माझा उद्योग...
नमस्कार मायबोलीकर,
माझा मागील धागा आमच्या स्पोर्टस ट्रेनिंग सेंटरचा होता, खूप उत्साहाने हे प्रोजेक्ट बनवलेले आहे, पण कोरोनाने मुले घरात, शाळा, ट्रेनिंग सेंटर बंद!
त्यामुळे आम्ही पण गप्प बसलो. पण हे गप्प बसणे पण झेपेना! काहीतरी करायला हवेच ना! काय करावे बरे?
मी विचारात होतेच....
आणि अचानक....
झाले असे, मला चिंच फार प्रिय...चिंच नाही मिळाली तर चिंचेचा पाला खाणारी मी! मधे सार बनवायला चिंच आणली. बघते तर चिंचेची सालं, रेशा, पाने सगळे त्याला चिकटलेले, तशीच ती दाबून पॅक केलेली.
मला अशी चिंच बघायची सवय नव्हती, मी तयार पिकलेली चिंच आणून, ती घरातच साफ करुन, फोडून चिंचोके वेगळे करायचे. मग मीठ लाऊन गोळे करुन ठेवायचे. पण लॉकडाऊनमधे ती चिंच मिळेना.
मनाला पटले नाही तरी ती आणलेली चिंच भिजवली, नंतर चाळणीने गाळली. गाळतांना लक्षात आले, त्यात सालांचे कण पण गाळले जातायेत. सारात कचकच येणारच!
झालं...डोकंच फिरलं. दुकानदाराला शिव्या घालत सगळा गर फेकून दिला. ही गोष्ट मनांत घर करुन राहीली. असे वाटले, अशी चिंच महीला कशा वापरत असतील? की वापरतच नाहीत आताशा?
मनात आलं, नाशिकला रहातोय, इथे चिंचेची किती झाडं आहेत, आपणच चिंच साफ करुन विकावी. फायद्याचा विचार मनात यायच्या आधी, विचार आला की वापरणार्याला साफ, स्वच्छ चिंच तरी मिळेल. मला झाला तसा त्रास तरी नाही होणार.
बस, ठरलं, चौकशी पण सुरु केली.
त्याचवेळी मुलाने शासनाचा एक ऑनलाईन कोर्स दाखवला. 'वुमन एम्पावरमेंट' 'नॅशनल कमिशन फॉर वुमन' यांचे 'एन्टरप्रिनॉरशीपचे ट्रेनिंग' ६ आठवड्याचा हा कोर्स होता. मी जॉईन केला. तिथे छान ट्रेनिंग मिळाले. बिझनेस सुरु करण्यापासून ते आपल्या आयडीयांवर विचार कसा करावा? आयडीयांची व्हॅलिडीटी कशी चेक करावी? लीन कॅनव्हास ह्या सगळ्या गोष्टी शिकतांना माझ्या कल्पनेचा विस्तार होत गेला.
नुसती चिंचच का विकावी? नाशिकमधे अॅग्रो प्रोडक्ट भरपूर आहेत. मग कांदा, ब्रेकफास्ट सिरीयल्स अशा काही पदार्थांची यादी झाली. मला शक्यतो विनाप्रोसेस पदार्थच विकण्यात रस आहे. तसेच ते सेद्रींय असावेत अशी पण इच्छा आहेच. त्यादृष्टीने प्रयत्न करतेय. सांगली आजोळ असल्याने कोल्हापूरी गूळ, सांगलीची प्रसिध्द हळद पण यादीत आहे.
खरे तर मला यातली काहीच माहीती नाही, पण काही हेल्पींग हॅन्ड मदतीला आहेत. माझे मावसभाऊच काही पदार्थांचे उत्पादन घेतात, त्यांच्या मदतीने पुढे सरकतेय. काही सेलींग साईट्स वर रजिस्ट्रेशन केले आहे. ह्या पदार्थांना मागणी आहेच.
पुढे जाऊन ग्रीन हाऊस प्रोजेक्ट करायचा मानस आहे. आणि हे सर्व काम आम्ही 'सुचेतस ऑरगॅनिक फुड्स' ह्या नावानेच करतोय.
तर अशी माझी कथा चिंचेपासुन सुरु होवून ग्रीनहाऊसपर्यंत गेली आहे!
इथे कोणी माहीतगार असतील, किंवा कोणाला अशा कामात रस असेल तर सांगा. बरोबर काम करायला मला आवडेल. 'एक से भले दो!"
धन्यवाद __/\__
- विनिता
झक्कास आहे नवीन उद्योग. आणि
झक्कास आहे नवीन उद्योग. आणि एक वाट आपत्तीमुळे अडली असता मुंगीसारखं (दुसरी उपमा पटकन नाही सुचत) वेगळी वाट शोधत चालत राहणं आवडलंय.
