भासणारी मुलगी. याउलट, माझे सर्व विद्यार्थी होते पन्नाशीच्या आतबाहेर असणारे, बहुतेक माझ्या वडिलांच्या वयाचे, मोठ्या दाढी आणि मिशा असलेले प्रौढ पुरुष.
ते 2१ व्या शतकाच्या सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा बँका आणि सरकारी कार्यालयांनी संगणकीकरण सुरू केले होते. आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विशिष्ट संगणक अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे घेणे अनिवार्य केले होते. एका बाजूला ज्यावेळी ‘तंत्रज्ञान’ हा शब्दच फारसा रुढ नव्हता त्यावेळी पूर्ण-वेळच्या नोकऱ्या, घरगुती किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि वयामुळे येणाऱ्या अडचणी सांभाळत नवीन संगणकाचे तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटणारे मध्यमवयीन स्त्री-पुरुष तर दुसरीकडे, संगणक शास्त्राचे अद्ययावत ज्ञान घेतलेली, पदवीधर, सर्व आव्हाने स्वीकारण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त जबाबदाऱ्या नसलेली, कुठलेही आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेली मी.
जसजशा मुलाखती पुढे गेल्या, तसतसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले आणि अधिक सकारात्मक होऊ लागले. शंकेची जागा कुतूहलाने, अविश्वासाची जागा माफक हास्याने घेतलेली मला जाणवत होती.
आता तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगते, तेव्हा मला जरी त्यांबद्द्ल सहानभूती वाटत होती किंवा मी तस दाखवत होते तरी आत खोलवर कुठेतरी माझ्यातली खट्याळ आणि नाठाळ मुलगी त्यांच्या डोळ्यातली ती भीती, त्यांचं मनातल्या मनात सोपा प्रश्न येऊ दे म्हणून प्रार्थना करणं, कठीण प्रश्नाचं (त्यांच्यासाठी पण माझ्या दृष्टीने अगदीच सोपा )उत्तर देतानाच अडखळणं मस्त एन्जॉय करत होती.
कारण काही वर्ष त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच मग मी ह्या खुर्चीत बसले होते ना !
"पोस्ट ऑफिस उघडं आहे " ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
तुमचे अल्याडचे किंवा पल्याडचे असे काही किस्से असतील तर जरूर लिहा!
** हा उतारा आधी एका "On The Other Side..." , medium.com ह्या लेखत प्रसिद्ध झाला आहे. "सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण " ह्या कल्पनेशी सम्ब्नधित उतारा त्यातून घेतला आहे.
शाळेत आमची बॅच पहिली जिला
शाळेत आमची बॅच पहिली जिला पाचवी पासून संगणक विषय अनिवार्य करण्यात आला.
आम्ही MS Paint, Black & White मॉनिटर वर शिकलो (!)
गणितात जसं क्ष मानतो, तसचं स्क्रीनवर रंग मानले
Virus
Virus and worms
काही Virus boot virus असायचे ते boot sector वर परिणाम करत. काही system file size बदलायचे.
बदल झालेल्या फाईल्स काढून दुस-या स्वच्छ फाईल्स त्या फोल्डर मध्ये copy केले की computer virus free.
एक Joshi's virus होता...Today is Mr. Joshi's birthday . Wish him happy birthday असा मेसेज फ्लॅश व्हायचा. I don't remember but it may be worm.
आमच्या कार्यालयात एक बडबड्या जोशी होता त्याला बडबड करण्यासाठी काही कारण लागत नसे. मग त्याला लोग बडबड्या जोशी म्हणायचे. पण नंतर त्याला आणि बडबड्या-या इतरांना virus हे टोपन नाव आले.
Melissa, Happy 99 हे देखील आपल्या करामती दाखवत.
Trojon Horse ची ग्रीक युद्ध कथा पोकळ लाकडी घोड्यात सैनिक लपवतात आणि ते रात्री बाहेर पडून युद्ध करतात खूप रंगवून सांगायचो...so the name trojon.
