पर्यावरणाची अवांतरे

Submitted by जिज्ञासा on 8 June, 2021 - 22:40

जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अरे बापरे ९ AQI!
काळजी घ्या उदय. >>

------ धन्यवाद हर्पेन. दारे खिडक्या बंद ठेवायच्या, आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे. तिकडे हिमाचल प्रदेशांत भूस्खलना मुळे शेकडो लोक गेले आहेत.

भरपूर उन्हाळा ( त्यामुळे गवत कोरडे होते) त्यामुळे एखाद्या भागांत प्रमाणापेक्षा जास्त बाष्पीभवन, पाण्यामुळे निर्माण झालेले ढग कुठे तरी कोसळणार, मग ढग फुटी/ फ्लॅश फ्लडिंग जोडीला वीजांचा कडकडांट पुढे जास्त आग आणि वणवे
वाढलेले तापमान/आगी/ पाऊस यामुळे जमिन सैल होत आहे - भूस्खलनाचे प्रकार ( तापमान वाढीमुळे काही भागांत स्नो पडायचा तिथे आता पाऊस पडत आहे असे हिमाचलचे चित्र आहे :अरेरे:)
बदल डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहेत.

बर्‍याच जणांनी केतकी घाटे आणि मानसी करंदीकर यांच्या पर्यावरण विषयक कामांबद्दल इथे मायबोलीवरच वाचले असेल.
त्यांच्याच अधिवास फाऊंडेशन तर्फे पुराण वृक्ष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम भारतासाठी मर्यादित आहे.

त्यांचे निवेदन

'पुराण वृक्ष मोहीम'

पुराण वृक्ष आजी-आजोबांसारखे असतात. एका मोठ्या काळाची माहिती स्वतःच्या आत राखणारे पक्व वृक्ष. असे पुराण वृक्ष आता बहुत करून रस्त्याकडेलाच बघायला मिळतात. यात बाभूळ, काटे सावर, पिपर, आंबा, वावळ असे मूळनिवासी, तर वड, चिंच, नीम अशा लावलेल्या स्थानिक जाती दिसतात. काही ठिकाणी त्यांच्यामुळे झाडांचे बोगदे तयार झालेले दिसतात. बऱ्याच रस्त्यांवर सावलीसाठी अशी झाडं मुद्दाम लावली असल्याच्या जुन्या नोंदी आहेत. काही भागात तत्कालीन राजांनी खास वाटसरूसाठी, नागरिकांसाठी अशा लागवडी केल्या. म्हणजेच बऱ्याच वृक्षांचं वय किमान १५० ते २०० वर्ष आहे.

सावली बरोबरच कधी फळ, फुल, मकरंद ह्याची मेजवानी माणसा सकट इतर प्राण्यांना देखील मिळते. हरियल, गुलाबी मैना, धनेश ह्यासारखे पक्षी या झाडांवर खाण्यासाठी गर्दी करतात.

वडाच्या वृक्षांचा बोगद्याने झाकलेला सोलापूर रस्ता, वाईचा रस्ता, सातारा रस्त्यावर असलेले नांदृक, बाभूळ, दापोली रस्त्यावरचे मोठाले आंबे, कोयनानगर रस्ता फुलांचा सडा पाडून सुंदर करणारे काटे सावर, तोच रस्ता तांबूस पालवीने सजवणारे पिपर, आंबे, चंद्रपूरच्या वाटेवरचे धावडे, साग नि बोंडारे... कितीतरी आठवणी. किमान ५० वर्ष जुनी झाडं. काही तर सहज १५० च्या आसपास.

रस्त्याकडेच्या बरोबरीने इतर ठिकाणीही एखादाच भला थोरला वृक्ष आधार वडासारखा उभा असलेला आढळतो. शेताचे बांध, गावं - खेडी, शिवार, डोंगरउतार अशा ठिकाणची सलग असलेली झाडी या ना त्या कारणाने लोप पावली मात्र असे भव्य वृक्ष मात्र टिकून आहेत.

