Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 14 June, 2022 - 09:32
माणसातला माणुस जागा ठेवा
तिच्या घराला चार झालरी लावा, तिच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवा
ओठ दाबुनी येइल ती भेटाया, यार! चेहरा माझा उघडा ठेवा
स्वभाव ज्याचा फार चांगला होता, आयुष्याने त्याची विट्टी केली
फार चांगले बनू नका राजेहो! बोट ठेवण्याइतकी जागा ठेवा
संकटात जो नक्की धावुन येतो खरेच त्याच्यावरती श्रद्धा ठेवा
दगड मांडुनी देव मानला आहे त्या देवाला सवा रुपाया ठेवा
दिशा योग्य आहे यत्नांची ज्याच्या, ज्याची झुंजायची तयारी आहे
काय फरक पायाचा पडतो त्याला...डावा ठेवा अथवा उजवा ठेवा
जरी व्यापिली कपटाने ही दुनिया, सत्याचा होईल उदय पूर्वेला
बस् हृदयामध्ये ओलावा ठेवा, माणसातला माणुस जागा ठेवा
©®- महेश मोरे (स्वच्छंदी)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा