{{ रोज देसाळ 'भिंगरी' पिऊन पिऊन लीवरला सूज
आलीय देठ्या...! पन काय करनार..! दुसरी परवडत नाय
म्हणून ती प्याय लागती.. पन आज तू हैस तर
चांगला फॉरेनचा ब्रॅण्ड मागव...ॲंटीक्वीटी है का
बग..! }}
पुणे मुक्कामी ऋषीकेश देठे यांचे भेटीसाठी
आलेले विजुभाऊ यांनी, दोन पॅग घपाघप मारल्यावर
पयला गिअर टाकला...!!!
{{ म्हंजे साला आधी एंडोसल्फान फवारून फवारून
युरिया घालून घालून सगळ्यान्ला वावरांची
खराबी कराय लावली..
आन् आता ह्या भोसडीच्यान्ला हे जुनं आठवाय
लागलंय.. }}
काय झालं विजुभौ?
{{ आरं सगळीकडं बोर्ड लागलेत.. पार हायवे पास्नं
बगत आलू..!
गुळाचा चहा...! ऑरगॅनिक फूड...! सेंद्रिय शेती..!
ॲंड यू नोs चुलीवरची भाकरीss?? आय जस्
लव् इट..!!
हितं पुन्यात तर मानसं पार डोंगरात
जाऊन राह्या लागलीत लगा..
दनादन स्कीमा उभ्या करून राह्यले...
क्वाऱ्या लावून लावून डोंगरं फोडाय लागले..
सगळं सपाट करून टाका म्हनावं....
काय शिल्लक ठिऊ नगा..
ह्या नदीचा बी आता नुस्ता मुडदाच राह्यलाय...
आता चिमन्या बिमन्या, पारवं, साळुंक्या
सगळ्यांन्ला पळवून लावा म्हनावं..
कुठंच आसरा दिऊ नगा त्येन्ला.. खदेडून लावा
सगळीकडनं..
भकास वाळवंट करून टाका सगळं येकदाच...
आनी मंग सेमिनार भरवा इकोफ्रेंडली कन्स्ट्रक्शन
आणि ससटेनेबल डेव्हलपमेंट वर..!
मागं पुन्यात त्यो रानगवा आल्ता, काय झालं तेचं?
त्येला पार पळवून पळवून मारला लगा...
वाट बिट चुकलं आसंल बिच्यारं..
त्येला काय म्हाईत की मानसं आसली येडझवी
असत्यात ते..
सगळीकडं हे आसंच हाय म्हना..
गावाकडं बी पैल्यासारखं राह्यलं नाय आता..
लय बदललंय सगळं..
मानसं समजा कोरड्या व्याव्हारिक पातळीवर
उतरलेत.. ते सोडून दिऊ समजा..
पन टीचभर गावात बी दोन-दोन कॉन्व्हेंटच्या
शाळा झाल्यात..! पार केरळावरनं मॅडम्या
आनल्यात शिकवायला..!
सगळ्या गावातनं आता इंग्लिश बोलनाऱ्या
बेकार पोरांची फौज उभी राहनाराय बग..!
आनी आपल्याकडच्या पोरींचं बी आवगडंच है रे..
जिन्स न् टॉप घालत्यात आनी शेनाच्या
पाट्या उचलतेत...! }}
पण इंग्लिश पायजेच ना आता..! तिच्याशिवाय
जमनार नाय पुढं..!!
{{ मान्यंय ना..! मान्यंय..! ती जागतिक भाषा है,
नॉलेजची भाषा है, सगळं कबूल है...!
पन तेवढं कामापुरतं इंग्लिश जमतंच असतं
मानसाला... तेवढं शिकावं बी.. पण हे लगा वाढीव चाललंय
सगळीकडं..
आणि आपल्या ह्या पोरांमधली शेकडा ९० पोरं कधी
म्हाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर पाऊल सुदा टाकनार
नाईत.. तो चान्सच मिळनार नाय दोन पिढ्यात
तरी..
हितंच आसपास आयुष्यं जानारेत ह्येंची..
लै लै तर पुन्या मुंबैत जाऊन माय पासली
घालतेल...! महिना वीस हजार रूपै पगारात
घराचे हप्ते फेडत आयुष्यभर..!
नंतर मग उगाच गावाच्या आठवनीनं
घैवर घालनारंच ना ते..!
आनी गावाकडं आले सुट्टीला, तर दोन दिवसाच्या
वर टिकत न्हाईत..!
तसं त्येंचं बी काय चूक नाय म्हना..!
काय उरलंय तिथं तरी..! नुस्ता फुफाटा
सगळीकडं..!
म्हाताऱ्या मानसाला गाडीत बसवून न्हायचं
म्हनलं तरी टेन्शन येतं..! गाडीतच गचकंल अशा
लायकीचे रस्ते..! सासूरवाडीला गेल्तो परवा..!
त्या धैवडीच्या रस्त्यावर तर म्हागच्या वीस वर्षांत
साधा एक डांबराचा हात पन मारला
नाय आजून..! अशी परिस्थिती हे..!
आणि चौकात माव्याच्या पिचकाऱ्या मारत
बसलेली, भकास फिरनारी तरनीबांड
बेरोजगार पोरं..!
त्यातली निम्मी आर्दी यूपीयस्सी एम्पीएससी च्या
डबऱ्यात गटांगळ्या खाल्ल्याली..!
म्हागं त्या कर्माधिकारींचं आणि झांगरे पाटलांचं वारं
आलतं..! त्येंचं बोलबच्चन ऐकून ऐकून हे बी
फाफलले...! हिकडं पुन्यातले सगळे क्लासवाले
ताजे झाले..!
झांगरे-पाटील म्हाईतच आसतेल ना तुला?
स्वतःच्या कदीकाळच्या संघर्षाच्या आठवनी
उगळंत, स्वतःच्या कर्तबगारीचे ढोल स्वतःच
वाजवत, भाषणं ठोकायची म्हणजे
कायच्या काय झालं...!
आता त्ये झांगरे-पाटील रेबॅनचे गॉगल आन् ब्रॅण्डेड
टी शर्ट्स घालून फिल्म स्टार्स बरोबर फिरताना
दिसतेत..!
यूथ आयकॉन वगैरे..!
भ्रष्ट सिस्टीमचा कायापालट करनारा
मॅचो मॅन, हॅंडसम अधिकारी वगैरे...!
पिच्चर मधीच जायाला पायजे आता तेंनी.!!
तर तेंच्यामुळंच भाषणबाज तरन्या
अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला आपल्याकडं..!
येकादी पोस्ट काढली की दणकावून ठोकून
देत्यात, की बाबा आमी आसे आसे ग्रामीण भागात
राहून यश-बिश मिळवलं...!
आणि आमच्या आई बाबांच्या पुण्याईमुळेच
आम्ही आयएएस, तहसीलदार, डीवायएसपी वगैरे झालो...!
कशाला असल्या थापा मारत असतेल हे लोकं?
हे पाच दहा वर्षं तिकडं दिल्ली पुण्यात असतात..
कारण तिथं ते सगळं वातावरन असतं..!
मग चुकून कधीतरी येकाद्याला निघते पोस्ट..!
आणि समजा आई बापांच्या पुण्याईनं जर यश
मिळत असतं, तर मग आमच्या ह्या पोरांना का
मिळत नाय वर्षानुवर्षं घासून ??
ह्यांचे आई बाप काय दरोडेखोर हैत काय?? }}
हम्म.. खरंय खरंय..आणि कर्माधिकारींचं काय
चाल्लंय सध्या??
{{ त्यांची तीच तीच प्रवचनं ऐकून ऐकून कटाळली
आता पोरं..!
'स्वस्थ दशकाची डायरी' नावाचं तडफदार
पुस्तक लिहिणारे कर्माधिकारी सर कुठे गेले काय
माहित..!
'किस रास्ते जाना है?' असा थरारक प्रश्न
विचारून,अंगावर काटा फुलवणारे कर्माधिकारी,
आता पार येगळेच दिसाय लागलेत लगा..!
