Submitted by @गौरी on 8 June, 2021 - 06:40
गुंता हा भावनांचा, गुंता हा शब्दांचा,
न मिटलेल्या वादांचा, न सांधलेल्या भेगांचा,
चिमूटभर प्रेमाने, मणभर राग जिंकल्याचा,
पसाभर माया, कणभर अहंकारात विरल्याचा,
कुणामधे हरवण्याचा, कुणाला जोखण्याचा,
गुंता साऱ्या आयुष्याचा, सतत शोध घेण्याचा,
इवल्या थेंबात आकाश कवेत घेण्याचा,
आकाशी पसरून थेंबाला जपण्याचा॥
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Mastch...
Mastch...
सुंदर रचना..!!
सुंदर रचना..!!
खूप धन्यवाद ऊर्मी, रूपाली!!
खूप धन्यवाद ऊर्मी, रूपाली!!
वाह.. खूप मस्त!
वाह.. खूप मस्त!
मस्तच लिहिली आहे
मस्तच लिहिली आहे
थोडक्या शब्दात खूप काही सांगून जाणारे
खूप धन्यवाद सांज आणि आशुचँप!
खूप धन्यवाद सांज आणि आशुचँप!
खुप छान..
खुप छान..
खूप मस्त!
खूप मस्त!
खूप आभार वीरू, वर्षा!!
खूप आभार वीरू, वर्षा!!
किती तरल भावना नेमक्या शब्दात
किती तरल भावना नेमक्या शब्दात मांडल्या आहेत.. खूप आवडली!
सुंदर
सुंदर
वाह!! काय सुंदर आहे.
वाह!! काय सुंदर आहे.