कोण्या एके काळी एक गुरू आणि त्यांचा शिष्य रहात होते. शिष्य आश्रमातील कामे करत असे आणि गुरू त्याला विद्या शिकवीत असत. रोज आजूबाजूच्या झाडांवरील फुलं काढून पूजेची तयारी करणे हे एक त्याचे काम होते.
पण ह्या वर्षी पाऊस, थंडी अधिक असल्याने आजूबाजूच्या झाडांना फुलं नव्हती. फक्त चांदणीची पांढरी फुलं मात्र दररोज येत असत. पण शेजारीच एक लाल जास्वंदीचे झाड होते. पण ते दुसऱ्यांचे होते. विचारल्याशिवाय दुसऱ्याची वस्तू घेणे ही चोरी होते. ह्या विचारांनी त्याला रोज इच्छा होऊनही तो ती फुलं घेत नसे. त्यानेही एक लाल जास्वंदीची फांदी लावली होती. त्याला छान हिरवीगार पाने ही आली होती पण अजून कळ्यांचा पत्ता नव्हता.अर्थातच फुलं पण नाही.
त्यामुळे रोज परडीत एकच एक पांढरी फुलं बघून त्याला ती फुलं तोडावी अशी इच्छा होई.
आणि शेजारचे झाड तर भरभरून ओसंडून वहात होते. काय झाले एक, दोन घेतली तर असंही त्याला रोज वाटे. पण तरी तो ती फुलं तोडत नसे.
असं रोज रोज ती फुलं बघणं आणि तरीही न तोडणे, हे तो करू लागला. हळू हळू ती फुलं तिथे आहेत ह्याचीही त्याला जाणीव होईना. आणि एक दिवशी त्याने लावलेल्या झाडाला दोन लाल फुलं आली. ते बघून त्याला खूप आनंद झाला. आता तो ती फुलं परडीत घेऊन आला. तेंव्हा गुरुजी म्हणाले," आज तू ही फुलं गणपतीला वहा. तू ती स्वकष्टाने कमावली आहेस. तुझ्या संयमाचे हे फळ आहे". ह्याने त्याला खूप समाधान वाटले आणि आनंदही झाला. गुरुजींना पण खूप आनंद झाला.
Moral: संयम,patience needs to be learned through practise.Each day,each time when you learn to wait for the right thing, than trying to hurry things, you gain strength. That strength is huge and unbeatable. It cannot be fast forwarded. The rewards are multifold and quite satisfactory.
© झारा तांबे
२४.११.२०२२
संयमाचे फळ ( patience fruit)
Submitted by Zara Tambe on 23 November, 2022 - 20:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा