क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा.
हा कसोटी सामना आहे. टी-२० नाहीये.

कोहली पुजारा शतक मारतील
राहणे जडेजा शार्दुल यांच्यात दोन अर्धशतके येतील
भरत शमी बोनस पकडा

कोहली पुजारा शतक मारतील
राहणे जडेजा शार्दुल यांच्यात दोन अर्धशतके येतील
भरत शमी बोनस पकडा

प्लॅन वर्क होत नसला (स्पेसिफिकली बोलिंग करताना) की कॅप्टन रोहित भांजाळतो हे ही परत एकदा दिसलं... >> हो नखांचे दुर्दैव म्हणायचे Wink

फॉलो ऑन ची शक्यता काय वाटते ?

रच्याकाने, हि विकेट न्यूट्रल कशी काय म्हणता येईल ? स्पिनर्स हा बॉलिंग चा भाग नसला की पिच चांगला असे धरायचे का आता ? इंग्लंड सारख्या बेभरवशाच्या हवामान असणार्‍या ठिकाणी फायनल चा अट्टाहास का असतो ? फायनल्स साठी ऑस्ट्रेलिया कधीही जास्त योग्य आहे असे माझे मत आहे.

रच्याकाने, हि विकेट न्यूट्रल कशी काय म्हणता येईल ? >>
असामी मला एक सांगा आज आपल्या ज्या विकेट पडल्या त्या कशामुळे? तुम्हाला कसली पिचेस अपेक्षित आहेत? माझ्या सारख्या मुर्खाने चेंडू फेकला तरी हातभार फिरायला पाहिजे? का पाटा?

तुम्हाला कसली पिचेस अपेक्षित आहेत? >> माझे उत्तर मी वर लिहिलय कि, मला स्पिन नि पेसर्स ह्या दोन्ही घटकांना मदत होईल असे पिचेस हवेत. मी हेच मत आधीही - हि फायनल सुरू व्हायच्या आधी नि गेल्या फायनलच्या आधीही मांडले होते त्यामूळे ह्या मॅच मधल्या विकेट्सचा प्रश्न गैरलागू आहे.

मला वाटतय कि पहिले दोन दिवस पेसर्स आणि मग हळू हळू फिरकी ला अनुकूल असाच ना. आज तर फक्त दुसरा दिवस आहे. जरा थांबून बघुया काय होतंय ते.

स्मिथ आला आणि त्याने आत्ता फक्त सोळा धावा केल्या आहेत. तो कदाचित पुढच्याच चेंडूवर आउट होईल. पण त्याने भारताच्या आशांवर पाणी ओतलय. Guardian

मिसिंग बुमरा . हेड विरुद्ध शॉर्ट बॉल चा मारा फारसा इफेक्टिव्ह वाटत नाही. त्याला बरिच मार्जिन मिळते आहे सोडून द्यायला. सरप्राईज म्हणून येण्याऐवजी शॉर्ट येणार हे एव्हढे उघड होते आहे.

चार तर गेलेच नि हेड व स्मिथ पण गेले.

आता दोनशेच्या आत उद्या लंच पर्यंत त्यांना सर्वांना बाद केले तर ३७४ धावा नि दीड दिवस. करू शकतील. दिग्गज फलंदाज आहेत. पहिल्या डावात बहुधा आयपिएल सारखे खेळत होते. ते विसरून कसोटी सामना आहे हे लक्ष्क्षात घ्यावे. अजिंक्य रहाणे नि ठाकूर चांगले खेळले.
शर्मा, गिल, पुजारा नि कोहली यांच्याकडून जबरदस्त अपेक्षा आहेत. ते सगळे डोके ठिकाणावर ठेवून खेळले तर जिंकतीलहि.

अरे आवरा ना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव!
बुमराह नि आश्विनची उणीव जाणवते.
रहाणेहि जखमी आहे म्हणे. आता पुजारा, कोहली नि शर्मा खेळले नाहीत तर त्यांना संघातून हाकलून दिले पाहिजे.

इतनी जल्दी क्या है गोरी? उद्याचा आख्खा दिवस आहेकी.
आयला मी इकडे लिहिले आणी गीलाभौ साजणके घर...

लाटला गिल
बॉलच्या सपोर्ट वर पडला नालायक
त्या पोझिशन मधून बॉल उचलूच शकत नाही टच न करता

अंपायर नि फार झूम करून बघितले सुध्दा नाही..
ना आपल्याला फार दाखवले..
फालतुगिरी...

Pages