Submitted by पुरंदरे शशांक on 20 June, 2022 - 01:31
गाथा गारुड
ठसे नितळ शब्दांचे
मनावर अलगद
त्याचे गारुड आगळे
आत आत सावळत
इंद्रायणी डोहावाणी
शब्द गंभीर सखोल
लाटा हलके उठत
नाम बोलत विठ्ठल
पिंपुरणी रुखातळी
गार साऊली संतत
ओढ वाटते जीवाला
सुख ह्रदी सामावत
भाव शब्दींचा ह्रदयी
क्षणी जरा उतरत
विटेवरी जो ठाकला
बाहू येई पसरीत....
------------------------------------------------------------------
पिंपुरणी रुखातळी.... पिंपुरणी वृक्षाखाली.
देहूगावात फाल्गुन वद्य द्वितीयेला पिंपुरणी वृक्षाखाली कीर्तन करीत असताना श्री तुकाराम महाराज अदृष्य झाले अशी एक आख्यायिका आहे.
साऊली....सावली
ह्रदी..... ह्रदयात
ठाकला... अवतीर्ण झालेला, उभा राहिलेला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर गाथा गाण....
सुंदर गाथा गाण....