आम्ही कॉम्पुटर चे users होतो
आम्ही कॉम्पुटर चे users होतो त्यामुळे त्या अनुषंगाने ते दिवस आठवतात. आमच्या ऑफिस मध्ये emoloyees चा कॉम्पुटर ला प्रचंड विरोध होता. मॅनेजमेंट ला हवं होतं आणि युनियन ना नको होतं पण शेवटी आम्हाला काही तरी आर्थिक फायदा देऊन कॉम्पुटरायझेशन ची वाट ऑफिस ने मोकळी करून घेतली. त्याच सुमारास ऑफिस ने vrs आणली. नकोच ती computer ची झंझट म्हणून खूप लोकांनी ती घेतली ही.
उरलेल्याना मात्र ते शिकण्या शिवाय पर्याय नव्हता. बाहेरच ट्रेनिंग तर प्रत्येकाला मिळेच पण प्रत्येक dept ला एक it cell असे , ते ही अडलं तर मदत करत असत.
सुरवातीला माउस नीट धरता यावा म्हणून आम्हाला सॉलिटेअर हा गेम खेळू देत असत. मग हळू हळू आमचं काम करायला सुरुवात झाली. मग नेट आलं. आम्हाला ही हे किती उपयोगी आहे हे समजत गेलं आणि मग विरोध ही मावळत गेला. मला आठवतंय 1 gb च pendrive ज्याची किंमत तेव्हा साडे आठशे रुपये होती आम्हाला ऑफिस ने फ्री दिलं होतं काय भारी वाटलं होतं तेव्हा. ते माझ्याकडे अजून आहे.
ऑफिस आम्हाला सवलतीच्या दरात घरी pc घेण्यासाठी लोन ही देत असे आणि internet चे पैसे ही देत असे. त्यामुळेच घरी ही नेट pc पटकन घेता आला. तो pc थोडं थोडं अपडेट करत आम्ही खूप वर्ष वापरला अलीकडेच मोडीत काढला.
ऑफिस मध्ये तर वापर कसा करायचा ते शिकवलं गेलं पण आम्ही जास्त करून word चा वापर करत होतो. नेट ची दुनिया घरीच शिकले. मला सगळं आलं नाही तरी जे हवं आहे तेवढं तरी जमवतेच मी. हल्ली तर गाडी अडली तर solution चे यु ट्यूब व्हिडीओ ही असतात. एकदा मोबाईल चा स्क्रिन land scape होत नव्हता, खूप झगडले पण व्यर्थ . शेवटी यु ट्यूब बघितलं तर अगदीच काखेत कळसा होत
तर त्या मोठ्या pc पासून सुरू झालेला प्रवास आता हातात आलाय. उबर ची माझी फर्स्ट राईड (जी मी मुलांबरोबर शेअर केली होती) मी कधीच विसरू शकत नाही. एक छान स्वच्छ टॅक्सी मी बुक करू शकते , ती माहिती , रूट मी मुलांबरोबर शेअर करू शकते आणि ज्या साठी मला फार जास्त पैसे ही मोजावे लागत नाहीत ... फारच भारी फीलिंग होत ते.