परंतु गेल्या काही वर्षात रस्ता रुंदीकरणात असे विशाल वृक्ष आणि त्यामुळे निर्माण झालेले अधिवास नष्ट होत आहेत. त्यांना लक्षात घेऊन प्लॅनिंग झालेलं कुठेही दिसत नाही. ह्या वृक्षांना सामावून घेऊन आराखडा करणं शक्य आहे परंतु ह्या कल्पनेचा समाजात मोठाच अभाव आहे. तो अभाव कमी करावा याचसाठी ही मोहीम !

आपल्या आसपास असे विशाल वृक्ष असल्यास त्याचे नाव, घेर, ठिकाण इत्यादी माहिती ह्या लिंकमधील फॉर्ममध्ये भरावी.. ही सर्व माहिती सर्वांना बघण्यासाठी खुली असेल. ह्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी जरूर संपर्क करा. या बरोबरीने आपापल्या भागात रस्ता रुंदीकरण झाल्यावर नवीन वृक्षारोपण करण्यासाठी स्थानिक झाडे सुचवूया.

या मोहिमेसाठी पुराणवृक्ष म्हणजे काय ?

वय ५० पेक्षा अधिक वर्षे
खोडाचा परीघ/घेर २ मी (२०० सेमी) व त्यापेक्षा अधिक
शक्यतो स्थानिक जाती

महत्त्वाच्या सूचना :
नोंद करायच्या आधी नकाशा बघून वृक्ष नोंद आधी झालेली नसल्याची खात्री करून घ्यावी.
https://www.adhiwas.org/old-trees-map

जिथे वृक्षांची वाढ हळू होते, उदा. राजस्थान, हिमालय, अशा ठिकाणी घेर १ मी पेक्षा अधिक असलेली झाडे नोंदयला हरकत नाही.
काही लावलेली अ-स्थानिक वृक्ष जसे रेनट्री. मोहोगनी, भरभर वाढून भव्य होतात. पण त्यांचे वय कमी असते, त्यामुळे अशा वृक्षांच्या नोंदी शक्यतो करू नयेत. परंतु त्यावर घरटी किंवा इतर जीव जाती किंवा त्याचे इतर काही महत्त्व आढळल्यास त्यांची नोंदवायला हरकत नाही.

एकाहून अधिक वृक्ष नोंदण्याकरता दर वेळी नवीन फॉर्म भरावा.
ही मोहीम एकट्या राहिलेल्या, धोकाग्रस्त किंवा एखाद्या ओळीत असणाऱ्या विशाल वृक्षांसाठी आहे. मोठ्या जंगलाचा भाग असलेल्या वृक्षांसाठी नाही.
https://www.adhiwas.org/old-trees-data

वेताळ टेकडी चे पुन्हा एकदा वाटोळे करायचा नवा डाव पुमनपा ने आखला आहे
लोक तळतळीने विरोध करतायत त्याची काही किंमतच ऊरलेली नाही. नदीची यथेच्छ वाट लाऊन झाली आहे आता टेकडी
दिवसेंदिवस पुणं बकाल करण्यात राजकारणी लोकांचा भला मोठा वाटा आहे

नागपूरांत पावसाच्या पाण्याने कहर केल्याच्या बातम्या आहेत.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/heavy-rain-floods-nagpur...

climate change कितीही नाकारले तरी रोज या नाही त्या प्रकारे आठवण करुन देते.
-------

smoke in Saskatoon (SK)- माझ्या गावातली धुराची परिस्थिती आता बरिच सुधरली आहे. जवळपांस ३.५ महिने खेळ सुरु होता. मागच्या लाँग विकेंडला सलग तिन दिवस घरांत कोंडावे लागले होते. आधीच सुटीचे दिवस कमी, आणि घरांत, दारे - खिडक्या बंद करुन बसणे म्हणजे शिक्षाच होती. Sad

सलग तिन दिवस स्मोक लेवल Air Quality Index AQI १०+ होती.

