प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १ - ऋतुरंग

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 13:28

आजचा विषय:- ऋतुरंग...

तीच खिडकी, तोच निसर्ग. पण ऋतू बदलला की निसर्गही वेगळंच रुपडं घेऊन समोर येतो. कधी पानगळ तर कधी अंकुर फुटलेली पालवी, कधी धुक्यात हरवलेली वाट तर कधी वर्षाधारांनी धो धो वाहिलेले पाट. जणू निसर्ग कात टाकतो आणि एकेक ऋतू आपल्याला त्याच्या सोहळ्यात वेडं करतो.
म्हणूच पाडगावकर म्हणतात सहा ऋतूंचे सहा सोहळे ! येथे भान हरावे !
चला तर मग. मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५ . झब्बू देताना एका ऋतूच्या झब्बूनन्तर दुसऱ्या ऋतूचा झब्बू अपेक्षित आहे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरण्यक मधील पावसाळ्यातली सकाळ..
पण पाऊस नसलेली..


उन्हाळ्यातल्या भर दुपारी गोंदवल्या जवळच्या ओसाड माळरानावर अंगोपांगी फुललेला हा गुलमोहोर.

DSC06464-1_0.jpg

डोळे निवताहेत ईथले फोटो बघून Happy
एक त्यात आपलाही
ऋतू हाच सध्याचा.
कारण गेल्याच आठवड्यातील फोटो.
स्थळ आपले नेहमीचेच मॉर्निंग वॉकचे.
गवताच्या कडेकडेने चालत काढलेला फोटो Happy
- निसर्ग उद्यान, कोपरखैरणे

IMG_20220901_133406.jpg

ह्या दिवसात मायबोलीवर येण्यात धोका आहे. दोनच मिंट बघते म्हणून मी जी काही घुसले, काय फोटो काय झब्बू ( आणि कुठलं ऑफिस कुठलं काम? ) असं झालं. मंत्रमुग्ध होऊन बघतच गेले.

सर्व फोटो सुरेख! मस्त वाटतंय बघायला. मोबाईल वरून इथे फोटो अपलोड करता येत नसल्याने नाईलाजास्तव माझा पास.

@ मेघना,
दुसरे ब्राऊजर वापरून बघा
नाही तर मग फोटो तर अपलोड झाला आहे खाजगी जागेत, जर कॉप्म्युटर अवेलेबल असेल तर तिथून इन्सर्ट करता येऊ शकेल.
तरी अ‍ॅडमिनला विचारून बघा. फोटो चौकशी दर चौथ्या दिवशी कोणाची तरी असतेच.
मी स्वतः ब्राऊजर वापरतो फोटो अपलोड करायला.
ईतके फोटो टाकून झालेत की ऋन्मेषची जागा भरली. मग अभिषेक अकाऊंटमध्ये अपलोड करून इन्सर्ट करून ती लिंक ऋन्मेषमधून टाकू लागलो.
आता तर अभिषेकचीही जागा भरली तर भन्नाट भास्कर कामात आला .. ईथून तिथून त्रास असतोच, पण फोटो टाकायची हौस भारी त्यामुळे झेलायची तयारी असतेच.

झब्बू गणपतीचे दहा दिवस आहेत अजून, ट्राय करा सारे ऊपाय..

या धाग्यातही चौकशी करून बघा
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
https://www.maayboli.com/node/1556

असाच एक थंडीतला सूर्योदय.

8E79B7B7-F1F9-45F3-B223-CD38CD659D9E.jpeg

Pages