पण आमचा मुनीम दोन चहा सांग रे
पण आमचा मुनीम दोन चहा सांग रे असे सांगताच पटकन शेजारच्या हॉटेल मध्ये जाऊन चहा सांगू न येतो, कोंप्युटर हे करेल ?>>>> आता अलेक्सा करेल
तर त्या मोठ्या pc पासून सुरू
तर त्या मोठ्या pc पासून सुरू झालेला प्रवास आता हातात आलाय. >>> खर आहे
सॉलिटेअर आणि माईनस्वीपर हे दोन खेल आम्ही खेळत असू. कुठेतरी अडलो वाटलं तर २-३ गेम्स माईनस्वीपरचे खेळले की जनरली अडलेला प्रश्न सुटत असे
२००२ मधील गोष्ट. तेव्हा
२००२ मधील गोष्ट. तेव्हा ऑनलाईन प्रोग्रॅम्स अस नसत. एकदा अंकलेश्वर ला एका फॅक्टरी मध्ये एक vb मधलं फ्रंट एन्ड अँप पाठवलेलं. आम्ही अनुभवी नव्हतो त्यामुळे ते तितकंसं रोबस्ट नव्हतं, एखादी ऑर्डर चुकली तर सरळ ते मान टाके. वापरणारी मंडळी फॅक्टरी तले गेट कीपिंग ऑफिस मधले लोक. त्याच्यात एक छोटा फिक्स करायला पाहिजे होता एखाद तासाच काम होत वाटत. पण तो २ तासाचा फिक्स करायला, जाऊन येऊन २४ तासापेक्षा जास्त प्रवास करायला लागला होता. आत ते इतकं सोपं आणि सहज झालंय.
आमच्या एका मित्राच्या मामाने
आमच्या एका मित्राच्या मामाने संगणक घेतला होता.तो मामाही आमच्या शेजारीच रहायचा. आम्ही तेव्हा लहान होतो. माझ्या पाहण्यातला तो पहिलाच संगणक. माऊस-विना केवळ डॉस कमांडवर चालणारा तो कृष्ण - धवल संगणक असावा. त्या मामाने त्यांच्या घरात एका छोट्याश्या स्वतंत्र खोलीत ते ठेवण्याची व्यवस्था केली होती. तिथे जायला आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. कधी मामा त्यावर प्रिन्स खेळत असला तर क्वचित आम्हाला खोलीत येऊ देत असे. पण आम्ही त्याच्या पासून ३-४ फूत अंतरावर एका बाकड्यावर चिडीचुप बसायचे असा दंडक होता. मामा खेळताना आम्ही मात्र अजिबात आवाज करायचा नाही हा नियम आत्ता आठवून मजेशीर वाटतं. पण तेव्हा आम्हाला हा असा काहीतरी खेळ केवळ बघायला मिळणं ह्याचंच अप्रूप होतं. आम्हाला वाटायचं की त्याच्या तो कामाचा भाग आहे. मध्यंतरी अनेक वर्षं असलेच संगणक बघितल्याने (आणि त्यांनीही ते अनेक वर्षे अपग्रेड न केल्याने) अशी चौकटी-चौकटीची चित्रं, कमांड देणे, प्रोग्रामिंग करणे - इतपतच संगणकाचा उपयोग आहे अशी माझी समजूत होती आणि संगणक जगतात झपाट्याने झालेल्या बदलांची गंधवार्ता नव्हती.
अकरावीत असताना दुसर्या एका मित्राने घरी बोलवले आणि म्हणाला की आपण संगणकावर पिक्चर बघू. मला इमॅजिनच होईना, की त्या असल्या काळ्यापांढर्या / निळ्या स्क्रीनवर पिक्चर कसा बघणार? त्या दिवशी त्याने सीडी ड्राइव्ह, विंडोज ९८ विरुद्ध एक्स्पी, वगैरे वगैरे मला सांगितले तेव्हा मला घेरीच आली. त्यानंतर आमच्या घरी सीडी ड्राईव्ह असलेली साउंड सिस्टिम आली तेव्हा आम्ही १००-१०० रुपयांच्या सीडीज आणत असू आणि त्यावर १०-१२ गाणी असत फक्त. तर ह्या मित्राने मला आवडतील अशी १०० गाणी असलेली एम्पी३ फॉर्मॅटेड सीडी घरी राईट करून आणली आणि मला दिली होती. ती बघून मी पुन्हा चक्रावून गेलो. मी १० गाण्यांना १०० रुपये या हिशोबाने त्याला १००० रुपये द्यायला लागलो तर तो हसून म्हणाला की ती कोरी सीडी १० रुपयांना मिळते. पुढे थोड्या वर्षांनी मी माझ्या ३ वर्षांच्या पुतणीला भेटायला गेलो होतो. ती टीव्हीवर टॉम अँड जेरी बघत बसली होती. मी म्हटलं, मलाही हे खूप आवडतं; माझ्या घरी आहे; येतेस का? तर जेमतेम एक वर्षापूर्वी बोलायला शिकलेली ही चिमूरडी म्हणाली की हर्पा काका, तू पुढच्या वेळेला येताना डिव्हिडीवर राईट करून घेऊन ये!!!
