जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या ‘कोव्हीड-19’ महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.
भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर ऑलिंपिकबाबत निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे.
आपल्या तयारीवर पूर्ण लक्ष्य केंद्रीत करत आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेऊन टोक्यो ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सगळ्या भारतीय खेळाडूंना मनापासून शुभेच्छा.
हा लेख सविस्तर खालील लिंकवर वाचता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_14.html