फ्रेंच ओपन टेनिस २०२१.

Submitted by मुकुंद on 19 May, 2021 - 17:32

चला मंडळी! आहात का तयार यंदाच्या फ्रेंच ओपन आवृत्तीसाठी?

सालाबादप्रमाणे याही वर्षी नदालच विजेतेपदाचा चषक उचलताना दिसणार की जोकोव्हिक/ झव्हेरोव्ह/ थिम/ सिट्सिपास पैकी एक नदालचा इथला जिंकण्याचा मक्ता संपवणार?

२ आठवड्यापुर्वी माद्रिद ओपनमधे झेव्हेरोव्हने नदालला उपांत्यपुर्व फेरीतच गारद करुन थोडी खळबळ माजवली पण गेल्या आठ्वड्यात नदालने इटालियन ओपनमधे झव्हेरोव्हला उपांत्यपुर्व फेरीत हरवुन त्या पराभवाचे उट्टे काढले. तेवढेच नाही तर इटालियन ओपनच्या फायनलमधे नदालने जोकोव्हिकला हरवले व त्याचे तिथले १० वे इटालियन ओपन विजेतेपद जिंकुन त्याच्या गोटात सगळे आलबेल आहे हे दाखवुन दिले.

मी इटालियन ओपन फायनल बघीतली. ती बघताना नदाल व जोकिव्हिक ज्या पद्धतीने खेळत होते ते बघताना त्यांच्यातली ही मॅच २०२१ मधली नसुन २०११ मधली आहे असे जरी मला कोणी सांगीतले असते तर ते मला खरेच वाटले असते! त्या दोघांचा फिटनेस व खेळ अगदी ते १० वर्षापुर्वी जसे खेळत होते तसाच्या तसाच अजुन आहे! केवळ अविश्वसनिय!

ती फायनल बघुन यंदाच्या फ्रेंच ओपनच्या मेजवानीमधे आपल्यापुढे काय वाढले असेल या विचाराने माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना धन्यवाद!

माझे तसे सगळ्या सगळ्या खेळांवर खुप प्रेम आहे. पण त्यातही टेनिस, स्विमींग, गॉल्फ, अमेरिकन फुटबॉल, बेसबॉल, एन सी ए ए कॉलेज बास्केटबॉल व क्रिकेट कडे मात्र सगळ्यात जास्त ओढ आहे. हे खेळ बघुन व त्या खेळातल्या ज्या खेळाडुंनी त्यांच्या खेळाने माझे आयुष्य सम्रुद्ध केले आहे त्या सगळ्यांची यादी इथे देत बसलो तर खुप मोट्ठी यादी होइल.

पण जर फक्त टेनिसबद्दलच बोलायचे झाले तर ख्रिस एव्हर्ट- मार्टिना नवरातिलोव्हा , बोर्ग- मॅकेन्रो, बोर्ग- कॉनर्स, कॉनर्स- मॅकेन्रो, बेकर-एडबर्ग, बेकर- सँप्रास ,लेंडल-मॅकेन्रो, लेंडल- बेकर, लेंडल-विलँडर, अ‍ॅगॅसी- सँप्रास, अ‍ॅगॅसी -बेकर, स्टेफी ग्राफ- मार्टिना नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ- अरांचा सँकेझ व्हिकारिओ, स्टेफी ग्राफ- मॉनिक सेलेस, स्टेफी ग्राफ- हाना नव्हाटना या सगळ्यांच्या रायव्हलरिज मी बघीतल्या आहेत. त्या सगळ्या मस्तच होत्या पण गेल्या १७-१८ वर्षात फेडरर- नदाल, फेडरर- जोकोव्हिच व जोकोव्हिच- नदाल यांच्यातल्या रायव्हलरीजना मात्र खरच तोड नाही!

हे माझे प्रामाणिक मत!( मार्टिना नवरातिलोव्हा- ख्रिस एव्हर्ट ही एकच रायव्हलरी मात्र या रायव्हलरीजना तगडी टक्कर देउ शकते!)

पण या सगळ्या रायव्हलरीज बघण्याचे भाग्य मात्र मला लाभले व त्या सगळ्या टेनिसपटुंचा खेळ बघुन माझे आयुष्य अजुन समृद्ध झाले आहे असेच मी समजतो. मीच नव्हे तर जगातल्या तमाम टेनिसप्रेमींना या खेळाडुंनी खुप आनंद दिला आहे यात दुमत नसावे!

