Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*तरी ९२ ला विजयी चौकार
*तरी ९२ ला विजयी चौकार मारल्यावर ९६ झाले आहेत. * - मीं मॅच पहातां नाहीं आली. 96 नाबाद एल्गारचं शतक कां हुकावं तें कळलं नाहीं हें आधीच स्पषट करून कोणत्या परिस्थितीत शतक पूर्ण झाले नाहीं याबाबत मीं फक्त कुतूहल व्यक्त केलं होतं. प्रत्यक्षदर्शीचं मत म्हणून मान्य.
पण शतक करणं व संघ जिंकण्याची मानसिकता याचं जणूं अतूट वैर आहे , हें नाहीं पटत. क्रिकेटच्या सुरुवातीपासूनच ' शतक करण्या'ला एक प्रतिकात्मक महत्व आहेच आहे व अगदींच सामना जिंकणं/ हरणंच त्यावर अवलंबून नसेल, तर शक्य असेल तिथे शतक करणं ही क्रिकेटमधील स्वाभाविकपणे अपेक्षित गोष्ट आहे. मीं तरी त्याचा हरण्या -जिंकण्याच्या मानसिकतेशी संबंध जोडून क्रिकेटच्या एका निखळ आनंदाला मुकणार नाहीं.. अर्थात, इतरांना वेगळं काही वाटणं यांत कांहींच गैर नाहीं.
शतकांचा हव्यास असूंच नये पण
शतकांचा हव्यास असूंच नये पण प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे एक खास महत्व असतं हें नाकारण्यात काय हंशील आहे ? >> +१. आत्ता पुजारा, राहणे, कोहली च्या नावाने तीच बोंब सुरू आहे कि.
"प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे
"प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे एक खास महत्व असतं हें नाकारण्यात काय हंशील आहे ?" - सहमत! माइलस्टोन्स ना महत्व असतंच.
"शतकाचा विचार केला असता..." - ह्या पुढे इतकं जर-तर आहे की सगळीच पोस्ट निसरडी झालीय.
"पण काल आफ्रिकेच्या कप्तानाने माझ्यासारखा विचार केला हे मला तरी आवडले" - बाबो!!!
प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे एक
शतकांचा हव्यास असूंच नये पण प्रत्येक शतकाला क्रिकेटमधे एक खास महत्व असतं हें नाकारण्यात काय हंशील आहे ? >>> वैयक्तिक शतकाला दिलेले महत्व हेच मुळात हव्यासातून आलेले आहे
“ वैयक्तिक शतकाला दिलेले
“ वैयक्तिक शतकाला दिलेले महत्व हेच मुळात हव्यासातून आलेले आहे” - ग्रेसपासूनच्या समस्त क्रिकेटियर्सनी लाजून माना खाली घालाव्या ह्या दर्जाचं विधान आहे सर!! तसाही सगळा घोळ ह्या डेसिमल सिस्टीम ने घातलाय. हेग्जाडेसिमल सिस्टीम वापरात असती तर त्या ९६ ला सोन्याचा भाव आला असता.
काही क्रिकेटियर्स अल्पसंतृष्ट सुद्धा होते. उदा. https://youtu.be/14-MsipMuy4
कुणीतरी नवा धागा काढा आता. सर
कुणीतरी नवा धागा काढा आता. सर, रूनमेश सर, ऐकताय ना?
उस्मान ख्वाजाची एक अप्रतिम
उस्मान ख्वाजाची एक अप्रतिम खेळी!!! ट्रॅव्हिस हेड ला कोव्हिड झाल्यामुळे त्याच्या जागी आलेल्या ख्वाजाने टेस्टच्या दोन्ही इनिंग्ज मधे शतक झळकावलं. व्हॉट अ परफॉर्मन्स!!
@ फिल्मी
@ फिल्मी
हो, क्रिकेट नेहमीच पहिले प्रेम..
क्रिकेट - ७
https://www.maayboli.com/node/80861
Pages