भौतेक ते तेंच्या तेंच्या वळणानं चाल्लेत...!
की तसं काय नव्हतंच मुळात, कुणास ठाऊक..!
आमचंच बगायचं चुकलं आसंल कायतरी..!
म्हागं तेंनी 'कार्यकर्ता अधिकारी' असा एक फंडा
काढला होता..!
म्हणजे काय असतं, ते नंतर कळाय लागलं..!
पगार शासनाचा खायचा आणि दुसऱ्याच
कुणाचातरी कार्यकर्ता म्हणून काम करायचं..!!
आसं कसं चालंल..??
बाकी सरांनी आता पुढं बसलेल्या कवळ्या
कवळ्या पोरांपुढं चावट जोक मारायचं बंद
कराय पायजे.!
तसल्या गोष्टींचं बी एक वय असतं..!
वयाच्या साठीत गेल्यावर पुन्हा तरणं ताठं होता
येत नाय, हे लक्षात घ्यायला पायजे त्येंनी आता..!
आता मस्त विश्रांती बिश्रांती घ्यावी..! मस्त चांगली
चांगली पुस्तकं वाचत बसावं निवांत...!
कारण शेवटी किती काळ देशसेवा किंवा
मातृभूमीसाठी दगदग वगैरे करनार ना मानूस..!!
जाऊ दी.. सोड भौ.. तो काय लौकर आटपनारा
इशय नाय..!
पुना म्हनचील मला इंग्लिश दारू झेपली नाय
म्हनून..! बाकी ह्यात तसं चडन्यासारखं काय
नाईचाय म्हना..? नुसतं फुळ्ळक पानीच है..! }}
नाय नाय.. बोला तुमी विजुभौ..
{{ आनी ही आपली पोरं..!
मिन्टामिन्टाला ओ माय गॉss.. होली शिट्
ओ शिट् मॅssन... योss मॅssन...कूssल गाssइज्..!
आसलं बोलतेत..!
ही ह्यांची भाषिक अभिव्यक्ती..!
तेंची बी काय चूकी नाय म्हना..
इंग्रजीमधी मुळात शब्दच कमी हैत..!
लय लिमिटेड..!
मानसाच्या सगळ्या भावना त्यातच कोंबून
बसवाय लागतेत.!
आनी ह्येंन्ला समजा नेमाडे बिमाडे म्हाईत
नाईत तर सोडून दिऊ समजा..!
सगळ्यान्लाच नसतंय नेमाड्यांचं कौतुक..!
आरं पन त्या बाळू चव्हानाच्या पोराला तुकाराम
बी म्हाईत नाईत लगा..!
म्हंजे तुकाराम म्हाईती नसलेला मराठी पोरगा
तयार केला बग बाळ्यानं..! चमत्कारच केला
बोंगाड्यानं..!
ग्लोबल झालं बाळ्याचं पोरगं..!
ग्लोबल हुन्याबद्दल बी काय म्हननं नाय बरं गा..
पण ह्येंन्ला धड मार्केझ आणि कोएत्झीपण
म्हाईत नसतूय...
तो नाकपुश्या चेतन भगतच लागतो
ह्येन्ला टाईम्पासला..!
नायतर तो शेंबडा अमिश त्रिपाठी न् देवदत्त
पटनायक...!
महाभारत रामायणावर कसलातरी थ्रिलर
व्यापक पट मांडायला जातेत, आनी चार
पानांतच धापा टाकाय लागतेत...!
भाषा सुद्धा सगळी लिबलिबीत..!
अंदाधुंद शब्दांचा लेखी गोळीबार नुसता..!
ह्येंन्ला फेफरं आनायला आमचे नरहर
कुरुंदकर गुरूजीच पायजे होते लगा आज...!
तेंनी समजा हे आसलं चिमटीत बी धरलं नसतं
म्हना..!
पन तरी बी पायजेच हुतं ते आज..!
चांगलं फटकावलं आसतं त्येंनी सगळ्यांन्लाच.!
त्या मानसाची तेवढी बुलंद छातीच होती ..!
बाकी ती सुधा मूर्ती नावाची आजून येक फेमस
म्हातारी है..!