कालाय तस्मै नमः!
गणितात जसं क्ष मानतो, तसचं
गणितात जसं क्ष मानतो, तसचं स्क्रीनवर रंग मानले >>>
त्रिशूलमध्ये शशी कपूरच्या
त्रिशूलमध्ये शशी कपूरच्या तोंडी कम्प्युटरचा उल्लेख आहे.
तो परदेशातून शिकून येतो, राखी ऑफिसची सेक्रेटरी असते, सगळी कामं तत्परतेने करणारी, तर तो तिला कम्प्युटरची उपमा देतो. संजीव कुमार त्याचा अर्थ विचारतो. तेव्हा तो समजावून सांगतो - अमेरिका में एक ऐसी मशीन बनी है जो ऑफिस का हर काम करती है
हे ऐकायला आता मजा वाटते. पण तेव्हा सगळ्यांना भारी वाटलं असलं पाहिजे (यश चोप्रांसकट)
प्रिंस आणि पॉवरबोट
प्रिंस आणि पॉवरबोट माझ्याकडेही आवडते होते.
नेटवर्किंग बेसिकची सुरवात या व्हिडिओने करायचो. बहुतेक मुलं घेऊन जायची....
https://youtu.be/3uhA8bdz8gI
१९९२ साली पहिल्यंदा संगणक
१९९२ साली पहिल्यंदा संगणक हातळला. डॉस ६.२२! पिसी एक्स्टी होता. नंतर ३८६ आले. तेव्हा मी R & D मधे होतो. ८०८५ वर आधारीत उत्पादने बनवायचो. मशिन लेव्हल मधे प्रोग्रम लिहुन ते असेंबल करावे लागत. ३२ के चे प्रोग्राम लिहायचे, डिबग करायचे .. पण मजा येत असे
नंतर विंडोज ३.१/३.११ वर काम केलं. १९९६ नंतर स्वतःचा संगणक व्यवसाय सुरु केल्यावर रोजच संगणकांसोबत खेळायला लागलो. संगणकाच्या 'कुडी'वर अधिक काम केलं आहे. सॉफ्ट्वेअर पासुन मात्र लांब राहिलो. ती खंत राहिलि आहे.
अरे खंत कशाला? आता चालू करणे
अरे खंत कशाला? आता चालू करणे खूपच सोपे झाले आहे. हार्डवेअरच्या जवळचा आहेस तर एंबडेड बारक्या सेंसरवर प्रोग्रॅम लिहुन होम ऑटोमेशन कर. त्यात अॅमेझॉन क्लाऊन वरुन फोन वर अलर्ट पाठवून घरी कोण आलंय, कुठलं दार उघडं आहे असे काय काय करायला मजा येईल.
होऊन जाऊद्या!
ते सगळं बायको करते. त्यात मी
ते सगळं बायको करते. त्यात मी लुडबुड करत नाही for obvious reasons
>>मेडप्लस फार्मसी वाले गेल्या
>>मेडप्लस फार्मसी वाले गेल्या वर्षा पर्यन्त डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरायचे.
LIC वाले आजहि वापरतात डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
ईमेल पाठवायला pine कोणी कोणी वापरलाय?