तुम्हाला यात मनासारखे यश मिळो. शुभेच्छा. ऑनलाईन उपलब्ध आहे का सुचेतस?
पुढील वाटचालीस शुभेच्छा
पुढील वाटचालीस शुभेच्छा
अभिनंदन आणि पुढिल दमदार
अभिनंदन आणि पुढिल दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी खूप शुभेच्छा..
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी खूप शुभेच्छा>>>+123
खूप शुभेच्छा विनिता !
खूप शुभेच्छा विनिता !
नवीन उद्योग आणि तो कसा
नवीन उद्योग आणि तो कसा स्फुरला झक्कास. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
काही सेलींग साईट्स वर रजिस्ट्रेशन केले आहे.>>> कोणकोणते प्रोडक्ट आहेत. लिंक असेल तर द्या. मलापण चिंचेचे पदार्थ आवडतात.
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!!
मनःपूर्वक धन्यवाद __/\__
मनःपूर्वक धन्यवाद __/\__
प्राचीन, ऑनलाईन आहे ना! इंडियामार्टवर आहे. अजून पूर्ण कॅटलॉग बनवलेला नाहीये, काम सुरु आहे. पण काही हवे असेल तर सांगा. मी नक्की पाठवेन.
बोकलत, चिंच आत्ता उपलब्ध नाहीये. जानेवारीत मिळेल. कारण मी बाहेरची घेवून विकणार नाहीये, तर झाडांची पाडून घेवून साफ करुन विकणार आहे. थोडा वेळ प्लीज मला द्या __/\__ पण सुरु केले की तुम्हांला नक्की पिंग करेन.
खूप छान उद्योग आणि सुरुवात.
खूप छान उद्योग आणि सुरुवात.
अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला.
अभिनंदन आणि पुढिल दमदार
अभिनंदन आणि पुढिल दमदार वाटचालीसाठी शुभेच्छा!
धन्यवाद मृणाली, हर्पेन
धन्यवाद मृणाली, हर्पेन
नमस्कार माबोकर __/\__
नमस्कार माबोकर __/\__
तुमचे प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतात.
आमची वेब्साईट सुरु झाली आहे...
https://suchetas.org.in/
नक्की चेक करा.
मी अनेक कार्यशाळा पण घेत आहे. उत्तम, अनुभवी मार्गदर्शक आहेत सोबत...
तसेच ऑडिओबुक बनवून देणे, ट्रान्सलेशन करुन देणे, युनिकोड मधे सॉफ्ट कॉपी बनवणे पण सुरु केले आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच सोबत...काम सुरु झाले आहे
कुणाला अभिवाचनात इंटरेस्ट असेल तर मला संपर्क करावा. (नियम व अटी लागू)
फारच सुंदर. सतत उद्योगी राहात
फारच सुंदर. सतत उद्योगी राहात आला आहात.
चराति चरतो भग: । ( जो चालत राहातो तो त्याच्या भाग्यालाही चालवितो)
शुभेच्छा.
धन्यवाद हीरा __/\__
धन्यवाद हीरा __/\__
फार छान वचन सांगितलेत, जमेल तितके करत रहायचे एवढेच माहीत
विनिता अभिनंदन आणि शुभेच्छा.
विनिता अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी
अभिनंदन आणि नवीन उद्योगासाठी खूप शुभेच्छा..... +१.
धन्यवाद अन्जू, देवकी
धन्यवाद अन्जू, देवकी
>>>>चराति चरतो भग: । ( जो
>>>>चराति चरतो भग: । ( जो चालत राहातो तो त्याच्या भाग्यालाही चालवितो)
वाह!!! हे ऐकले नव्हते.
आपल्याला शुभेच्छा विनिता
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
विनीता, अभिनंदन व खूप
विनीता, अभिनंदन व खूप शुभेच्छा !
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
विनिताजी खूप शुभेच्छा!!
विनिताजी खूप शुभेच्छा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
मनःपूर्वक धन्यवाद मंजूताई ,
मनःपूर्वक धन्यवाद मंजूताई , बोकलत, क्यूटी, संजीवजी , सामी
तुम्ही भाषांतर कोणत्या
तुम्ही भाषांतर कोणत्या भाषांतून करता ?
तुम्ही भाषांतर कोणत्या
तुम्ही भाषांतर कोणत्या भाषांतून करता ? >> सध्या तरी मराठीतून हिंदी, इंग्रजी सुरु आहे.
इंग्रजीतून मराठी पण करतो.
तुम्हांला कुठले हवे आहे? फोन कराल का? सविस्तर बोलता येईल. __/\__ विपू करते.