Screenshot 2023-09-18 at 5.14.20 PM.png

इतर वेळी पर्यावरणाबद्दल बोटतिडकीने लिहिणारे, गणपती उत्सवावेळी होणाऱ्या आवाज प्रदूषणाबद्दल मोदक गिळून गप्प असतात. ह्या वर्षी तर मुख्यमंत्र्यांच्या कृपेने DJचा अक्षरशः हैदोस चालला आहे. DJ ला रात्री १२ पर्यंत परवानगी तर दिली आहेच पण आवाजाच्या पातळीवरची मर्यादा पण काढून टाकली आहे की काय असे वाटते.
वृत्तपत्रांमध्ये मिरवणुकी दरम्यान होणाऱ्या आवाजामुळे मृत्यूंच्या बातम्या वाढल्या आहेत. देवाच्या नावाने चाललेला हा हैदोस पर्यावरणालाच नाही तर समाजाला पण घातक आहे.

https://india.postsen.com/trends/1119325.html

https://www.esakal.com/paschim-maharashtra/death-of-young-man-during-ganpati-visarjan-miravnuk-at-kavatheekand-sound-system-police-bam92

जवळपांस ३.५ महिने खेळ सुरु होता. मागच्या लाँग विकेंडला सलग तिन दिवस घरांत कोंडावे लागले होते. आधीच सुटीचे दिवस कमी, आणि घरांत, दारे - खिडक्या बंद करुन बसणे म्हणजे शिक्षाच होती.

बाप रे, काळजी घ्या उदय

अरे वा! झदा- स्वागत आहे ह्या धाग्यावर.

कोणत्याही कारणाने का होईना तुम्हाला पर्यावरणाची काळजी वाटू लागली आहे हे स्वागतार्हच आहे.
तुम्ही हे ध्वनी प्रदुषण कमी व्हावे म्हणून काय प्रयत्न केलेत / करू पाहता आहात ते जाणून घ्यायला आवडेल.

तुम्ही हे ध्वनी प्रदुषण कमी व्हावे म्हणून काय प्रयत्न केलेत / करू पाहता आहात ते जाणून घ्यायला आवडेल.>>
पेंडश्या नक्कीच गणपती मिरवणुकीत ढोल वाजवत असणार. कोणताही मुद्दा उपस्थित केला तर त्यामध्ये वैयक्तीक योगदान आधी सांगणे का लागावे? आहे माझे योगदान पण आज मला ह्या प्रश्नावर चर्चा करायची आहे.

प्रकर्षाने जाणवणारे आणि नोंद घ्यावी असे दोन मोठे बदल....

(अ) डिसेंबर चे तापमान सरासरी पेक्षा २० सें ने जास्त आहे. आतापर्यंत -२५ / -३० सें पर्यंत तापमान जायला हवे होते. एल निनो (El Nino) चा परिणाम आहे का ? हे माहित नाही.

(ब) अजून पर्यंत म्हणावा तसा स्नो पडलेला नाही. अनेक वर्षांनी brown (instead of white) Christmas साजरा करावा लागला. येथे साधारणत: सप्टेबर - ऑक्टोबर मधे स्नो पडायला सुरवात होते. जमिनीत आर्द्रता / ओलावा नसेल तर शेती व्यावसायाचे मोठे नुकसान आहे.

PM2.5 ची वार्षिक सरासरी हा निकष असेल तर प्रदूषणाच्या बाबतीत (अ) भारताचा जगात ३ रा क्रमांक, (ब) पहिल्या ५० सर्वाधिक प्रदूषित शहरांमधे ४२ शहरे भारतात आहेत. Sad
https://www.iqair.com/ca/world-most-polluted-cities

https://indianexpress.com/article/india/india-3rd-most-polluted-country-...

योग्य धागा न सापडल्याने जनहितार्थ.

पुणे महानगरपालिकेच्या उद्यान-वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने दिनांक 5 जून ते 14 ऑगस्ट 2024 अखेर वन महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने वृक्ष रोपांची अल्प दरात उपलब्धता करून देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे उद्यान, जंगली महाराज रोड या ठिकाणी रक्कम रुपये पाच या अल्प दरात वृक्ष लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तरी वृक्षप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे
महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी ३२ लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्या माणसाची स्वतःची २० फूट जागा आहे, त्याने आज फक्त एक झाड लावले तर २२ कोटी झाडे थेट वाढतील आणि पुढच्या उन्हाळ्यात तापमान ३० अंश असेल. अधिक पाऊस.