माझ्या मावशी चे मिस्टर sbi
माझ्या मावशी चे मिस्टर sbi मध्ये होते. त्यांच्याकडे अगदी नवीन नवीन संगणक आले होते. ऑफिस मधला
स्टाफ सगळा प्रौढ. कुणाला काही कळायचं नाही. सारखं सारखं IT dept ला फोन करायचे हे लोक. एकदा असंच काहीतरी झालं म्हणून यांनी फोन लावला. पलीकडच्या माणसाने सांगितले सगळ्या windows बंद करुन बाहेर या. तर यांचा सगळा स्टाफ दारं, खिडक्या बंद करून ऑफिस बाहेर आला. आजिबात अतिशयोक्ती नाही त्यांनी स्वतः सांगितलेला किस्सा आहे. आमची हसून वाट लागली.
खरा का खोटा ते मरुदे. जाम फनी
खरा का खोटा ते मरुदे. जाम फनी आहे!
पलीकडच्या माणसाने सांगितले
पलीकडच्या माणसाने सांगितले सगळ्या windows बंद करुन बाहेर या. तर यांचा सगळा स्टाफ दारं, खिडक्या बंद करून ऑफिस बाहेर आला. आजिबात अतिशयोक्ती नाही त्यांनी स्वतः सांगितलेला किस्सा आहे. >>>>
हाहाहा सानवी.
हाहाहा सानवी.
माझा नवरा एसबीआय मध्येच होता. त्याने आमच्या लग्नाच्या आधीच संगणक वेगवेगळे कोर्सेस केलेले आणि तो सहजतेने सामोरा गेला नवीन बदलांना, त्याने घरीही computer घेतला साधारण १९९७, ९८ मध्ये, कलर प्रिंटरही होता आमच्याकडे, आता नाही. मला बरंच शिकवलं त्याने. तो माझा गुरु आहे याबाबत. शेजारच्या लहान मुलालाही आम्ही हाताळायला द्यायचो computer. मी मराठी typing त्याच्यावर शिकले, आता सोपं आहे तेव्हा नव्हतं. मी इंग्लिश typing शिकले होते पण मराठी नव्हते, नवऱ्याने मला चार्ट करून दिलेला. ग्रिटींग्ज वगैरे तयार करून प्रिंट्स करायचे मी (सर्व आमच्यासाठी, गिफ्ट म्हणून द्यायला, बिझनेस वगैरे नव्हतो करत). गेम्सही खेळायचे. नेट नव्हतं तेव्हा. बबल बॉबल गेम खेळायचे, पत्ते खेळायचे. बाकी बरंच माझ्या डोक्यावरुन जातं. नेट वगैरे इझी उपलब्ध झाल्यानंतर तर मी fb account काढायला किंवा साईटवर मेंबर व्हायला घाबरायचे. त्यानेच प्रोत्साहन दिलं. तरीही अजून बऱ्याच बाबतीत मी अडाणी आहे.
छान धागा,
छान धागा आणि चर्चा,
आमच्या कडे पहिला कॉप्युटर १९८९ साली आला. एक्स्टी ८०८८, सव्वा पाच ईच फ्लोपी ड्राईव, त्याच आकाराची ४० Mb Harddisk , ८४ key keyboard होता. नंतर सव्वा पाच ईच पासुन साडेतिन ईच फ्लोपी ड्राईव आणि हार्ड डिस्क झाली. keyboard ला १०१ कीज आल्या.
godarej चा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होता तो बरेच वर्ष चालला नंतर HP1020 घेतला .
कॉप्युटर ३०००० रुपयाला आणि प्रिंटर ८००० ला होता. त्या काळात वडलाचे एका वर्षाचे उत्पन्न होते. एवढे पैसे नसल्याने त्यावेळी लोन घेउन घेतला होता. नंतर बरेच वर्ष तेवढीच किंfunction at() { [native code] }अ राहिली. आजही असेंबल केला तर कदाचित तेवढ्यातच मिळेल.