या सगळ्यांचा खेळ बघुन बघुन मला खुप श्रिमंत झाल्यासारखे वाटते. यांच्या खेळांच्या आठ्वणी मला खुप खुप सुख देउन जातात व त्या आठवणी माझ्यासाठी एक अमुल्य ठेवा आहे. त्यांनी मला माझ्या आयुष्यात आतापर्यंत दिलेल्या आनंदासाठी या सगळ्या टेनिसपटुंना माझे शतशः प्रणाम!

आता वेध विंबल्डन २०२१ चे व मग टोकियो ऑलिंपिक्स!

राज..त्याधी या आठ्वड्यात टोरी पाइन्सला परवापासुन सुरु होणारी यु एस ओपन गॉल्फ बघणार! Happy टायगर वुड्स विल बी सोअरली मिस्ड हिअर! तब्बल ८ वेळा तो इथे जिंकला आहे , २००८ यु एस ओपन सकट!

आणी हो, तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची म्हणजे या आठ्वड्यात आमच्यापासुन ३ तासाच्या ड्राइव्हिंग अंतरावर ओमाहा, नेब्रास्का इथे यु एस ऑलिंपिक्स स्विम टिमची निवड चालु आहे ऑलिंपिक्स ट्रायल्स मधे. तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की या शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकीटे मिळवण्यात मी यशस्वी झालो आहे. त्या दिवशी संध्याकाळच्या सेशनमधे केलब ड्रेसल( ज्याच्याकडुन अमेरिका टोकियो ऑलिंपिक्स मधे ७ सुवर्णपदके मिळवायची आशा ठेवुन आहे!) ५० मिटर्स सेमि फायनल व १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल पोहणार आहे! माझा मुलगा आदित्य जो गेली ७ वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करतो त्याचा केलब ड्रेसल हा आयडल आहे. त्याला माहीत नाही की मी त्याला ओमाहाला केलब ड्रेसलची रेस बघायला नेणार आहे! इट्स अ बिग सरप्राइज फॉर हिम! Happy

तुमच्या लिखाणातून तुमची पॅशन जाणवते! तुमच्याइतकं टेनिस किंवा खरं म्हणजे कुठलाच खेळ तेवढ्या प्रमाणात मी पाहिलेला नाही. टेनिस बघायला आवडतं मात्र खूप. फेडरर-नडाल-जोकोविचने गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांना जो आनंद दिला आहे त्याला खरंच तोड नाही!

तुम्हाला आणि तुमच्या मुलाला तुमच्या आवडत्या स्विमरला पोहताना बघण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल अभिनंदन! एन्जॉय!

त्याला माहीत नाही की मी त्याला ओमाहाला केलब ड्रेसलची रेस बघायला नेणार आहे! इट्स अ बिग सरप्राइज फॉर हिम! >>> वॉव. किती मज्जा येईल. आदित्यची रिएक्शन इथे जरूर कळवा.

हर्पेन, जरुर! Happy

मला शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकिटे जरी मिळाली असली तरी सगळी होटेल्स आधीपासुनच बुक झाली असल्यामुळे होटेल मात्र मिळाले नाही राहायला. म्हणुन मग सकाळच्या १० च्या सेशनला, ३ तासाचा ड्राइव्ह करुन जायला, सकाळी ६ लाच घरुन निघावे लागणार आहे. त्यामुळे त्याला आधीच सांगुन ठेवायला लागले आहे की तुला शनिवारी एक मोट्ठे सरप्राइझ आहे पण त्यासाठी तुला पहाटे ५ वाजताच उठुन तयार व्हायचे आहे व आपल्याला लवकर कुठेतरी जायचे आहे.

पण मग तेव्हापासुनच क्ल्यु साठी त्याचे १००० प्रश्न विचारुन झाले आहेत पण मीही ताकाला सुर लावुन दिला नाही आहे, सो ही इज स्टिल कंप्लिटली क्ल्युलेस! Happy

आणी एक, मीही त्या दिवशी ओमाहाच्या सी. एच. आय. सेंटरच्या स्विमिंग पुलवर कुठे मायकेल फेल्प्स दिसतो का ( प्रेक्षक म्हणुन!) याच्यावर एक डोळा ठेवणार आहे आणी असला तर त्याची स्वाक्षरी मिळवायचा प्रयत्न करणार आहे. झालच तर एन. बी. सी चा एक्स्पर्ट कलर समालोचक , १९८४ ऑलिंपिक्स मधला १०० मिटर्स फ्रिस्टाइल गोल्ड मेडल विनर व तेव्हाचा फास्टेस्ट स्विमर राउडी गेन्स याचीही स्वाक्षरी मिळवता येते का हेही बघणार आहे असल्या बाबतीत मग मी लहानाहुनही लहान होतो Happy

>> इट्स अ बिग सरप्राइज फॉर हिम! <<
व्वा मस्त. आदित्यची रिअ‍ॅक्शन विज्युअलाय्ज केली. इच्छा करतो कि पुढल्या ऑलिंपिक्स क्वालिफाइंग राउंडला तु एका स्पर्धकाचा बाप म्हणुन जाशील...

तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की या शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकीटे मिळवण्यात मी यशस्वी झालो आहे. त्या दि >> अरे वा मुकुंद ! एंजॉय कर नि मग इथे लिहीच.

इच्छा करतो कि पुढल्या ऑलिंपिक्स क्वालिफाइंग राउंडला तु एका स्पर्धकाचा बाप म्हणुन जाशील... >> +११११

जबरीच मुकुंद. मी आजच ऑलिंपिक्सचा धागा काढला. तुझे अनुभव तिथे लिही नक्की.

तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

पण ते इतके सोपे नाही. मागे मी माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्स आठ्वणींच्या पोस्टमधे पण सांगीतले होते. स्विमींगमधे C, B, BB, A, AA, AAA and AAAA अश्या चढत्या मापाच्या टायमिंगच्या श्रेणी असतात. आदित्यचे 50 meters freestyle, 100 meters freestyle , 100 meters butterfly and 200 meters individual medley चे टायमिंग त्याच्या एज ग्रुप मधे या वर्षी AA श्रेणीचे आहे. ऑलिंपिक्स ट्रायल्स साठी तुमचे टायमिंग AAAA श्रेणीमधे असावे लागते. मायकेल फेल्प्सचे टायमिंग १६ व्या वर्षी AAAA लेव्हलचे होते. आदित्य सप्टेंबरमधे १५चा होइल. आम्ही पालक म्हणुन स्टिल प्राउड ऑफ हिम Happy

पराग.. तु नुसता बीबी उघडतोस व नंतर गायब होतोस! ऑलिंपिक्स बीबी वर केलब ड्रेसल वरच एक लेख लिहुन सुरुवात करावी म्हणतो! नाहीतर स्विमिंगला रिलेटेड अश्या १९७६ ऑलिंपिक्स मधल्या शर्ली बाबाशॉफच्या
माझ्या जुन्या गोष्टीला तुझ्या बीबीवर परत टाकुन सुरुवात केली तर चालेल का?

आदित्यचे 50 meters freestyle, 100 meters freestyle , 100 meters butterfly and 200 meters individual medley चे टायमिंग त्याच्या एज ग्रुप मधे या वर्षी AA श्रेणीचे आहे. >>> जबरदस्त....
खूप खूप बेस्ट विशेस तुमच्या सुपुत्रास.... .../\...

तु नुसता बीबी उघडतोस व नंतर गायब होतोस! >>>> नाही हा! धागा काढला तर मी येतो तिथे. हल्ली धागे जागते ठेवायला वेळ मिळत नाही म्हणूनच टेनीसचे काढत नाही.
तू नवीन गोष्टी पण लिही तिकडे. फक्त आधीच्या रिपोस्ट नको.

अहो काय सांगु तुम्हाला?

आदित्यला कालचे सरप्राइज तर मस्तच होते, त्यात वादच नाही पण त्यावरही मात करणारी पुढची गोष्ट ओमाहाच्या सी एच आय सेंटरमधे काल घडली!

आम्ही घरी येइसपर्यंत काल रात्री एक वाजुन गेला होता म्हणुन इथे लिहीता आले नाही.

आठवत तुम्हाला मी आधीच सांगीतले होते की माझा एक डोळा मायकेल फेल्प्स कुठे दिसतो का यावर असणार होता व त्याची व राउडी गेन्सची स्वाक्षरी मिळवायचा मी प्रयत्न करणार आहे?

वेल, मिडिया कक्षात सुरक्षा अती कडक असल्यामुळे माझ्या त्या मनसुब्यावर पाणी फिरले.

पण तरीही सी एच आय सेंटरम्धे आम्ही सकाळच्या १० च्या सेशनला ९ वाजताच पोहोचलो होतो. मला त्या सी एच आय सेंटरवरच्या फेस्टिव्ह वातावरणात पूर्ण भिजवुन घ्यायचे होते, फोटो काढायचे होते.