आणि तिज्या त्या दमलेल्या आजीच्या
दमवणाऱ्या गोष्टी..!
म्हागं येकदा बार्शीच्या स्टॅण्डवर येष्टीची वाट बघत
वाचाय लागलो होतो, तर ढास लागली मला..!
घाबरून मिटवूनच टाकलं ते..!
आणि मग तिथंच विसरून आलो..!
मुद्दामच ठेवून दिलं तिथं साईडच्या बाकड्यावर..!
आजून बी तिथंच पडलं आसंल..!
कोण न्हेणार ते ?
शेंगदाण्याच्या पुड्या बांदायला बी काय उपेग
झाला नस्ता तेचा..!
नवऱ्याकडं दाबजोर पैसा है..!
आणि हिच्याकडं बक्कळ वेळ..!
त्यामुळं दणादण पुस्तकं पाडत आसते.
मिडलक्लास लोकांना नीतीमत्तेची गुटी वगैरे
पाजते..!
संस्कार बिंस्कार करते..! हळवं बिळवं करते..!
पण लय हळवं नाय बरं गा..!
उगंच आपलं चिमुटभर..! तोंडी लावन्यापुरतं..!
कारण मिडलक्लास लोकांन्ला दुसऱ्या
दिवशी कामावर बी जायाचं असतं ना..?
लय भावुक होऊन कसं चालेल?
तेंची बी काय चूकी नाय तशी म्हना..!
चंपक चांदोबा वगैरे बंद पडलं, त्याच दिवशी
भौतेक हे सगळे जन्माला आले..!
चंपक ची सगळी कसर भरून काढली ह्येंनी..!
आणि आता 'लेखक लेखक' म्हणून नाचाय
लागले..! ऊरावरच बसलेत तवापास्नं..!
कदी खाली उतरतेत काय म्हाईत...! }}
हम्म आणि ती देशपांडे म्हणून येक होती ना?
तुमी बोलला होता तुम्ही मागं..
{{ ती भारीचाय रे..! गौरी देशपांडेची पोरगी है ती..!
उर्मिला म्हणून है..! 'खोटं सांगेन' म्हणते पन अगदी खरंखरं लिहिते..! आईवरच गेलीय..!
आणि गौरी देशपांडे म्हंजे आपलं जुनं लव्ह है बरं गा..!
त्या बाईचं असलं खतरनाक इंग्लिश आसूनसुद्धा तिनं
मराठीमधी लिहिलं त्या टायमाला..!
आणि चांगलंच लिहिलंय, त्या वेळच्या मानानं..!
तर ती आवडायचीच..!
आता तिची पोरगीपन आवडती..!
हा माझ्या वयाचा दोष है बरं गा..!
आता माझं वयच आसं आडनिडं झालंय,
की येकाच वेळी पोरगीपन आवडती आणि
तिची आईपण आवडती...!
तू पॅग भर की..! साला दारू पन चडत नाय आज..!
डुप्लीकेट माल इकतेत का काय हितं?
आपला बिच्या आसं करत नाय..!
इमानदारीनं धंदा करतू...!
येवडी उदारी झालीय माजी, पन येका शब्दानं
बोलत नाय कदी..!
आता एवढं डाळींब गेलं की फेडून टाकतो
म्हागचं सगळं..! सगळं निल करून टाकतो..! }}
आणि ते बाळ्याच्या पोराचं काय म्हणत हुता मगाशी?
गावातनं दरसाल पालखी जाती पंडरपूरला
तरी बी आसं कसं काय.?? आवगडंच है..!
{{ काय नाय रे..!
पालखीत बी आता सगळा चकचकाट झालाय..!
मला तर वाटाय लागलंय की, आता ही पालखी
अन् वारी बिरी सुद्धा अंबानी-अडानीलाच चालवाय दितील...! मंग काय टेन्शनंच नाय..! सगळं येकदम कार्पोरेट स्टाईल हुईल..! }}
नाय नाय.. आसं काय होनार नाय विजुभौ..!
तुमी आज लैच वाकड्यात बोलाय लागलाय..!