>>सव्वा पाच ईच पासुन साडेतिन
>>सव्वा पाच ईच पासुन साडेतिन ईच फ्लोपी ड्राईव
हो NIIT मध्ये black and white monitor & सव्वा पाच इन्चाची फ्लोपी वापरत. तेव्हा Aptek स्टुडंट्स color monitor & साडे तीन इन्चाची फ्लोपी वापरायचे आणि NIIT च्या स्टुडंट्स ना एकदम 1942- A love story च्या युगात वावरल्यासारखे लूक्स द्याय्चे
NIIT, Aptech, Boston ही नाव
NIIT, Aptech, Boston ही नाव कितीतरी दिवसानी ऐकली. ह्या लेखाच्या निमित्ताने!
>>NIIT, Aptech, Boston ही नाव
>>NIIT, Aptech, Boston ही नाव कितीतरी दिवसानी ऐकली. ह्या लेखाच्या निमित्ताने!
+१
मस्त लेख आणि आठवणींना उजाळा.
माझ्या आठवणीत एक लहान मुलगी आहे जी कॉंम्प्युटरवर पेंट वापरुन काहीतरी चित्र काढायचा प्रयत्न करत होती आणि स्क्रिनवर असलेल्या पांढर्या जागेवर गिरगटून झाल्यावर पुढे काय करायचं ते न कळल्याने एकदम म्हणाली - 'कॉम्प्युटर संपला! "
कागद संपला तसा कॉम्प्युटरही संपलाच.
असलेल्या पांढर्या जागेवर
असलेल्या पांढर्या जागेवर गिरगटून झाल्यावर पुढे काय करायचं ते न कळल्याने एकदम म्हणाली - 'कॉम्प्युटर संपला! " Happy
कागद संपला तसा कॉम्प्युटरही संपलाच. >>
कागद संपला तसा कॉम्प्युटरही
कागद संपला तसा कॉम्प्युटरही संपलाच. >>>
मस्त धागा आणि मजेशिर
मस्त धागा आणि मजेशिर प्रतिक्रिया..
मी नव्या कंपनीत लागल्या वर व्हीआरएस पद्धत जोम धरत होती.५२+ वाल्यांना संगणक जी कामं रीप्लेस करू शकते अशांना काढत होते. माझी बॉस साऊथ ईंड. होती.
नुसती विंडो मिनिमाईझ केली तरी अय्ययो म्हणुन बोंब ठोकायची तिला वाटायचे इतका वेळ घेऊन बनवलेली फाईल समोर स्क्रीन वर दिसत नाही म्हणजे गायब झाली..वारली
मग जादुगारा सारखे ती फाईल मी पुन्हा वर काढायचे.. लॉल
मी एकदा माफक दुस्ठ पणा केला
मी एकदा माफक दुस्ठ पणा केला होता. एका वन पर्सन व्हिडीओ प्रोडक्षन कंपनीत काम करत होते. पगार वट्ट २७५० तो ही कंत्राटी. त्यात आम्हाला एकच सिस्टिम दिली होती २८६ टाइप. मोठ्या एजन्सीत आमची तीन टेबले होती. त्यात आमचा अजून एक पोरगेला असिस्टंट होता. वर्ड च्य आधी काय जे सॉफ्ट वेअर होते ते - वर्ड स्टार!!!! किंवा वर्डच जुनी व्हर्जन तर त्यात आम्ही आमचे कोटेशन बजेट बनवायचो. एकदा मी एक फाइल उगीचच प्रोटेक्ट करुन ठेवली. त्यामुळे असिस्टंटला त्यात काही बदल करता येइना. मग तो कुठेतरी बाहेर गेल्यावर ती अन प्रोटॅक्ट करुन ठेवली.
