Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला गंगेत घोडे न्हायले. आता
चला गंगेत घोडे न्हायले. आता ह्या शतकाच्या जोरावर हा आपलयाला किती वर्षे इमोशनल ब्लाकमेल क्स्रणार आहे ?
*अशा पिचवर महात्मा गांधींनी
*अशा पिचवर महात्मा गांधींनी पण डबल सेन्चुरी मारली असती!* - अशा पीचवरही आपण आपलं पानिपत करून न घेतां 400-५ स्कोअर केलाय, याचं महात्माजीनाही कौतुक वाटलं असतं !
सामना अजूनही रंजक होवू शकतो !!
कोहली जबरदस्त पेशंटली खेळतो
कोहली जबरदस्त पेशंटली खेळतो आहे. सिडनी २००४च्या त्या इनिंगच्या व्हाईब्ज आल्या. असंच काहीतरी लागणार होतं, असं वाटत होतं. २८व्या शतकासाठी फार आनंद झाला. ब्राव्हो!
अशा पिचवर महात्मा गांधींनी पण
अशा पिचवर महात्मा गांधींनी पण डबल सेन्चुरी मारली असती!
>>
दोन्ही टीम पैकी कुणीही अजून तरी मारली नाहीये
आता ह्या शतकाच्या जोरावर हा
आता ह्या शतकाच्या जोरावर हा आपलयाला किती वर्षे इमोशनल ब्लाकमेल क्स्रणार आहे
>>
व्हाइट बॉल परफॉर्मन्स वर टेस्ट टीम मधे येण्यासाठी शर्मानी जितकी वर्ष केलं त्याच्या पेक्षा 2 कमी...
शर्मावर बराच अन्याय झाला
शर्मावर बराच अन्याय झाला कसोटी बाबत..
ते एक असो.. त्याने आपली जागा मिळवली अखेर हे मात्र छान झाले
स्मिथ फारच गंडलेली कप्तानी
स्मिथ फारच गंडलेली कप्तानी केली. चक्क कोहलीला शतक करायला दिले.
आल्या आल्या कोहली नेहमीप्रमाणे स्पिनरला चाचपडत होता या भाईने स्टार्कला आणले होते त्यासमोर आणि कोहलीने त्याला तीन चार चौके मारून आपली गाडी स्टार्ट केली.
नंतरही ईतके चेंजेस करत होता की आपल्याच बॉलरना सेटल होऊ देत नव्हता. फारच उतावीळ. याऊलट कोहलीने प्रशंसनीय संयम दाखवला.
खरी मजा तर उद्या या मॅचला आहे
खरी मजा तर उद्या या मॅचला आहे.
सामनाही रंगतदार होण्याची शक्यता आहे आणि आपलाही यात ईंटरेस्ट आहे.
जर लंकेने न्यूझीलंडला २-० ने हरवले तर आपण बाहेर लंका आत.
NZ v SL, 1st Test
NZ 28-1 & 373
SL 302 & 355
Tom Latham*: 11 (48)
Kane Williamson: 7 (39)
Prabath Jayasuriya 3-0-10-0
Day 4: Stumps - New Zealand need 257 runs
शर्मा आधी कसोटी संघात नव्हता
शर्मा आधी कसोटी संघात नव्हता तेच बरे होते. आताही कप्तानीच्या नावाखाली एक्सपायरी संपल्यावरही अजून दोन वर्षे गळ्यात पडला नाही तरच नवल. कोहलीच्या काळात टीमचा स्वॅगच खास होता. शर्मा काही तसले करू शकत नाही.
शर्मावर बराच अन्याय झाला
शर्मावर बराच अन्याय झाला कसोटी बाबत..
>>
त्याला जितके चांसेस दिले त्याच्या एक दशांशही इतरांना मिळत नाहीत (पृथ्वी)
2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ओपन करायला घाबरला होता तो, विहारीला बळीचा बकरा केलं होतं...
आश्विनने विकेट सांभाळायला हवी
आश्विनने विकेट सांभाळायला हवी होती आपली. मग दोघांनी सिंगल डबल करून केली असती कोहलीची डबल सेंच्युरी का असा शॉट खेळला समजत नाही..
त्याला जितके चांसेस दिले ....
त्याला जितके चांसेस दिले ....
>>>>
शर्माला सुरुवातीला परदेश दौऱ्यावरच बळीचा बकरा बनवायला नेत होते. रेकॉर्ड चेक केले तर समजेल की त्याने कमबॅक करायच्या आधी तो मायदेशात कमी आणि परदेशातच जास्त खेळला आहे.
त्याचवेळी लिमिटेड फॉर्मेटचा तो लिजंड झाला होता. ओपनिंगला खेळायचा. ईंग्लंड ऑस्ट्रेलियात खोऱ्याने धावा करत होता. भारतात तर बॉस होता. पण तरीही त्याला डावललेच जात होते. राजकारण काही कमी नाही आपल्याकडे..
कोहलीच्या काळात टीमचा स्वॅगच
कोहलीच्या काळात टीमचा स्वॅगच खास होता.