केक/कपडे/बाईकवर हजारो खर्च केले जातात. पण आज थोडा विचार करा आणि बाजारात जाऊन २० रुपये किमतीचे रोप विकत घ्या आणि ते लावा, पुढच्या पिढीचा विचार करा. *मिशन ग्रीन महाराष्ट्र*

तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने हुकूम दिल्यास, किमान १० लोकांना हा संदेश पाठवा आणि सहकार्य करा. पुढच्या पावसाळ्यापर्यंत हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात पसरवा.

सौजन्य : कायप्पा

युरोप मध्ये एनर्जीचे भाव निगेटिव झाले.

https://www.business-standard.com/industry/news/surge-of-free-power-rais...
पहा उघडतेय का लिंक.
मात्र एक लक्षात ठेवा कि युरोप मध्ये power exchange आहे. म्हणजे आपल्या इकडच्या शेअर मार्केट सारखे. पण this points to future.

स्पेनमधे काही भागांत आठ तासांत वर्षभरातला पाऊस झाला. पुरामुळे १५५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे Sad , अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत.
https://www.bbc.com/news/articles/czxrnlld95zo

अशा प्रकारच्या एका आपत्तीचा climate change शी संबंध लावता येत नाही. पण नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण, तीव्रता वाढत आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे, अनुभवत आहे. climate change च्या परिणामांपासून सुरक्षित असा कुठलाही भाग राहिलेला नाही. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष झळही सगळ्यांनाच पोहोचत आहे.

मी AQI किंवा प्रदूषण या विषयांमधला जाणकार नाही. Happy वाचलेली माहिती तपासून मत बनवित असतो.

भरत यांनी दिलेल्या लिंकवरच्या बातमीतला AQI ५०० - १५०० असा मजकूर असलेला मथळा सामान्यांचाच तसेच शिकलेल्या लोकांतही संभ्रम निर्माण करतो.

हवेतील प्रदूषणाचे प्रमाण दर्शविणारा AQI भारतामधे ० ते ५०० पर्यंत मोजला जातो. त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम सहा श्रेणीमधे (Good, Satisfactory, Moderately polluted, poor, very poor, severe) विभागले आहेत. ४०० ते ५०० ला गंभीर म्हटले आहे. तो शेवटचा टप्पा पण गाठला गेला आहे म्हणून severe, severe+ असे अजून विभाग पाडले. सरकारकडे जे काही करण्यासारखे उपाय उपलब्द आहेत, ते सर्व severe+ पर्यंत करुन झालेले आहेत ( असायला हवेत). आता पुढे काय ? Sad

AQI_Category_20Nov2024.001.jpeg

जगांत अनेक देश Air Quality Index AQI, मोजत आहेत, पण हा निर्देशांक मोजण्याची प्रमाणित पद्धत ( standard method) आजतरी अस्तित्वात नाही आहे. अमेरिका, भारत, चीन यांची स्वत: ची मोजण्याची पद्धत आहे. उदा- PM2.5 ( particular matter 2.5 micron size) हा एक महत्वाचा प्रदूषक घटक आहे हे सर्व देशांना मान्य आहे. हवेतील त्याचे प्रमाण १५ micro gram per meter cube असेल तर त्यापासून काढला जाणारा AQI चीन, अमेरिका, भारत या तीन देशांत वेगळा असेल. प्रदूषकाचे प्रमाण तेच त्यापासून काढला जाणारा AQI अमेरिकेत चीन पेक्षा जास्त आहे.

भारतात AQI कशा पद्धतीने काढला जातो या बद्दल सविस्तर माहिती cpcb च्या संकेत स्थळावर मिळते. AQI मोजण्यासाठी हवेतील आठ घटक प्रदूषकांचे ( PM10, PM2.5, NO2, SO2, CO, O3, NH3, Pb) प्रमाण बघितले जाते. प्रत्येक वेळी आठही प्रदूषक घटकांचे प्रमाण बघणे शक्य नसेल तर PM10 / PM2.5 यांच्या सोबत इतर दोन प्रदूषक घटक असले तरी चालतात.
https://cpcb.nic.in/displaypdf.php?id=bmF0aW9uYWwtYWlyLXF1YWxpdHktaW5kZX...