हितं मी ऑफिसातल्या दोस्ताला घिऊन
आलोय..! हे बघा, हे पाचपाटील म्हणून हैत..!
आपल्यापैकीच हैत..!
'तुमी चांगलं हसवता' असं सांगून धरून
आणलंय त्येंन्ला..!
आणि तुमचा आज असा उदास बोचा का झालाय
कळंत नाय..!
पन आसू द्या.. होतं आसं कधीकधी..!
काय आडचन नाय..!
आता आपन एक काम करू..!
आता बार बंद व्हायची वेळ झालीय..!
एक हाफ खंबा पार्सल घिऊन जाऊ फ्लॅटवर
आणि तिथं कंटीन्यू करू..! रात्र आपलीच है..!
काय टेन्शन नाय..!
फक्त आता गाडी कुठं पार्कींगला लावली हुती ते
आठवाय पायजे..!
भाग-१
https://www.maayboli.com/node/81253
भाग-२
https://www.maayboli.com/node/81259
भाग -३
https://www.maayboli.com/node/81262
भाग - ४
https://www.maayboli.com/node/81273
(क्रमशः)
पहिले ४ भाग उगीच काढून टाकले.
पहिले ४ भाग उगीच काढून टाकले. त्या त्या पात्राची त्याच्या वकुबानुसार तशी भाषा असते. गावाकडे समवयस्क गप्पा मारत बसले की अशी भाषा ऐकायला येतेच.
पण तुमच्या निर्णयाचा आदर आहे.
शिवाय ते नांगरे पाटील आन धर्माधिकारी यांनी खरच दोन पिढ्या बरबाद केल्या. >>> ह्याला +१००
कोण नांगरे पाटील आणि
कोण नांगरे पाटील आणि धर्माधिकारी? कुठल्या पिढ्या अन कश्या बरबाद केल्या? कोणीतरी थोडक्यात वा सविस्तर लिहा यावर?
कोण नांगरे पाटील आणि
कोण नांगरे पाटील आणि धर्माधिकारी? कुठल्या पिढ्या अन कश्या बरबाद केल्या? कोणीतरी थोडक्यात वा सविस्तर लिहा यावर?
सर तुम्ही सिरियसली क्रिकेट
सर तुम्ही सिरियसली क्रिकेट आणि बॉलिवूड या पलीकडे काहीही वाचत नाही का?
समीर धर्माधिकारी - अभिनेता
समीर धर्माधिकारी - अभिनेता आहे...
पुढचा भाग लिहा. की मागचे भाग
पुढचा भाग लिहा. की मागचे भाग पुन्हा लिहायला घेतले?
समीर धर्माधिकारी - अभिनेता
समीर धर्माधिकारी - अभिनेता आहे...>> त्यांना अविनाश धर्माधिकारी म्हणायचं आहे.
सर तुम्ही सिरियसली क्रिकेट
सर तुम्ही सिरियसली क्रिकेट आणि बॉलिवूड या पलीकडे काहीही वाचत नाही का?
>>>>>
चांंगले आहे की. वर उल्लेखलेल्या नावांबद्दल वाचून त्यांच्यामुळे बरबाद होणार्या पिढीत मी नाहीये
हो ना बरबाद झाला असतात तर काय
हो ना बरबाद झाला असतात तर काय झालं असतं मायबोली चे
तिलाही सोबत घेऊन गेला असतात
माझ्या वाईट सवयी वगैरे आणि मी वाया कसा गेलो वगैरे वाया गेलेले धागे काढून
थोर उपकारच आहेत तुमचे समाजावर की तुम्ही बॉलिवूड आणि क्रिकेट च्या पलीकडे काही वाचत नाही
रूनमेश मुद्दाम करत असशील तर
रूनमेश मुद्दाम करत असशील तर ठीक
गुगल करत जा रे , नाही उत्तर मिळालं तर असे बाळबोध प्रश्न विचार !