>>>
याच्याशी सहमत.
कसोटीत कोहलीच कप्तान बेस्ट होता.
बदल करायचे झाल्यास लिमिटेडला शर्मा.
माझीही अशीच ईच्छा होती.
पण बीसीसीआयला कोहलीचा गेम करायचाच होता. त्याचा ॲटीट्यूड त्याला नडला. चेतन शर्मा यांनी म्हटल्याप्रमाणे तो स्वताला खेळापेक्षा मोठा समजायला लागलेला. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना ते खुपणारच होते.
जबरदस्त इनिंग - विराट कोहली!!
जबरदस्त इनिंग - विराट कोहली!!! take a bow!! अक्षर, भारत, जडेजा - सगळ्यांनी मस्त भागीदार्या रचल्या. (अय्यरच्या आधी जडेजा आणि भारत बॅटींगला आले तेव्हा मला वाटलं 'अजून एक मास्टरस्ट्रोक' की काय?
) रिझल्ट लागेल की नाही ते पाचव्या दिवशी विकेट किती टर्न होते, ह्यावर अवलंबून आहे. पण आत्तापर्यंत ही मॅच मस्त झालीय.
महात्माजींचं क्रिकेटशी असलेलं एकमेव कनेक्शन बहूदा, त्यांनी हिंदू, मुस्लिम वगैरे टीम्स खेळत असलेल्या पेंटॅग्युलर्सना ला केलेला विरोध असावं.
"शर्माला सुरुवातीला परदेश दौऱ्यावरच बळीचा बकरा बनवायला नेत होते. " - ह्यात आपण ज्याची बाजू घेतोय त्यालाच खाली खेचतोय हे चाणाक्ष लेखकाच्या लक्षात आलं नाही ह्याचं आश्चर्य आहे
भारतातल्या मॅचेसमधे खोर्याने रन्स काढल्या म्हणून त्याला परदेशात संधी दिली आणि तो अयशस्वी ठरला ह्यात तो बळीचा बकरा नाही, तर मायदेशात(च) वाघ होता इतकंच. शर्मा २०२१ च्या इंग्लंड दौर्यापासून एकदम वेगळ प्लेयर झाला टेस्टमधे. तो स्वतःच्या विकेटवर प्राईस ठेवायला शिकला आणी तिथून त्याने बाजी पलटवली. पण त्याआधी २०१३ पासून त्याला अनेक संधी मिळाल्या हे सुद्धा खरंय. (ह्यात तक्रार नाही, पण हे नाकारण्यात काहीहे अर्थ नाही). आणि परदेशातल्या टेस्ट्सचं बोलायचं तर तेंडुलकर (पाकिस्तान, इंग्लंड), द्रविड (इंग्लंड, द. अफ्रिका), कोहली (ऑस्ट्रेलिया) अशा अनेक प्लेयर्सनी परदेशातल्या टेस्ट्समधे कारकिर्दीची खणखणीत सुरूवात करून मग भारतात मैदान गाजवलंय. त्यामुळे 'परदेशात बळीचा बकरा' वगैरे आर्ग्युमेंट्सना काहीही अर्थ नाहीये.
शर्माला परदेशात खेळता येते हे
शर्माला परदेशात खेळता येते हे त्याने सिद्ध केले आहे. ईथून पुढेही करेन. तेव्हा येत नव्हते. नंतर शिकले असा काही प्रकार आहे का? असूही शकतो. पण मुळात त्याला स्थैर्य दिलेच गेले नाही. वर कोणीतरी त्याला चान्स मिळाले बरेच म्हटले म्हणून आठवण करून दिली की कसे चान्स मिळाले आणि कुठे कुठे मिळाले.
या सामन्या नंतर नॅथन लायन
या सामन्या नंतर नॅथन लायन भारतात सर्वात जास्त कसोटी बळी घेणारा परदेशी गोलंदाज झाला आहे.
नक्कीच अभिनंदन करण्या सारखी गोष्ट आहे.
भारतात सर्वात यशस्वी पाच परदेशी गोलंदाज -
लायन (55 बळी / 27 ची सरासरी), अंडरवूड (54 बळी / 26 ची सरासरी), बेनॉ (52 बळी / 18 ची सरासरी), वॉल्श (43 बळी / 18 ची सरासरी) आणि मुरली (40 बळी / 46 ची सरासरी)
शर्मा २०२१ च्या इंग्लंड
शर्मा २०२१ च्या इंग्लंड दौर्यापासून एकदम वेगळ प्लेयर झाला टेस्टमधे. तो स्वतःच्या विकेटवर प्राईस ठेवायला शिकला आणी तिथून त्याने बाजी पलटवली >> +१. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतात दणकून सुरूवात केली होती त्याने पण नंतर बाहेर गडबडला होता. मॅच्युअरिटी किंवा अजून काहि असेल पण विकेट वर प्राईस ठेवायला लागल्यापासून तो टेस्ट लेव्हलचा झाला हे नाकारण्यामधे काहीच अर्थ नाही.
कोहलीची हि इनिंग मधे टेक्निकल पैलूंपेक्षा पेशन्स नि मेंटल दिसिप्लिन चे आदर्श उदाहरण होते. पाटा पिचेस वर बॅटींग करणे सोपे असते वगैरे म्हणताना ह्याच पिचर स्मिथ ,रोहित नि लाबु ह्यांनी बर्यापैकी लयी मधे असतानाही शतके झळकावली नाहित हे लक्षात घ्यावे. अक्षर ची ह्या सिरीजमधली बॅटींग रिव्हीलेशन आहे एकदम.
“ कोहलीची हि इनिंग मधे
“ कोहलीची हि इनिंग मधे टेक्निकल पैलूंपेक्षा पेशन्स नि मेंटल दिसिप्लिन चे आदर्श उदाहरण होते. पाटा पिचेस वर बॅटींग करणे सोपे असते वगैरे म्हणताना ह्याच पिचर स्मिथ ,रोहित नि लाबु ह्यांनी बर्यापैकी लयी मधे असतानाही शतके झळकावली नाहित हे लक्षात घ्यावे.” - +१. ‘डिसिप्लिन’ आणि ‘डिटरमिनेशन’ दोन्ही. पहिल्या सेशनमधे इतका भक्कम बचाव करणारा कोहली नंतर जेव्हा आक्रमणावर आला तेव्हा तो अॅटॅकही तुफान होता.
बापू (महात्माजी नव्हे, अक्षर) ह्या सिरीजमधे एक निव्वळ बॅट्समन म्हणून खेळतोय असं वाटावं इतका फॉर्मात आहे.
कोहली ने पुन्हा एकदा फॉर्म
कोहली ने पुन्हा एकदा फॉर्म सिद्ध केला आहे. गेले चार दिवसाच्या खेलामधून स्पष्ट झाला आहे की पाचव्या दिवशी काही चमत्कार होणार नाही. ऑस्ट्रेलिया ३-५ फलादांजाच्या बदल्यात पूर्ण दिवस खेळून काढतील.
पावसाने श्रीलंका आणि न्यूझीलंड सामनायात रंगत?? आणली आहे की घालवली आहे, तेच कळत नाही.
मॅच ड्रॉ झाली तर भारताला फायदा होईल.
श्रीलंका आणि न्यूझीलंड मॅच
श्रीलंका आणि न्यूझीलंड मॅच ड्रॉ झाली तर आपण फायनल मध्ये.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या ४८०
भारताने ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर
लंका न्यूझीलंड सामन्यात पावसाने ओवर्स कमी केल्या आणि सामना अनिर्णित राहण्यास मदत केलीय. तसे झाल्यास भारत आजच फायनलला..
आश्विन अण्णाने नाईट वॉचमनला
आश्विन अण्णाने नाईट वॉचमनला तरी घेतला. तासाभरात अजून दोन विकेट जात ऑस्ट्रेलियावर प्रेशर यायला हवे. प्रेशरमध्ये गेम बदलतो. मात्र एकदा का प्रेशर गेले की अर्थ नाही सामन्याला..
100 च्या खाली टार्गेट आल्यावर
100 च्या खाली टार्गेट आल्यावर न्यूझिलंड सुटलेत
आपण जाऊ फायनल ला
9 ओव्हर मधे 55 हवेत...
गेल्या 10 मधे 69 चोपलेत
दोन विकेट्स गेल्यानी रनरेट
दोन विकेट्स गेल्यानी रनरेट खाली आलाय
विल्यमसन पण शतका जवळ सावध झालाय
शंभर झाले की मारेल बहुतेक
साडेचार मधे 34 हवेत
लै भारी चालू आहे मॅच
लै भारी चालू आहे मॅच
8 बॉल मधे 11 हवेत किंवा 3 विकेट्स
लै भारी चालू आहे मॅच
लै भारी चालू आहे मॅच
8 बॉल मधे 11 हवेत किंवा 3 विकेट्स
रोप वर कव्हर नसल्याने 2
रोप वर कव्हर नसल्याने 2 वाचल्या
5 बॉल 7
विल्यमसन ची 4
विल्यमसन ची 4
2 बॉल 1
2 विकेट्स
विल्यमसन डज इट फॉर इंडिया
विल्यमसन डज इट फॉर इंडिया
लास्ट बॉल वर सिंगल
कमाल प्लेअर आहे हा विल्यमसन!
कमाल प्लेअर आहे हा विल्यमसन!
पावसाने सामना ड्रॉ ला नेलेला. आपल्याला न्यूझीलंड विजयाचे वा लंका पराभवाचे काही पडले नव्हते. अनिर्णित सामना पुरेसा होता आपल्यासाठी. जो सहज होत होता. पण जेव्हा हे शेवटी जिंकायला गेले तेव्हा या नादात हरू नये असेच मनात आलेले. विकेट पडू लागल्या तेव्हा तेच टेंशन आलेले. पण विल्यमसन होता तोपर्यंत विश्वास होता. सार्थ ठरवला.
Pages