त्या आधीच्या कंपनीत मी पूर्ण कॉपी साध्या टाइप राइ टर वर टाइप करत असे. पाच पाच पाने ब्रोशर, त्यामुळे वर्ड स्टार सुद्धा एकदम देवाची देणगी वाटाअयचे. मग वर्ड आले त्यात तर फॉर्मेटिन्ग ऑप्शन बघून जीव वेडा झालेला. दोन कॉलमी टेबल बनवून त्यात स्क्रिप्टे लिहायची असे करून एकदा पहिल्या फ्रीलान्स स्क्रिप्टला २५०० रु मिळाल्यावर लै भारी वाटलेले. फ्रीलान्स व पगार धरून मी आर्थिक बाबीत सबळ स्वतंत्र झाले. त्यामुळे कंप्युटर बद्दल एक प्रेम वाटायचे. अजुनही माझ्य हाताखाली जे सर्वर आहेत त्यांना रोज हपिसात गेल्यावर कोरिअन पद्धतीने वाकून संपूर्ण नमस्कार करते. ( यडपट वाटेल) आता बरेच आटोमेटेड झाले आहे. पण एरर सोडवोन काम पुश केलेकी सिसिटिम परफेक्टली ते घेउन पुढेजाताना फार आनंद होतो. आपले पोर पहिले पाउल टाकत टाकत धडपडत पुढे जात पळायला लागले की वाटते तसे.
मला वेगळा धागा काढून कुणी तरी शुद्ध मराठीत व्ही लुक अप कसे करायचे ते सांगा ना. अजुनही ते येत नाही.
सर्वर आहेत त्यांना रोज हपिसात
सर्वर आहेत त्यांना रोज हपिसात गेल्यावर कोरिअन पद्धतीने वाकून संपूर्ण नमस्कार करते >>
शुद्ध मराठीत व्ही लुक अप >> अमा, तुम्ही shantanuo यांचे धागे वाचा. त्यात नक्की असेल. बहुतेक लिब्रे ऑफिसमध्ये आहे हा पर्याय असं तिथे वाचल्यासारखं आठवतंय. किंवा जाऊ दे; फार शोधत बसायला लागेल तुम्हाला रेलेव्हंट माहितीसाठी.
vlookup हे excel मधील १
vlookup हे excel मधील १ फंक्शन आहे. मराठीत सोदाहरण नंतर लिहितो कारण आत्ता फाईल बनवून फोटो काढायची सोय नाहीये.
vlookup हे excel मधील १
vlookup हे excel मधील १ फंक्शन आहे>> हो ते म्हायती मला पण अगदी पोरे सोरे सुद्धा ज्या सहजतेने वापरतात तितकी फ्लुएन्सी नाही. वर्क अराउन्ड आहे मजकडे. सा महिन्यातून एकदा तरी लागते. पण यायला हवे परफेक्ट.
पलीकडच्या माणसाने सांगितले
पलीकडच्या माणसाने सांगितले सगळ्या windows बंद करुन बाहेर या. तर यांचा सगळा स्टाफ दारं, खिडक्या बंद करून ऑफिस बाहेर आला. >>>>
मी पण dos च्या काळातली. Cobol, fortran शिकलेली. तेव्हा लॅब मध्ये आमचे सर packman खेळायचे ते खूपच भारी वाटायचं.
लॅब बाहेर चपला आणि एसीत थंडी वाजते म्हणून स्वेटर.>> आमच्या कॉलेज मध्ये लॅब मध्ये सॉक्स वापरणं कंपलसरी होतं. बॅच बदलतांना काही लोकं एकमेकांचे सॉक्स वापरायचे. (आता ते ई.. वाटतं)
कॉम्प्युटर वाल्यांना नोकरी अगदी सहज मिळायची तेव्हा. त्याकाळी मी काम करत असलेल्या ऑफिस मध्ये बोर्ड लावला होता, ’आम्ही पावत्या संगणकावर करत असल्यामुळे वेळ लागेल. तसदी बद्दल क्षमस्व|’
एके ठिकाणी मी एका खाजगी बँकेत कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटर ट्रेनिंग द्यायला जात होते. तिथली लोकं एकाच बोटाने की बोर्ड वापरायची आणी मध्येच ‘मॅडम माझ्या की बोर्ड वर झेड नाही.. डी नाही..’ म्हणून मला आवाज द्यायची. कधीतरी माझा सहा वर्षांचा मुलगा सोबत असायचा. तो त्यांना अक्षर शोधायला मदत करायचा.
Pages