वर उल्लेखलेल्या नावांबद्दल
वर उल्लेखलेल्या नावांबद्दल वाचून त्यांच्यामुळे बरबाद होणार्या पिढीत मी नाहीये >> सर नवीन धागा काढुन 'तुम्ही बरबाद कसे झाला नाहीत' यावर चर्चा कराल का? उगीच पाटीलसाहेबांचा धागा कशाला भरकटवता?
धाग्याचं नाव प्रतिसादांमधेही
धाग्याचं नाव प्रतिसादांमधेही सार्थ झालं!
प्रांजळ अभिप्राय / मतं /
प्रांजळ अभिप्राय / मतं / फीडबॅक/ सूचनांबद्दल सर्वांचे आभार..!
हे सगळं जमेल तसं लक्षात घेऊन, पुढे लिहिनच..!
भरत, आबा, मोद, वावे .. आभार.
SharmilaR,
<< पर तुमी ते आडवं लिवायच्या ऐवजी
उबे ल्हीताय
ते लई मंजे
लयीच भारी हाये बगा. >>
मजकूर टंकण्यासाठी इथे जो आयताकृती भाग असतो, तो गच्च भरून टाकला की मग शब्द तुटतात. अर्धा शब्द वरती आणि अर्धा खाली, लोंबकळत राहतो. म्हणून हा 'उभं' लिहिण्याचा प्रयोग..! वाचताना जरा सुटसुटीत पडतं ते..!
आशुचॅंप,
तुमचं आमंत्रण मोहात पाडणारं आहे... अशा आमंत्रणाला नाही म्हणण्याची आमच्यात अजिबातच पद्धत नाही.. परंतु तरीही ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत, हे एक आहेच..! आमंत्रणाची नोंद घेऊन ठेवतो आहे..! धन्यवाद.
बाकी 'चांगला खंबा' म्हणजे जास्तीत जास्त ब्लेंडर्स प्राईड..! त्यापुढे आमची फारशी झेप जात नाही.. सगळ्या पेशींनाही घनिष्ठ ओळखीची झालीय आता ती..!
बाकी पुस्तकं, राजकारण, मूव्हीज, विचारसरण्या, इतिहास, शेती, शिवाय भविष्यातली हरहमेश गंडणारी नियोजनं वगैरे किंवा समजा भूतकाळातले काल्पनिक त्रास वगैरे विषयांत बिनबोभाट संचार करत करत, आपलं तोडकं-मोडकं ज्ञान मुक्तपणे पाजळण्याएवढा कॉन्फिडन्स, ब्लेंडर्सने नेहमीच दिला आहे..!
कार्पोरेशन एरियात 'सुदामा' 'आलोक' वगैरे काही जिव्हाळ्याची ठिकाणं आहेत.. तिथे समजा शटर डाऊन झाल्यावरसुद्धा एखाद्या कोपऱ्यातल्या टेबलवरून, अशाच लंब्या लंब्या फोकनाड ताना ऐकू येत असतील, तर तिथे आसपास आम्हीच आहोत, असा संशय बाळगू शकता..!
पुन्हा एकदा सर्वांचे आभार..
फारच छान आहे हे म्हणा. आधीचे
फारच छान आहे हे म्हणा. आधीचे भाग पण छान होते त्यांच्या त्यांच्या परीने आणि ठिकाणी. द्वारकानाथ बिवलकर ह्यांनी रामदास आय डी ने असलंच काही जबरा लिहिलं आहे मिसळपाववर. नागरी भाषा वापरून.
प्रचंड बुद्धिमान, चाणाक्ष, बेरक्या, सगळं ज्ञान कोळून प्यायलेला कोणी ' माणूस ' दिसतोय ह्यातून. ( तर दुसरं काही पिण्याची गरज काय म्हणा!)
धर्माधिकारी, मूर्तीबाई, नांगरे पाटील अगदी अगदी.
अनुभव अगदी पिळून पिळून encash केलेत ह्या लोकांनी. गोडबोलेना पण घ्या एकदा ग्रूपमध्ये.
चला. चार भागांवर मी न लिहिलेल्या एकूण प्रतिसादांइतका प्रतिसाद लिहून टाकलाय इथे. ( थक) बाकी शून्य!
Pages