तसच संध्याकाळच्या सेशनलाही आम्ही ८ ऐवजी ७ लाच आत गेलो होतो.

त्या १ तासात संध्याकाळी सी एच आय सेंटरच्या एका भिंतिवर गेल्या इथल्या अनेक ऑलिंपिक्स ट्रायल्समधे विक्रम केलेल्या व विजेत्या खेळाडुंच्या नावाची यादी असलेल्या प्लॅकचा आम्ही फोटो काढत होतो. तिथे आम्हाला “टिम केलब ड्रेसल“ असे टी शर्ट घातलेले एक जोडपे त्या प्लॅकवर असलेल्या केलब ड्रेसलच्या नावाकडे पॉइंट करत फोटो काढत असताना दिसले.

त्यांना मग मी विचारले तुम्ही हा टी शर्ट कुठुन घेतला? तर तो माणुस म्हणाला की माझे नाव स्टिव्ह आहे व मी केलब ड्रेसलचा अंकल आहे!

मी व आदित्य चाट पडुन अवाकच झालो! तेवढ्यात त्याची बायको आमच्याजवळ आली व तिने मला विचारले की आम्ही भारतिय आहोत का? ती स्वतः सुद्धा भारतियांसारखी दिसत होती पण मी म्हटले कदाचित मेक्सिकन बाइ पण असु शकेल. मी म्हटले की मी अमेरिकेत गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासुन राहात आहे पण हो मी मुळचा भारतियच आहे. तर ती म्हणाली तिचे वडिल गोव्याचे व आई मुंबईची आहे! मला तिने विचारले की मुंबाईत मी कुठला? मी म्हटले दादरचा. ती म्हणाली तिची आई कुलाब्यात राहायची.

हे असे आमचे संभाषण होत असताना मी त्या दोघांना सांगीतले की आज माझ्या मुलाला इथे केलब ड्रेसलची रेस बघायला आणुन मी त्याला फादर्स डे चे ( एक दिवस आधीच!) कसे अरली सरप्राइज दिले व आदित्य कसा गेली कित्येक वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करत आहे व केलब ड्रेसल त्याचा कसा आयडल आहे.

ते ऐकुन गुड लक यंग मॅन! असे म्हणत त्या दोघांनी आदित्याचा हँड शेक केला.

मी त्या दोघांना म्हटले की आदित्यचा केलब ड्रेसल बरोबर फोटो काढुन घेणे त्याची लोकप्रियता व इथली सिक्युरीटी बघुन तर अगदी अशक्य गोष्ट वाटते तर निदान तुमच्या बरोबर तरी त्याचा एक फोटो मी काढु शकतो का?

तर ते मला म्हणाले की त्यांच्या स्वतःच्या वाट्याला सुद्धा या आठवड्यात केलब आलेला नाही व त्यांनी ग्रेशिअसली फोटो काढायला परवानगी दिली. इतकेच नव्हे तर त्या दोघांनी “ टिम केलब ड्रेसल“ च्या बाकीच्या त्याच्या सगळ्या नातेवाइक इन्क्ल्युडिंग केलब ड्रेसलच्या आई- वडिलांना भेटायला व त्यांच्याबरोबर फोटो काढुन घ्यायला त्यांच्या व्ही आय पी सेक्शन मधे यायचे आमंत्रण आम्हाला दिले!

ते ऐकुन आदित्यचे डोळे एकदम विस्फारले व आदित्यचा( आणी माझाही!) आनंद गगनात मावेनासा झाला.

पण लवकरच ८ वाजता केलबची आजची पहीली फायनल सुरु होणार होती म्हणुन मग मी म्हटले ती रेस झाल्यावर आम्ही त्या सेक्शनमधे आले तर चालेल का?

ते म्हणाले जरुर! जस्ट त्या सेक्शनमधे येउन त्यांना वेव्ह करा. ते सगळे त्या सेक्शनमधे शेवटच्या रो मधे बसलेले असतील.

केलब ड्रेसलने त्याची १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल सहज जिंकली व त्यानंतर सुरु होणार्‍या २०० मिटर्स वुमन्स बॅकस्ट्रोक फायनलच्या आधी आम्ही लगेच टिम केलब ड्रेसलची फॅमीली जिथे बसली होती तिकडे जायला पोबारा केला.

तिथे पोहोचल्यावर केलबचा अंकल स्टिव्ह याने आम्हाला लगेचच पाहीले व वेव्ह करुन आम्हाला जवळ बोलावले. त्याने केलब ड्रेसलच्या आईवडिलांना आम्ही कोण हे व आम्ही तिथे त्यांच्याबरोबर आदित्यचा फोटो काढायला येणार असल्याची आधीच कल्पना दिली होती.

