पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य धागा सापडला नाही म्हणून इकडेच विचारते

पुण्यात धानोरी एरिया रहायच्या दृष्टीने कसाआहे?
पाण्याचा प्रॉब्लेम आहे असे ऐकलंय त्याबद्दल पण माहिती मिळाली तर बरे होईल.

मी पुण्यातील डेक्कनजवळ फ्लॅट घेणार आहे, जंगली महाराज रोडला आणि रिटायरमेंट घेतल्यावर अधून मधून तिथे जाऊन राहणार आहे.

Biggrin बोकलत अधुन मधुन का बरे..? आं.....??? Wink

भारीच आहे डेक्कन.... फक्त मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे भयंकर ट्राफिक, गजबज आणि धूराचा त्रास जास्त आहे.

भारीच आहे डेक्कन.>> परवा यु ट्युब सर्फ करताना वनाज पासून सिविल कोर्ट परेन्त मेट्रो ची कायकशी प्रगती झाली आहे त्याचा विडीओ आलेला.
मी इतक्यांदा बघितला तो. मला अजून वनाज नक्की काय व कुठे आहे माहीत नाही. मी पुने सोडले तेव्हा ११ नंबरची बस जस्त कोथरूड ओएम जी
व पुढे वनाज परेन्त जात असे. काही मोजकेच लोक तिथे जात.

तर ही वनाज पासून सुरू होते मेट्रो. मग कोथरूड, पुढे एस एन डीटी कॉलेज( दत्तक बाबांची वर्क प्लेस) नळ स्टोप ( बायोलोजिकल पालक इथे आत एका खोलीत राहात असत व मला कधी मधी तिथे नेत.

पुढे येउन कॉलेज गरवारे!! मग
अलिकडे विमला बाई गरवारे शाळा
चौकात भागवत बिल्डिन्ग. !!!

वहींपे शुरू और वहींपे खतम एक छोटीसी जिंदगी अपनी. असे फीलिन्ग आले.

पुढे व्हिडीओ कोर्टा परेन्त जातो. उधर मेरा कोई कभी काम नही रहा. शिवाजी नगर बस स्टँड व स्टेशन जिथून हैद्राबाद एक्स्प्रेस पकडायचो!!! ते दिसते मात्र.

कुठे पण रहा सबकॉन्शस मध्ये पुणेच

बचक = BHK>> ते एक मा शे स्वं पाहिजे. माजघर शेज घर स्वयंपाक घर. ; )

जुनं धार्मिक नाशिक हे एका बाजूला ( मुंबई नाशिक रोडच्या डावीकडे.)आहे. त्यातच गजबजलेल्या वस्तीतून अशोक स्तंभाच्या पुढे गंगापूर रोडला एके काळी वस्ती वाढली. पण आता हाईवेच्या उजवीकडे रेल्वे सटेशन, एरपोर्ट,पुणे रस्ता परिसरात होत असलेली वस्ती नवी आहे. छान आहे, रेल्वेने सोयीची. गजबजाट नाही. कनेक्टिविटी इकडे बरी आहे.

नाशकातल्या कोथरूडात (गंगापूर रोड- पंपिंग स्टेशन ते आनंदवल्ली; तसेच महात्मानगर अ‍ॅनेक्स वगैरे) २बीएचके ५० ते ६० लाखात जाईल. १बीएचके ४० ते ५०. पण एकाच एरियात, १बीएचके आणि २बीएचके ची स्पेसिफिकेशन्स वेगळी असतात, असा अनुभव आहे. त्यामुळे किंमतीलाही प्रो-रॅटा बेसचा नियम लावता येत नाही. त्यातही ह्या किंमती अ‍ॅव्हरेजपेक्षा जरा जास्त लेवलच्या लक्झरी स्पेसिफिकेशन्स आणि अ‍ॅमेनिटीज वगैरेसाठी आहेत. सुपर लक्झरी आणि दुसरं टोक, म्हणजे इकॉनॉमी फ्लॅट्स- यांसाठी किंमती अर्थातच वेगळ्या असतील.

बाकी धागा विषयाबद्दल- व्यत्यय यांचा पहिल्याच पानावरचा प्रतिसाद (Don't fix it if it is not broken) अतिशय परफेक्ट आहे. पुण्याचा आजचा पसारा बघता याला डेव्हलपमेंट म्हणावं की सूज- असा प्रश्न पडतो. मात्र प्रॉपर्टी अ‍ॅप्रिशिएशन, नोकरी धंद्यातल्या संधी, छंद-पॅशन-अभ्यास-संशोधन संबंधातल्या सोयी-सुविधा इत्यादी हेतू असतील तर प्राधान्य कोणत्या शहराला- याचं उत्तर अर्थातच स्पष्ट आहे.

मुंबईत फ्लॅट घेणं आता फायद्याचं नाही. नासाच्या म्हणण्यानुसार २०५० पासून मुंबई पाण्याखाली जायला सुरवात होणार आहे. २०८० पर्यंत बहुतेक सगळी मुंबई पाण्याखाली असणार.

. नासाच्या म्हणण्यानुसार २०५० पासून मुंबई पाण्याखाली जायला>>>> जाऊ दे हो.तोपर्यंत आम्ही ढगात असू.आप मरे,दुनिया मरे! २०८० तर सोडूनच द्या.

