क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज WPL ची (ह्याला WIPL का नाही म्हटलं गेलं माहित नाही) पहिली एलिमिनेटर - मुंबई वि. युपी!!

IPL सुरु व्हायला एक आठवडा उरला आहे. ह्या वेळी दुखापतीमुळे पूर्ण सिझन कन्फर्मड बाहेर असलेल्या खेळाडूंची लिस्ट अशी आहे.

मुंबई - जसप्रीत बुमरा आणि जाय रिचर्डसन (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

दिल्ली - ऋषभ पंत (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

राजस्थान - प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅक्कॉय (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

चेन्नई - काईल जेमिसन (रिप्लेसमेंट म्हणून द आफ्रिकेच्या सिसांदा मागला ला घेतले आहे).

पंजाब - जॉनी बेअरस्टो (अजूनही रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार हे माहित नाही).

बंगलोर - विल जॅक्स (रिप्लेसमेंट म्हणून न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेल ला घेतले आहे).

फेरफटका

मुंबई च्या महिला लखनौ ला संहजरित्या हरवून फायनल ला पोचल्या.

उद्या परत एकदा हरमनप्रीत विरुद्ध मेग लँनिंग हि लढत होणार.

>>ह्याला WIPL का नाही म्हटलं गेलं माहित नाही

अगदी हाच प्रश्न मलापण पडलेला!!
चक्क Indian हा उल्लेखच नाही नावात Uhoh

सलीम दुराणी श्रध्दांजली !
' खेळासाठी खेळ ' हे तत्त्व पाळूनही उच्चतम क्रिकेटमध्ये आकर्षकपणे प्रभावी ठरण , यासाठी असामान्य प्रतिभाच हवी ! एक शैलीदार चतुरस्र खेळाडू व लोभस, आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून दुराणी एकमताने प्रसिद्ध होते. ज्याच्या 'मॅजिक' चेंडूने सोबर्सची विकेट घेवून वाडेकारच्या संघाला विंडीज बेटांत ऐतिहासिक विजय मिळवून दिला , तो सर्व संघाचा व देशाचा लाडका झालेला खेळाडू - सलीम दुराणी !!! सलाम !

भारतीय क्रिकेटच्या सुरूवातीच्या काळातले काही 'raw gems' होते, त्यातला एक सलीम दुराणी वाटायचा मला. गॅरी सोबर्स त्याला ग्रेट क्रिकेटर समजायचा असं वाचलंय. RIP Durani!!

असामी
50-60 च्या काळात आपल्याला सेकंड क्लास टीम ची ट्रीटमेंट मिळत असे असं वाचले आहे.
आता जसे बांगलादेश ला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द आफ्रिका टूर ला बोलावत नाहीत तशी आपली स्थिती होती.

तेंव्हाही आपण इंग्लंड, ऑस्ट्रेलिआ दौरे केले आहे पण. दुराणी हे नाव वगळलेले दिसतेय राजकारणामूळे.

"पण. दुराणी हे नाव वगळलेले दिसतेय राजकारणामूळे." - भाऊ कदाचित ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. पण जे वाचलंय त्यावरून दुराणी चा सगळ्यात मोठा शत्रू त्याचं टेंपरामेंट होतं. संझगिरींनी लिहिलंय कि दुराणी कडे जर शास्त्रीचा पेशन्स असता तर तो फार मोठा प्लेयर होऊ शकला असता.

ते कोट अस आहे कि सास्त्री कडे सलीमची गुणवत्ता असती किंवा सलीमकडे शास्त्रीचा पेशन्स, बुद्धिमत्ता नि मेहनत असती तर तो गारफिल्ड सोबर्स एव्हढा महान झाला असता. आय पील मधे नक्कीच धमाल उडवई असती दुराणी ने हे नक्की.

https://www.youtube.com/watch?v=th_s3LWzyCM

परवा युट्युबवर हे बघायला मिळालं..... गावसकर ची अफलातुन बॅटिंग अन दिलिप वेंगसरकरचेही शतक...
मला वाटते, गावसकर त्याच्या काळातला महान (आक्रमक) फलंदाज होता, त्याला गीअर चेंज करायची संधी फारशी मिळत नसावी.... सदैव डाव सांभाळत खेळावे लागले त्याला...
काय खेळला आहे ही ईनिंग्ज... १०३ चेंडुत शतक.... तेही विंडीजसमोर...