AQI ५०० पर्यंत पोहोचल्यावर ५१०, ६९०, ९५० ला काही अर्थ नाही. हे AQI चे आकडे कशासाठी आहेत हे जाणून घ्यायला हवे. तो जस जसा वाढत जाईल त्या प्रमाणांत उपाय योजना टप्प्याटप्प्याने कठोर बनत जायला हव्यात. AQI ४०० ला आजारी / कमजोर लोकांना शक्य असेल तर घरांत बसा सांगणार, वाहतुकीवर निर्बंध लादणार. AQI ४५० सर्वांना घरी बसायला सांगणार, वाहतूक /बांधकाम कामांवर निर्बंध कठोर करतील. AQI ५०० च्या पुढे गेला असेल तर परिणाम करु शकतील असे काही उपाय योजायचे शिल्लक राहिलेले नाही म्हणून ५०० च्या वर दाखवित असलेल्या AQI ला अर्थ नाही. over ५०० म्हणायचे ( ५०१ असेल किंवा ११००) आणि उपाय योजण्याचे काम सुरु ठेवायचे. अर्थात परिस्थिती गंभीर आहे.

analyzer, detector accuracy, measurement range, measurement errors, tolerance हे मुद्दे विचारांत घेतले नाहीत.

कॅनडामधे थोडा अजून वेगळा प्रकार आहे. AQI ३००, २२५ असे काही नाही. १ (चांगला) ते १० (वाईट) अशी स्केल वापरतात. शेवटी १०च्या पुढे १०+
AQHI_Canada_page1.001.jpeg

उदय, माहितीबद्दल धन्यवाद.
दिल्लीत AQI ५०० च्या जवळ गेला. म्हटल्यावर काहींनी लाहोर मध्ये २००० आहे, असं सांगितलं.
मग ही कॅप्डची बातमी दिसली. दिल्लीतल्या मापकाची उच्चतम मर्यादा ५०० ठेवली आहे, याचा अर्थ हवेची गुणवत्ता त्याहीप्व्क्षा कितीतरी अधिक खालावलेली असू शकते. खाजगी प्रदूषणमापके ते दाखवतात.

<सरकारकडे जे काही करण्यासारखे उपाय उपलब्द आहेत, ते सर्व severe+ पर्यंत करुन झालेले आहेत ( असायला हवेत). आता पुढे काय ? > याबद्दल दिल्लीत राहणारे लोक सांगू शकतील. लाहोरमध्ये लॉकडाउन लावला आहे.

दिल्ली प्रदूषणाबाबत शेतकर्‍यांच्या काडी-कचरा जाळण्याला मोठा दोष दिला जातो. पण वीज निर्मीती ( औष्णिक विद्दुत Thermal power) मधे जाळला जाणारा कोळसा आणि त्यामुळे होणार्‍या प्रदूषणाचा ( SO2 ) भागही मोठा आहे. शाळा, कॉलेज, बांधकाम काही काळ बंद ठेवता येतात पण वीज निर्मीती अत्यावश्यक सेवा मधे मोडते - बंद करता येत नाही.

शेतकर्‍यांच्या कचरा जाळण्यामुळे जेव्हढे SO2 प्रदूषण निर्माण होते त्याच्या १६ पट जास्त SO2 प्रदूषण थर्मल पावर निर्मीती मुळे होत आहे.
https://www.business-standard.com/india-news/delhi-pollution-blame-therm...

दिल्ली NCR (National Capital Region ) मधे १२ औष्णिक विद्दुत प्रकल्प कार्यरत आहेत. SO2 चे प्रमाण कमी करण्यासाठी स्क्रबर ( FDG Flue Gas Desulfurization ) वापरणे अत्यावश्यक आहे. स्क्रबर वापरल्याने ६५ % SO2 प्रदूषण कमी होते.

FDG तंत्रज्ञान हवे आहे हे कधी सुचविण्यात आले होते ? आतापर्यंत बारापैकी केवळ दोनच प्रकल्पांमधे बसविण्यात आले आहे? काय कालमर्यादा दिली होती, नंतर वाढविली का ? चार कोटी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यावर या प्रकल्पाला प्राधान्य का दिले जात नाही, अडचण कुठे आहे? Sad
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/ncr-can-slash-so2-emissio...

