तुमच्या जाण्याने जग सुने झाले
सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||
किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||
रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||
कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान
दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून
रिक्त राहीले स्वतः केले दुसर्यांचे भले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३||
आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही
शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही
काळाने तुम्हाला असे अकाली का नेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४||
(माझे वडील जाण्याला आज सव्वा महिना झाला. वडीलांना हाक मारण्यास मी पोरका झालो. त्यांच्या आठवणी तर येतच राहतील.
आजच्या जागतिक फादर्स डे निमित्ताने ही काव्यसुमनांजली वडीलांना अर्पण.)
- पाषाणभेद
२०/०६/२०२१
श्रद्धांजली!!
श्रद्धांजली!! आपल्याला व आपल्या कुटुंबियांना, दु:ख पेलण्याचे बळ मिळो.
>>>>>>>> गाडी लागते, फलाटावरती लोक चढतात. आपल्या डब्यात काहीजण प्रवासी म्हणुन येतात. कोणी थेपल्यांचा डबा उघडतं, कोणी बाहेरुन केळी आणलेली असतात. सारेजण वाटुन घेतात, गप्पा मारत प्रवास सुरु होतो. तसेच जीवनाचे आहे. आई-वडील-भाऊ - बहीण हे जीवाला मिळत जातात. सारे २ घडीचे प्रवासी असतात. आपापले स्टेशन/ गंतव्य स्थान आले, की उतरुन जातात.
सं - https://www.maayboli.com/node/78809
आदरांजली . उचित कविता
आदरांजली .
उचित कविता
आदरपूर्ण भावांजलि
आदरपूर्ण भावांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली...
कवितेतले शब्द मनाला स्पर्शून गेले...