आपण नसलो तरी आपले नातेवाईक तर असतीलच ना. त्यांचा लॉस व्हायचा बिचाऱ्यांचा. आणि काय माहीत हे पुनर्जन्म प्रकरण खरं असेल तर आपलाच लॉस व्हायचा. तसंही मी 100 वर्षे जगणार आहे. 2100-2105 या काळात मी कधीतरी देहत्याग करेन.

औध मध्ये बरे आहेत का रेट्स?

बाणेर? हे दोन एरिआ लेकीला माहीत आहेत

का कोरेगाव पार्कात रो हाउस असलेला जावाई शोधू?!!! कपाळा वरचा घाम पुसणारी भावली.

रेट बरे नाही 'चांगलेच उत्तम' आहेत Happy
एक जण अमेरिकेत गेले त्यांचा जुना 2बीएचके वेस्ट एन्ड मॉल च्या मागे 1 कोटीत जात होता,नंतर त्यांना वाटलं कधीकधी परत आल्यावर राहायला लागेल म्हणून ठेवला.

साजिरा चांगली माहीती दिलीत धन्यवाद. फार वर्षांपूर्वी आम्ही सिडीओ-मेरी काॅलनीत रहात असू. फार छान परिसर होता तो.

मागच्या वर्षी लॉकदाऊन आधी ५-६ महिने आधी कात्रजला राजीव गांधी झू च्या समोरील बाजुला रहाणार्‍या मित्राच्या सोसायटीत २ बिएच्के १ कोटीत गेला.. ऐसपैस फ्लॅट होता म्हणे. घेणारे पण बॅगा भर भरून पैसे देतात ते नक्की कशाकडे बघुन हे काही समजत नाही. Uhoh

मेरी कॉलनी वगैरे अजूनही छान शांत आहे. तसं सगळं नाशिकच ओव्हरऑल शांतछान आहे. आता लोकसंख्येच्या आणि 'प्रगती'च्या प्रमाणात बकाली वाढतेच. त्या दृष्टीने नाशिकचंही पुणं होऊ घातलंय, असं काही लोक म्हणतात. पण ते काही इतकं खरं नाही. पुण्याची मुंबई जशी कधीच होणार नाही, तसंच नाशिकचंही पुणं कधीच होणार नाही.

अमा, औंध बाणेर हे कोरेगाव पार्काच्या फार काही मागे नाहीत. विशेषतः औंधात फिरताना किंचित युरोपात असल्यागत, प्लस, कोथरुडाचे संस्कृती-अस्मिता-अभिरुचीचे गंध (जरा वेगळ्या फ्लेवरचे असतील इतकंच) येतात. हे निराळंच काँबिनेशन म्हणायचं..

डीजे, १ कोटी म्हणजे जरा जास्त झाले. पण मग एरिया मोठा असेल.. १२००-१४००-- स्क्वे.फु.

मात्र चांगल्या ठिकाणी ('उच्चभ्रू' वगैरे नव्हे) २बीएचके घ्यायचा तर ८० लाखाच्या आसपास लागतातच. (एरिया- ८००-९०० स्क्वे.फु.)

अमा, औंध बाणेर हे कोरेगाव पार्काच्या फार काही मागे नाहीत. विशेषतः औंधात फिरताना किंचित युरोपात असल्यागत, प्लस, कोथरुडाचे संस्कृती-अस्मिता-अभिरुचीचे गंध (जरा वेगळ्या फ्लेवरचे असतील इतकंच) येतात. हे निराळंच काँबिनेशन म्हणायचं..>> सर्च चालू आहे. पण एकदा इंट्रेस्ट दाखवला की बिल्डर चे सेल्स वाले पार हैराण करतात. साय्टी सारख्या मेल करत राहतात.

मला एक कळत नाही की ८० लाख ते १ कोटी किमतीत घर घेण्यापेक्षा डेक्कन जिमखाना परिसरात किंवा मॉडेल कॉलनी परिसरात महिना ३५,००० भाडे देऊन २ बीएचके फ्लॅट भाड्याने का घेत नाही? एक उदा. किंवा हे सहज सापडले, पण शोधले तर अश्या अजूनही जागा मिळतील.

सोसायटीज आणि रहिवासी कधीकधी भाडेकरूना उगीच शिष्ट वागणूक देतात(भाडेकरू तो, त्याला हळदीकुंकू किंवा इतर इन्व्हाईट करू नका, एक दिवस जाणार, आपली मानसिक गुंतवणूक वाया जाणार' असे.हे लिहिताना माझ्या डोक्यात परदेशीयो से ना अखिया मिलाना गाणे वाजते आहे. Happy ) हे वागणे अजिबात बरोबर नाही.पण असे होताना पाहिले आहे.
शिवाय घरात राहताना काही बदल करावेसे वाटतात ते करता येत नाहीत.
अर्थात जर शहरे, देश बदलत राहायची सवय असेल तर भाड्याने राहणे हा केव्हाही चांगला पर्याय.हिंजवडी जवळ घरे घेऊन फ्रेशर्स ना भाड्याने दिलेली आता रिकामी पडली आहेत.वर्क फ्रॉम होम मुळे भाडेकरू मिळणे कठीण झालेय.

Pages