New Delhi Air Quality Index (AQI) : Real-Time Air Pollution
New Delhi Air Quality Index (AQI) | Air Pollution. Real-time PM2.5, PM10 air pollution level in India. ... Particulate Matter (PM10) 244 µg/m³. Carbon Monoxide (CO) 652 ppb. Sulfur Dioxide (SO2) 5 ppb. Nitrogen Dioxide (NO2) 20 ppb. Ozone (O3) 38 ppb. AQI Graph. Historical Air Quality Data.
उदय, माझ्या मते वरील बातमी कुणा FGD व्हेंडरने स्पॉन्सर केलेली दिसते आहे. खरा प्रॉब्लेम SO2 नसून Particulate Matter आहे.

https://www.financialexpress.com/india-news/explained-why-delhi-faces-on...

केशवकूल - धन्यवाद. तुम्ही म्हणत आहात तशी शक्यता आहे.

SO(x) किती वेळ हवेत रहातो हे हवेतील इतर घटकांवर अवलंबून आहे पण PM2.5 तयार करण्यात त्या किती हातभार लागत आहे ?
SO(x)-->> पासून सल्फेट -->> contributor to the secondary formation of respirable particulate matter (PM2.5)

https://www.canada.ca/en/environment-climate-change/services/air-polluti...

जनतेच्या आरोग्यासाठी काय चांगले आहे यापेक्षा कोट्यावधी रुपयांची बचत याला प्राधान्य दिले जात आहे का?

प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पदरी उपाय योजणे आवश्यक आहे आणि पैकी FGD बसविणे हा एक होता. अगदी १ ऑगस्ट २०२४ पर्यंत तरी असेच धोरण होते.

नवी माहिती समोर आल्यावर आधीच्या धोरणांत बदल , सुधारणा होणे योग्य वाटते. पण आर्थिक बोजा कमी ( cost cutting) करण्यासाठी धोरणच बदलणे हे प्रश्नाचे गांभिर्य नसल्याचे दर्शविते.

१ ऑगस्ट, २०२४ - ऊर्जा मंत्रालयाचे पत्रक. ज्यामधे FGD चा उल्लेख केला आहे, ५३७ युनिटमधे बसविणार होते , अगदी वेळापत्रकही दिले आहे. अडचणी (खर्चिक आहे, आपल्याला एकाच वेळी एव्हढी मोठी मागणी पुरवता येणार नाही, स्पेअर्सचा तुटवडा, परकीय चलन... ) मांडलेल्या आहेत. या अडचणी दूर करणे यासाठीच तर कणखर नेतृत्वाची जबाबदारी आहे.

आता धोरणच बदलायचे असेल तर काही ठोस कारणे हवीत. नागपूरच्या CSIR-NEERI ला (FGD आणि SO(x) चा ) अभ्यास करण्यासाठी प्रोजेक्ट दिला जातो. त्यांचा संशोधन / अभ्यास अहवाल येतो. या अहवालाच्या आधारावर निती आयोग, ' अगोदर बसविलेल्या प्रकल्पांपर्यंत आहे, पण या पुढे आपल्याला FGD ची अवशक्ता नाही , त्यापेक्षा इतर महत्वाच्या प्रदूषकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे' अशा निष्कर्षाला येते.

भारतात वापरला जाणारा कोळशांत सल्फरचे प्रमाण कमी आहे हे एक कारण देणार ( पण त्याच वेळी अशा कोळशांतून मिळणारी ऊर्जा पण कमीच आहे. त्यामुळे जास्त कोळसा वापरावा लागतो - हे कुठेही सांगितलेले नाही Happy ). दोन्ही आकडेवारी उपलब्द नसेल तर सल्फरचे कमी/ जास्त झालेले प्रमाण कळणार नाही.

एक अभ्यास/ रिपोर्ट आणि एव्हढा मोठा निर्णय? मग आधी घेतलेला निर्णय कशाच्या आधारावर घेतला होता? अगदी अलिकडच्याच काळांत, २ मार्च २०२४ रोजी, पंतप्रधानांनी ६५० कोटी रु खर्च करुन एका FGD प्रकल्पाचे ( मेजिया थर्मल पावर प्लांट) उद्घाटन झाले आहे.

CSIR -NEERI चा अहवाल, ज्या आधारावर एव्हढा मोठा निर्णय घेतला गेला तो कुठे बघायला मिळेल ? कुणी पाहिला आहे ? कुठे प्रसिद्ध झाला आहे?

Pages