*सदैव डाव सांभाळत खेळावे लागले त्याला...* - +१. वे. इंडिजच्या तोफाखान्यासमोर सुनील ज्या सहजतेने, आकर्षकपणे आक्रमक खेळायचा, तितक्याच सहजतेने खत्रुड पीचवर दर्जेदार फिरकी गोलंदाजीही तो परफेक्टली बचावात्मकही खेळत असे. त्याची तंत्रावर प्रचंड पकड व एकाग्रता याचा एक किस्सा -
इंग्लंडमधील भारत वि इंग्लंड कसोटीच्या वेळी प्रेस बॉक्स मध्ये माजी कप्तान माइक ब्रेअरली (बहुतेक ) एमसीसीचा प्रतिनिधी म्हणून हजर असे. नेहमी चेष्टा मस्करी करत फिरत असणारा माइक सुनील खेळत असताना मात्र कठड्यावर हनुवटी टेकून एकाग्रतेने त्याला बघत होता. कुणीतरी मस्करीत त्याला ' झोपला आहेस का ' असं विचारलं. मागे वळून तो गंभीरपणे म्हणाला, ' लहानपणापासून फलंदाजीसाठी आम्हाला एकच धडा सतत शिकवत. ' बचावात्मक खेळताना शक्य तितकं चेंडूजवळ जा. पण कुणीही हे नाही सांगितलं, " You have to actually smell the ball before playing, as this chap Sunil does ! "
( माझे एक जाणकार मित्र एका वर्तमानपत्रातर्फे त्या कसोटी मालिकेसाठी तिथे गेले होते व तेंव्हां प्रेस बॉक्समध्ये हजर होते.)

लॉंग वीकेंड कोकणात गेलेलो त्यामुळे कुठल्याच मॅचेस फॉलो केल्या नाहीत..... अगदी आरआरची मॅच होती हे पण विसरुन गेलेलो!!
रिंकू सिंगवाली मॅच मात्र आता पाहावीच लागेल Happy

रिंकू सिंग चा एकंदर इतिहास बघता मस्त वाटलं पोराबद्दल. व्हेरी इंस्पायरिंग !

, " You have to actually smell the ball before playing, as this chap Sunil does ! " >> Happy

अरे इकडे पडली का ही पोस्ट!! मला वाटले मी आयपीएलच्या धाग्यावर लिहली!!
पण त्यानिमित्ताने भाऊ पण आयपीएल फॉलो करतात हे तरी कळले Happy
या की तिकडे आयपीएल कट्ट्यावर!!

द्रविड नि त्याचा सपोर्ट स्टाफ, सध्या एमारेफ मधे टेस्ट चँपियनची पूर्व तयारी करायला जमले आहेत असे वाचले. इनिशियेटीव्ह कौतुकास्पद आहे फक्त डावपेच नि स्ट्रेट्जी ठरवण्याव्यतिरिक्त अजून काय करणार कळत नाही. आयपील संपायला अजून दीड महिना आहे. अगदी सगळे टेस्ट टीम वाले शेवटच्या चार सामन्यांपर्यंत बाहेर निघाले असे धरले तरी जेम तेम १५ दिवस मिळतील. एव्हढा वर्कलोड झाल्यावर किती जण इंजरी फ्री असतील देव जाणे नि किती फेश माईंड सेट मधे असतील हेही देवच जाणे. बीसीसीआय ने काही वर्कलोड मॅनेज करायला कळावले नाहिये असे वाचले. ऑसी टीम बर्‍यापैकी फ्रेश असेल हे उघड आहे कारण स्मिथ बघता कोणीही टेस्ट वाले आयपील मधे नाहियेत Sad

"एव्हढा वर्कलोड झाल्यावर किती जण इंजरी फ्री असतील देव जाणे " - हे प्रत्येक मोठ्या टूर्नामेंटच्या आधीचं रडगाणं आहे. यंदा वर्ल्डकप ऑक्टोबर मधे आहे म्हणून बरं. नाहीतर मागच्या वर्ल्डकपला, टी-२० वर्ल्डकपला हे चक्र चालूच असतं.

परवा असच कुठेतरी एक लिस्ट पाहिली. २०११ वर्ल्डकप चे टॉप २० का २५ रन गेटर्स
त्यात आपले सेहवाग, सचिन, गंभीर, विराट, युवी अन् धोनी हे सगळे आहेत.

त्या नंतरच्या २ वर्ल्डकप मधे मात्र आपण केवळ टॉप ३ च्या परफॉर्मन्स वर अवलंबून होतो. यंदा ही जर वर्ल्डकप जिंकायचा असेल तर सगळ्यांनी काँट्रिब्यूट करायला लागेल.

स र तेंडूलकर, अर्ध शतकाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

ह्या अर्धशतकातील जवळपास निम्मी वर्षे क्रिकेट प्रेमींना भरभरून आनंद दिला. आंतरराष्ट्रीय शतकांचे शतक केले. असेच निर्भेळ निरोगी आयुष्याचे शतक पुर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रर्थना!

असेच निर्भेळ निरोगी आयुष्याचे शतक पुर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रर्थना! >> +१ - नुसता आनंदच नाही तर एक आशा दिली - एक दिशा दिली.

*असेच निर्भेळ निरोगी आयुष्याचे शतक पुर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रर्थना! * +१ !!!!!!!!!

“ नुसता आनंदच नाही तर एक आशा दिली - एक दिशा दिली.” - +१. सचिनशी पर्सनल लेव्हलवर लोकांना कनेक्ट जाणवायचा. सचिनकडे बघताना, आपलं कुणीतरी खेळतंय, एकेका आव्हानाला सामोरं जात यशस्वी होतंय, ही भावना जाणवायची. तो रिटायर झाल्यावर अचानक मोठं झाल्याची जाणीव झाली. हॅपी बर्थडे सचिन!!

Pages