पण तेवढ्यात वुमेन्स २०० मिटर्स बॅकस्ट्रोक स्पर्धा चालु होणार होती व शर्यत सुरु होण्याच्या आधीचा पिनड्रॉप सायलंस सुरु झाला.

तेव्हा केलबच्या आइने आदित्यला हग करुन जवळ घेतले व तिच्या बाजुला असलेल्या केलबच्या वडिलांच्या सिटवर ती रेस बघायला आदित्यला तिच्या जवळ बसवुन घेतले. मग म्हणुन केलबच्या वडिलांनी व मी मागेच असलेल्या भिंतीला टेकुन ती वुमेन्स २०० बॅकस्ट्रोकची रेस बघीतली! कॅन यु बिलिव्ह इट?

मग ती रेस संपल्यावर केलबच्या आईने आदित्यला म्हटले की केलब तर आता तुझ्याबरोबर फोटो काढायला इथे येउ शकणार नाही पण हे केलबच्या चेहर्‍याचे कार्डबोड कट आउट् तु हातात धर असे म्हणुन तिने केलबच्या चेहर्‍याचे कार्डबोर्ड कटआउट आदित्यच्या हातात दिले व मग मी आदित्यचा त्यांच्याबरोबर फोटो काढला व त्याच्या सगळ्या फॅमीली व फ्रेंडसमोरही (ते सगळे त्या व्हि आय पी सेक्शमधल्या वरच्या दोन रो मधे बसुन ) आदित्यचा फोटो कढायाला केलबच्या आइने मला सांगीतले व मी तसाही एक फोटो काढला! : )

असा हा कालचा दिवस आदित्यसाठी( व माझ्यासाठीही) एक मेमोरेबल अरली फादर्स डे ठरला!

लवकरच ते फोटो इथे अपलोड करीन

बाकी ओमाहामधले सी एच आय सेंटरमधले यु एस ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्सचे जबरदस्त फेस्टिव्ह अ‍ॅटमॉसफिअर याबद्दल व कालच्या सगळ्या रेसचा मेमोरेबल अनुभव मी ऑलिंपिक्स बीबीवर लवकर टाकीनच.

किती मस्त अनुभव आला मुकुंद तुम्हाला! छानच!
जोकोविचने फायनल संपल्यावर त्याची रॅकेट एका मुलाला देऊन टाकली तेव्हा तो मुलगा केवढा खूष झाला होता! आयुष्यभर जपून ठेवावी अशी आठवण!

मुकुंद, हा प्रतिसाद आणि प्रकाशचित्र याच ग्रुपात एक वेगळा धागा करून लिहू शकाल का? म्हणजे टेनिसच्या धाग्यात हरवणार नाही.

सिनसिनाती ओपन 2012 ला मला असा अनुभव आला होता. फायनल होती जोकोविच आणि फेडरर मध... फेडरर जिंकला होता.. एक सेट तर बेगल होता... जबरदस्त खुश होतो आम्ही...नंतर आम्ही 2 तास रांगेत उभे होतो स्वाक्षरी घेण्यासाठी... फेडरर ला भेटलो.. शेक हँड केला.. बॉल वर ऑटोग्राफ घेतला...

नेमस्तक, वेगळा धागा उघडुन यु. एस. ऑलिंपिक्स स्विमिंग ट्रायल्स संबधीत माझ्या पोस्ट्स व फोटो मी त्या बीबीवर नेले आहेत. त्यामुळे इथली त्याबाबतची माझी पोस्ट्स व माझे फोटो तुम्ही डिलिट करु शकता. झालच तर त्यासंबंधित सगळे प्रतिसादही तुम्ही तिथे ट्रांसफर करु शकता म्हणजे हा बीबी मुळ विषयाबद्दलच राहील.

इथे विषयांतर झाले त्याबद्दल क्षमस्व!

काल फेडरर हरता हरता वाचला. एकदम वाईट खेळत होता. ४५ नटाळक्या चुका. जितेंगे तो और भी लढेंगे. पण सध्यातरी काही खर नाही अस वाटतय.

सेरेना विल्यम्सच्या दुखापतीबद्दल वाचून वाईट वाटलं Sad आज जोको पण किती वेळा पडला. स्लिपरी कोर्ट्सचं काही तरी केलं पाहिजे या लोकांनी.

Pages